Tatsam Linguistic Services

Tatsam Linguistic Services All language related services : Translation, Proof-reading, Editing, Content-writing, Creative-writing, Language training.

वाचन विशेष कार्यशाळा नुकत्याच झालेल्या पुस्तक महोत्सवात भरपूर पुस्तकं विकत घेतलीत का? घेतली असल्यास किती वाचलीत किंवा वा...
06/01/2026

वाचन विशेष कार्यशाळा

नुकत्याच झालेल्या पुस्तक महोत्सवात भरपूर पुस्तकं विकत घेतलीत का? घेतली असल्यास किती वाचलीत किंवा वाचायचा मानस आहे? अनेक दिवसांपासून एखादे पुस्तक वाचायचे ठरवले आहे पण वाचून होत नाहीये? वर्षाच्या सुरूवातीला एक तरी पुस्तक वाचून काढायचे असा नववर्षाचा संकल्प तुम्ही केला आहे का? खूप दिवसात काहीच वाचले नाहीये आणि वाचन पुन्हा सुरू करण्यास निमित्त शोधत आहात का?

तर शब्दांच्या अलीकडीले या आमच्या मराठी भाषेच्या जानेवारीतील कार्यशाळेत अवश्य सामील व्हा. या वेळची कार्यशाळा “वाचन विशेष” आहे. येत्या १० तारखेपासूनच कार्यशाळेस नोंदणी करणाऱ्यांचा गट तयार करून आपण आपल्या आवडीचे एक पुस्तक (शक्यतो मराठी भाषेतील) वाचायला घेणार आहोत. कार्यशाळेत वाचलेल्या पुस्तकावर बोलू, त्याचे थोडेसे अभिवाचन करु असा मानस आहे. बाकी नेहमीची मराठी भाषेशी निगडित इतर कृतीसत्रे, खेळ कार्यशाळेत असतीलच. रविवारी दिनांक १८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत कार्यशाळा असेल. स्थळ आहे United Western Society hall, कर्वेनगर. डी पी रोडला अगदी लागून आहे त्यामुळे जायला यायला सोयीस्कर आहे. नोंदणी करायची असल्यास अवश्य मेसेज करा. भेटू या.

Address

47 Swedganga Society, Warje
Pune
411058

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919373322938

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tatsam Linguistic Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tatsam Linguistic Services:

Shortcuts

Share