11/08/2022
✌️✍️💰 *वेतनवाढ करार* 💰✍️✌️
👍मनात फक्त एकच ध्यास शेतकरी आणि कामगार यांचा विकास...!
*चाकण औद्योगीक क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढ करार*
कळविन्यात अत्यंत आनंद होत आहे कि, आज मंगळवार दिनांक ०९/०८/२०२२ रोजी चाकण औद्योगिक वसाहाती मधील निघोजे येथील *IAC India pvt. Ltd. प्लॅन्ट १, प्लॅन्ट २ व* *स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना* यांच्यामध्ये झालेल्या तिसऱ्या वेतनवाढ करारावरती संघटनेचे प्रमुख सल्लागार आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, पै. श्री. रोहिदास गाडे, व अध्यक्ष श्री. जीवनशेठ येळवंडे , मा. कामगार आयुक्त सुनील बागल साहेब, मा. कामगार उपआयुक्त श्री. संभाजी काकडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
*करारामध्ये झालेले ठळक मुद्दे खलील प्रमाणे* =
*०१) एकूण पगारवाढ :- १९२६७/- ( एकोणविस हजार दोनशे सदुसष्ट रुपये)* 💰
*पगाराचा रेशो:-* पहिल्या वर्षी ७०% दुसऱ्या वर्षी १५% तिसऱ्या वर्षी १५% मिळणार.
*०२) कराराचा कालावधी* ०१/०४/२०२१ ते ३१/०३/२०२४ या तीन वर्षांचा राहील.
*०३) मेडिक्लेम पॉलीसी:-* कुटुंबातील एका व्यक्तीस ३०००००/- रुपये या प्रमाणे चार व्यक्तींसाठी १२०००००/- रुपयांची पॉलिसी राहणार संपूर्ण खर्च कंपनी करणार या पॉलिसी मध्ये स्वतः, पत्नी, आणि मुले यांचा समावेश करण्यात येणार आहे.
*०४) मृत्यू साहाय्य योजना*
अ) मृत्यू झाल्यास सर्व कामगारांचा एक दिवसांचा पगार व जादाचा मोबदला पुढील पॉलिसी प्रमाणे कंपनीकडून कायदेशीर वारसास मिळणार.
ब) एखाद्या कामगाराचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास युनियन सोबत चर्चा करून त्यास मदतनिधी व योग्य त्या ठिकाणी कामावर ठेवण्यात येईल.
*०५) ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी:-* मासिक ग्रॉस पगाराच्या ७२ पट म्हणजेच सरासरी ३६,८०,०००/- रुपये रक्कम कंपनीकडून वारसदारास देण्यात येईल.
*०६):- टर्म इन्शुरन्स पॉलीसी:-* जर एखाद्या कामगाराचा कंपनीमध्ये किंवा कंपनी बाहेर नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या वारसास वार्षिक ग्रास पेमेंटच्या ४ (चार) पट २४,५१,०००/- रुपये एवढी रक्कम मिळेल.
*०७) सूटया :-*
A) PL - १९,
B) SL - ११
C) CL - ११
D) PH - ११
E) *मतदानाची सुट्टी:-* सरकारी आदेशानुसार राहील,
*०८) दिवाळी बोनस:-* सर्व कामगारांना दिवाळी बोनस हा पगाराच्या व्यतिरीक्त २०% या प्रमाणे देण्यात येईल.
*०९) मासिक हजेरी बक्षीस:-* ज्या कामगाराचे प्रत्यक्ष कामाचे पूर्ण दिवस भरतील त्या कामगारास मासिक हजेरी बक्षीस म्हणून *७५०/-* ( सातशे पन्नास) रुपये देण्यात येईल.
*१०) सेवा बक्षीस:-*
A) ५ वर्षे नोकरी झाल्यास ५०००/-,
B ) १० वर्षे नोकरी झाल्यास १२५००/-,
*११) बक्षीस योजना :-* कामगारांच्या मुला मुलींसाठी त्यांची गुणवत्ता पाहून बक्षीस देण्याचे मान्य.
१ ते ७ वी:- ८०% ते ९०% - १०००/- रुपये आणि ९०% च्या पुढे १५००/- रुपये,
८ वी ते १० वी:- ८०% ते ९०% - १५००/- रुपये आणि ९०% च्या पुढे २०००/- रुपये,
*१२) वैद्यकीय कर्ज सुविधा:-* प्रत्येक कामगारास १०००००/- (एक लाख) रुपये देण्याचे मान्य, तसेच यापेक्ष्या जास्त रक्कम हवी असल्यास एकत्रित चर्चा करून मदत करण्यात येईल.
*१३) ड्रेस:-*
a) उच्च प्रतीचे टी शर्ट वर्षाला - १,
b) पूर्ण ड्रेस - २,
c) शूज - २०००/- रुपये किंमतीचे,
d) हिवाळी जर्किंग - तीन वर्षाला एक मिळणार,
e) पावसाळी रेनकोट - प्रत्येक वर्षाला एक मिळणार.
*१४) गुणवंत कामगार पुरस्कार:-* प्रत्येक वर्षी दोन गुणवंत कामगारांची निवड करून त्यांना ८०००/- (आठ हजार) रुपये एवढी रक्कम बक्षिस म्हणून देण्याचे मान्य,
*१५) पाळी भत्ता:-* तिसरे पाळीसाठी १००/- रुपये पाळी भत्ता देण्याचे मान्य.
*१६) प्रत्येक कामगाराला प्रत्येकी १६ महिन्याचा फरक ऑगस्ट महिन्याच्या पगारामध्ये देण्यात येणार आहे.*
करारावरती संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, प्रमुख सल्लागार पै. श्री रोहिदास गाडे , संघटनेचे अध्यक्ष श्री. जीवन येळवंडे, सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले, चिटणीस श्री. रघुनाथ मोरे, उपाध्यक्ष श्री. शामभाऊ सुळके, खजिनदार श्री. अमृत चौधरी, श्री. प्रशांतआप्पा पाडेकर, श्री. महादेव येळवंडे, श्री. रविंद्र भालेराव, श्री. विजय पाटील, श्री. दत्तात्रय गवारे, श्री. दत्ता येळवंडे, श्री. कुणाल कोळेकर, प्लॅन्ट १ युनिट अध्यक्ष श्री सचिन लांडगे, उपाध्यक्ष श्री. विनोद दौंडकर, सरचिटणीस श्री. प्रविण गव्हाणे, सहचिटणीस श्री. धनंजय झापर्डे, खजिनदार श्री. अमित दुधाने, प्लॅन्ट नं. २ युनिट अध्यक्ष श्री उमेश वाडेकर, सरचिटणीस श्री. गणेश पापरे, खजिनदार श्री. चेतन हुले, व्यवस्थापनाच्या वतीने कंपनीचे एच. आर. डायरेक्ट इंडिया हेड दिपाली खैरनार, प्लॅन्ट १ चे प्लॅन्ट हेड. श्री. पवन मालसे साहेब, प्लॅन्ट २ चे प्लॅन्ट हेड श्री. सिनोज मॅथ्यू साहेब, एच आर मॅनेजर श्री. अनिकेत निळेकर साहेब,एच. आर. मॅनेजर श्री.ओंकार बडवे साहेब, श्री. महेश सावंत साहेब, सौ. गायत्री जोशी, कु. कुमुदसिंग यांनी सह्या केल्या.
संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार पै. श्री. महेशदादा लांडगे, एच. आर. डायरेक्ट सौ. दिपाली खैरनार, अध्यक्ष श्री. जीवन येळवंडे व कंपनी प्लांट हेड. श्री. पवन मालसे साहेब आणि श्री. सिनोज मॅथ्यू यांनी उपस्थित कामगार बंधू व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले, प्रास्ताविक एच. आर हेड श्री.अनिकेत निळेकर साहेब यांनी केले, तसेच सूत्रसंचालन श्री. सूर्यकांत मुंगसे सर यांनी केले, व सरचिटणीस श्री. कृष्णा रोहोकले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप केला
कामगारानी डिजे च्या तालावर नाचून, पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्येक्त केला.