06/04/2022
महाराष्ट्र शासनाने सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री साठी परवानगी देणे बाबत निर्णय घेतला आहे त्यावर सर्व समाज माध्यमात आपण आवाज उठवून शासनावर दडपण आणायचा प्रयत्न केला पण त्यास शासनाने भिक घातली नाही. परंतु आता कायदेशीर मार्गाने आपण शासनाचे या निर्णयाचे विरुद्ध आपली हरकत नोंदवून सदर वाईन विक्रीस विरोध करू शकतो. दारू, वाईन इत्यादी मुळे आपल्या तरुण मुलांचे आणि येणाऱ्या पिढीचे नुकसान होऊ शकते तरी आपण आपल्या हातातील स्मार्ट फोन वरून खालील ईमेल शासनास करून कायदेशीर मार्गाने हरकत नोंदवावी.
तमाम ग्राहकांना आग्रहाची विनंती की आपण नुसते सोशल मीडिया वर निषेध करणे पेक्षा सरकार कडे कायदेशीर हरकत नोंदवावी.
ईमेल:
[email protected]
मी खालील प्रकारे ईमेल केली आहे आपण पण करावी,
मा. आयुक्त,
राज्य उत्पादन शुल्क,
जुने जकात घर,
शाहिद भगत सिंह मार्ग,
फोर्ट, मुंबई ४०००२३
विषय : वाईन निर्णयाविरुद्ध हरकत बाबत...
महोदय,
उपरोक्त वरील विषयास अनुसरून मी या स्वतंत्र भारताचा स्वतंत्र नागरिक म्हणून मला मिळालेल्या सविधानातून हक्क व अधिकार नुसार व आपण केलेल्या आवाहना नुसार जनतेचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन सरकारद्वारे सामान्य नागरिकांना सूचना आणि हरकती नोंदविण्याचे नुकतेच आवाहन करण्यात आले आहे,
31 मार्च 2022 च्या जाहिराती नुसार मी आपणास सांगू इच्छितो की, वाईन मुळे येणारी पिढी बरबाद होईल आणि अशी कुठेही वाईन विक्री केली तर तळीराम चे राज्य येईल. बऱ्याच गुन्हामध्ये, महिला अत्याचार हे दारू पिऊन जास्त प्रमाणात होतात कारण दारू/वाईन पिल्याने माणसाची विचार करणेची शक्ती बधीर होते. शासनाच्या या निर्णयामुळे समाजात गुन्हेगारी जास्त प्रमाणात वाढेल तसेच येणारी पिढी ही नशेबाज होईल
त्यामुळे माझा या निर्णयास विरोध असून असा नागरिकांच्या हितास बाधक ठरणारे निर्णय आपण घेऊ नये अशी मी हरकत नोंदवत आहे.
कळावे आपला विश्वासू,
नाव:
ईमेल: