BrandWork

BrandWork Brand Deigning

17/03/2024
01/01/2022

आकारमान लहान असलेले
कोरोनामुक्त असलेले 10 लहान देश
दोन देश संशयाच्या भोवर्‍यात

2019 मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आतापर्यंत करोनाचा एकही रूग्ण आढळून न आलेले तब्बल 10 देश असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेची आकडेवारी सांगते. या देशापैकी अनेक देश हे पॅसिफिक व अटलांटिकच्या समुद्रामधील छोट-छोट्या बेटं आहेत. या देशांनी लागू केलेले कठोर निर्बंध व बदलेले प्रवास धोरणांमुळे या देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झालाच नाही.

तुवालू
जगाच्या पाठीवर फक्त 26 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा आणि 12 हजार लोकसंख्येचा हा देश आहे. विशेष म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाने एक सार्वभौम देश म्हणून मान्यता दिली आहे. नऊ छोट्या बेटांचे मिळून बनलेले हे व्दीपराष्ट्र दक्षिण पॅसिफिक महासागरात ऑस्ट्रेलिया आणि हवाई बेटांच्या साधारण मध्यावर आणि फिजी बेटांच्या उत्तरेला वसलेले आहे. या देशात 100 व्यक्तींपैकी 50 जणांचे लसीकरण झालेले आहे.

तोकलौ
दक्षिण पॅसिफिक समुद्रामधील तोकलौ या लहान बेटांपासून हा देश तयार झाला आहे. तीन लहान बेटांपासून तयार झालेल्या या देशाचे 10 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ आहे. या देशाची लोकसंख्या दिड हजार इतकी असून या देशात कोणतेही विमानतळ नाही. मात्र, या देशात जाण्यासाठी न्युझीलंडवरुन बोटीने जावे लागते. इतर देशांपासून हा देश दूर असल्याने या देशात कोरोनाचा प्रादूर्भाव झालेला नाही.

सेंट हिलीना
दक्षिण अटलांटिक समुद्रामध्ये असणारा हा छोटाचा बेट असलेला देश आहे. ब्रिटीशांच्या ताब्यात असणार्‍या दैशांपैकी हा एक देश आहे. हा देश आणि येथील प्रदेश हा जगातील सर्वात दुर्गम भागापैकी एक आहे. या देशात 138 व्यक्तीपैकी 100 जणांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने सांगितली आहे. या देशाची लोकसंख्या चार हजारांहून थोडी अधिक आहे. या देशाचं आकारमान छोटं असलं तरी त्यांचं स्वतंत्र विमानतळ आहे.

पिटकॅरन बेटे
पॅसिफिक महासागरामधील चार लहान व मोठ्या बेटांपासून हा देश तयार झाला आहे. या देशामध्ये कायमस्वरुपी वास्तव्यास असणार्‍या लोकांची संख्या अवघी 50 इतकी आहे. या देशातील जवळजवळ सर्व लोक ही अ‍ॅडम्सटाऊन गावामध्येच राहतात. इतर तीन बेटांवर लोकवस्ती अस्तितवात नाही. कमी लोकसंख्या असल्याने येथे कोरोनाचा प्रादूर्भाव झालेला नाही.

न्यूवे
हा देश सर्वात मोठ्या प्रवाळांपासून (कोरल्स) बनलेल्या बेटावर वसलेला आहे. न्यूझीलंडपासून अडीच हजार किलोमीटर अंतरावर दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये आहे. या देशाला कोरोनापासून लढण्यासाठी न्यूझीलंडने मदत केलेली आहे. न्यूझीलंड हा करोनाशी सर्वात यशस्वीपणे दोन हात करणारा देश म्हणून ओळखला जातो.

नाऊरु
दक्षिण प्रशांत महासागरात ऑस्ट्रेलियाच्या ईशान्येस असलेल्या नीरू किंवा नाऊरु हा सार्वभौम देश जगातला सर्वात लहान प्रजासत्ताक देश आहे. 21 चौरस किलोमीटर इतके क्षेत्रफळ असलेला हा देश जगातला तिसरा सर्वात लहान देश आहे. याहून अधिक कमी क्षेत्रफळ असलेले व्हॅटिकन सिटी व मोनॅको हे दोन देश आहेत. हा देश तुवालू या द्वीपदेशाच्या वायव्येस 1300 किलोमीटर तर पापुआ न्यू गिनीच्या ईशान्येस प्रशांत महासागरात आहे. या देशाने लावलेले कठोर निर्बधामुळे येथे करोनाचा प्रादूर्भाव झालेला नाही.

मायक्रोनेशिया
पॅसिफिक महासागरातल्या ओशियाना उपखंडामध्ये 600 बेटांच्या समुहाला मायक्रोनेशिया म्हणतात. आदिवासी पट्ट्यातील दर्यावर्दी आणि मच्छिमारांचे वास्तव्य आहे. अमेरिका, चीन आणि जपानसारख्या मोठ्या देशांनी या देशाला कोरोनाविरूध्द लढण्यासाठी मदत केली असल्याने या देशातही कोरोना प्रादूर्भाव कमी प्रमाणात झाला.

किरीबात
हा देश हवाई बेटांच्या नेऋत्येला 3200 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या देशात फार मोजक्या संख्येने विमानं येतात. वेळीच निर्बंध केल्यामुळे या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झालाच नाही.

उत्तर कोरिया
करोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही, असा दावा करणार्‍यांमध्ये उत्तर कोरियाचाही समावेश होतो. काही प्रसारमाध्यमांनी उत्तर कोरियाचा हुकूमशाह किम जोंग-उनने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांना थेट मारून टाकल्याच्याही बातम्या दिल्या होत्या. या देशामध्ये करोनाचा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जातं.

तुर्कमेनिस्तान
करोनाचा प्रादुर्भाव न झालेल्या देशांपैकी हा एक देश आहे. 27 ऑक्टोबर 1991 ला सोव्हिएत राष्ट्रसंघातून बाहेर पडून तुर्कमेनिस्तान हा एक स्वयंशासित, स्वतंत्र देश अस्तित्वात आला. तुर्कस्थान या दुसर्‍या देशाशी असलेल्या नामसाधम्यामुळे तुर्कमेनिस्तानच्या बाबतीत अनेक लोकांचा गोंधळ होतो. या देशाची आग्ेनय सीमेला अफगणिस्तान, दक्षिणेस इराण, पश्‍चिमेस कॅस्पीयन समुद्र, वायव्येस कजाकिस्तान आणि ईशान्येस उज्बेकिस्तमान यांच्या सीमा (बॉर्डर) मिळतात. या देशाची पाच लाख चौरस किलोमीटर क्षेत्राफळापैकी साधारणत: 70 टक्के क्षेत्रावर काराकुम वाळवंट पसरलेले आहे. एवढ्या देशांसोबत सीमा असणार्‍या या देशात करोना रूग्ण नसल्याबद्दल शंका उपस्थित केली जाते.

ही सर्व माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीवर आधारित आहे. त्यामुळे एकीकडे जग ओमायक्रॉनच्या संकटाला तोंड देत असतानाच दुसरीकडे हे देश आहेत, हे फारच आश्‍चर्यात टाकणारे आहे.

ऑक्सीजन काळाची गरज आहे.
30/05/2021

ऑक्सीजन काळाची गरज आहे.

ट्रकशी जिव्हाळ्याचं नातं असलेल्या “Horn OK Please” या शब्दप्रयोगाची रंजक जन्मकथा नक्की वाचाकधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून...
13/06/2020

ट्रकशी जिव्हाळ्याचं नातं असलेल्या “Horn OK Please” या शब्दप्रयोगाची रंजक जन्मकथा नक्की वाचा

कधी रस्त्यावर ट्रक नजरेसमोरून गेला की त्या ट्रक मागे लिहिलेला Horn OK Please हा शब्द हमखास आपलं लक्ष वेधून घेतो, आणि जन्मापासून हा शब्द नजरेस पडत असल्यामुळे आपण देखील दिसल्या दिसल्या नकळत तो मनातल्या मनात वाचतो देखील!

केवळ ट्रकच नाही तर ट्रान्सपोर्टच्या अनेक गाड्यांवर सर्रास हा शब्द तुम्हाला लिहिलेला आढळेल, पण तुम्ही कधी विचार केलाय का, “या शब्दाचा नेमक उगम कसा झाला?”

चला तर आज जाणून घेऊया या कोड्या मागचं कोणालाच माहित नसलेलं उत्तर!

तत्पूर्वी जाणून घेऊ या या शब्दामागचा सर्वमान्य समज/अर्थ

त्या शब्दामध्ये OK हा शब्द अधिक मोठा आणि ठळक शब्दांत लिहिलेला आढळतो. कारण मागील वाहनाने समोरच्या वाहनापासून सुरक्षित अंतर राखावे असे त्यांना सांगायचे असते.

Horn व Please हे शब्द लहान अक्षरांत असतात. मागील गाडी अधिक जवळ आल्यास त्यांना ते शब्द दिसावेत आणि त्यांनी आपल्या गाडीचा हॉर्न वाजवून पुढे जाण्याची वाट मागावी – असा सामान्य संकेत ह्यातून दिसतो.

आता जाणून घेऊ या याचा उगम कसा झाला.

ह्या शब्दप्रयोगच्या उगमाची ३ वेगवेगळी कारणं सांगितली जातात.

पहिला दावा असं सांगतो की, ‘Horn OK Please’ ही टाटा कंपनीमार्फत चालवली गेलेली एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी होती – जी त्यांनी त्यांच्या OK या साबणाच्या प्रसारासाठी राबवली होती.

भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याकाळी ट्रक इंडस्ट्रीमध्ये केवळ टाटा कंपनीचे वर्चस्व होते. त्यामुळे कंपनीने आपल्या नव्या प्रोडक्ट्सची जाहिरात करण्यासाठी याच ट्रकचा मुव्हिंग होर्डींग्ज म्हणून वापर करण्याचे ठरवले.

त्या काळचा टाटा कंपनीने सदर केलेल्या नव्या साबणाच्या प्रोडक्टचा लोगो म्हणजे कमळाच्या फुलाचे चित्र होते आणि आजही बहुसंख्य ट्रक्स वर OK शब्दाच्या वरती कमळाच्या फुलाचे चित्र असलेला हा लोगो आढळून येतो.

परंतु दुसरा दावा असे सांगतो की, पूर्वीच्या काळी सर्वच रस्ते हे सिंगल लेनचे होते, ज्यावरून ओव्हरटेक करणे सोपे नसायचे.

तेव्हाच्या ट्रक्सना रियर मिरर व्हूज देखील नसल्यामुळे मागून एखादी लहान गाडी ओव्हरटेक करायचा प्रयत्न करत असेल, तर ते देखील कळायला मार्ग नसायचा. परिणामी अपघात होण्याची शक्यता असायची.

त्यामुळे एक नवीन शक्कल लढवण्यात आली ती म्हणजे ‘Horn Please’ हे दोन शब्द लिहिण्यात आले. दोन्हींच्या मधे “OK” लिहून या शब्दाभोवती बल्ब लावला जायचा.

म्हणजे –

मागून येणाऱ्या गाडीने Horn Please! ह्या विनंती नुसार हॉर्न वाजवायचा.

ट्रक ड्रायव्हरने OK शब्दावरील बल्ब पेटवून त्याला सिग्नल द्यायचा की “पुढचा रोड क्लियर आहे”.

हळूहळू मल्टीलेनचे रोड्स तयार होऊ लागले आणि बल्ब सिग्नल सिस्टम गायब झाली. पण ‘Horn OK Please’ हा शब्द मात्र तसाच राहिला.

तिसराही एक दावा केला जातो ज्यात थेट दुसऱ्या महायुद्धाचा संदर्भ येतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी इंधनाची कमतरता असल्याने ट्रक्स केरोसीन वर चालवले जायचे, पण त्यात असा धोका होता की लहानश्या अपघाताने देखील ट्रकचा स्फोट व्हायचा.

त्यामुळे सावधानी बाळगण्यासाठी ट्रक्सच्या मागे ‘On Kerosene’ असे लिहिले जायचे, म्हणजे मागू येणाऱ्या गाड्या उगाच ओव्हरटेक करण्याची घाई करणार नाहीत आणि मोठा अपघात होणार नाही.

पुढे ‘On Kerosene’ चे संक्षिप्त रूप म्हणजे OK ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिले जाऊ लागले आणि सोबतच सिग्नल म्हणून Horn Please देखील लिहिण्यास सुरुवात झाली.

या तीन पैकी टाटा कंपनीच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा दावा हा सर्वमान्य मनाला जातो. इतर दावे त्यापुढे दुबळे ठरतात. पण अजूनही हा गमतीशीर शब्दप्रयोग आला कुठून हे खात्रीशीर रित्या स्पष्ट झालेले नाही.

असो, ते काही का असेना.

Horn OK Please या शब्दने आजही वाहतुकीची शिस्त शाबूत आहे हे मान्य करावे लागेल.

#साभार इनमराठी

29/04/2020

#खरी_परीक्षा
#लॉकडाऊन_संपल्यावरच

कोविड 19 हा विषाणु म्हणजे काही दिवस मुक्कामाला आलेला पाहुणा नाही, की त्याला गाडीत बसवून दिलं की आपण सुटलो असं समजायला. हा आपल्यापासून कदाचित दूर झालेला असेल किंवा कदाचित आपल्याजवळ कुठेतरी दबा धरुन बसलेलाही असेल. तुम्ही एखादी चूक केली, थोडं गाफील राहिलात की हा हल्ला केल्याशिवाय राहाणार नाही. या विषाणुची भीती अनेक कारणांनी वाटते आहे. हा कुणालाही मृत्युच्या दारात नेऊन ठेवू शकतो. एकदा हा एखाद्यावर स्वार झाला की त्याला कुटुंबापासून, समाजापासून दूरच राहावं लागतं. दुर्दैवाने जर एखाद्याचा मृत्यु झाला तर अंत्यविधीही करण्याचा अधिकार कुटुंबीयांकडे शिल्लक राहिलेला नसतो. आपण पाहिलं आहे की अपवादात्मक घटनात कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घ्यायलाही नकार दिला आहे. आपले मित्र नातेवाईक प्रयत्नपूर्वक आपल्यापासून दूर राहातात. यापेक्षा अधिक क्‍लेषकारक काय असणार? म्हणूनच हा विषाणु आपल्यापासून चार हात दूरच राहील याची दक्षता घ्यायची, आज आणि लॉकडाऊन संपल्यावरही. आता पहिल्यासारखं जगायचं नाही. आता नवे नियम, नवे विचार आणि नवी दक्षता घेतच जगण्याशिवाय दुसरा मार्ग नाही.

लवकरच लॉकडाऊन संपेल आणि हळु हळु सगळे व्यवहार सुरु होतील. तसे करावेच लागतील. आणि त्यानंतरच आपली परीक्षा सुरु होणार आहे. म्हणूनच आताच ठरवून टाकायचं की कोणकोणती काळजी घ्यायची आणि कसं कसं बदलायचं.

सगळ्यांच्या डोक्यावरचे केस कान झाकायला लागलेत. अनेकांना असं झालं असेल की मी कधी एकदाचा सलूनमधे जातोय आणि केस बारीक करुन येतोय. पण सावधान. तुम्ही केस कापणार्‍या कलाकारापासून जेमतेम काही इंचावर असणार आहात आणि तेही जवळपास अर्धातास. तुम्हाला कळणारही नाही की तो कलाकार कोरोना पॉझिटिव्ह आहे किंवा नाही.त्या खुर्चीशेजारी आणखी काही खुर्च्या असतील. त्यावरही एक एक गिर्‍हाईक आणि एकेक कलाकार असेल. त्यांच्या आरोग्याबाबतही तुम्हाला माहीत नसणार. शिवाय तुमच्या अंगावर टाकलेले कापड, वापरलेल्या कातर्‍या, वस्तारे यावर एखादा विषाणु नाही याची तुम्हाला कल्पना नसणार आहे. वरकरणी कितीही स्वच्छता दिसली, सॅनिटाईज केलं आहे तरीही खात्री देता येणार नाही. हा प्रश्न केवळ ग्राहकाचा नाही. तो कलाकार ज्याचे केस कापणार आहे त्या ग्राहकाबाबतही त्या कलाकाराला माहिती नसणार आहे. मग काय करायचं? केसांच्या जटा वाढवायच्या का? नाही. आता सध्या बाजारात बॅटरीवर चालणार्‍या मशीन आहेत. त्याचा वापर करुन घरीच कटींग करणे सोपे आहे. घरातल्या कुणाला तरी मदतीला घेतलं तर उत्तम कटिंग होवू शकते.यात सलून चालविणारांचं नुकसान होणार आहे, पण या धोकेदायक काळात याशिवाय मार्ग नाही.

लाॅकडाऊन संपल्यावर उपवास सोडायची जशी घाई होते, तशी अनेकांना अनेक प्रकारे झालेली उपासमार संपविण्याची तीव्र इच्छा होईल. एखादा आठवडा बाहेर जेवायला गेलं नाही की आयुष्यात काहीतरी विचित्र चाललं आहे असं वाटायला लागायचं इतके आपण बाहेर खाण्याबाबत आग्रही बनलो होतो. त्यामुळे लेगेच हॉटेलचा रस्ता धरु नका. तुम्हाला माहीत नाही, की तुम्ही बसत असलेल्या खुर्चीवर अगोदर कोण बसून गेलं आहे. टेबलावरचा अ‍ॅश ट्रे, टिश्युचा स्टँड हे काही सतत सॅनिटाईज केले जाणार नसतात. शिवाय भटारखाना कसा आहे तुम्हाला माहीत नाही. खाद्यपदार्थ तुमच्यापर्यंत आणून देणारा वेटर कसा आहे माहीत नाही. तुम्हाला तो डिश आणून देताना भटारखान्याच्या धुरामुळे शिंकला नसेल हे कसं समजणार? त्यापेक्षा काही महिने हॉटेल म्हणजे निशिध्द क्षेत्र समजा. तुम्ही बाहेरुन लागण घेऊन घरी आलात तर ज्यांचा काही दोष नाही अशांचं जगणं नक्कीच धोक्यात आणणार आहात. जी अवस्था हॉटेलची तीच सिनेमाची. आपण दोन महिने सिनेमावाचून जिवंत आहोतच ना? मग आणखी काही महिने तिकडे फिरकायचं नाही.

मसाज करत असाल, फिजियोथेरपी घेत असाल तरीही तुम्ही कुणाच्या तरी खूप जवळ जात असता. ते आता काही काळ टाळा. तोंडाला मास्क लावणे हे आता आवश्यक आहे. घराबाहेर पडताना अंगात शर्ट जरी घातला नाही तरी तोंडाला मास्क आवश्यक आहे याची खुणगाठ बांधा. आता कपडे खरेदी करताना किंवा जसा महिन्याचा किराणा भरतो तसे मास्कही नियमित खरेदी करा. फारतर आपल्या शर्टाला किंवा साडीला मॅच होणारे मास्क घ्या. आता वेगवेळ्या डिझाईनचे मास्क मिळायला लागतील. साडीसारखं आता मास्कचंही कौतुक करायला शिका.

सोशल डिस्टन्सिंगचं व्यसन लाऊन घ्या. शेखहँड हा शिष्टाचार नाही. शेखहँड हे बेजबाबदारपणाचं लक्षण समजा आणि छानपैकी नमस्कार करायची सवय लावा. प्रत्येक सोसायटीत तळमजल्यावर एक सार्वजनिक नळ उभारा आणि पूर्वी वाड्यात जाताना जसं हातपाय धुवूनच घरात प्रवेश केला जात असे तशी सवय परत लावा.

मास्क, डिस्टन्सिंग, हातपाय धुणे, बाहेरचं खाणं टाळणे अशा काही सवयी लागल्या तर केवळ कोरोनाच काय पण इतर आजारही मोठ्या प्रमाणात कमी होतील. तब्बेत उत्तम राहील, घरचं खाण्यामुळे प्रतिकार शक्ती वाढेल आणि आयुष्य निरामय बनेल.

एक बदललेली जीवनशैली स्वीकारली तर जगण्यात अधिक आनंद निर्माण होईल, आजार आणि मृत्युचं भय कमी होईल. आपण आतापर्यंत जगलो ते खरं तर स्वातंत्र्य नव्हतं. तो एक स्वैराचार बनला होता. आता काळच सांगतोय की बाबा सुधार.

लॉकडाऊन नंतरच्या परीक्षेच्या काळात आपण बदललो तर भीती उरणारच नाही. चला मस्त जगू या, आनंदी जगू या आणि भयमुक्त वातावरणात आयुष्य उपभोगू या.

28/04/2020

ाणून_घ्या

कृपया फरक लक्षात घ्या :*
(1) कोरडा खोकला + शिंक = #वायू_प्रदूषण

(2) खोकला + श्लेष्मा + शिंका येणे + वाहणारे नाक = #सामान्य_सर्दी

(3) खोकला + श्लेष्मा + शिंका येणे + नाक वाहणे, शरीरावर दुखणे + अशक्तपणा + हलका ताप = #फ्लू

(4) कोरडा खोकला + शिंका येणे + शरीरावर वेदना + अशक्तपणा + उच्च ताप + श्वास घेण्यात अडचण = #कोरोनाव्हायरस

#पॅथॉलॉजी_विभाग_AlIMS_दिल्ली

Pure veg homemade cake
20/04/2020

Pure veg homemade cake

03/04/2020

तुम्हाला पतंग माहिती आहे का? तोच तो जो
पेटत्या दिव्यावर आकर्षित होऊन झडप घालतो आणि स्वत:च जळून खाक होतो.

तुम्ही म्हणाल आता हे काय नवीन तर सांगतो, पण त्या अगोदर काही माहिती घेऊयात,

आपल्या पुराणात ९ अंकाचे किती महत्व आहे हे वेगळं सांगायची गरज नाही, आता बघा ९ ग्रह, नवरात्रीचे ९ दिवस, ९ अवतार एव्हढच काय तर मुल जन्माला घालायचा कालावधी पण ९ महिने हा आहे, लांब कशाला आपल्या राज ठाकरे यांचा लकी नंबर पण ९ आहे,

मोदींनी ९ ची वेळ आणि ९ मिनिटेच का निवडली हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल, काही लोकांना शंका ही आहे की ५ एप्रिल ही तारीख का निवडली? ९ का नाही, तर त्यामागे पण एक लॉजिक आहे, ५+४(चौथा महिना)= ९. मोदीजी जे काही करतात ते सर्व विचार करूनच करतात.

आता वर पतंगाचे उदाहरण का दिले हा तुम्हाला प्रश्न पडला असेल, त्यासाठी एक उदाहरण सांगतो, १८९३ साली आजच्या कोरोनासारखीच एका विषाणूची साथ जगभर आली होती, त्यावेळी पूर्ण जगात हाहाकार उडाला होता, त्यावेळी जगभरातील लोकसंख्येच्या जवळपास १२% लोक त्या साथीत मृत्युमुखी पडले होते, पण आश्चर्य म्हणजे भारतात त्या साथीचा एकही बळी गेला नव्हता, सर्व जगभर याबद्दल आश्चर्य व्यक्त केले गेले,

त्यावेळी इंग्लडमधील एक शास्त्रज्ञ जॉन विल्यम्सन हा खास याबद्दल माहिती घेण्यासाठी भारतात आला, त्याने दोन महिने पूर्ण अभ्यासाअंती हे मत मांडले की, जगभर विषाणूची साथ असताना भारतात एकही बळी गेला नाही, कारण त्यावेळी दिवाळी होती, आणि दिवाळी असल्याने सर्व भारत दिव्यांनी उजळून गेला होता, त्याच्या हे लक्षात आले की दिवा लावल्याने ज्याप्रमाणे पतंग दिव्यावर झोकून देतो त्याच प्रमाणे विषाणू पण दिव्यावर झोकून देतात आणि त्याचा नायनाट होतो, पतंग मोठा असल्याने आपल्याला डोळ्याने दिसतो, विषाणू दिसत नसल्याने आपल्या हे लक्षात येत नाही,

अजून दुसरी एक गोष्ट १९३४ साली संस्कृत पंडित भार्गव आचार्य यांनी आपल्या प्रवचनात सांगितली होती, विषाणू हे नाव विष्णू वरून पडले असावे, लक्ष्मी च्या विरहात सूक्ष्म रुपात सैरभर फिरणारा विष्णू चा अणू म्हणजे विषाणू आणि आपल्याला माहितीच आहे, संध्याकाळी दिवे लावल्यावर विष्णू पत्नी लक्ष्मी ही दिव्यारूपी त्या घरात प्रवेश करते, आणि साहजिकच आहे विष्णू लक्ष्मी कडे ओढला जाणार,

मित्रांनो, मोदी जे काही करतात ते पूर्ण अभ्यास करूनच करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, या गोष्टींची खात्री करण्याची जबाबदारी त्यांनी इस्रो चे शास्त्रज्ञ व्यंकय्याधरण यांच्यावर सोपवली होती, ते स्वतः संस्कृतपंडित आहेत, त्यांनी यावर पूर्ण अभ्यास करून ही उपाययोजना मोदींच्या समोर मांडली, मोदींनी क्षणाचा विलंब न करता, ही अमलात आणायचे धोरण आखले,

माझी सर्वांना विनंती आहे की दिवा पेटवल्यावर, शुभंकरोती कल्याणम म्हणायला विसरू नका, विचार करा हा मंत्र १३० कोटी जनतेने एकत्रित म्हणला तर आसमंतात नवीन चैतन्य निर्माण होऊन आपल्यात ऊर्जा संचारेल.

काही लोकांना वाटतं की मोदी काय करत आहेत? ते गप्प का? पण अहोरात्र झटणारा पंतप्रधान आपल्याला लाभला आहे हेच आपलं भाग्य आहे, आपण सर्वांनी मोदींना साथ द्या.

नमो नमो

#लढा_कोरोनासी

Address

Ahmednagar
414001

Telephone

+919921228338

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BrandWork posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BrandWork:

Share

Category