28/08/2021
*औषध कंपनीवाले*
तुम्ही ग्रुप वर फक्त अडचण सांगा.
ढिगाने कमेंट येतील तेल्या वर , मरीवर , कुजवा वर 100 टक्के रिझल्टस औषध मिळेल.
सोबतच कहर म्हणजे टॉनिक किंवा pgr वाले ही टॉनिक फवारणी करा अशा कमेंट करतात काही बहाद्दर तर स्टिकर वापरा रोगच येणार नाहीत अशाही कमेंट करतात जसे काय संपूर्ण ब्रम्हांडात यांचेच स्टिकर उत्कृष्ट आहे आणि जे लोक यांचे प्रोडक्ट वापरतात ते फार चांगले शेतकरी जे वापरत नाहीत ते बे अक्कल त्यांना शेतीच करता येत नाही.
काही नग तर असेही आहेत डांबरी , कुजवा , खर्डा , तेलकट डाग या सर्वांवर एकच रामबाण इलाज असणारा थातूर मातूर प्रोडक्ट यांच्याकडे असतो.
आणखी काही लोक अमुक तमुक वापरलेला प्लॉट त्यामुळे आलेली काळोखी चमक आशा गोष्टी सांगून लुटतात. मुळात यांचे प्रॉडक्ट सोडून शेतकऱ्यांने शेतात टाकलेले शेणखत , इतर रासायनिक बेसल डोस , वेळोवेळी घेतलेल्या फवारणी , जमिनीतून सोडलेल्या स्लरी , वेळोवेळी दिलेले पाणी या त्याच्या मेहनतीला ही लोक केराची टोपली दाखवतात आणि फक्त माझाच प्रॉडक्ट वापरल्या मुळे प्लॉट कसा चिकना दिसतोय असच सांगत सुटतात.
आपण वेळोवेळी ज्या बुरशीनाशकांची फवारणी घेतो त्यातील बहुतांश बुरशीनाशक ही #झिंक बेस असतात त्यामुळे पानावरील काळोखी वाढत असतेच .
दुसरं म्हणजे कळी अवस्था , सेटिंग अवस्था आणि सेटिंग झाल्या नंतर असणारा गुलाबी लालसर कलर त्या अवस्थेनुसार त्याला नैसर्गिक रित्या उठावदार चमकदार पणा हा असतोच तो कोणत्याही प्रोडक्ट ने येत नसतो , जसे की लहान नवजात बाळे लहान मुले ही चुणचुणीत गुटगुटीत गोंडस असतात अगदी तसेच.
शेतकऱ्यांना एकच विंनती असल्या भूल थापाना बळी पडू नका 🙏
तर अशांना लोकांना सरळ रिपोर्ट करा अडमीन टीम कडे
त्यांच्या फालतू कमेंट ही हाईड किंवा डिलीट मारा.
ढोंगी धेंडे खोटा शेतकरी हिताचा पुळका घेऊन स्वताची आर्थिक पोळी भाजून घेतात.