Saarathi Counselling Centre,Thane

Saarathi Counselling Centre,Thane Saarathi Counselling Centre offers remedial & preventive counselling for all. We also conduct various workshops for Art Therapy, Anger & Stress Management etc.

Aim of Saarathi Counselling Centre is to set up an authentic as well as Reliable support group which will provide a promising option in the field of mental health. we have a group of experts to deal with some specific problems that people usually face such as disturbance in relationships,family,& couple relationships,fear,anxiety etc. Career guidance is provided along with Aptitude +IQ +Personalit

y testing, personal counselling for depression, anxiety,introversion,Emotional disturbances & child and adolescent counselling is also available. We also organize career exhibitions, & Awareness seminars for 9th,10th &12th Std students.

10/10/2025

Happy World Mental Health Day 2025!

येत्या काळात हा मोठा धोका ठरू शकतो.. त्याबद्दल अधिक माहिती नक्की वाचा🙏.. धन्यवाद म.टा... अशा महत्त्वाच्या विषयांवर जागृत...
08/10/2025

येत्या काळात हा मोठा धोका ठरू शकतो..
त्याबद्दल अधिक माहिती नक्की वाचा🙏..

धन्यवाद म.टा... अशा महत्त्वाच्या विषयांवर जागृती निर्माण करण्यासाठी!..

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला   चा रिपोर्ताज.. धन्यवाद  #मटा!!..
16/06/2025

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेला चा रिपोर्ताज..

धन्यवाद #मटा!!..

या महिन्याच्या शेवटच्या दिवशी.. म्हणजेच ३१ तारखेला.. टाइम्स ऑफ इंडियाच्या भव्य वास्तू मध्ये.. अवश्य या..🙏🙏.. नक्की भेटू ...
27/05/2025

या महिन्याच्या शेवटच्या दिवशी.. म्हणजेच ३१ तारखेला.. टाइम्स ऑफ इंडियाच्या भव्य वास्तू मध्ये..
अवश्य या..🙏🙏.. नक्की भेटू 🙏. ..

--- इ.११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.. अनेक पालक आणि मुलांमध्ये याबाबत अजूनही संभ्रम दिसून येतोय.. ...
19/05/2025

--- इ.११वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे.. अनेक पालक आणि मुलांमध्ये याबाबत अजूनही संभ्रम दिसून येतोय.. ती बारकाईने आणि अतिशय सोप्या पद्धतीने समजावून घेण्यासाठी खाली दिलेल्या बातम्या जरूर वाचा!..

#महाराष्ट्रटाइम्स #प्लॅनेटकॅम्पस #११वीप्रवेश

CBSE 12th and 10th Std. Results are on the way...   get ready...
13/05/2025

CBSE 12th and 10th Std. Results are on the way...
get ready...

05/05/2025

सर्वांनी जरूर सहभागी व्हा!..🙏

02/05/2025

"तुम्ही समुपदेशक आहात का? शिक्षक, क्रिएटिव्ह डिझायनर, किंवा सोशल मीडियावर काम करता?
किंवा एक संवेदनशील व्यक्ती आहात जी मनाच्या खोल भावना समजून घ्यायचा प्रयत्न करत आहे?"

मग हा कोर्स फक्त तुमच्यासाठीच आहे!

आपलं मन अनेकदा शब्दांपेक्षा अधिक रंगांशी संवाद साधतं. आपल्या घराच्या रंगसंगतीपासून, एखाद्या जाहिरातीतील रंगांपर्यंत – प्रत्येक रंग आपल्या मेंदूला आणि भावनांना उत्तेजित करत असतो. पण हे विज्ञान अजूनही अनेकांना माहित नाही. म्हणूनच घेऊन आलो आहोत –🌈 रंगांचे मानसशास्त्र – कलर थेरपी सर्टिफिकेट कोर्स

या कोर्समध्ये तुम्ही शिकाल:

🔹 रंगांची भाषा आणि मनाशी होणारा संवाद
🔹 कलर थेरपीच्या माध्यमातून चिंता, भीती, अस्वस्थतेसारख्या भावना हाताळणे
🔹 जाहिरात, ब्रँडिंग, अँप डिझाइन यामध्ये रंगाचा मानसशास्त्रीय वापर
🔹 विविध रंगांच्या भावनिक प्रतिक्रिया – केस स्टडीजसह
🔹 रोलप्ले आणि थेट चर्चासत्रांतून अनुभवात्मक शिक्षण
🔹 मनोमापन चाचण्या आणि कलर IQ वाढवणारे सराव

📚 २ महिन्यांचा ऑनलाईन कोर्स
🧠 थेट शिकवणार – मानसी आमडेकर मॅडम – अनुभवी समुपदेशक आणि कलर थेरपिस्ट
🎓 प्रमाणपत्र – Skill India सर्टिफिकेट

⏰ दर रविवारी रात्री ७ ते ९ लाईव्ह, आणि इतर दिवशी रेकॉर्डेड व्हिडीओज
तुमच्या करिअरमध्ये एक भावनिक, सर्जनशील, आणि मानसशास्त्रीय टप्पा जोडा –

आजच नाव नोंदवा!

📲 ब्रोशर मिळवा – ८७६७५९०३५५ / ९९७५७६९३७१

--- या नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही पंढरपुरी होतो, तिथून आल्यावर बोलावणं होतं ते या ९८ वर्ष अविरतपणे सामाजिक कार्य कर...
23/01/2025

--- या नव्या वर्षाच्या स्वागताला आम्ही पंढरपुरी होतो, तिथून आल्यावर बोलावणं होतं ते या ९८ वर्ष अविरतपणे सामाजिक कार्य करणाऱ्या सुप्रसिद्ध 'श्रद्धानंद महिला आश्रमाच्या' वार्षिकोत्सवात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं... सोबत प्रमुख पाहुण्या होत्या विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि अर्थतज्ज्ञ डॉ.रोहिणी केळकर..

समाजानं ज्यांचं अस्तित्व नाकारलं, तसंच ज्यांना अपत्य होऊनही त्यांचं संगोपन करणं शक्य होतं नाही, किंवा इतर काही कारणांमुळे ज्या आपल्या कुटुंबाला पारख्या झाल्या आहेत अशा अनेक निरागस मुली-महिलांसाठी खंबीरपणे उभी राहिलेली ही संस्था म्हणजे त्यांचा आधारवड आहे.. अत्यंत निरलसपणे आणि सहृदयतेने हे पुनर्वसन कार्य सुरू करणाऱ्या 'स्वामी श्रध्दानंद' यांना 'शांतताप्रिय' समाजातील एका 'माथेफिरूच्या' हातून निर्घृण मृत्यू आला.. पण हे 'अतिमहत्त्वाचं' असणारं काम थांबलं नाही..त्याला समाजातील काही सजग नागरिकांनी आपल्या कष्टांची जोड देऊन गेली इतकी वर्षे अव्याहतपणे सुरू ठेवलं आहे.. अनेक संवेदनशील प्रज्ञावंतांच्या कामाला जेव्हा करुणेची किनार मिळते, तेव्हाच असं मोठ्ठं कुटुंब उभं राहू शकतं..

या सर्व आश्रमकन्या व्यवस्थित अद्ययावत शिक्षण घेतात, आई / भावंडं जशी माया करेल तशी एकमेकांना लावतात, वेगवेगळ्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणातून आणि अभ्यासक्रमात मनापासून स्वतःला झोकून देतात, नोकरीच नाही तर स्वतःचा व्यवसाय सुरु करून सक्षम होतात, यथावकाश लग्न करून आपापल्या घरी नांदायला जातात, पण त्यांच्या मंगळागौरी पासून ते बाळंतपणांपर्यंत सगळं "माहेरपण" ही संस्थाच करते आणि गरज पडल्यास त्यांच्या मुलांचाही सांभाळ करते..

तिथल्या आश्रमकन्यांशी एक थोडीशीच मोठी असणारी "ताई" म्हणून मला भरपूर गप्पा मारता आल्या, विविध करिअर बद्दल, ती कशी निवडावी यांबद्दल आणि येत्या महिन्यातल्या बोर्डाच्या परीक्षांबद्दल आम्ही खूप काही बोललो, हसलो आणि जोडल्या गेलो!..
या मुलींच्या रुपात असलेला हा उत्साहाचा, सर्जनशीलतेचा झरा असाच निर्मळपणे अखंड वाहत राहो.. अशा मनोमन सदिच्छा!!..

||जय हरी विठ्ठल||

Our Director Ms. Manasi Amdekar featured in Today's MahaMTB newspaper..
11/12/2024

Our Director Ms. Manasi Amdekar featured in Today's MahaMTB newspaper..

Address

Thane
Thane
400603

Opening Hours

Thursday 10am - 2pm
Friday 10am - 2pm
Saturday 10am - 2pm

Telephone

+91-22-38537968

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saarathi Counselling Centre,Thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Saarathi Counselling Centre,Thane:

Share