02/09/2026
Video No. 6: Ikagai
तुम्हाला तुमच्या आयुष्याचा अभिमान कशाचा आहे?
तुम्हाला कशातून किक मिळते?
आणि पुढे आयुष्यात नेमकं काय मिळवायचं आहे?
दोन मिनिटं थांबा आणि या तीन प्रश्नांची उत्तरं शोधा.
कारण आयुष्यात काही गोष्टी आपण मिळवतो, ज्याचा आपल्याला अभिमान असतो.
काही गोष्टी आपण करतो, ज्यातून आपल्याला किक मिळते.
आणि काही गोष्टी आपल्याला भविष्यात मिळवायच्या असतात. त्याला आपली Aspiration म्हणता येईल.
कुणासाठी वजन कमी करणं ही अभिमानाची गोष्ट असते.
कुणासाठी स्वतःच्या पायावर उभं राहणं.
कुणासाठी गरिबीतून वर येणं.
कुणासाठी स्पर्धा परीक्षा पास होऊन नोकरी मिळवणं.
पण किक वेगळी असते.
एखाद्या माणसाला इव्हेंट ऑर्गनाईज करून तो सक्सेसफुल झाल्यावर किक मिळते.
कुणाला टीम तयार करून जिंकल्यावर.
कुणाला विद्यार्थी घडवताना.
कुणाला समाजसेवेमध्ये.
म्हणजे एखादी गोष्ट करताना तुम्हाला इतका आनंद मिळतो की ती पुन्हा पुन्हा करावीशी वाटते, आणि त्यातून स्वतःचं, कुटुंबाचं किंवा समाजाचं काहीतरी भलं होतं, ती तुमची किक.
आता Aspiration.
काही लोकांच्या आयुष्यात ठरलेलं असतं.
कुणाला स्पर्धा परीक्षा देऊन IAS व्हायचं असतं.
कुणाला शंभर कोटींचा व्यवसाय उभा करायचा असतो.
कुणाला स्वतःचं घर किंवा बंगला बांधायचा असतो.
कुणाला एखादी गाडी घ्यायची असते.
म्हणजे आपल्याला पुढे कुठे पोहोचायचं आहे, याची एक इच्छा, एक ध्येय असतं.
पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे Ikigai.
सोप्या भाषेत सांगायचं तर,
तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कशात चांगले आहात, लोकांना किंवा जगाला कशाची गरज आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी अर्थपूर्ण करू शकता का, यांचा संगम म्हणजे Ikigai.
व्यवसाय करणाऱ्या माणसासाठी त्याचा व्यवसाय त्याची Ikigai होऊ शकतो, जर त्याला ते काम आवडत असेल, तो त्यात चांगला असेल, लोकांना त्याची गरज असेल आणि त्यातून त्याचं आयुष्यही चालत असेल.
आणि एखाद्या सामान्य माणसासाठीही ते वेगळं असू शकतं.
कुटुंबासाठी वेळ देणं, मुलांना घडवणं, स्वतःचं काम करणं, समाजासाठी काही करणं, आणि हे सगळं करताना आयुष्याबद्दल समाधान वाटणं.
म्हणून दोन मिनिटं थांबा.
विचार करा...
आजपर्यंत मी असं काय केलंय, ज्याचा मला अभिमान आहे?
मला कशातून किक मिळते?
मला पुढे आयुष्यात काय मिळवायचं आहे?
आणि या सगळ्यांमध्ये माझं Ikigai कुठे आहे?
कारण आयुष्य फक्त जगायचं नसतं.
आपल्याला कशाचा अभिमान वाटतो, कशातून किक मिळते आणि पुढे काय मिळवायचं आहे, हे कळलं की आयुष्याची दिशा थोडी स्पष्ट होते.