12/10/2021
INDICHEM STARSULF (sulphur 80%WDG)
पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे उर्वरित अन्नद्रव्यांची कमतरता वाढत जाते. अलीकडे जमिनीत गंधकाची कमतरता जाणवू लागली आहे. पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि जमिनीतील सामू नियंत्रित करण्यात गंधक महत्त्वाचे आहे.
गंधक म्हणजेच सल्फर.' बुरशीनाशक, कोळीनाशक म्हणून गंधकांचा वापर होतो. विविध खतांमधून सल्फेट या संयुगाच्या स्वरूपात गंधक आता उपलब्ध झाले आहे. सल्फेट ऑफ पोटॅश हे दाणेदार पोटॅशयुक्त खत बाजारात उपलब्ध आहे. त्यामध्ये गंधकाचे प्रमाण दहा टक्के असते. शंभर टक्के पाण्यात विरघळणारे दाणेदार स्वरूपातील गंधक ही बुरशीनाशक म्हणून बाजारामध्ये उपलब्ध आहे.
गंधकामुळे जमिनीची उत्पादकता व आरोग्य टिकविण्यास मदत होते. कृषिमालाच्या गुणवत्तेत वाढ होते. गंधकाला भूसुधारक असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे गंधक मातीचा सामू कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे चुनखडीयुक्त चोपण जमिनीमध्ये त्याचा वापर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. जमिनीतून गंधकयुक्त खतांचा वापर केल्यामुळे नत्र, स्फुरद आणि खतांचा कार्यक्षम वापर होऊन उत्पादनाची भरीव वाढ होते. गंधकासोबत इतर अन्नद्रव्यांचा वापरामुळे आंतरपीक प्रक्रियेवर अनुकूल परिणाम होऊन शेतीमालाचे उत्पादन वाढण्यास व प्रत सुधारण्यास मदत होते.
गंधकाचे पिकांमधील कार्य -
1) गंधक हे प्रकाश संश्लेषण क्रियेत भाग घेऊन पानांमधील हरितद्रव्य वाढण्यास मदत करते. त्यामुळे पिकांच्या अन्ननिर्मितीला चांगली चालना मिळते.
2) गंधक हा प्रत्येक जिवंत पेशीचा एक भाग आहे. तसेच सिस्टीन, सिस्टाईन व मिथीनोओतीत या आवश्यक जमिनी आम्लांचा एक घटक आहे.
3) गंधक हे बीजोत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत करते. त्याचबरोबरीने द्विदल कडधान्य पिकांच्या मुळावरील गाठींमध्ये वाढ करण्यास व जिवाणूद्वारे नत्र स्थिरीकरण्यात मदत करते, विविध विकार व चयापचयाच्या क्रियेला मदत करते.
4) भुरीच्या नियंत्रणासाठी ससागेचा वापर होतो, कोळीनाशक म्हणूनही त्याचा वापर होतो.
5) गंधकामुळे हरितद्रव्य निर्मितीत आणि प्रकाश संश्लेषणामध्ये वाढ होते. प्रथिनांचे प्रमाण वाढते. फळांमधील विद्राव्य पदार्थांचे प्रमाण वाढते.
इंडिकेम कंपनीचे
स्टारसल्फ (सल्फर 80%)
" अन्नद्रव्ये म्हणून नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्यांची शाकीय वाढीसाठी मुख्य गरज असते ,तसेच दुय्यम अन्नद्रव्ये म्हणून कॅल्शियम, मॅग्नेशियम व सल्फर यांची पिकांना गरज लागते"
स्टारसल्फ चे पिकांना होणारे फायदे:-
1) स्टारसल्फ ड्रीप मधुन पिकांना दिल्यास मातीचा Ph नियंत्रित होतो व क्षार कमी होण्यास मदत होते.
2) स्टारसल्फ पोषक अन्नद्रव्ये शोषण करण्यास मदत करते.
3) स्टारसल्फ प्रकाशसंश्लेषण प्रक्रियेतील महत्त्वाचे अन्नद्रव्ये आहेत.
4) स्टारसल्फ वनस्पतींच्या पेशींमध्ये चयापचय प्रक्रिया नियंत्रित ठेवते.
5) स्टारसल्फ हे भाजीपाला व फळ पिकांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
6) स्टारसल्फ पिकांच्या मुळांभोवती जमिनीमध्ये हानिकारक बुरशीची वाढ होऊ देत नाही.
प्रमाण- ड्रीपसाठी:3kg/ एकर...
पिकातील सल्फर कमतरतेची लक्षण
केळी
1) केळीची नवीन पाने गोलाकार न होता पिवळसर पांढरी होतात.
2) झाडांची वाढ खुंटते व लहान फळे तयार होतात व पाने पिवळी पडतात.
कांदा
1) गंधकाचे प्रमाण कमी झाल्यास पानाचा आकार लहान होतो. पाने पिवळी पडतात.
2) पानांची शेंडे पिवळसर पडून वाळतात.
ऊस
1) नवीन पानांवर पिवळसर हिरवा रंग येतो.
2) गंधकाची कमतरता असल्यास पूर्ण पान पांढरे होतात व वाढतात.
गहू
1) सर्वसाधारण पूर्ण झाड पिवळे पडते.
2) गंधकाच्या कमतरतेमुळे झाडांची वाढ खुंटते. लोंब्या धरण्याचे प्रमाण कमी होते व फुले कमी दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
संपर्क : सागर कृषि सेवा केंद्र, परांडा
7709014444