12/07/2026
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विधानपरिषदेत आवाज उठवला !
गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये जवळपास 3000 पाझर तलाव, मध्यम प्रकल्प आणि कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता असल्याने आपला शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. शासनाने स्वतः मान्य केले आहे की 1406 बंधाऱ्यांचे नुकसान झाले आहे, मात्र त्यापैकी केवळ 196 कामे पूर्ण झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील 'मसलगा मध्यम प्रकल्पा'ला मोठी भेग पडल्यामुळे गेल्या वर्षी साठवलेले पाणी सोडून द्यावे लागले होते. नवीन पावसाळा तोंडावर आला तरी अद्याप ही दुरुस्ती झालेली नाही.
जलसंपदा मंत्र्यांनी यावर बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते, परंतु अद्याप कोणतीही बैठक झालेली नाही. ही सर्व दुरुस्तीची कामे तातडीने करून येणारे पाणी अडवणे अत्यंत गरजेचे होते, परंतु शासनाच्या संथ कारभारामुळे पाणी वाया जाण्याची आणि शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडण्याची भीती आहे.
ही दुरुस्तीची कामे कधी पूर्ण होणार?
शेतकरी आणखी किती दिवस अडचणीत राहणार? असा प्रश्न विधानपरिषदेत उपस्थित केला.