Phoenix Startup Consultancy India Ltd.

Phoenix Startup Consultancy India Ltd. to fly the sky, through the ash, never before, never believe. sky is unlimited!

so why our what never ask where the solution n when I start to wake up and how become a successful entrepreneurship?

08/06/2020

Startup करण्यासाठी लागणारी "स्वतःची" मानसीक, शारिरीक आणि आर्थिक तैयारी.
Startup जितका ऐकायला Cool आणि Trendly वाटतो ते तितकाच Stressful आणि Struggling आहे. Youtube वरतीचे Motivational Video बघुन किंवा "शिव खेरा" चे पुस्तक वाचून तर तुम्ही निश्चितच हे करू शकणार नाही, Startup म्हणजे एका प्रकारचा व्यवसाय, उद्योग किंवा व्यापार आहे परंतु पारंपरिक पद्धतीच्या उद्योगापेक्षा खूप वेगळं त्यासाठी स्वतःला अगोदर त्या स्टार्टअप च्या मानसीकतेत प्रवेश द्यावं लागतं, मगच तुम्ही ते प्रत्यक्षपणे करण्यासाठी तैयार होऊ शकता
कारणकी स्टार्टअप हा एक प्रवास आहे ज्याचे अंतिम स्थळ प्रवास-प्रारंभी कधीच निश्चित करता येत नाही फक्त मार्ग ठरवता येते म्हणून या प्रवासासाठी लागणारी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक "Packing" कशी करावी हे खालील मुद्यातून स्पष्ट होईल.

#1 मानसिकता -
Startup हे एक "कल्पने" पासून निर्माण होणारी गोष्ट आहे, ज्यास हल्ली आपण Idea बोलतो हा तेंव्हाच तुमच्या बुद्धीत येऊ शकतो जेंव्हा तुम्ही मुक्त विचार करण्याच्या मानसिकतेत असता
"हं अस कुठं असतंय व्हय" अस बोलणाऱ्यानी, तसेच "नौकरी अच्छि होती है, हर महिना पगार मिलती है" वाली मानसिकता असणाऱ्यानी Startup पासून हजार पाऊल लांब राहावे, Startup करणाऱ्याच्या मानसिकतेत फक्त आणि फक्त Startup असतं तेंव्हाच ते यशस्वी होत म्हणून मनात Startup हा शब्द येण्या अगोदरच आपली मानसिकता तपासून पहा.

#2 Startup क्षेत्राची तोंड ओळख आणि अभ्यास -
मानसिकता निर्माण झाल्यास लागलीच "उतावीळ नवरदेवा" सारखे काहीही निर्णय घेऊ नका Startup क्षेत्र हल्ली खूप मोठा आहे यात अनेक बाबी अभ्यासाव्या लागतात, Internet च्या माध्यमातून त्याची तोंड ओळख करून घ्या जितकी माहिती या क्षेत्रा बाबत अभ्यासता येईल अभ्यासा, Startup बाबतची थोडीशी संकल्पना स्पष्ट होईल आणि मग कळेल की "ये Startup किस चिडीया का नाम है".

#3 प्राथमिक स्वयअध्ययन
स्टार्टअप काय आहे हे माहित झाल्या नंतर स्वतःचे अध्ययन करून घ्या वाट्टेल तिथे एकांतात बसा आणि विचारा स्वतःला की का करायचे आहे स्टार्टअप??, कश्यासाठी करायचे आहे??, स्वतःला विचारा तैयार आहात का तुम्ही startup करण्यासाठी??, हे वाट पाहण्यासाठी आणि अफाट मेहनतीचा खडतर प्रवास पूर्ण करण्यासाठी?? की मधूनच पलायन करणार, पलायन करून Startup नाही केलं तर दुसर पर्याय काय आहे भविष्यात हे सगळं काही स्वतः मध्ये प्रश्न मंजुषा निर्माण करून मनातील खंबीर उत्तर शोधा आणि मग Startup चा प्रवास सुरु करा.
(हे फक्त प्राथमिक स्वयं अध्ययन आहे, या नंतर सुद्धा भरपूर स्वयं अध्ययन करावे लागतील )

#4 Startup ची निवड
Startup हे जितके मुक्त आणि पसरट आहे तितके जास्त उद्योग त्यात समावलेले आहेत, जशे एका मॉल मध्ये गेल्यावर हे घेऊ का ते घेऊ वाले मन होते तसेच काही या Startup चे आहे, म्हणून स्वतःसाठीच्या startup ची निवड करताना 3 गोष्टी लक्षात घ्या
1 तुमच्या आवडीचा क्षेत्र
2 त्याची बाजारात असलेली मागणी आणि पुरवठा
3 त्या क्षेत्रात विकास होण्यासाठीची असलेली संधी
या 3 गोष्टी तुमच्या Startup ला दीर्घ काळ खेळत राहण्यासाठी मदत करतील पण शेवटी तोच क्षेत्र निवडा ज्यात तुमची आवड आहे आणि जिथून तुम्ही व्यवसाय करू शकता कारणकी "Startup Starts with passion not just with money"
म्हणून तुमच्या आवडीचा क्षेत्रच तुमचा Startup आहे.

#5 सुसंवाद
जर का स्वयं अध्ययन आणि क्षेत्र निवड मध्ये निश्चित झाले की "मेरी दुल्हन Startup है" तर "मै Startup करणा चाहता हूं" याबाबत आई, वडील, भाऊ, बहीण, बायको (या व्यतरिक्त बाकीचे कोणीच नको) यांच्याशी सल्ला मसलीतीची प्रथम चर्चा करा त्यांना पटवून द्या पूर्ण संकल्पना, जर हुशार मित्र असतील तर त्यांच्या सोबत ही संवाद साधा (जर ते त्याच निगडित क्षेत्रातील असतील तर फक्त वर वरची चर्चा होऊद्या) आपण जे क्षेत्र निवडला आहे त्या क्षेत्रातील ईतर अनुभवी व्यक्ती सोबतही चर्चा करा संवाद साधा (पण कोणासही आपल्या Startup ची संकल्पना खोल पर्यंत देऊ नका).

#6 स्वतःची वर्तमान परिस्थिती
स्वतःची वर्तमान अवस्था काय आहे तुम्ही विद्यार्थी आहात, कर्मचारी आहात, विवाहित आहात की नाही, जोडीदार कमावता आहे नाही, घरून बागायत आहात नाही किंवा गुंठामंञी आहात की मोबाईल रिचार्ज साठी महाग आहात, कारणकी स्टार्टअप हे 1 वेळ खाऊ गोष्ट आहे पूर्ण पणे त्यात स्वतःला गुंतवावे लागते तेंव्हाच ते शक्य आहे startup उभा होण्यास महिने किंवा वर्ष अधिक लागतात तेवढे काळ तुमचे "पोट" कोणत्या गोष्टीवर टिकून राहणार याची काळजी नक्की घ्या.
(नोट - तुमच्या startup स्वप्नाचे भार आई वडिलांवरती कदापी टाकू नका)

#7 पेशन्स, धीर आणि टिकून राहणे
पेशन्स आणि धीर जरी एकच असले तरी या दोन्ही गोष्टी तुमच्या जवळ असायला हवेत स्टार्टअप एका दिवसात उभारत नाही आणि उभारल्यास एका दिवसात मोठा होत नाही, पोटचा बाळ जन्माला घालण्याची गोष्ट आहे नऊ महिने गर्भ संस्कार त्या नंतर देखभाल, शिक्षण, संस्कार, काळजी, पालन पोषण या सगळ्या गोष्टी प्रदिर्घ एका Startup साठी हव्या असतात, काही स्टार्टअप 1 दिवसात सुद्धा उभा राहिले आणि काहींना 10 वर्ष फक्त एवढेच की उभा तेच राहिले ज्याच्या कडे वाट बघण्याची क्षमता होती आणि टिकून राहण्याची कुवत.

#8 सगळं काही स्वतः करण्याची तैयारी
सगळं काही स्वतः करण्याची तैयारी ठेवा तुमचा startup तुम्हीच उभारू शकता किंवा तुम्हीच मोठा करू शकता बाकी कोणी नाही, incubator आणि Accelerator हे तुमच्या Startup ला उभा राहण्यासाठी ची मदत करतात किंवा मोठा होण्यासाठीच्या अडथळे दूर करतात, बाकी सगळं काही तुमचं असत नियोजन पासून ते वाटणी पर्यंत.

#9 स्वप्नरंजनात अडकू नका
सकाळी उठल्या पासून ते परत रात्री झोपे पर्यंत startup साठी च्या लाखो कल्पना तुमच्या मेंदूत येतील आणि सदैव येत राहतील आणि प्रत्येक स्वप्न हे सुनेहराच दिसून येणार पण हे तेवढेच नक्की के प्रत्येक स्वप्न हे तुमच्या कामाचा नाहीये आणि ते फक्त आणि फक्त स्वप्न आहे वास्तव नाहीये आणि एका वेळेत फक्त एकच startup उभारावा अनेक स्टार्टअप एकाच वेळी उभारण्यासाठी तितका अनुभव आणि मनुष्यबळ लागतो म्हणून जे क्षेत्र आणि संकल्पना startup साठी निवडली आहे फक्त त्याच एका गोष्टीस आपले स्वप्न समजून त्या साठी कष्ट करा आणि ते साध्य करा.

#10 नियोजनबद्ध जीवनशैली
नियोजनबद्ध जीवनशैली स्वीकारावी लागेल, अभ्यासु व्यक्तिमत्त्व असलेली व्यक्तीच नाविन्यपूर्ण कौशल्य प्राप्त करू शकते म्हणून प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करण्याची जीवनशैली विकसीत करा, नवनवीन क्षेत्र, स्थळ, लोक, उदयोग समूह यांना भेट द्या तुम्ही जे Startup साठी क्षेत्र निवडले आहे त्याचा आराखडा निर्माण करा, त्या साठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा खर्च आणि गरज अभ्यासून पहा, अनुभवी व्यक्ती सोबत त्याबाबत चर्चा करा Production Process, Financial Economic Situation, Agriculture industry, Packaging, Advertising and Branding, Marketing, Brand Positioning, Import Export, International Market बाबत अभ्यास करा, नवीन भाषा शिका, इंग्रजी भाषेचा ज्ञान जितक जास्त अवगत करता येईल करा, वाचन क्षमता वाढवा शब्दांना, वाचनांना, विचारांना दैनंदिन जीवनात जितके प्रत्यक्ष अवलंबून घेता येईल तितके घ्या.

#11 समूह कार्याची शैली अवगत करा
Startup एकट्याने होत नाही तुम्हाला कधी कधी भागीदारांची गरज लागेल, म्हणून व्यक्ती आणि त्याची गुण ओळखुण त्याची भागीदार म्हणून निवड करा, काम समान भागात वाटून घ्या कारणकी या गोष्टीमुळे startup ला वेग आणि विकास दोन्ही गोष्टी लवकरात लवकर साध्य होतील.

#12 No शासन, No राजकारण
तुमचे Startup उभे करण्यासाठी शासन कोणतीच सहाय्यता करत नाही उलट तुमच्या Start up मुळे त्यांना काय फायदा होऊ शकतो याचा प्रयत्न ते नक्की करतात, शासनाची कोणतीच योजना सध्या पर्यंत तरी Startup साठी सहाय्यकारी ठरली नाही म्हणून भविष्यातील शासणाकडून सहायतेची शक्यता कमीच, कोणता राजकारणी व्यक्ती सुद्धा तुमचे Startup उभे करण्यासाठी तुमची साहाय्यता करेल याचीही अपेक्षा भोवळीच कारण काय हे तुम्हालाही ठाऊकच आहे.....

#13 धर्मजात, अंधश्रद्धा, भक्ती या पासून लांब राहा -
Startup हे खूप Revolutionary गोष्ट आहे माझ्याच समाजातील लोकांसोबत मी बोलतो, त्याच धर्माचे लोक उद्योग करतात, त्या क्षेत्रात त्याच धर्माचा दबदबा आहे, या देवाला साखळे घातल्याने हे होईल, तमुक केल्याने अमुक होईल या सगळ्या गोष्टी पासून मुक्त होण्याची मानसिकता तैयार ठेवा, कारणकी Startup चालतो Science, Technology, Environment, industrial Revolution, Upgradation, Liquidity, Economics वर "बाकी सब मोह माया है".

#14 सतत नवीन काही करण्याची आणि स्वीकारण्याची ओढ -
स्वतः मध्ये सतत नवीन काही निर्माण करण्याची ओढ अवगत करावी लागेल कारणकी स्वतःला वेळेनुसार बदलणे हे काळाची गरज असते माझी संस्कृती, माझा गाव, माझी लोक, माझा राज्य माझा हे माझं ते जर या संकुचित गोष्टीत अडकून राहिलात तर नवीन काहीच साध्य होणार नाही, नवीन लोक, नवी शहरे, नवी बाजारपेठ, नवीन क्षेत्र येवढेच नाही तर नवीन चुका सुद्धा मान्य करा तेंव्हाच काही बदल घडेल.

फक्त या काही गोष्टी करून तुमचा Startup उभा राहणार नाही त्या साठी अजून खूप काही करावं लागेल पण या सगळ्या गोष्टी करून तुम्ही Startup उभं करण्यासाठी स्वतःला मानसिक, शारीरिक, आर्थिक रित्या तैयार करू शकता हे मात्र अचूक आणि नक्की आहे.

नोट - Startup करणे सुद्धा UPSC आणि MPSC सारखच आहे, सगळ्यांना नाही जमत पण एक गोष्ट वेगळी आहे ते की Startup चा प्रत्येक attempt तुम्हाला बाजारपेठेत एक नवीन ओळख निर्माण करून देतो आणि इथे आरक्षण व एजबार सारख्या थुकरट गोष्टी बिलकुलही नाहीत कारणकी Startup हे स्वतंत्र लोकांचा क्षेत्र आहे गुलामगिरी चा नाही.

©

19/02/2020
स्टार्टअप म्हणजे नेमके काय?------------------------------------------www.smallideaBIGMONEY.comनेमक्या कुठल्या उद्योगाला ...
19/02/2020

स्टार्टअप म्हणजे नेमके काय?
------------------------------------------
www.smallideaBIGMONEY.com

नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे.

लहानसहान उद्योगधंदे आपल्याकडे यापूर्वीही सुरू झाले, चालवले गेले. पण आज तरुणाईला भुरळ पडली आहे ती स्टार्टअप संकल्पनेची. खरं तर स्टार्टअपची क्रेझच झाली आहे. पण म्हणून स्टार्टअप म्हणजे काय ते नेमकं माहीत झालं आहे असं नाही.

घरच्या फरशीची स्वच्छता करण्याचं काम गृहिणीसाठी फार वेळखाऊ आणि जिकिरीचं ठरतं. मग ती गृहिणी अमेरिकन का असेना! घरच्या फरशीची स्वच्छता करण्याचं काम सोपं व्हावं यासाठी १९९० मध्ये एका हरहुन्नरी, कल्पक गृहिणीने एका साध्या यंत्राचा शोध लावला. ‘मिरॅकल मॉप’ या नावाने ते यंत्र ओळखलं जाऊ लागलं. ते वजनाला हलकं व्हावं यासाठी तिने प्लॅस्टिकचा दांडा वापरला आणि त्याच्या तळाशी लांबच लांब गुंडाळी होणारा कापसाचा बोळा बसवला. फरशीची सफाई झाल्यावर गृहिणीचे हात ओले न होता तो तळाचा कापूस बदलण्याची स्वयंचलित सोय त्यात केली होती. इतकी झकास कल्पना आणि ते यंत्र लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, हा विचार करत तिने अमेरिकेतील होम शॉपिंग नेटवर्कच्या वाहिनीचा आधार घेत आपल्या यंत्राची प्रात्यक्षिकं द्यायला सुरुवात केली. अल्पावधीत तो मॉप लोकप्रिय झाला आणि त्याची तडाखेबंद विक्री होऊ लागली. लहानशा पण कल्पक मॉपच्या जोरावर ती गृहिणी गृहोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रातील अमेरिकेतील आघाडीची उद्योजिका झाली. जॉय मँगॅनो हे तिचं नाव. ‘इंजिनीअर्स डिझाइन्स’च्या मालकीण असलेल्या या जॉयबाईंच्या जीवनावर ‘जॉय’ नावाचा चित्रपट गेल्या महिन्यात नाताळला प्रदर्शित झाला. सर्जक उद्योजिका असलेल्या जॉयबाईंचा जीवनप्रवास तितकाच प्रेरणादायी आहे. फक्त मॉपच नाही तर प्राण्यांसाठी असलेल्या ‘फ्लोरेसंट फ्ली कॉलर’च्या निर्मितीसाठीही त्या ओळखल्या जातात. ही कल्पना त्यांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच प्रत्यक्षात आणली. आता फ्लोरेसंट फ्ली कॉलर ही काय नवी भानगड! अशी शंका जर मनात आली असेल तर तिचं निरसनसुद्धा व्हायला पाहिजे. रात्रीच्या वेळी वाहनांचे धक्के लागून जखमी किंवा मृत होणाऱ्या प्राण्यांना वाचवण्यासाठी त्यांनी फ्लोरेसंट फ्ली कॉलरची शक्कल लढवली. जॉयबाईंच्या या उदाहरणावरून आपल्याला काय कळतं, तर एका लहानशा गरजेतून, युक्तीतून त्यांनी उद्योगाची सुरुवात झाली. तो उद्योग सुरुवातीला खूप लहान होता पण त्यात नावीन्य होते, व्यवसायवाढीला वाव होता. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी स्टार्टअप उद्योग सुरू केला होता.

स्टार्टअप (उद्यमारंभ) या शब्दाने गेल्या दशकभरात विशेषत: तरुणाईला भुरळ घातली. आजघडीला ‘मला स्टार्टअप सुरू करायचंय’, असं म्हणणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. तेव्हा स्टार्टअप म्हणजे नेमकं काय, त्याचं वाढतं आकर्षण का आहे, त्याला आज इतकं महत्त्व का दिलं जात आहे, याचा विचार करणं गरजेचं आहे.

आज ‘स्टार्टअप’ या संकल्पनेची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या देता येणार नाही. वेबस्टर कोशाप्रमाणे स्टार्टअप म्हणजे ‘द अ‍ॅक्शन ऑर प्रोसेस टू गेट समथिंग इन मोशन’ अर्थात् एक ठरावीक गती येण्यासाठी केलेली कृती वा प्रक्रिया. दुसरी एक व्याख्या केली जाते ती म्हणजे उद्योगाच्या किंवा उद्योजकाच्या आयुष्यातील प्रारंभिक अवस्था जिचा प्रवास कल्पनेकडून उद्योगसंरचना, संलग्न अर्थव्यवहारांपर्यंत होतो. प्रसिद्ध उद्यमगुरू स्टीव्ह ब्लँक यांच्या मते स्टार्टअप म्हणजे (भविष्यकालीन) नफ्याचा विचार करून सुरू केलेली अंशकालीन (हंगामी / अस्थायी) उद्योगसंरचना.

स्टार्टअप आणि लघुउद्योग यांतील फरक
बऱ्याचदा स्टार्टअप म्हणजे फक्त एखादा लहान उद्योग अशी गैरसमजूत होते. मात्र त्यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. कुठल्याही स्टार्टअपमध्ये भविष्यात मोठा उद्योग होण्याची क्षमता असते. ब्लँक यांच्या मते स्टार्टअप उद्योगाच्या मालकाला फक्त स्वत:च स्वत:चा बॉस व्हायची इच्छा नसते तर जग जिंकायची महत्त्वाकांक्षा असते. पहिल्यापासूनच आपली ‘आयडिया’ कशी सर्वोत्तम आहे आणि तिच्या जोरावर बाजारपेठ कशी काबीज करता येईल आणि आपली कंपनी कशी मोठी होईल, उपलब्ध पर्याय सोडून ग्राहक आपल्याकडे नव्याने कसे वळतील किंवा आपणच नवी बाजारपेठ कशी तयार करू शकतो, याचा विचार असतो. आपल्या उत्पादनाची वैशिष्टय़े सांगत त्याला एक ठरावीक दृष्टी देणे, ग्राहक, वितरणव्यवस्था, अर्थकारण इ. ठळक घटकांचा अभ्यास स्टार्टअप उद्योजकाला करावा लागतो.

मग लघुउद्योग कशाला म्हणायचं? अमेरिकन लघुउद्योग संघटनेनुसार लघुउद्योग म्हणजे स्वतंत्र मालकीचा संचालित आणि नफ्याचे उद्दिष्ट ठेवून केलेला उद्योग. त्याचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे असा उद्योग बाजारपेठेत फार प्रबळ, वर्चस्ववादी नसतो, कारण त्याचा मुख्य उद्देश हा स्थानिक बाजारपेठ काबीज करणे नसून तिच्यात स्थिर होणे हा असतो.

स्टार्टअप या शब्दाला गेल्या काही वर्षांत ग्लॅमर मिळालं. नेमक्या कुठल्या उद्योगाला स्टार्टअप म्हणायचं हेसुद्घा समजणं आवश्यक आहे. एखाद्या गृहिणीने नव्याने सुरू केलेले पोळी-भाजी केंद्र हे तिच्यासाठी स्टार्टअपच असते. फरक इतकाच की त्या केंद्राला कोणी स्टार्टअप म्हणत नाही किंवा प्रायव्हेट इक्विटी, व्हेंचर कॅपिटलिस्टकडून त्या केंद्राला काही आर्थिक साहाय्य दिले जात नाही. मात्र सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे त्या पोळी-भाजी केंद्राचे उद्या एक रेस्तराँ होऊ शकते.

व्यवहाराच्या सोयीसाठी ‘नॅसकॉम’ संघटनेने एक व्याख्या प्रस्तावित केली जिचा ‘स्टार्टअप इंडिया’च्या कृतिआराखडय़ात समावेश केला. त्यानुसार गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत भारतात नोंदणी झालेल्या आणि प्रारंभिक वर्षांत २५ कोटींपेक्षा जास्त कारभार नसलेल्या उद्योगाला स्टार्टअप म्हटलं जावं.

स्टार्टअपविषयी एक गैरसमज प्रचलित आहे, तो म्हणजे फक्त तरुणांनी सुरू केलेल्या उद्योगांनाच स्टार्टअप म्हणायचं का? याचं उत्तर अर्थात ‘नाही’ असंच आहे. कारण उद्योग सुरू करण्यासाठी ठरावीक वयोमर्यादेची आवश्यकता अजिबात नसते. शिवाय उद्योगाची संकल्पना वयाच्या कुठल्याही टप्प्यावर सुचू शकते. मात्र हेही खरं की आज भारतातील एकूण स्टार्टअप उद्योजकांपैकी ७२ टक्के उद्योजक हे पस्तीशीच्या आतील आहेत. तर मग तरुणाईमध्ये स्टार्टअपची इतकी क्रेझ का आहे, याचं उत्तर म्हणजे यशस्वी उद्योगांतून मिळणारी प्रेरणा, दूरसंचार क्रांती आणि मोबाइलच्या सर्वदूर वापरामुळे तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपना मिळणारा मोठा ग्राहकवर्ग, सोप्या रीतीने होणारा पतपुरवठा, उद्योगपूरक वातावरणनिर्मिती इत्यादी.

याचा एक फायदा असा झालाय की तंत्रज्ञानविषयक स्टार्टअपची संख्या आणि लोकप्रियता वेगाने वाढत आहे. मोबाइल ‘स्मार्ट’ झाल्यापासून बरेचसे आर्थिक व्यवहार त्याद्वारे होऊ लागले. मग ती खरेदी-विक्री असो वा बँकिंग. वाढत्या युवावर्गाचा आणि प्रौढ ग्राहकांचा कल ओळखत मोबाइलद्वारे सेवा पुरवणाऱ्या अ‍ॅप्लिकेशन्सची संख्या वाढली. शिवाय अशी अ‍ॅप्लिकेशन्स तयार करण्यासाठी येणारा भांडवली खर्च कमी असतो. त्यात नावीन्यपूर्णतेला वाव जास्त असतो आणि ग्राहकांचाही प्रतिसाद त्वरित मिळतो. मात्र याचा अर्थ असा नाही की स्टार्टअप फक्त तंत्रज्ञानाशीच निगडित असतात. उदाहरणार्थ अशी कल्पना करूया की आपल्या देशात फिरायला आलेल्या एका सायकलवेडय़ा पर्यटकाला एका शहरातून हजारो किलोमीटर्स दूर असलेल्या दुसऱ्या प्रेक्षणीय स्थळी सायकलनेच जायचं आहे. मात्र त्याच्याजवळ त्याक्षणी स्वत:ची अत्याधुनिक सायकल नाही, पण तो भाडय़ाने घेऊ शकतो. अशा वेळी जर त्याला कोणी सायकल पुरवली किंवा त्यासाठी एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन तयार करून त्याद्वारे मागणी नोंदवण्याची सोय करून दिली तर तोही एक स्टार्टअपच होईल. तात्पर्य काय, तर काहीतरी हटके किंवा स्वत:च्या मालकीचं सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून सुचलेल्या नावीन्यपूर्ण संकल्पनेत उद्योग होण्याची क्षमता आहे का आणि ती असेल तर त्या दृष्टीने भविष्यकालीन वृद्धीचा विचार करत जो उद्योग उभारला जाईल, त्याला स्टार्टअप म्हणता येईल.

- ओंकार पिंपळे

Source : http://www.loksatta.com/advata-news/what-is-startup-india-1198356/

https://www.facebook.com/108172147269943/posts/150904792996678/
17/01/2020

https://www.facebook.com/108172147269943/posts/150904792996678/

Paancake, a delicious finger-licking recipes to treat your family and friends.
This cake is the best in the looking wise so also have really well enough for the part of the great temporary things.
⭐️⭐ Paan Cake is something that We always wanted to try.⭐️⭐
Our services
👉🏻Event Booking
👉🏻Paan franchise
👉🏻Order online
For more Information
⚡⚡Visit us: - https://paanaroma.com/
⚡⚡Call us: - +91 8860348393
⚡⚡Or Email us: - [email protected]

https://www.facebook.com/108172147269943/posts/150837243003433/
17/01/2020

https://www.facebook.com/108172147269943/posts/150837243003433/

Now we are in (Kutch) Opening Soon!!! Paan Aroma - India's No. 1 Retail chain of Paan Cafe at Gandhidham (Kutch), JOIN US.
Address: P. 169, Shop No. 3, W/12- B , Panchratna Complex, Near Green Palace Hotel, Gandhidham (Kutch), Gujarat, Pin Code - 370201.
Get the Special Flavours:-
* Ice / Fire Paan * Chocolate Paan * Sugar-Free Paan * Dry Fruit Paan * Paan Shots * Rasmalai Paan * Kit-Kat Paan *Fresh Fruit Paan * Chuski Paan & many more.
Get info call us at: +91-8860348393.
~Via: www.paanaroma.com

Address

Sinhgad College Campus Road, Ambegaon Bk
Pune

Telephone

+919130970995

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Phoenix Startup Consultancy India Ltd. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Phoenix Startup Consultancy India Ltd.:

Share