25/09/2021
सुवर्ण संधी ! सुवर्ण संधी !!सुवर्ण संधी
मोफत ! मोफत !! मोफत!!!
चिपळूण शहर व चिपळूण तालुक्यातील .......
SC आणि ST प्रवर्गातील बचतगटातील महिलांसाठी किंवा नव्याने उद्योग व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असलेल्या नव उद्योजिका, SC ,ST मधील सुशिक्षित बेरोजगार युवती ,महिला ज्यांचे वय अठरा ते पंचेचाळीस वर्षे या दरम्यान आहे,ज्यांचे शिक्षण किमान आठवी पास आहे .अशा. होतकरू आत्मविश्वासू ,जिद्दी, महत्व कांक्षी, दुरदृष्टी,असलेल्या महिलांसाठी सुवर्ण संधी...
EDII अहमदाबाद व टाटा कम्युनिकेशन मुंबई द्वारा आयोजित उदया प्रकल्पा अंतर्गत स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची मनस्वी इच्छा व स्वयंप्रेरणा असणाऱ्या सर्व माता, भगिनिंसाठी सुवर्ण संधी......
चिपळूण तालुक्यात चिपळूण,सावर्डे,पिंपळी खुर्द, धामण वणे येथे WEDP महिला उद्योजकता विकास कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मोफत एकदिवसीय शिबिरे कोरोनाचे नियम पाळून अनुक्रमे सप्टेंबरच्या पंधरा, सोळा, सतरा, व एकवीस तारखेला घेण्यात आली .
आता निकष पूर्ण करणाऱ्या अंतिम तीस महिला प्रशिक्षणार्थी ना WEDP या कार्यक्रमात प्रविष्ट करून घेता येणार आहे. एकदिवसीय कार्यक्रमाला वैयक्तिक कारणामुळे उपस्थित राहू न शकलेल्या महिलांसाठी ही शेवटची सुवर्ण संधी आहे. दिनांक २६ सप्टेंबर आणि २७ सप्टेंबर सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळेत श्री.प्रसाद अरविंद जोग , विघ्नहर्ता पिंपळी खुर्द.. डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन समोर.... अर्ज मागणी करून तिथेच भरून द्यावेत...येताना एक फोटो,आधार कार्ड झेरॉक्स,शाळा सोडल्याचा दाखला,जात प्रमाणपत्र, व अन्य documents बरोबर ठेवावीत. श्री.प्रसाद अरविंद जोग हे EDII अहमदाबाद यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील उदया प्रकल्पाचे समन्वयक आहेत.त्यांचा संपर्क व whatsapp क्रमांक 9930591242 असून... प्रशिक्षणास इच्छुक महिला अथवा त्यांच्या घरचे अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकतात.
सदर प्रशिक्षण हे चिपळूण मध्ये नव कोकण एज्युकेशन सोसायटीच्या DBJ कॉलेज च्या MMS/MBA बिल्डिंग मध्ये दिनांक एक 1 ऑक्टोबर ते 30 तिस ऑक्टोबर या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे (मानस आहे).सदर प्रशिक्षण हे SC ,ST प्रवर्गातील महिलांसाठी असून चोवीस दिवस हजर राहणे व अभ्यासक्रम पूर्ण करणे अनिवार्य आहे.
सकाळी अकरा ते दुपारी चार हा प्रशिक्षणाचा वेळ/कालावधी असेल .प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर अत्यंत महत्त्वाचे, व PMEGP किंवा CMEGP कर्ज प्रकरणास सहाय्यभूत ठरणारे प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
प्रकल्प उभारणी साठी सदर प्रमाणपत्र मौलिक स्वरूपाचे आहे. सदर प्रशिक्षण चार आठवड्यांच असेल
१ आठवडा
प्रकल्प निवड
२ आठवडा
संसाधनांचे एकत्रीकरण
३ आठवडा
उपलब्धि प्रेरणा,प्रकल्प अहवाल निर्मिती
४ आठवडा
व्यवसाय योजना आराखडा तयार करणे व व्यवस्थापन या स्वरूपाचे असणार आहे. मायक्रो लॅब, उद्योजकीय गुण संपदा,उद्योग व्यवसायाचे विविध प्रकार,व्यक्तिमत्त्व विकास,सॉफ्ट स्किल्स,सेलिंग स्किल्स,मार्केटींग स्किल्स,निगोशियेशन स्किल्स, मार्केट सर्व्हे,उद्योग व्यवसाय संधी शोध,प्रकल्प भेट,क्षेत्र भेट, रॉ मटेरियल माहिती, बाजारपेठ माहिती,प्राथमिक प्रकल्प अहवाल निर्मिती, प्रेझेंटेशन स्किल्स,AMT सिद्धी प्रेरणा ,PPR,DPR प्रकारचे प्रकल्प अहवाल , अकाउंटिंग, कॅश फ्लो, फंड flow, management,ROI,BEP, ना नफा ना तोटा बिंदू,जाहिरातीचे तंत्र, डिजिटल मार्केटींग, व्यवसाय वाढीसाठी सोशल मिडिया, बिझनेस प्लॅन, प्रोजेक्ट. फायनल कसा करावा,असे विस्तृत ज्ञान सोप्या मराठी भाषेतून उदाहरणातून महिला प्रशिक्षणार्थिना समाजवून दिले जाणार आहे.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर बारा महिन्यांचा Hand Holding सपोर्ट असणार आहे.प्रत्येक महिन्याला अनुधा वन होणार आहे. SC ,ST प्रवर्गातील महिला उद्योजक वाढाव्यात हा उदया प्रकल्पाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
कॉलेज पूर्ण झालेल्या पण सुशक्षित SC,ST बेरोजगार ,बचत गटातील युवतीही ह्या कार्यक्रमाचा लाभ घेऊ शकतात. हा मेसेज आपल्या माहितीतील संबंधितांना व्हॉट्सॲप वर copy करुन जरूर पाठवावा किंवा सोशल मीडिया वरून जरूर शेअर करावा ही अत्यंत नम्रतेची व कळकळीची विनंती.
आपला एक लाईक एक शेअर SC,ST महिला उद्योजिका घडविण्याच्या उदात्त कामात आम्हाला नव चैतन्य व प्रेरणा मिळवून देईल यात दुमत नाही.या अभियानात सर्वांचे सहकार्य मिळत आहे.NRLM,NULM चिपळूण टीमचा मी प्रसाद जोग व्यक्तिशः आभारी आहे.असेच सहकार्य व प्रेम राहू द्या...
ता. क
चिपळूणकरांनी हा मेसेज सर्व चिपळूणभर संबंधितांना शेअर करावा ही पुनश्च हात जोडून विनम्र विनंती
#चिपळूण