Lokheetbusinessmh

Lokheetbusinessmh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Lokheetbusinessmh, Business service, आय. टी. आय . समोर, प्रत्रकार कॉलनी , अकोला ४४४०००१, Akola.

23/01/2019

उद्योग एक आंदोलन
प्रत्येक कुटुंबाला प्रति महिना रुपये १०,०००/-कमाई
भारत कृषीप्रधान देश आहे. आज ही ६७% जनता ग्रामीण भागात राहते व शेती वर अवलंबून आहे. ग्रामीण भागात कास्तकार पेक्षा शेतकरी व शेतमजुरांची संख्या जास्त आहे. ग्रामीण भागातील महिलांना व पुरुषांना वर्षातील एकूण 365 दिवसांपैकी फक्त 120 ते 150 दिवस काम उपलब्ध आहे. आज रोजी ग्रामीण भागातील पुरुषांना सरासरी 300/- रुपये प्रति दिवस प्रमाणे मजुरी तसेच महिलांना 150/- रुपये रोज मजुरी मिळत आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण भागात एका कमावत्या व्यक्तीच्या मागे एक व्यक्ती बसून खाणारा आहे.यामध्ये शिक्षण घेत असलेला मुलगा/मुलगी किंवा म्हातारे आई-वडिलांचा समावेश आहे.व त्यांना 150 दिवसाच्या मजुरीतून मिळणाऱ्या पैशातून 365 दिवस जगणे आहे.त्यामुळे सदरचा परिवार कायम आर्थिक तणावात असतो. त्यांची काम करण्याची मानसिकता असूनही त्यांना शेती व्यतिरिक्त पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांचा नाईलाज होतो. शेती पूरक व्यवसाय शेतीवरच अवलंबून असल्याने शेती व्यवसायात तोटा आल्याने शेती पूरक व्यवसायात नुकसान होते व त्यांना डबल मार सहन करावा लागतो.
आम्ही अशा 300(तीनशे) आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवारांचा सर्वे केला व त्यांना समाधानकारक व सुखी जीवन जगण्यासाठी किती पैशाची गरज आहे? याबाबत विचारले असता त्यांनी सरासरी रुपये दहा हजार प्रति महिना मिळाला तर आनंदात जीवन जगू शकतो असे सांगितले.
अशा कुटुंबांना स्वयंरोजगारासाठी खूप मोठ्या भांडवलाची आवश्यकता लागत नाही किंवा खूप मोठ्या टेक्नॉलॉजीची पण गरज भासत नाही. दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किराणा शॉप मधुन विकल्या जाणाऱ्या 300 ते 400 वस्तू अशा आहेत ज्यांचे उत्पादन आपण 25000 पासून ते 1,00,000/- रुपये भांडवलात सुरू करू शकतो. व त्यातून 300 ते 500 रुपये दररोज कमावला जाऊ शकतो. अशा उत्पादनाची व त्यांना लागणाऱ्या मशीनची, कच्च्या माला बाबतची, त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्जा बाबत ची माहिती घरोघरी पोहोचविण्यासाठी उद्योग एक आंदोलन समजुन उभे करण्याची गरज आहे.
या अंतर्गत आपण घरोघरी कमी भांडवलात सुरू होणाऱ्या उद्योगाबाबत माहिती देऊ. त्यांचे समुह तयार करून त्यांना मार्केटिंग बाबत मदत करूया. जेणे करून परत कोणत्याही शेतकऱ्याला आर्थिक दबावाखाली किंवा तणावामुळे आत्महत्या करावी लागणार नाही. या कामाला आंदोलन बनवूया
ज्यांना या कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क करावा.
लोकहित बिझनेस
मो. 9112103239

23/01/2019

उद्योग एक आंदोलन

Address

आय. टी. आय . समोर, प्रत्रकार कॉलनी , अकोला ४४४०००१
Akola
444001

Telephone

+919110104882

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lokheetbusinessmh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share