udyojakmaharashtra

udyojakmaharashtra Digital Media, Online News Website

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏“शि...
14/04/2026

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
महामानव, ज्ञानसूर्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम 🙏
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा त्यांचा संदेश आजही आपल्याला योग्य मार्ग दाखवतो.
त्यांच्या विचारांनीच समाजाला समानता, न्याय आणि स्वाभिमानाची दिशा मिळाली.
💙 चला, त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया!
DrAmbedkar Inspiration SocialJustice MarathiPost SthanikSamachar

24/01/2026

*झोपेतील धक्का, हिसका तुम्हाला कधी जाणवतो का.....?*

समजा तुम्ही गाढ झोपेत आहात. अचानक तुम्हाला कोणीतरी ढकलले असे वाटते. धक्का, हिसका बसल्यासारखा वाटतो. उडी मारल्यासारखे वाटते. दचकून एकदम जाग येते. तुमच्या बाबतीत असे कधी झाले आहे काय?

घाबरु नका. हा कोणताही आजार नाही. याला *हिपनिक जर्क Hypnic jerk* असे म्हणतात. जगातील ६० ते ७० टक्के लोकांनी कधी न कधी हा अनुभव घेतलेला असतो. हा आजार नसून झोपेत शरीराला किंवा स्नायुंना बसलेला धक्का आहे. असे होण्याचे नक्की काय कारण आहे, हे अजूनही समजलेले नाही. पण पुढील परिस्थितीत असा धक्का बसण्याची शक्यता वाढते.

*१. तुम्ही झोपताना खूप चिंता, काळजी करीत आहात.

*२. झोपण्यापुर्वी दारु किंवा इतर अमली पदार्थ घेतले आहेत.

*३. संध्याकाळी उशीरा जोरदार व्यायाम केला आहे.

"४. तुम्ही चुकीच्या पद्धतीने झोपत आहात किंवा तुमची झोप अर्धवट झाली आहे.

*५. काही औषधांचे प्रमाण जास्त झाले आहे.

*हिपनिक धक्का टाळण्यासाठी पुढील गोष्टी करा...*

*१. झोपताना चिंता, काळजी करू नका. सकारात्मक विचार करा.

*२. रोज रात्री आठ तास झोप घ्या.

*३. आहारात मॅग्नेशियम, कॅलशियमचा समावेश करा. गोड आणि मीठ कमी करा. ताज्या भाज्या व फळे खा.

*४. झोपी जाण्यापूर्वी कमीतकमी सहा तास आधी व्यायाम करण्याचे टाळा.

*५. झोपण्यापूर्वी संगीत ऐका. एखादे पुस्तक वाचा. मेडीटेशन करा.

*६. झोपण्यापुर्वी अल्कोहोल, चहा, कॉफी घेणे टाळा.

*७. हिपनिक धक्का सारखा जाणवत असेल तर तुमच्या डॉक्टरांसोबत चर्चा करा.

*डॉ. आशिष गुरव,*
*सुनील इनामदार.*

 #जिजाऊजयंती  #विवेकानंद_जयंती
12/01/2026

#जिजाऊजयंती
#विवेकानंद_जयंती



बार्टीची संविधान प्रश्नमंजुषाडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत भारतीय संविधानाच्या अ...
10/01/2026

बार्टीची संविधान प्रश्नमंजुषा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घर घर संविधान अभियानांतर्गत भारतीय संविधान प्रश्नमंजुषा ऑनलाइन पद्धतीने बार्टी वेबसाईटवर सुरू करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नमंजुषा निशुल्क असून सर्वांना विनंती की आपणही या प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होऊन मा. महासंचालक व मा. निबंधक बार्टी, पुणे यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र प्राप्त करावे. २५ प्रश्नांच्या संचापैकी १३ प्रश्नांची उत्तरे बरोबर आली तरीही आपल्याला लगेच प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे.

संविधान प्रश्नमंजुषेमध्ये सहभागी होण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करावे :
https://constitution.barti.in/

   #सावित्रीबाईफुलेजयंती
03/01/2026

#सावित्रीबाईफुलेजयंती

15/12/2025

*हिवाळ्यात गूळ खाण्याचे दहा उत्तम फायदे !!*

हिवाळ्यात गूळ खाणे तुमच्यासाठी सर्व प्रकारे फायदेशीर आहे. जिथे गूळ शरीरात उष्णता आणतो तिथे निरोगी राहण्यासाठी त्याचे सेवन अधिक महत्त्वाचे मानले जाते. अनेकदा असे दिसून आले आहे की अनेकांना अन्न खाल्ल्यानंतर काहीतरी गोड खावेसे वाटते. अशा परिस्थितीत साखरयुक्त मिठाईऐवजी गुळाचे सेवन केल्यास ते आरोग्यासाठी चांगले असते आणि हिवाळ्यात ते शरीरासाठी फायदेशीर असते आणि शरीरात उष्णता टिकून राहून पचनशक्तीही चांगली राहते.

*चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात गूळ खाण्याचे 10 आरोग्य फायदे-*

1) हिवाळ्यात रक्त परिसंचरण सामान्यतः खूप मंद होते. परंतु गुळाचे नियमित सेवन केल्यास रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत होते. रक्तदाबाच्या समस्यांवरही फायदेशीर.

2) गूळ हा मॅग्नेशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. गूळ खाल्ल्याने स्नायू, मज्जातंतू आणि रक्तवाहिन्यांच्या थकव्यापासून आराम मिळतो आणि अशक्तपणा दूर करण्यातही ते खूप उपयुक्त ठरते.

3) सर्दी आणि संसर्गाच्या औषधांमध्ये गुळाचा वापर केला जातो. या दिवसांमध्ये, घसा आणि फुफ्फुसाचे संक्रमण खूप लवकर पसरते आणि गुळाचे सेवन केल्याने तुम्हाला हे टाळण्यात खूप मदत होते.

4) गुळाचे सेवन पाचन समस्यांवर उपचार करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने तुमची पचनशक्ती आणखी सुधारते. पोटाच्या समस्यांवर गूळ हा एक अतिशय फायदेशीर उपाय आहे.

5) हिवाळ्यात गुळाचे रोज सेवन केल्याने सर्दी, खोकलापासूनही तुमचे रक्षण होते, कारण गुळाचा प्रभाव उष्ण असतो, त्यामुळे थंडीच्या दिवसात याचे सेवन करणे तुम्हाला उबदार ठेवण्यासाठी खूप प्रभावी आहे.

6) या दिवसात रोज गुळासोबत आले खाल्ल्याने सांधेदुखीत आराम मिळतो. सांधेदुखीची समस्या असल्यास आल्यासोबत गुळाचा वापर करणे खूप फायदेशीर ठरते.

7) गूळ आणि काळ्या तिळाचे लाडू बनवल्याने हिवाळ्यात दम्याचा त्रास होत नाही आणि शरीरात आवश्यक उष्णता राहते. म्हणूनच दम्याच्या उपचारात गूळ खूप फायदेशीर आहे.

8 ) गूळ आणि तूप एकत्र खाल्ल्याने समस्येपासून सुटका मिळते. कानदुखीवर गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.

9) हिवाळ्यात श्‍वसनाशी संबंधित आजारांसाठी 5 ग्रॅम गूळ मोहरीच्या तेलात मिसळून खाल्‍याने श्वसनाच्‍या त्रासापासून सुटका मिळते.

10) जरी थंडीच्या दिवसात भूक जास्त लागते, पण भूक कमी वाटत असेल तर या समस्येवर गुळाचा उपाय आहे. गूळ खाल्ल्याने तुमची भूक मोकळी होईल आणि पचनक्रिया व्यवस्थित सुरू होईल.

*डॉ. प्रमोद ढेरे*

10/12/2025

📢 *Hiring: Site Engineer – Eight Fold Group (New Mumbai)*

Eight Fold Group, a growing Civil Construction Firm in New Mumbai, is looking for a *Site Engineer* to join our project team.

🏤*Position:* Site Engineer

📍*Location*: New Mumbai

📘*Experience:* 2–5 years (preferred)

🎓*Qualification:* Diploma/Degree in Civil Engineering

🪙*Key Responsibilities:*

* Supervise daily site work
* Ensure quality and safety
* Coordinate with contractors & teams
* Maintain daily reports and project progress

👨‍🚒*Skills Needed:*

* Knowledge of RCC & finishing work
* Ability to read drawings
* Good communication skills

💎*Apply Now:* send your resume or contact

📧 [email protected]

📞 9321950783

*💼 Employment Type:* Full-Time

*💰 Salary:* As per industry standards (based on experience)

*🏗 Why Join Eight Fold Group?*

* Opportunity to work on reputed projects across Mumbai
* Professional growth in a supportive work culture
* Hands-on exposure to innovative engineering practices
* Long-term career development

👨‍🚒👨‍🚒👨‍🚒👨‍🚒👨‍🚒👨‍🚒👨‍🚒👨‍🚒👨‍🚒

*विश्वरत्न,भारतरत्न,बोधिसत्व, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन* !!...
06/12/2025

*विश्वरत्न,भारतरत्न,बोधिसत्व, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन* !!!
🕯️🕯️🕯️🙏🙏🙏

Address

Panvel

Alerts

Be the first to know and let us send you an email when udyojakmaharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to udyojakmaharashtra:

Share