Nilesh kale's Udyogniti 2

Nilesh kale's Udyogniti 2 Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh kale's Udyogniti 2, Business consultant, kille Dharur, Dharur.

मराठी व्यवसायिकांना बिजनेससंदर्भात, अभ्यासपूर्ण पूर्ण लेख देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
अशा काही बाबी ज्या केवळ, इतर भाषांमध्येच उपलब्ध आहेत, त्या देखील आम्ही आमच्या वाचकांसाठी पूर्ण मराठी मध्ये देणार आहोत.

 विक्रीच व्यवसायात पैसा आणते.बाकी मार्केटिंग,ॲडव्हर्टायझिंग,PR, प्रमोशन,सोशल मीडिया, ब्रँडिंग... या सर्व गोष्टी आवश्यक आ...
03/06/2026



विक्रीच व्यवसायात पैसा आणते.

बाकी मार्केटिंग,ॲडव्हर्टायझिंग,PR, प्रमोशन,सोशल मीडिया, ब्रँडिंग... या सर्व गोष्टी आवश्यक आहेत,पण त्या पैसा खर्च करतात.

बघा ! पैसा तेव्हाच येतो जेव्हा एखादी Lead ग्राहकामध्ये बदलते आणि विक्रीची प्रक्रिया पूर्ण होते.

आज अनेक व्यावसायिक एका भ्रमात जगत आहेत... की,कधीतरी ग्राहक काहीच न ऑब्जेक्शन घेता खरेदी करील,पण त्याच्या समोर ढिगभर ऑप्शन असताना त्याने आपल्याकडेच खरेदी करावी यासाठी आपण प्रॉपर ट्रेन्ड असायल हवं .
बऱ्याच जणांचा अजून एक भ्रम असतो की,
"मला 10-15 वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे मी विक्री करू शकतो."
पण अर्धसत्य आहे .
अनुभव आणि विक्री कौशल्य या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
जग बदलत आहे,ग्राहक बदलत आहेत,खरेदी करण्याची मानसिकता बदलत आहे. त्यामुळे विक्रीमध्ये सातत्याने Training, Practice आणि नवीन Techniques शिकणे आवश्यक आहेत .

📌बऱ्याच जणांकडे कर्मचारी असतात... पण ते प्रभावी विक्री करू शकत नाहीत? मग तुम्ही हातावर हात धरून बसणार का ?

याच कारणासाठी उद्योगनीती बिझनेस कन्सल्टंट्स घेऊन येत आहेत 5 दिवसांचा विशेष विक्री प्रशिक्षण कार्यक्रम —
"Effective Selling"
विक्री वाढवून देणारा प्रॅक्टिकल कोर्स
या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:
1) ग्राहकांची मानसिकता समजून घेणे
2) विक्रीतील मानसशास्त्र (Sales Psychology)
3) प्रभावी प्रश्न विचारण्याची कला
4)ग्राहकांचा विश्वास जिंकण्याच्या पद्धती
5) आक्षेप (Objections) हाताळण्याचे तंत्र
6)विक्री पूर्ण (Closing) करण्याच्या Techniques
7) ग्राहकांना दीर्घकाळ जोडून ठेवण्याची कला
8)प्रत्यक्ष वापरता येतील असे Frameworks आणि Scripts

सर्वात महत्त्वाचे म्हणजे...
हा कोर्स फक्त ज्ञान देण्यासाठी आहे. आम्ही अशा प्रशिक्षणांमध्ये पुढचे कोर्स विकण्याचा प्रयत्न करत नाही.

जर तुम्हाला विक्रीचे शुद्ध, प्रॅक्टिकल आणि प्रत्यक्ष व्यवसायात वापरता येणारे ज्ञान हवे असेल ?, तर या प्रशिक्षणात सहभागी व्हा.

तारीख: 7 जून ते 12 जून
वेळ: रात्री 9 ते 10 (रोज 1 तास )
माध्यम: Zoom
फीस: फक्त ₹500
ट्रेनर: @ निलेश काळे बिझनेस कोच
contact : 9860555247

हा कोर्स जॉईन करण्यासाठी आपल्याला अगोदर रजिस्ट्रेशन ग्रुप जॉईन करावा लागेल त्याची लिंक खालील प्रमाणे आहे

https://chat.whatsapp.com/LPKWQdHjXkd3AlzZPw2MYG

 We at Shree Shantadurga Chamundeshwari Jewellers Belgaviare  looking for passionate, dedicated, and talented individual...
01/06/2026



We at Shree Shantadurga Chamundeshwari Jewellers Belgavi
are looking for passionate, dedicated, and talented individuals to be part of our team.

Open Positions:
✅ Sales Executive (Male/Female)
✅ HR Executive
✅ Tele Caller
✅ Accountant

Requirements: ✔ 2–3 Years of Experience
✔ Team-Oriented Attitude
✔ B.Com & Tally Knowledge (for relevant positions)

If you are looking for a rewarding career with a trusted jewellery brand, we would love to hear from you!

📍 Khade Bazar, Shahapur, Belgavi 590006
📞 +91 93533 23961
📧 [email protected]
Apply Today and Build Your Future With Us!

मनीष मार्केट,रविवार पेठ,पुणे येथील सुप्रसिद्ध कापड दुकानासाठी अनुभवी पुरुष सेल्समनची आवश्यकता आहे .तुम्ही जर इतर ठिकाणच्...
25/05/2026

मनीष मार्केट,रविवार पेठ,पुणे येथील सुप्रसिद्ध कापड दुकानासाठी अनुभवी पुरुष सेल्समनची आवश्यकता आहे .

तुम्ही जर इतर ठिकाणच्या अवास्तव टार्गेट आणि वेळेवर पगार न मिळण्यामुळे त्रस्त आहात का?
तर आता काम करा अशा ठिकाणी जिथे तुमच्या अनुभवाला आणि मेहनतीला योग्य मान मिळेल!

✨ ‘श्रीराम लाईफस्टाईल’ मनीष मार्केट पुणे मध्ये अनुभवी सेल्स पर्सनची आवश्यकता आहे.

तुम्हाला काय मिळेल ?

✅ वेळेवर पगार व इन्सेंटिव्ह
✅ कामाच्या निश्चित वेळा
✅ सन्माननीय आणि सकारात्मक वातावरण
✅ कपड्यांच्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना प्राधान्य
📍 ठिकाण : रविवार पेठ, पुणे
📞 संपर्क : 9028444446
जर तुम्हाला सेल्समध्ये आत्मविश्वास असेल आणि ग्राहकांशी उत्तम संवाद साधण्याची कला असेल, तर आजच संपर्क करा!


व्यवसाय सुरू करणे हे धाडस असते.पण व्यवसाय “टिकवणे”, “वाढवणे” आणि “स्वतःशिवाय चालणारी सिस्टीम” बनवणे — ही खरी उद्योजकता अ...
23/05/2026

व्यवसाय सुरू करणे हे धाडस असते.
पण व्यवसाय “टिकवणे”, “वाढवणे” आणि “स्वतःशिवाय चालणारी सिस्टीम” बनवणे — ही खरी उद्योजकता असते.
आज अनेक MSME, स्टार्टअप आणि छोटे-मोठे व्यापारी ( मी इथे मुद्दाम उद्योजक हा शब्द वापरत नाही ) एका धोकादायक सापळ्यात अडकले आहेत — Founder’s Trap.
हा असा सापळा आहे जिथे व्यवसाय वाढत असतो, उलाढाल वाढत असते, लोक वाढत असतात… पण संस्थापक मात्र दिवसेंदिवस अधिक अडकत जातो.
सकाळपासून रात्रीपर्यंत प्रत्येक फोन त्यालाच.
प्रत्येक निर्णय त्याचाच.
प्रत्येक पेमेंट त्याच्याकडून.
प्रत्येक प्रॉब्लेम त्याच्यासमोर.
कर्मचारी काम करण्याऐवजी “साहेब काय सांगतील?” याची वाट पाहत असतात.
आणि हळूहळू व्यवसाय हा संस्था न राहता एका व्यक्तीभोवती फिरणारे केंद्र बनतो.
अनेक लोक व्यवसाय सुरू झाल्यानंतर स्वतःला एखादा “विशेष” दर्जा मिळाल्यासारखे समजू लागतात.
नावाच्या पुढे Founder, CEO, Director अशी विशेषणे लागली की जणू काही आयुष्याची लढाई जिंकली असे वाटते.
मोठ्या कार्यक्रमात फोटो काढणे, सोशल मीडियावर स्वतःला ब्रँड म्हणून दाखवणे, लोकांसमोर “मी व्यवसाय करतो” असे सांगणे — या गोष्टींमध्ये ते इतके गुंतून जातात की व्यवसायाच्या मूलभूत गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते.
पण वास्तव खूप कठोर असते.
मार्केटला तुमच्या पदवीशी काही देणंघेणं नसतं.
तुमच्या visiting card वर Founder लिहिलंय की Chairman — याने ग्राहक पैसे देत नाही.
ग्राहकाला फक्त तीन गोष्टी महत्त्वाच्या असतात — गुणवत्ता, विश्वास आणि सातत्य.
अनेक व्यवसाय फेल होतात कारण त्यांचा मालक स्वतःला “व्यवसायापेक्षा मोठं” समजू लागतो.
तो शिकणं बंद करतो.
इतरांचे ऐकणं बंद करतो.
टीका स्वीकारणं बंद करतो.
आणि सर्वात धोकादायक म्हणजे — तो सिस्टम बनवणं बंद करतो.
खरा उद्योजक स्वतःला केंद्रस्थानी ठेवत नाही.
तो अशी व्यवस्था तयार करतो की त्याच्या अनुपस्थितीतही व्यवसाय चालू राहिला पाहिजे.
कारण जर व्यवसाय मालकाविना दोन दिवस चालत नसेल, तर तो व्यवसाय नसून स्वतःसाठी निर्माण केलेली नोकरी असते.
व्यवसाय मोठा करण्यासाठी फक्त मेहनत पुरेशी नसते; संरचना लागते.
Hierarchy लागते.
Processes लागतात.
Accountability लागते.
Reporting लागते.
Training लागते.
लोकांवर विश्वास ठेवण्याची मानसिकता लागते.
अनेक मालक प्रत्येक गोष्ट स्वतः करण्यामध्ये अभिमान मानतात.
“माझ्याशिवाय काहीच होत नाही” हे वाक्य त्यांना शक्ती वाटते.
प्रत्यक्षात ती त्यांच्या अपयशाची सुरुवात असते.
कारण जगातील कोणतीही मोठी कंपनी एका व्यक्तीवर उभी नसते.
ती सिस्टीमवर उभी असते.
व्यवसायाचा खरा स्केल तेव्हा सुरू होतो जेव्हा मालक “Operator” मधून “Strategist” बनतो.
जेव्हा तो दिवसभर छोट्या छोट्या समस्या सोडवण्यात वेळ घालवत नाही, तर पुढच्या पाच वर्षांचा विचार करतो.
जेव्हा तो स्वतःभोवती सक्षम लोक तयार करतो.
जेव्हा तो प्रत्येक गोष्टीत स्वतःची गरज कमी करतो.
पण इथे आणखी एक मोठा भ्रम अनेक लोकांच्या मनात असतो —
“मी व्यवसाय सुरू करेन आणि काही वर्षांत पूर्णपणे फ्री होईन.”
ही कल्पना आकर्षक आहे, पण पूर्ण सत्य नाही.
हो… व्यवसायाने तुम्हाला स्वातंत्र्य दिलं पाहिजे.
पण त्या स्वातंत्र्याचा अर्थ “काम न करणे” असा नसतो.
खरा अर्थ असा असतो की — तुम्ही गुलामासारखे काम न करता, मालकासारखे काम करता.
अनेक लोकांना वाटतं की एक दिवस असा येईल जिथे ते ऑफिसमध्ये जाणार नाहीत, फोन उचलणार नाहीत, निर्णय घेणार नाहीत आणि तरीही व्यवसाय चालत राहील.
प्रत्यक्षात मोठे उद्योजक देखील आजही व्यवसायात गुंतलेले असतात.
फरक फक्त एवढाच असतो की ते रोजच्या गोंधळात अडकत नाहीत; ते दिशा ठरवतात.
व्यवसाय म्हणजे शेतीसारखा असतो.
पीक मोठं झालं म्हणून शेतकरी शेतीकडे दुर्लक्ष करत नाही.
तो कायम निरीक्षण करत राहतो, बदल करत राहतो, काळजी घेत राहतो.
कारण ज्या दिवशी मालक पूर्णपणे निष्क्रिय होतो, त्या दिवसापासून व्यवसायाचा उतार सुरू होऊ शकतो.
म्हणून “मी पटकन मुक्त होणार” या भ्रमात राहू नका.
व्यवसाय तुमच्याकडून वेळ मागेल, ऊर्जा मागेल, मानसिक ताकद मागेल.
कधी कधी वैयक्तिक सुखांचा त्यागही मागेल.
आणि यात काहीच चुकीचं नाही.
कारण व्यवसाय हा फक्त पैसा कमावण्याचं साधन नसतो;
तो एक जबाबदारी असतो, एक नेतृत्व असतं, एक सतत चालणारी निर्मिती प्रक्रिया असते.
आज अनेक व्यवसायांची अवस्था अशी आहे की ऑफिस मोठं आहे, स्टाफ मोठा आहे, turnover मोठा आहे… पण मालक मानसिकदृष्ट्या थकलेला आहे.
कारण त्याने व्यवसाय वाढवला, पण स्वतःभोवती सिस्टम उभी केली नाही.
खरा प्रश्न हा नाही की “तुमचा व्यवसाय किती मोठा आहे?”
खरा प्रश्न हा आहे की —
तुमचा व्यवसाय तुमच्याशिवाय किती सक्षम आहे?
जर प्रत्येक निर्णयासाठी लोक अजूनही तुमच्याकडे पाहत असतील,
जर प्रत्येक समस्येचा शेवट तुमच्याकडे होत असेल,
जर तुम्ही एक दिवस फोन बंद केला आणि व्यवसाय थांबत असेल —
तर तुम्ही अजून व्यवसायाचे मालक नाही.
तुम्ही त्या व्यवसायाचे कैदी आहात.
आणि म्हणूनच प्रत्येक उद्योजकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे —
“मी व्यवसाय उभा करतोय… की फक्त स्वतःभोवती गोंधळ उभा करतोय?”
कारण शेवटी मोठा व्यवसाय हा मोठ्या ऑफिसने तयार होत नाही.
तो मोठ्या विचारांनी, मजबूत सिस्टीमने आणि जमिनीवर राहणाऱ्या नेतृत्वाने तयार होतो.

©️ निलेश काळे, बिजनेस कोच .
उद्योगनीती बिजनेस कन्सल्टंटस
संग्राम नगर सातारा परिसर
छत्रपती संभाजीनगर .
9860555247

संकल्प एकच…जास्तीत जास्त शतकवीर फ्रॅंचाईजी घडवण्याचा! 💯🚀व्यवसायामध्ये परफॉर्मन्स हवा असेल ? तर ट्रेनिंग हा पर्याय नसून ग...
21/05/2026

संकल्प एकच…
जास्तीत जास्त शतकवीर फ्रॅंचाईजी घडवण्याचा! 💯🚀

व्यवसायामध्ये परफॉर्मन्स हवा असेल ? तर ट्रेनिंग हा पर्याय नसून गरज असते.
आणि सातत्याने दिलेले योग्य ट्रेनिंग अनेक सामान्य लोकांमध्येही असामान्य क्षमता निर्माण करू शकते.

आज Success Abacus & Education (i) pvt,ltd सातारा.यांच्या हेड ऑफिस मधून आपल्या ऑनलाईन फ्रॅंचाईजींसाठी ट्रेनिंग सेशन आयोजित करण्यात आले होते .

जून महिन्यापासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रत्येक फ्रॅंचाईजीने जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे, अधिकाधिक ऍडमिशन मिळवावेत आणि आपल्या भागात शिक्षण क्षेत्रात नवा विक्रम निर्माण करावा यासाठी आज सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

©️ निलेश काळे,बिजनेस कोच,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
संग्राम नगर,सातारा परिसर,
छत्रपती संभाजीनगर .
9860555247







फेसबुकवर सध्या एक ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासा...
20/05/2026

फेसबुकवर सध्या एक ट्रेंड मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचे, विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीचे छायाचित्र वापरून त्यासोबत एखादी आकर्षक ओळ लिहायची आणि त्यातून स्वतःच्या व्यवसायाची जाहिरात करायची. वरवर पाहता ही कल्पना हुशार वाटू शकते, कारण लोकांचे लक्ष पटकन वेधले जाते. पण व्यवसायाच्या दृष्टीने पाहिले, तर हा मार्ग योग्य नाही.
काही दिवसांपूर्वी मोदीजींनी नागरिकांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते. या विधानाचा आधार घेऊन अनेकांनी “मोदीजींनी सोने खरेदी करू नका म्हटले आहे, पण आमचे उत्पादन खरेदी करू नका असे सांगितलेले नाही” अशा प्रकारच्या जाहिराती तयार केल्या. काही लोकांना हा ट्रेंड मजेशीर वाटला, पण प्रत्यक्षात हा प्रकार अनेक अडचणी निर्माण करू शकतो.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो त्यांच्या परवानगीशिवाय वापरणे चुकीचे ठरू शकते. आपण आपल्या उत्पादनाला विश्वासार्हता मिळावी म्हणून त्या व्यक्तीची प्रतिमा वापरत असतो. ग्राहकांना असे वाटू शकते की त्या व्यक्तीने आपल्या व्यवसायाला पाठिंबा दिला आहे. प्रत्यक्षात तसे नसते. यामुळे गैरसमज निर्माण होतो.
दुसरे म्हणजे, हा प्रकार कायदेशीर अडचणीत आणू शकतो. सार्वजनिक पदावरील व्यक्तींची प्रतिमा वैयक्तिक व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो. तक्रार झाल्यास पोस्ट काढावी लागू शकते, नोटीस येऊ शकते किंवा कायदेशीर कारवाई होऊ शकते. थोड्या प्रसिद्धीसाठी एवढा धोका घेणे शहाणपणाचे नाही.
तिसरे कारण म्हणजे ब्रँडची प्रतिमा. व्यवसाय म्हणजे विश्वास. जर आपण फक्त व्हायरल होण्यासाठी कोणाचाही फोटो वापरत असू, तर ग्राहकांना वाटू शकते की आपला व्यवसाय गंभीर नाही. अल्पकाळात पोस्टला प्रतिसाद मिळेल, पण दीर्घकाळात ब्रँडची विश्वासार्हता कमी होऊ शकते.
चौथे म्हणजे ट्रेंडच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःची ओळख तयार करणे अधिक महत्त्वाचे आहे. आज एक ट्रेंड चालतो, उद्या दुसरा येतो. पण चांगला व्यवसाय हा दर्जा, प्रामाणिकपणा आणि सातत्यावर उभा राहतो.
मी माझ्या विद्यार्थ्यांना आणि क्लायंटना नेहमी एकच गोष्ट सांगतो: “जाहिरात अशी करा की उद्या ती पोस्ट दाखवताना तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे.” प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर किंवा प्रतिमेवर आधारलेली जाहिरात काही वेळा लक्ष वेधून घेईल, पण स्वतःच्या मूल्यांवर उभा असलेला व्यवसायच खऱ्या अर्थाने टिकतो.
म्हणूनच, व्हायरल होण्याच्या मोहापेक्षा सुरक्षित, कायदेशीर आणि विश्वासार्ह मार्केटिंग निवडा. कारण व्यवसायात फक्त लोकांचे लक्ष मिळवणे महत्त्वाचे नसते; त्यांचा विश्वास जिंकणे अधिक महत्त्वाचे असते.

🎯 म्हणून करता तुम्ही अशा ट्रेन्ड च्या मोहात पडू नका ! आपले व्यवसायाची इमेज खालावून घेऊ नका !

प्रॉपर पद्धतीने मार्केटिंग करायची कशी आणि व्यवसाय वाढवायचा कसा ? हे शिकायचंय ? तर आम्ही आहोत ना .

खालील नंबर वर संपर्क करा !

©️ निलेश काळे,बिजनेस कोच,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
संग्राम नगर,सातारा परिसर,छत्रपती संभाजीनगर .
9860555247

🚀 We Are Hiring | Digital Marketing ExecutiveMale / Female ( पदे :02)वनाज, पुणे येथील प्रतिष्ठित प्रायव्हेट लिमिटेड कंपन...
19/05/2026

🚀 We Are Hiring | Digital Marketing Executive

Male / Female ( पदे :02)

वनाज, पुणे येथील प्रतिष्ठित प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसाठी Digital Marketing Executive पदासाठी उमेदवार हवे आहेत .

यायला हवं :

1) CorelDRAW
2)Photoshop
3) Social Media Marketing

📌पगार : स्कील आणि अनुभवावर
🎯निवड : प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे
✅ अनुभव: 6 महिने ते 2 वर्षे
📍 लोकेशन: वनाज, पुणे
📞 संपर्क / WhatsApp:
उद्योगनीती बिजनेस कन्सल्टंट
9860555247 / 9518950764
📩 तुमचा Resume आजच पाठवा!
योग्य संधीची वाट पाहू नका — संधी स्वतः मिळवा!

छोट्या दुकानात आणि छोट्या ऑफिसमध्ये Hierarchy का आवश्यक आहे?अनेक छोटे दुकानदार आणि लघुउद्योजक असा विचार करतात की, “आपला ...
15/05/2026

छोट्या दुकानात आणि छोट्या ऑफिसमध्ये Hierarchy का आवश्यक आहे?
अनेक छोटे दुकानदार आणि लघुउद्योजक असा विचार करतात की, “आपला व्यवसाय छोटा आहे. आपण स्वतः सर्व पाहू शकतो. मग वेगळी पदरचना (Hierarchy) कशाला?”
पण व्यवसायाचा आकार लहान असला तरी व्यवस्थापनाची शिस्त मोठ्या कंपनीसारखी असणे अत्यंत महत्त्वाचे असते.
छोट्या दुकानात किंवा ऑफिसमध्ये किमान खालील तीन स्तर असणे आवश्यक आहे:
Owner / Admin (मालक किंवा प्रशासक)
Manager (व्यवस्थापक)
Staff (कर्मचारी)
1. मालकाने सर्व कामांत अडकू नये
अनेक व्यवसायांमध्ये मालकच खरेदी करतो, विक्री करतो, ग्राहकांशी बोलतो, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवतो, अकाउंट्स पाहतो आणि तक्रारीही हाताळतो.
यामुळे मालकाचा वेळ पूर्णपणे रोजच्या कामांमध्ये जातो.
मालकाचे खरे काम काय असते?
व्यवसायाची दिशा ठरवणे
नवीन संधी शोधणे
मार्केटिंग रणनीती तयार करणे
नफा वाढवणे
विस्ताराचे निर्णय घेणे
Hierarchy असल्यास मालकाला धोरणात्मक कामांसाठी वेळ मिळतो.
2. Manager म्हणजे मालकाचा उजवा हात
Manager हा मालक आणि कर्मचारी यांच्यातील दुवा असतो.
त्याची प्रमुख जबाबदाऱ्या:
कर्मचाऱ्यांना कामाचे वाटप
दैनंदिन कामावर देखरेख
ग्राहकांच्या समस्या सोडवणे
शिस्त राखणे
रिपोर्टिंग करणे
यामुळे मालकावरचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होतो.
3. Staff ला स्पष्ट जबाबदारी मिळते
जेव्हा कर्मचारी थेट मालकाकडे धाव घेतात तेव्हा गोंधळ वाढतो.
पण Hierarchy असल्यास:
कोणाला रिपोर्ट करायचे हे स्पष्ट असते
कामाची जबाबदारी निश्चित होते
उत्तरदायित्व वाढते
शिस्त निर्माण होते
Hierarchy चे प्रमुख फायदे
1. निर्णय प्रक्रियेत वेग
प्रत्येक छोट्या निर्णयासाठी मालकाची गरज पडत नाही.
2. मालकाचा वेळ वाचतो
मालक उच्च-मूल्याच्या निर्णयांवर लक्ष केंद्रित करू शकतो.
3. कर्मचारी अधिक जबाबदार बनतात
कामाचे मोजमाप आणि फॉलोअप सुलभ होते.
4. व्यवसाय विस्तारासाठी तयारी
नवीन शाखा सुरू करताना प्रणाली आधीपासून तयार असते.
5. मालकावर अवलंबित्व कमी
व्यवसाय मालक नसतानाही चालू राहतो.
6. ग्राहक अनुभव सुधारतो
तक्रारी आणि प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद मिळतो.
7. अंतर्गत शिस्त वाढते
प्रक्रिया स्पष्ट असल्याने गोंधळ कमी होतो.
उदाहरण
समजा एका रिटेल दुकानात 8 कर्मचारी आहेत.
Hierarchy नसल्यास:
सर्वजण थेट मालकाकडे येतात.
मालक सतत व्यस्त राहतो.
निर्णय उशिरा होतात.
कर्मचारी गोंधळतात.
Hierarchy असल्यास:
1 मालक
1 व्यवस्थापक
8 कर्मचारी
परिणाम:
काम सुरळीत चालते.
मालकाला रणनीतीसाठी वेळ मिळतो.
कर्मचारी अधिक जबाबदार होतात.
ग्राहक सेवा सुधारते.
व्यवसाय म्हणजे मशीन
व्यवसायाला मशीन समजा.
मालक = इंजिनिअर
Manager = मशीन ऑपरेटर
Staff = मशीनचे घटक
प्रत्येक भाग योग्य ठिकाणी असेल तर मशीन कार्यक्षमतेने चालते.
अंतिम संदेश
व्यवसायाचा आकार लहान असला तरी व्यवस्थापनाची रचना मोठ्या विचारांची असली पाहिजे.
Hierarchy ही खर्च नसून गुंतवणूक आहे.
ती:
मालकाला स्वातंत्र्य देते,
कर्मचाऱ्यांना दिशा देते,
ग्राहकांना उत्तम अनुभव देते,
आणि व्यवसायाला वाढीसाठी सक्षम बनवते.
छोटे दुकान असो किंवा छोटे ऑफिस — Owner, Manager आणि Staff अशी स्पष्ट Hierarchy असेल तर व्यवसाय अधिक शिस्तबद्ध, नफ्याचा आणि स्केलेबल बनतो.

©️ निलेश काळे,बिजनेस कोच,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
संग्रामनगर, सातारा परिसर, छत्रपती संभाजीनगर
9860555247

व्यवसाय ऑटोमेट  करायचा म्हणजे नेमकं काय? खरं चित्र समजून घ्या !Nilesh Kale सोशल मीडियावर आता बिझनेस कंटेंट खूप वाचला जात...
13/05/2026

व्यवसाय ऑटोमेट करायचा म्हणजे नेमकं काय? खरं चित्र समजून घ्या !

Nilesh Kale

सोशल मीडियावर आता बिझनेस कंटेंट खूप वाचला जातो. आम्हीही वाचतो, लिहितो. चांगली गोष्ट आहे. पण त्यात एक ट्रेंड खूप जोरात चालतोय – “माझा बिझनेस माझ्याशिवाय चालवा.”
हे ऐकल्यावर नव्या व्यावसायिकांचे डोळे चमकतात. लगेच लक्षात राहतं – “ बिजनेस ऑटोमेट करा!” तीन शब्द. बस्स. आणि मग सुरुवातीपासूनच ते या स्वप्नामागे लागतात. पण इथेच मोठी चूक होते.

खरं सांगायचं तर, व्यवसायाला ऑटोमेट करणं ही चांगली आणि नैसर्गिक इच्छा आहे. मी स्वतः बिझनेस कोच म्हणून याच विषयावर काम करतो. आम्हीही बिझनेस ऑटोमेशन, सिस्टीम आणि टीम बिल्डिंगवर खूप बोलतो. पण सत्य लपवता येत नाही. माझं काम तुम्हाला सत्य सांगणं आहे, कितीही कडू असलं तरी.

तुम्हाला व्यवसाय मुक्त करायचा असेल ? तर प्रथम तुम्हाला जास्तीत जास्त व्यस्त व्हावं लागतं. स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावं लागतं.

ही स्टेज चुकवता येत नाही. बायपास करायचा प्रयत्न केलात तर व्यवसायाचं मोठं नुकसान होतं.
नव्या उद्योजकांना बघा. कोच किंवा गुरूंच्या पोस्ट्स पाहून ते थेट “बिझनेस ऑटोमेट” या शब्दावर येतात. “मी कमी काम करणार, व्यवसाय आपोआप चालणार.” हा विचार सोपा आणि आकर्षक वाटतो. पण वास्तव वेगळं आहे.
सुरुवातीला तुम्हाला स्वतः हात घालून प्रत्येक गोष्ट करावी लागते.

कस्टमरशी बोलावं लागतं, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस कशी बनवायची ? ते पाहावं लागतं, विक्री कशी होते ? ते अनुभवावं लागतं,
चुकांमधून शिकावं लागतं. !
हे सगळं करताना तुम्ही व्यवसायाचा प्रत्येक कोपरा ओळखता.
मग जेव्हा तुम्ही प्रक्रिया तयार करता, SOPs लिहिता, तेव्हा त्या खऱ्या आणि प्रभावी होतात. कारण त्या तुमच्या प्रत्यक्ष अनुभवातून आलेल्या असतात. लोकांना काम द्यायला सोपं जातं. चुकांचं प्रमाण कमी होतं. व्यवसाय खरोखर स्थिर होतो.
ज्यांनी ही मेहनत चुकवली, ते नंतर अडचणीत येतात. टीम नेमली तरी काम नीट होत नाही. कस्टमर नाराज होतात. पैसा खर्च होतो पण परतावा मिळत नाही. आणि शेवटी निराशा येते.
मग खरं उत्तर काय?
प्रथम स्वतः पूर्ण गुंतवा.
व्यवसायाचे सर्व भाग स्वतः अनुभवा.
जे काम वारंवार होतं ते लिहून ठेवा.
एक एक प्रक्रिया मजबूत करा.
मग हळूहळू काम दुसऱ्यांकडे सोपवा.
ही प्रक्रिया सोपी नाही. थकवणारी आहे. पण याशिवाय दुसरा रस्ता नाही. मी कोच म्हणून हे सांगतो कारण मी खूप लोकांना हे घसरताना पाहिलं आहे. सोशल मीडियावर फक्त शेवटचं चित्र दाखवलं जातं – “मी समुद्रकिनारी बसलोय आणि बिझनेस चालतोय.” पण त्या समुद्रकिनारी पोहोचण्याआधी त्यांनी किती रात्री जागून मेहनत केली, हे कुणी दाखवत नाही.

मित्रांनो, स्वप्न बघा. बिझनेस ऑटोमेट करण्याची इच्छा ठेवा. पण त्या स्वप्नापर्यंत जाण्याचा खरा मार्ग विसरू नका. व्यस्त व्हा, मेहनत करा, सिस्टीम बनवा. मग मुक्ती आपोआप येईल. आणि ती टिकेलही.

ज्यांनी हे समजून घेतलं, त्यांचा व्यवसाय खरोखर मोठा आणि टिकाऊ होतो. बाकीचे फक्त ट्रेंडच्या मागे धावत राहतात आणि नुकसान करून घेतात.
तुमचा व्यवसाय तुम्हाला हवा तसा बनवा. पण घाई करू नका. मजबूत पाया बांधा. उरलेलं सगळं सोपं होईल.

या मेहनतीच्या टप्प्यावर तुम्हाला जर बिजनेस कोचिंग ची गरज लागली ? तर आम्ही आहोतच

@ निलेश काळे,बिझनेस कोच,
उद्योगनीती बिजनेस कन्सल्टंटस,
संग्राम नगर,सातारा परिसर,छत्रपती संभाजीनगर.
9860555247


#व्यवसाय
#उद्योजक




#व्यावसायिक





#बिझनेस










#मराठीव्यवसाय





भारतातील नवीन कामगार कायदे (Labour Codes): एक व्यापक सुधारणाभारत सरकारने कामगार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करत 29 जुन्या...
09/05/2026

भारतातील नवीन कामगार कायदे (Labour Codes): एक व्यापक सुधारणा

भारत सरकारने कामगार क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा करत 29 जुन्या कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून चार नवीन "Labour Codes" पूर्णपणे लागू करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
हे कोड 21नोव्हेंबर 2025पासून प्रभावी झाले आहेत. या सुधारणांचा उद्देश कामगारांचे संरक्षण, उद्योगांसाठी सोपे नियम (Ease of Doing Business) आणि आधुनिक कामाच्या स्वरूपाशी जुळवून घेणे हा आहे.

हे चार मुख्य Labour Codes कोणते?

1) Code on Wages, 2019 (वेतन संहिता)
2)Industrial Relations Code, 2020 (औद्योगिक संबंध संहिता)
3)Code on Social Security, 2020 (सामाजिक सुरक्षा संहिता)
4)Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020** (व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाच्या स्थिती संहिता)

या चार कोड्समुळे पूर्वीचे 29 वेगवेगळे कायदे एकत्र आले आहेत, ज्यामुळे अनावश्यक जटिलता कमी होईल आणि अनुपालन (Compliance) सोपे होईल.

मुख्य बदल आणि त्यांचे परिणाम

#वेतनाची_नवीन_व्याख्या_भत्ते (Allowances) एकूण रेम्युनरेशनच्या 50% पेक्षा जास्त असल्यास अतिरिक्त रक्कम ‘वेजेस’ मध्ये समाविष्ट होते. याचा परिणाम PF, Gratuity आणि इतर फायद्यांवर होतो. बेसिक सॅलरी किमान 50% ठेवण्याचा सल्ला दिला जातो.

ि_Gratuity_वर_प्रभाव :

नवीन वेतन व्याख्येमुळे PF योगदान आणि Gratuity ची रक्कम वाढू शकते. यामुळे काही कर्मचाऱ्यांचे Take-Home Salary कमी होऊ शकते, मात्र दीर्घकालीन सेवानिवृत्ती फायदे वाढतील.

ि_Platform_Workers_साठी

#सामाजिक_सुरक्षा: ही पहिलीच वेळ आहे जेव्हा गिग वर्कर्सना (उदा. Uber, Swiggy, Zomato) सामाजिक सुरक्षा योजनांचा (PF, ESI, Gratuity इत्यादी) फायदा मिळणार आहे. प्लॅटफॉर्म कंपन्यांना त्यांच्या टर्नओव्हरचा एक भाग सामाजिक सुरक्षा निधीमध्ये योगदान द्यावे लागेल.

#कामाचे_तास_आणि_ओव्हरटाईम आठवड्यातील कामाचे तास 48 पर्यंत मर्यादित. ओव्हरटाईमसाठी दुहेरी वेतनाची तरतूद. दिवसाचे 8 तास काम.

ाठी
Gratuity**: आता फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना एक वर्षाच्या सेवेनंतर प्रो-राटा Gratuity मिळण्याची तरतूद. पूर्वी 5 वर्षे आवश्यक होते.

्त्वाचे_बदल :

- सर्व कर्मचाऱ्यांना Appointment Letter अनिवार्य.
- महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करण्याची परवानगी (सुरक्षेच्या तरतुदींसह).
- किमान वेतनाची राष्ट्रीय फ्लोर लेव्हल.
- डिजिटल अनुपालन, एकच रिटर्न आणि कमी नोंदणी प्रक्रिया — MSME आणि स्टार्टअप्ससाठी फायदेशीर.

#कोणावर_होईल_परिणाम?
या बदलांचा थेट परिणाम कर्मचारी, उद्योगपती, HR विभाग, कारखाने, MSME, कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स, गिग वर्कर्स आणि स्टार्टअप्स** यांच्यावर होईल.

काही कर्मचाऱ्यांचे मासिक टेक-होम पगार कमी होण्याची शक्यता असली तरी PF, Gratuity, Retirement Benefits आणि सामाजिक सुरक्षा मजबूत होईल. उद्योगांसाठी नियम सोपे होऊन गुंतवणूक आकर्षित होण्यास मदत होईल.

#सरकारचे_धोरण;

सरकारने हे Labour Reforms “Ease of Doing Business” आणि “Worker Protection” या दोन्ही गोष्टींचा समतोल साधून आणले आहेत. हे सुधारणा औद्योगिक वाढ, कामगार कल्याण आणि Aatmanirbhar Bharat च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहेत.

: हे नवीन Labour Codes भारतीय कामगार कायद्यांना आधुनिक, पारदर्शक आणि समावेशक बनवतील. मात्र, पूर्ण अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय नियम (State Rules) आणि कंपन्यांनी आपल्या HR पॉलिसी अपडेट करणे आवश्यक आहे. कर्मचारी आणि नियोक्ते दोघांनीही या बदलांची माहिती घेऊन तयारी करावी.

©️ निलेश काळे,बिजनेस कोच,
उद्योगनिती बिजनेस कन्सलटंटस,
सातारा परिसर छत्रपती संभाजी नगर
9860555247

Address

Kille Dharur
Dharur
431124

Telephone

+919518950764

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh kale's Udyogniti 2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nilesh kale's Udyogniti 2:

Share