14/11/2020
संपू दे #अंधार सारा #उजळू दे आकाश तारे,
गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे....
जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा,
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा...
स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी,
मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी...
स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा
ही दिवाळी रोज यावी #माणसाचा #देव व्हावा....
#दिवाळी . . . . .
२०२० हे वर्ष जरी मानसिक त्रासाचे आणि अर्थहाणीचे गेले असले तरी..."ही दिपावली आपल्या सर्वांच्या जीवनात नवीन प्रकाश व चैतन्य घेऊन येवो, येणाऱ्या आनंदमय व प्रकाशमय जिवनाकरिता व सर्वांच्या आरोग्यासाठी आपणास आणि आपल्या संपुर्ण परिवारास मनःपुर्वक शुभेच्छा
! शुभं भवतु !
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
संदिप निंबाळकर आणि सहपरिवार
Utseco Solar
Web: www.utseco.com
Email: [email protected]
Contact: 7744 99 7744
7744 97 7744