08/01/2025
घरातील एखादं मोठं आजारपण कुटुंबाला मोठ्या खर्चात टाकतं आणि तसं आजारपण कोणालाही कधीही आणि कुठेही येऊ शकतं.
अशा आजारपणामुळे मेडीक्लेम पॉलिसी नसलेलं मध्यमवर्गीय कुटुंब देखील कर्जबाजारी होऊन दारिद्र्यात जाऊ शकतं.
भारतात ९२ टक्के कुटुंबांच्या मेडीक्लेम पॉलिसी नाहीत. कारण मेडिक्लेम पॉलिसी खुप महाग आहेत.
सरकारी आरोग्य योजना (महात्मा फुले जन आरोग्य योजना) फ़क्त ३० टक्के आजार कव्हर करते आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी ही योजना असलेल्याच हॉस्पिटल मध्ये जावे लागते की जी हॉस्पिटल्स महाराष्ट्रात फ़क्त १३०० आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला अश्या हॉस्पिटल मध्ये जाणे शक्य नाही.
जर तुम्हाला पुण्यात रूबी हॉल सारख्या महागड्या हॉस्पिटल समोर हार्ट अटॅक आला आणि जर तुम्ही सरकारी योजनेतील हॉस्पिटल्स मध्ये जायचं ठरवलं तर तुमचा मृत्यू होण्याची शक्यता खूप जास्त आहे.
यासाठी सायास कोऑपरेटिव्ह आणि यूनिवर्सल साँपो जनरल इन्शुरन्स कंपनी यांनी मिळून सर्वांसाठी स्वस्त इमर्जन्सी मेडिक्लेम पॉलिसी आणली आहे. ही पॉलिसी भारतात फक्त सायासच्या सभासदांसाठी उपलब्ध आहे.
या पॉलिसी अंतर्गत १०० पेक्षा जास्त इमर्जन्सीज मध्ये जेव्हा तुमचा अवयव किंवा जीव वाचवायला तुम्हाला जवळच्या हॉस्पिटलमध्ये जायला लागेल तेव्हा तुम्ही भारतातील कुठल्याही हॉस्पिटल मध्ये जाऊ शकता. भारतातील १३००० हॉस्पिटल्स मध्ये तुम्हाला कॅशलेस क्लेम मिळेल व इतर हॉस्पिटल मध्ये तुम्हाला खर्च केलेले पैसे परत मिळतील.
(या पॉलिसी अंतर्गत कव्हर होणाऱ्या इमर्जन्सी आजारांची यादी कमेंट नंबर १ मध्ये आहे.)
ही पॉलिसी वयानुसार, कुटुंबातील सदस्यांच्या संख्येनुसार आणि विमा रक्कमेनुसार रु. ९१० ते रु.४३३३ मध्ये उपलब्ध आहे. याव्यतिरिक्त सायासचे सभासद भाग भांडवल आणि सपोर्ट सर्विस भाग भांडवल यासाठी अतिरिक्त पैसे भरायला लागतील. (माहिती पत्रक कमेंट नंबर २ मध्ये)
या पॉलिसी मध्ये कव्हर न होण्याऱ्या इतर इमर्जन्सी नसलेल्या उपचारांसाठी तुम्ही सरकारी आरोग्य योजनांचा (महात्मा फुले जन आरोग्य योजना) फायदा घेऊ शकता. सायासचे रु.२०० सपोर्ट सर्विस भागभांडवल भरून तुम्ही योजनांबद्दल लागणारे संपूर्ण मार्गदर्शन मिळवू शकता.
सायास इमर्जन्सी पॉलिसी आणि सरकारी योजना या दोन्ही मध्ये कव्हर न होणारे आजार खूप कमी आहेत आणि कमी खर्चाचे आहेत. त्यासाठी देखील BPL कार्ड असलेल्या कुटूंबांसाठी महाराष्ट्रातील चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये फुकट/कमी खर्चात उपचार उपलब्ध आहेत. सायास तुम्हाला त्याबद्दल माहिती देऊ शकेल.
बाकीच्या कार्डधारकांसाठी सध्या काही योजना नाही पण सायास लवकरच त्यांच्यासाठी अशी स्कीम घेऊन येईल.
सायास इमर्जन्सी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी खालील फोन नंबर / ईमेल / व्हॉट्सॲप नंबरवर संपर्क साधा.
फोन नंबर : ७९७२१३३४६१, ८३२९४९०१७६, ९३२५४३९७३६
व्हॉट्सॲप नंबर : ९४०४२७६२४३
ईमेल : [email protected]