28/05/2021
आज आपण शॉप ऍक्ट लायसन्स व उद्यम रजिस्ट्रेशन बाबत समजून घेऊ
उद्योगाची सुरुवात करतांना , बँकेत खाते उघडताना हे लायसन्स आपल्याला आवश्यक असते .....
Shop Act Gumasta -
आपण कोणताही व्यवसाय जेव्हा सुरू करता तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी हवी असते, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका , महानगरपालिका यांची परवानगी हवी असते तसे न केल्यास Shop act Registration Maharashtra Act या कायद्यान्वये योग्य ती दंडात्मक कारवाई होऊ शकते.
0 to 9 Employees त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
1)Photo
2)Sign photo
3) Firm name
4) Nature of business
5) Shop photo with Marathi name
6) Email ID
7) Mobile No
8) Firm Address
9) No of Employees Male and female
10) Pan card
11) Aadhar card
12) Self declaration we provide
13) If food business Fssai Receipt or license.
उद्यम रजिस्ट्रेशन - जुलै 2020 पासून उद्योग आधार चे नाव बदलून उद्यम आधार झाले आहे, जुने उद्योग आधार मार्च २०२१ अगोदर उद्यम आधार मध्ये बदलणे गरजेचे आहे नाही तर ते रद्द होणार आहे, जर आपले उद्योग आधार असेल तर त्याचे उद्यम आधार बनवून भेटेल किंवा काही बदल करून घ्या.
उद्यम आधार MSME (उद्योग आधार) म्हणजे काय ?
सूक्ष्म, लघु व मध्यम म्हणजे त्या कंपन्या आणि प्रकार :
१)ज्यांची गुंतवणूक 1 करोड पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 5 करोड पेक्षा कमी.
२) ज्यांची गुंतवणूक 10 करोड पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 50 करोड पेक्षा कमी.
३) ज्यांची गुंतवणूक 20 करोड पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न 250 करोड पेक्षा कमी.
वरील प्रकारा मध्ये जेवढे पण उद्योग येतात त्यांना MSME असे म्हटले जाते. भारत सरकारने 18 सप्टेंबर 2015 रोजी (एमएसएमई), सूक्ष्म, लघु व मध्यम या या मंत्रालयाची स्थापना केली. वरील उद्योगांना भारत सरकारच्या (एमएसएमई), सूक्ष्म, लघु व मध्यम मंत्रालय द्वारे 12 अंकाचे नोंदणी प्रमाणपत्र दिले जाते त्याला सध्या उद्यम आधार म्हटले जाते.
उद्यम आधारचे फायदे:
१) कोणतेही व्यावसायिक कर्ज घेताना सामान्य व्याज दरापेक्षा 1 ते 1.5 टक्के व्याज दर कमी पडतो, मुद्रा लोन.
२) बँकेत करंट अकाऊंट साठी उपयोगी पडते.
३) सरकारी Industrial Subsidy, Barcode Registration, Patent, Trademark ™®, Tender, Light bill concession साठी उपयोगी पडते व खास सूट भेटते.
उद्यम आधार ला हवी असणारी कागदपत्रे व माहिती
1) AADHAR CARD
2) MOBILE NO LINKED WITH AADHAR
3) EMAIL ID
4) PAN CARD
5) Social category- OPEN/SC/OBC/ST.
6) FIRM NAME
7) BUSINESS TYPE - Proprietorship, Partnership, PVT LTD, LLP
8) FIRM ADDRESS
9) DATE OF INCORPORATION
10) Nature of business
11) No of Employees Male and female
12) Investment
13) Cancelled cheque Saving or Current
14) Gst certificate Yes or No
15) Last year ITR filled or not
16) LAST YEAR TURNOVER
17) ANY OLD UDYOG AADHAR COPY
वरील सर्व माहिती आपण दिलीत तर फक्त 4 दिवसात आपले उद्यम आधार नोंदणी प्रमाणपत्र आपणास भेटते..