10/04/2012
खडकी कॅन्टोंमेंट बोर्डात कनिष्ठ लिपिकाच्या १२ जागा
खडकी कॅन्टोंमेंट बोर्डात कनिष्ठ लिपिक (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १०-१६ मार्च २०१२ या कालावधीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.cbkirkee.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय परिवहन सेवा कार्यालयात ३० जागा
महाराष्ट्र शासनाच्या नियंत्रक, शासकीय परिवहन सेवा, वरळी, मुंबई या कार्यालयात नोंदणी सहाय्यक (२ जागा), भांडारखरेदीदार (१ जागा), वाहनचालक (७ जागा), मुख्य यांत्रिक/वाहन तपासणीस (७ जागा), सहाय्यक यांत्रिक/कनिष्ठ यांत्रिक (३ जागा), वीजतंत्री (१ जागा), सहाय्यक सज्जक (२ जागा), सहाय्क कथिलगार (१ जागा), सहाय्यक रेडिएटर यांत्रिक (१ जागा), खरवडणारा (२ जागा), स्वच्छक/हमाल (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती www.exxononline.net/gts व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कामगार राज्य विमा महामंडळात १६ जागा
कामगार राज्य विमा महामंडळात खेळाडू कोट्यातून वरिष्ठ श्रेणी लिपिक (८ जागा), बहुकार्मिक कर्मचारी (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत व महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षकाच्या १०९० जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विक्रीकर निरीक्षक (पूर्व) परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार विक्रीकर निरीक्षक (१०९० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता मध्ये दि. ३१ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात २६३ जागा
अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठात सहाय्यक कुलसचिव/सहाय्यक नियंत्रक (३ जागा), वरिष्ठ संशोधन सहाय्यक (५० जागा), शाखाधिकारी (४ जागा), सहाय्यक शाखाधिकारी (३ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (२ जागा), कनिष्ठ अभियंता –स्थापत्य (२ जागा), कनिष्ठ संशोधन सहाय्यक (९ जागा), लघुटंकलेखक (२ जागा), वरिष्ठ लिपिक (१ जागा), कृषि सहाय्यक-पदविका (३६ जागा), पशुधन पर्यवेक्षक (१ जागा), वरिष्ठ यांत्रिक (१ जागा), कनिष्ठ यांत्रिक (३ जागा), शाखा सहाय्यक (२ जागा), वाहनचालक (७ जागा), निर्गम सहाय्यक (१ जागा), सुतार (१ जागा), विजतंत्री (१ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (२ जागा), पंप परिचर (१ जागा), प्रयोगशाळा परिचर (१९ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), चौकीदार/पहारेकरी (१४ जागा), मदतनिस (२ जागा), परिचर (४२ जागा), माळी (१ जागा), व्हॉलमन (२ जागा), स्विपर (१ जागा), मजूर १३ जागा), कृषि सहाय्यक-पदवीधर (३३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २० एप्रिल २०१२ पर्यंत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३१ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २६ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जलसंपदा विभागातील उपअभियंता –विद्युत व यांत्रिकी (१४ जागा), मृद सर्वेक्षण अधिकारी (१ जागा), उद्योग, ऊर्जा व कामगार विभागातील उद्योग अधिकारी (११ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळ मध्ये दि. २० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.mpsc.gov.in/ व http://www.mpsconline.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अपंग प्रवर्गासाठी १९ जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात अपंग प्रवर्गासाठी उपरचनाकार (१ जागा), सहायक नियोजक (१ जागा), सहायक अभियंता (३ जागा), लिपिक टंकलेखक (५ जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (१ जागा), भूमापक (२ जागा), अनुरेखक (२ जागा), शिपाई (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची शेवट तारीख १६ एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. २८ मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सांगली उपविभागीय वन अधिकारी कार्यालयात ४ जागा
महसूल व वन विभागाच्या सांगली उपविभागीय वन अधिकारी कार्यालयात लिपिक संवर्ग (३ जागा), वाहनचालक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०१२ आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/forest२०१२ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयात अपंग प्रवर्गासाठी २ जागा
महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व स्वयंरोजगार संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयात अपंग प्रवर्गातून लिपिक टंकलेखक (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. ३० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नोकरी विषयक जाहिरातीन साठी आमच्या पेज वर जाऊन like करा .
पेज लिंक --
http://www.facebook.com/pages/Poornima-Consultant/250939541613366
या लिंकवर जाऊन LIKE वर क्लिक करा.