18/03/2020
भारत सरकार ने ज्या पद्धतीने 'COVID-19' वर मात करण्यासाठी तातडीने निर्णय घेऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनसामान्य मध्ये जागरूकता निर्माण केली, त्याच प्रमाणे कचरा जाळणाऱ्यावर सुद्धा तातडीने कार्यवाही करायचे आदेश द्यावेत.
कोणत्याही प्रकारची भीती नं बाळगता दुकानदार दुकानं बाहेर, रस्त्याच्या कडेला जिथे मोकळी जागा मिळेल तिथे कचरा मग तो कोणत्याही प्रकारचा असू द्या जाळायला सुरुवात करतात.
हल्ली पुण्यामध्ये सुद्धा सर्रास सर्व ठिकाणी रस्त्याच्या कडेला, बालेवाडी स्टेडियम च्या बाजूला , बाणेर गाव , औंध नवीन DP road , असे कित्येक ठिकाणी आहेत, हायवे ला सर्रास कचरा टाकून तो जाळण्याचा प्रकार सध्या पुण्यामध्ये सुरू आहे.
महानगरपालिकेने जेव्हा कंत्राटदारांना कचरा उचलायचे पैसे देऊन सुद्धा कंत्राटदार जरका कचरा उचलत नसतील आणि तीच लोकं जर रस्त्यावर येऊन कचरा टाकत असतील तर ह्याला जिम्मेदार कोण आहे? महानगरपालिका ह्या विषयावर अजिबात लक्ष देत नाही. त्यांनी जे त्यांचे रक्षक नेमले आहेत ते सकाळी कामावर येण्याच्या आत दुकानदार दुकानासमोर असलेला कचरा काढून कचरा वेचक येण्या अगोदरच कचऱ्याला आग लावतात. व रात्रीच्या वेळेस सर्रास हायवे लगत ,दुकानासमोर, बिल्डिंग च्या बाहेर, सर्रास पणे नागरिक कचरा जाळत असतात. आता सोसायटीत सेक्युरिटी ला सर्व साधारण पणे उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान इथून आलेले अशिक्षित लोक, त्यांच्या कडे ही सगळी सवय सहजच असेल, पण याचा अर्थ असा नाही की ते इथे काय कुठे ही असतील तरी कोणत्याही प्रकारचा कचरा जळतील.
कचरा वेचक यांनी त्यांना प्रत्यक्षात कचरा जळताना बघत नाहीत तो पर्यंत ते समन्स बजावू शकत नाही पण एक कचरा वेचक कचरा गोळा करणार का सकाळी ह्याच्यावर निगराणी करणार. जो पर्यंत राज्य सरकार या विषयावर कोणत्याही प्रकारचा कडक निर्णय घेत नाही तो पर्यंत सर्रास पणे हे असे चालूच राहील.
पुण्यापासून मुंबई कडे एक्स्प्रेस हायवे नी जाताना गाडीची काच खाली करायची सोय नाही, कारण सतत कुठे ना कुठे गावाचा कचरा हा हायवे च्या कडेला टाकून जाळला जातो. कारण तर ग्रामपंचायतीचे तयार असते की आमच्या कडे जागा नाही कचरा साठवून त्यावर प्रक्रिया करायला म्हणून आम्ही तो जाळून टाकतो.
पण सरकार ने या वर ग्रामपंचायतींना , महानगरपालिकेने त्यांच्या कंत्राटदारांना जाब विचारून त्या वर कडक कार्यवाही केली पाहिजे.
आज काल सकाळी कुठेही फिरायला जा शहरामध्ये स्वच्छ हवा ,नाही कारण सगळी कडे ठीक ठिकाणी कचरा कोणत्याही प्रकारचा जाळला जातो. रात्री चा वेळी अधिकारी बघत नाहीत म्हणून.
पण ह्याला आळा कुठे तरी बसणे खूप गरजेचे आहे, आणि हे आपल्याकडील लोकांना जो पर्यंत फाइन लावत नाही तो पर्यंत कळणे हे खरंच कठीण आहे. रस्त्यावरून गाडी चालवणे ही कशी चालवायची हा स्वतःचा वैयक्तिक प्रश्न आहे पण रस्त्यावर कचरा जाळणे आणि प्रदूषण करणे हे काही योग्य नाही अश्या लोकांवर गुन्हा दाखल होणे हे खूप आवश्यक आहे. प्रदूषण दूषित करणे हे कदापिही योग्य नाही. आज ऑक्सिजन ची किंमत ही हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतरच लक्षात येते. ₹ ९०० प्रत्येक ऑक्सिजन सिलेंडर मागे मोजायला लागतात. आज करोना मुळे इतकं भीतीचे वातावरण आहे त्याच प्रमाणे राज्य आणि केंद्र सरकार ने ह्या गोष्टी मध्ये लक्ष देऊन कचरा जळणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे. स्वच्छ भारत अभियान नक्कीच चालू आहे पण काही ठिकाणी अजूनही त्याला जुगरून नुसती कारणे सांगून अधिकारी काय किवा लोकं पैसे नाहीत म्हणून कोणताही प्रक्रिया न करता कचरा असाच जाळून टाकतात.
सरकारनी खरंच या विषयाकडे लक्ष देऊन या वर सक्त कार्यवाही करणे गरजेचे आहे.