05/08/2023
महत्वाचे
40% EMI LOAN
यापेक्षा जास्त EMI नको
100-38 = 62 STOCK
जर तुम्हाला शेअर्स मध्ये गुंतवणूक करायचीच असेल तर 100-आपले वय = आलेले उत्तर एवढी गुंतवणूक करावी
50%30%20% हा गुंतवणूक फार्मुला तुम्हाला लवकर FINANCIAL FREE करण्यासाठी खूप उपयोगी पडेल.... सुरूवातीला थोडा त्रास होईल पण तुमचे भविष्य आता पेक्षा खूप सुंदर व त्रासमुक्त होईल
50% NEEDS -
आवश्यक गरजा अन्न वस्र निवारा ( Loan EMI Rent)
30% WANTS
बाहेर फिरणे, मौजमजा करणे, 🏖️🏝️🛕🛳️ इत्यादी
20% INVESTMENT
आपल्या नियोजनात बचतीचा खूप महत्वाचा भाग आहे, जर आपल्याला तणावमुक्त जीवन जगायचं असेल तर 20% रक्कम ही बचत व्हायलाच पाहिजे.
72/10%=7.2
जर आज तुम्हाला 10% Interest rate मिळत असेल तर तुमचे पैसे दुप्पट करण्यासाठी 7.2 वर्ष लागतील.
1st WEEK RULE
20% investment kara
आपल्या उत्पन्नाचा 20% भाग हा महिन्याच्या पहिल्या हप्त्यातच Automatically बचत व्हायलाच हवा.
Emergency Fund 6 months
आयुष्य म्हणजे खाच खळगे आलेतच. आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबाला कधीही समस्यांना सामोरे जावे लागते किंवा कधी काळी नैसर्गिक आपत्ती, कोरोना, छोटेखानी अपघात, दवाखान्यात अल्पकाळातील खर्च, नोकरी जाणे ... यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते पण आपल्या जवळ कमीतकमी आपल्या मासिक उत्पन्नाचा 6% भाग आपल्या जवळ असायलाच हवा.
Accident👨🏼🦽
Job loss🙆🏻♂️
Covid😷
Crisis
Interst savings scheme
Auto sweep FFD
तुमच्या बँकेत जर भरपूर रक्कम पडलेली असेल तर तुम्ही
Auto sweep / FFD यासारख्या स्कीम असतात पण बहुतेक बॅका आपल्याला याची माहिती देत नाही....या स्कीम द्वारे आपण आपले पैस वाढवू शकतो.
25× Cash in hand financial free
जर तुम्हाला खरोखरच FINANCIAL FREE आयुष्याचे नियोजन करायचे असेल तर तुमच्याकडे कमीतकमी तुमच्या वार्षिक उत्पन्नाच्या 25 पट रक्कम आज असेल व त्यातून निश्चित परताव्याची गॅरंटी असेल तर तुम्ही रिटायर्डमेंट घेऊ शकता.
आणि महत्वाचे म्हणजे वरील सर्व गोष्टी तेव्हाच यशस्वी होतील जेव्हा खालच्या गोष्टींचे तुम्ही पालन केले असेल.
20 × Annual income Tearm insurance
आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या कमीतकमी 20 पट रकमेचा आपला सुरक्षाकवच INSURANCE असायलाच हवा.
Health insurance
आपल्या स्वतःचा तसेच आपल्या कुटुंबाचा आरोग्य विमा हा हवाच कारण तुमच्या मेहनतीने कमविलेली दहा, बारा वर्षांची रक्कम 5 लाख 10 लाख रूपये काही दिवसांत🏥 दवाखान्यात संपायला वेळ लागत नाही.🧑🏼🦽🧑🦯
नाहीतर दागिने💶🏬घर गहाण ठेवण्याची वेळ कुणावरही येऊ शकते...
अधिक सविस्तर तुमच्या स्वतःच्या आर्थिक माहितीसाठी 🏡📈💴तुम्ही आता कुठल्या पायरीवर आहात, तुमची गुंतवणूक योग्य आहे का?
यासारख्या गोष्टींसाठी मला आवश्यक भेटा🤝
*आपला गुंतवणूक सल्लागार*
*विजय माळी*
*9209253978*