Vaidehi Biofertilizers

Vaidehi Biofertilizers Consultancy of Agriculture in day today farming practice.

All Types of Biofertilizers, Fertilizers, Pesticides, Seeds And other Agriculture products are Available

निसर्गाची किमया...पेरणी १५ जुन ला केली त्यानंतर काल पर्यंत म्हणजे ३५ दिवस पर्यंत पावसाचा थेंब ही नव्हता, (मध्यंतरी पान भ...
20/07/2025

निसर्गाची किमया...
पेरणी १५ जुन ला केली त्यानंतर काल पर्यंत म्हणजे ३५ दिवस पर्यंत पावसाचा थेंब ही नव्हता, (मध्यंतरी पान भिजवण्यापुर्ता एक दोन वेळा येऊन गेला) ओलावा कमी असल्यामुळे पेरलेले बियाणे खुपच पातळ (विरळ) उगवण झाली होती. हे सोयाबीन, तूर येईल की नाही याची शाश्वती नव्हती. परंतु काल पहाटेच्या (१९ जुलै) २०-२५ मिनीट च्या पावसाने सर्व चित्रच पालटले. बघु शकता ११ जुलै ला पिकाची काय अवस्था होती व‌ आज २० जुलै रोजी कशी आहे, पिक हिरवगार, टवटवीत दिसत आहेत. जर निसर्गाने साथ दिली तर शेतकरयांना कुठल्याही तकलादू (तीन चाकी) सरकारकडून मदतीची (विमा) अपेक्षा नाही. सरकार कडून तर काय अपेक्षा ठेवणार जर कृषीमंत्रीच विधानभवनात जुगार खेळत असेल तर...
मराठवाड्यातील बहुतेक जिल्हात १ महिन्यापेक्षा जास्त पावसाचा खंड पडला काही कोरडवाहू शेतकऱ्यांचे पिकं वाळून गेली पण चालू अधिवेशनात या कडे संबंधित जिल्ह्यातील आमदार, मंत्री व सरकार यापैकी कुणालाही यांच्या वयक्तीक भांडणासाठी व रम्मी मधून बाहेर पडून यासाठी लक्ष वेधून प्रश्न मांडायण्यासाठी वेळच मिळाला नाही, यामुळे दिसतय की शेती व शेतकर्याबद्द्ल सरकार व विरोधक सर्वच किती उदासीन आहेत....

कोरडवाहू शेतकरी...🌱🌾🌱🌾🌱

या वर्षी पाऊस में महिन्यातच चालू झाला होता, जून मध्ये सुरुवातीला ४ दिवस पाऊस पडला, पेरणी करावी, करु नये या गोंधळात पेरणी...
15/07/2025

या वर्षी पाऊस में महिन्यातच चालू झाला होता, जून मध्ये सुरुवातीला ४ दिवस पाऊस पडला, पेरणी करावी, करु नये या गोंधळात पेरणी करुन टाकली, जमीन म्हणावी तशी तापली नसल्यामुळे व पेरणी नंतर पाऊस नसल्याने सोयाबीन ऊगवन कमी झाली तरी वाटलं पाऊस पडल्यानंतर दुबार पेरणी करावी पण पेरणी करून एक महिना झाला नंतर पाऊस गायब झाला तो आजपर्यंत आलाच नाही, मग आहे तेच पिक जसं आल तसं ठेवायचं अस ठरवल, पण परिस्थिती खुप अवघड दिसतेय, ऊन पडतय, नुसतच जोराचा वारा फुकतोय, आहे ते पिक वाळत आहेत, कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणजे झालं....😞
काही भागात नुसता पाऊस पडतोय व आहे ते पिक, जमीन, माती सगळीच धुवून जात आहे, सरकारला नेते व पक्ष फोडा-फोडी पासून शेतकऱ्यांनकड बघायला वेळ नाही, नुसतच विमा भरून घेतात, विमा मंजूर पण होतो, ४-२ शेतकऱ्यांना विमा मिळतो, बाकी विमा कंपनी आणि नेते वाटून घेतात, बाकी शेतकरी विम्याची वाट बघत बसतात तो काय खात्यात येतच नाही.
अशी ही शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था आहे...!





शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देवाला सुद्धा शक्य नसतं...आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..पेहराव पाहू...
18/10/2022

शेतकऱ्यांची बरोबरी करणं हे देवाला सुद्धा शक्य नसतं...

आमच्या हॉटेल महिलाराज वर पायजमा शर्ट घातलेला माणूस आला..पेहराव पाहून मला ते शेतकरी आहेत हे सांगणं गरजेचं नव्हतं.....काउंटर ला आले अन म्हणाले मटण ताट कितीला आहेत... मी म्हटलं 250रुपयाला.. अन चिकन ताट.. मी म्हटलं 180ला... तो माणूस जरा वेळ बाहेर गेला अन म्हटला नुसता रस्सा अन भाकरी देता का... हो म्हटलं देतो की.. त्यांचीं एकूणचं हालचाल पाहून माणूस काही तरी टेंशन मध्ये असावा किंवा बचत करतं असावा असं मला वाटलं... दोन भाकरी अन रस्सा दया म्हटले... मी रस्सा आणी भाकरी भरायला लागल्यावर मला खूप अस्वस्थ वाटलं... मी त्याबरोबर मटणाची प्लेट पण दिली... ते पाहून त्या माणसानं मला मटणाची प्लेट नको आहो माझ्याकडे एवढे पैसे नाहीत म्हटले... मी म्हटलं नसू दया.... घ्या त्यांनी त्या मटणाच्या प्लेट ला अजिबात हात लावला नाही... मला माघारी घेऊन जायला भाग पाडलं...... मी त्यांना परत रस्सा मागितल्यावर रस्यात मटणाचे पीस घालून दिले.. अन त्यांना म्हटलं.. हे रस्यातले पीस आहेत त्यांनी खाल्ले... जेवण करून बडीशेप घेताना मग त्यांना विचारलं.... मी म्हटलं कुठले..काय करता.... त्यांनी गावाचं नावं सांगितले अन म्हटले भाजी इकायला आलो होतो... म्हणलं भाजी चांगल्या रेट मधी जाईल पण 1200रुपये आलं... भूक लागली म्हणून मागच्या दोन हॉटेल वर विचारलं.. तर.. एका हॉटेल वर शाकाहारी जेवणाची थाळी 120रुपयाला सांगितली.... पण तसलं पनीर बिनीर खाऊ वाटतं नाही...... मी त्यांना वरण भात मागितला तर म्हटले 60रुपये.... तुम्ही दोन भाकरी अन रस्सा 50रुपयात देतो म्हटला म्हणून जेवायला बसलोय.......आहो दोनशे अन तीनशे रुपये जेवायला घालवायला तेवढं पैसे नाहीत येत शेतकऱ्याकडे.... दिवाळी आलीय... आता पोरं मोठाली झाल्यात कॉलेज ला जात्यात पाच दहा हजार रुपये खर्च हाय..... या वाचलेल्या दोनशे रुपयात माझं दोन तीन दिवसाचं पेट्रोल भागंल.... कुठ खर्च करतं बसता.... मी म्हटलं येत जावा कधी वाटेल तवा... तवा ते बाबा हसलं अन म्हणालं.. आवं आता कवा दोन महिन्यांनी आमची अन मटणाची गाठ पडायची....
असं म्हणून ते बाहेर गेले.. अन गाडीला अडकवलेल्या पिशवीतून दोन भाजीच्या पेंड्या.. अन चार कोंबडीची अंडी आणून काउंटर वर ठेवली... मी त्यांना पैसे किती झाले ते सांगा म्हटल्यावर ते म्हणाले ... काय रावं साहेब मी नको म्हटलं तर तुम्ही मला मटण रस्यातून आणून दिलंच की..... मला माहिती नाय व्हयं.... आहो शेतकरी आहे मी....नुसतं कोंब फुटलं तर त्याला धान येईल का नाय ओळखणारी मानसं.... तुम्ही माझ्या पोटात दोन घास घातल्यात तर आम्ही तुम्हाला चार घास घालू... फक्त शेतकऱ्याला अजून या जगानं वळखलं नाही....
खरचं आहेत शेतकऱ्याची बरोबरी करायला देवाला सुद्धा जमणार नाही....
मच्छिन्द्र टिंगरे -बारामती 9527547547

16/10/2022

हया पट्याला सलाम करावा लागेल कारण आपण दिड वर्ष शेतात कष्ट करून 2 रू.ते 3 रू.किलो ऊस विकतो आणि हा चक्क 100रू किलो ऊस विकतो. एक किंट्टल ऊस 10000/-रू आणि एक टन ऊस 1,00,000/-रू या भावाने विकतो.👌🙏

"जिओस्मिन"
19/06/2022

"जिओस्मिन"

*RO फिल्टर्सवर बंदी* - SC आदेश!!!!                                                   रिव्हर्स ऑस्मोसिस पाण्यातील सर्व खन...
18/06/2022

*RO फिल्टर्सवर बंदी* - SC आदेश!!!!
रिव्हर्स ऑस्मोसिस पाण्यातील सर्व खनिजे काढून टाकते आणि खनिज नसलेले पाणी आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. भारतीय राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने प्रति लीटर 50 पेक्षा कमी विरघळलेले घन पदार्थ सोडणाऱ्या RO प्रणालींवर बंदी घातली आहे. इतर काही देशांमध्ये RO ला बंदी आहे. जे नियमितपणे RO वापरतात त्यांनी इतर जलशुद्धीकरण प्रणालींकडे जाण्याचा विचार करावा.

https://www.financialexpress.com/india-news/ban-on-ro-systems-to-continue-in-delhi-supreme-court-declines-to-stay-ngt-order/1772112/

*RO (रिव्हर्स ऑस्मोसिस) फिल्टर्स प्रतिबंधित* - SC आदेश!!!!

आजकाल प्रत्येकजण आरओचे पाणी पितात. _परंतु लोकांना माहित नसलेली गोष्ट म्हणजे, जवळजवळ सर्व RO युनिट्स, डीफॉल्टनुसार, पिण्याच्या पाण्यातून सर्व आवश्यक खनिजे काढून टाकतात ज्यामुळे गंभीर आरोग्य समस्या उद्भवतात._

कृपया PH आणि TDS साठी स्वतः पाण्याची चाचणी करत रहा आणि एखाद्याला आढळू शकते की बहुतेक RO (टॉप ब्रँड्ससह) चे TDS मूल्य 10-20 आहे जे अस्वीकार्य आहे.
त्याला *डेड* पाणी (डीमिनरलाइज्ड) म्हणतात आणि त्यामुळे कर्करोगही होऊ शकतो.

_कृपया तुमच्या RO च्या पाण्यावर नेहमी 50 ते 100 TDS असल्याची खात्री करा._

_50 किंवा 70 पेक्षा कमी काहीही अस्वीकार्य आहे._

_टीप: कमी tds असलेले पाणी खरे तर चवीला चांगले असते पण आरोग्यासाठी वाईट असते. 50 ते 100 च्या tds सह पाण्याला तितकीशी चव येत नाही, परंतु ते सर्वात सुरक्षित आहे._

आशा आहे सर्वांनी फॉलो कराल...

The Supreme Court said that the National Green Tribunal order prohibiting the use of RO filters in Delhi will continue.

*नेहमीच राया तुमची घाई**नका करू गडबड पेरणीला*https://youtu.be/Y1-TLTbqd1kबीज प्रक्रियाची ही लावणी जास्तीत जास्त शेतकऱ्या...
14/06/2022

*नेहमीच राया तुमची घाई*
*नका करू गडबड पेरणीला*

https://youtu.be/Y1-TLTbqd1k

बीज प्रक्रियाची ही लावणी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा...

*लाईक करा, शेअर करा, कमेंट करा महत्त्वाचे म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा*

*वैदेही बायोफर्टिलायझर्स एजन्सी*
औराद शाहजानी.
९६२३२३२७९९.

सर्व शेतकरी बांधवानी कृषि विभाग, तिफण फाउंडेशन संचालित सहाय्यक कृषि अधिकारी आणि राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलाइज.....

Address

Latur

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm

Telephone

+919766962799

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vaidehi Biofertilizers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share