13/08/2024
मैत्रीपूर्ण संबंधातून व्यवसाय वृद्धी करण्याच्या दृष्टिकोनातून कार्य करण्याच्या रोटरी मीन्स बिजनेस (आरएमबी) क्लबच्या अध्यक्षपदी रोटे.अमित पगारे यांची वर्ष 2024 2025 साठी निवड झाली. मावळते अध्यक्ष डॉ. रामनाथ जगताप यांच्याकडून त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली...
रोटरी मीन्स बिजनेस क्लब चा पाचवा पदग्रहण सोहळा नुकताच हॉटेल सीटा डेल येथे रोटरी डिस्ट्रिक्ट :3030 चे प्रांतपाल (2025- 26) रोटे.नाना शेवाळे व डिस्ट्रिक चेअर रोटे.डॉ गौरव सामनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने उत्साहात पार पडला. रोटे. ऍड. राजेश्वरी बालाजीवाले व रोटे. सलील केळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. क्लबच्या प्रथेनुसार मावळते संचालक आणि पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच मावळते सचिव रोटे.डॉ. वैभव वाणी यांनी त्यांचा पदभार रोटे. विक्रम खैरनार यांच्याकडे सुपूर्द केला.
जगभरात कोणतेही रोटेरियन सभासद हे आरएमबी क्लबचे सभासद होऊ शकतात. रोटरी सभासदांमध्ये जास्तीत जास्त व्यावसायिक संबंध प्रस्थापित करणे, उद्योग विकासाला चालना देणे यासाठी आरएमबी क्लब प्रयत्नशील असतो. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 मध्ये पाच आरएमबी क्लब असून, कार्यक्रमास आरएमबी जळगाव, नागपूर व मालेगाव चे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात नवनिर्वाचित उपाध्यक्ष रोटे. उन्मेश देशमुख, खजिनदार रोटे सलील केळकर तसेच संचालक रोटे.राजेश्वरी बालाजीवाले, रोटे.निलेश सोनजे,रोटे.भारत बिरारी, रोटे.पराग जोशी, रोटे.पंकज अहिरराव, रोटे.राहुल देशपांडे, रोटे.राहुल शिंदे, रोटे.मयुर तांबे, रोटे.किशोर थेटे, रोटे.आर्कि.मकरंद चिंधडे, रोटे.अमोल काबरा, रोटे.विजय दीक्षित, रोटे.विठ्ठल वाकडे, रोटे.योगेश बाहेती, रोटे.किरण वाघ, रोटे.सुशांत जाधव, रोटे.सचिन करमासे, रोटे.मनोज केंगे, रोटे.सीए रोहीत सागोरे यांनी पदभार स्वीकारला. आरएमबी नाशिक च्या सर्व सभासदांना व्यावसायिक प्रमाणपत्र देण्यात आले. प्रमुख पाहुणे प्रांतपाल रोटे.नाना शेवाळे यांनी रोटरी मध्ये व्यावसायिक व सामाजिक संबंध कसे दृढ करता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटे अमित पगारे यांनी येत्या नवीन वर्षात आरएमबी नाशिक मिटींगचे नियोजन कसे असेल याबद्दल सर्वांना माहिती दिली. रोटे.अमित पगारे हे संगणक व्यावसायिक असून ते रोटेरियन म्हणून सामाजिक कार्यात सदैव सक्रिय असतात. नवनिर्वाचित सचिव रोटे.विक्रम खैरनार यांनी उपस्थित प्रमुख पाहुणे व सर्व सभासदांचे आभार मानले.