AgroOne krushi Seva Kendra, Kargani , AtpaDi

AgroOne krushi Seva Kendra, Kargani  , AtpaDi Pomegranate consultants, Integrated Farm management

डाळिंब शेतकरी  – फक्त खतं देऊन झाडं फुलत नाहीत…आज आपण बहार धरायचं ठरवलंय – १० ते १५ मे दरम्यान.तेव्हा आधीच:✔ ४०% पाण्याच...
22/04/2025

डाळिंब शेतकरी – फक्त खतं देऊन झाडं फुलत नाहीत…

आज आपण बहार धरायचं ठरवलंय – १० ते १५ मे दरम्यान.
तेव्हा आधीच:
✔ ४०% पाण्याचा नैसर्गिक ताण
✔ छाटणी पूर्ण
✔ ड्रीपर खाली खड्डे
✔ मातीचं सोलर स्टरलायझेशन – १५ दिवस

आता त्या शुद्ध मातीमध्ये घातलंय
शेणखत + भेसळ डोस
झाडाच्या आतून ताकद वाढवणारा पोषणविघात.

आम्ही वाट पाहतोय –
७०-८०% नैसर्गिक पानगळ होण्याची...
कारण आमचं झाड तणावात नाही, तर त्याच्या वेळेनं जागं होतंय.
झाडाची भाषा समजून घेतली, म्हणूनच झाड समाधानी आहे.

"शेतकरी राजा तोच – जो खतांवर नाही,
झाडाच्या फिजिओलॉजीवर विश्वास ठेवतो."

झाडाला योग्य ताण, नैसर्गिक स्टोरेज,
आणि भेसळ डोस –
हाच खरा यशाचा मूलमंत्र आहे.

शेतकरी मित्रांनो – नैसर्गिक ताण, खत नियोजन,
आणि पानगळ किती % झाली याचे अचूक भान ठेवा.
योग्य नियोजन केलं तर यश हमखास आहे! मार्गदर्शक मनोज कदम ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र करगणी 7981263023

आज सकाळी काही शेतकरी मित्रांच्या डाळिंब प्लॉटला भेट दिली. प्रत्येक बागेत फेरफटका मारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती ...
17/04/2025

आज सकाळी काही शेतकरी मित्रांच्या डाळिंब प्लॉटला भेट दिली. प्रत्येक बागेत फेरफटका मारताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत होती – वाढत्या उष्णतेचा झाडांवर होत असलेला खोल परिणाम.

झाडांवर मादी कळींचं प्रमाण भरपूर आहे, पण त्या फुलात रूपांतरित व्हायला वेळ लागत आहे. झाडांमध्ये ती नैसर्गिक उर्मी जाणवत नाहीये. फुलं उघडायला खूप वेळ लागतोय, आणि सेटिंग जवळपास थांबल्यासारखं वाटतंय. झाडांची वाढ मंदावलेली आहे.

या सगळ्याबद्दल शेतकऱ्यांशी चर्चा करताना लक्षात आलं की सध्या तापमान ४० अंश सेल्सियसच्या पुढे गेले आहे. बाष्पीभवन वाढल्यामुळे झाडं तणावाखाली आली आहेत.

एक शेतकरी म्हणाले –

"सर, फुलं उघडायलाच वेळ घेतायत. कित्येक दिवस झालेत, पण काही हालचालच नाही. झाडं स्लो वाटतायत…"

मी पाण्याच्या व्यवस्थेची चौकशी केली, आणि लक्षात आलं की अनेक बागांमध्ये अजूनही सिंगल ड्रिप लाईन वापरली जाते. पाणी झाडाच्या एका बाजूला पोहोचतं, परिणामी मुळांचा भाग कोरडा आणि ताणतणावात राहतो.

उपाय सुचवताना मी पुढील गोष्टी सांगितल्या:

डबल ड्रिप लाईनचा वापर – संपूर्ण रूट झोनमध्ये नमी टिकवून ठेवतो.

स्ट्रेस कमी करणारे स्प्रे व ड्रीप एप्लीकेशन– सिवीड , फुलविक, सिलिकॉन , एनपीके, मायक्रोन्यूट्रिएंट वापरल्यास झाडांना थंडावा आणि उर्जा मिळते.

न्यूट्रिशनल सपोर्ट – बोरोन व कॅल्शियम यांची नियोजनबद्ध फवारणी फुलांची लांबी आणि सेटिंग सुधारते.

मल्चिंगचा वापर – जमिनीचं तापमान स्थिर ठेवतो, मुळांना थेट उष्णतेपासून वाचवतो.

हे सगळं ऐकून एक शेतकरी भावनिकपणे म्हणाले –

"खत-पाणी दिलं की झालं असं नाही, झाडाला जसं गरज लागते तसं सगळं वेळेवर द्यावं लागतं…"

शेती म्हणजे निसर्गाशी भांडणं नाही…

…तर त्याला समजून घेत त्याच्यासोबत चालण्याची एक जीवनशैली आहे.
उष्णता फक्त बाहेरची नसते – ती झाडांच्या आत खोलवर साचलेली असते. पण योग्य व्यवस्थापन केलं, तर तीच झाडं आपल्याला समाधान देणारं उत्पादन देतील.

"प्रत्येक फुलामागे, झाडामागे एक शेतकऱ्याचं जागं मन असतं – आणि हेच मन परिस्थिती बदलण्याची ताकद ठरू शकतं."

शेतकरी मित्रांनो, लक्ष द्या या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे.
समजून घेऊन, नियोजनबद्धपणे पावलं उचलली, तर उत्पन्नात नक्कीच वाढ होईल.

– मनोज कदम
ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र, करगणी
मो.: ७९८१२६३०२३

उन्हाच्या झळांतून हिरव्या आशेचा उगम!"उन्हाळ्यात डाळिंब फळांची सेटिंग झाल्यानंतर, तीव्र सूर्यकिरणांमुळे फळांवर सनबर्नचे ड...
15/04/2025

उन्हाच्या झळांतून हिरव्या आशेचा उगम!"

उन्हाळ्यात डाळिंब फळांची सेटिंग झाल्यानंतर, तीव्र सूर्यकिरणांमुळे फळांवर सनबर्नचे डाग पडण्याची शक्यता वाढते. हे डाग केवळ सौंदर्यावर नाही, तर फळांच्या सालीवर ताण निर्माण करून भविष्यात फळ क्रॅकिंग होण्याची शक्यता वाढवतात.

पण यावर उपाय शोधण्यात आलेला आहे — इंग्रजी पेपरने केलेलं फळ कव्हरिंग!
या कव्हरिंगमुळे फळांना थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळतं आणि सालीचा ताण कमी होतो.

फक्त उन्हापासूनच नव्हे, तर पावसाळ्यात येणाऱ्या तेलकट चा प्रसार कंट्रोल करण्यास फायदेशीर ठरते व कव्हरिंग केलेले फळांचे रक्षण करते.

मागील वर्षी आलेल्या निमॅटोड प्रादुर्भावावर यंदा जैविक उपायांनी प्रभावी नियंत्रण मिळवण्यात आलं — गांडूळ खत, ट्रायकोडर्मा, प्यासीलोमायसिन यांचा वापर करून मुळांची वाढ आणि जमिनीतील सूक्ष्मजीवसंख्या वाढवण्यात आली.

बागेत 530 झाडे असून, प्रत्येकी 100 पेक्षा जास्त फळांची सेटिंग होती पण थिनिंग करून 70 ते 80 फळे ठेवण्यात आली आहे.
फळ क्रॅकिंग टाळण्यासाठी कॅल्शियम, बोरॉन आणि ऑर्थो-सिलिकिक ऍसिडची 2% फवारणी करून सालीची लवचिकता वाढवण्यात आली आहे. ज्यामुळे डाळिंब फळाची साईज चांगल्या प्रकारे होईल.

पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन आणि उसाच्या पाचटाचे मल्चिंग वापरून जमिनीत गारवा व ओलावा टिकवण्यात आला.
यामुळे पांढऱ्या मुळांची वाढ लक्षणीय झाली आहे.

या सर्व शास्त्रशुद्ध उपायांमुळे बागेतील फळं जुलैच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येणार असून, दर्जा उत्तम राहिल्याने चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.

शेतकरी: नवनाथ ऐवळे — ज्यांनी नियोजन, जैविक उपाय आणि सतत निरीक्षण याच्या जोरावर डाळिंब बागेतील उत्पादन आणि गुणवत्ता एक नवा टप्पा गाठला आहे.

मार्गदर्शक : मनोज कदम
📞 7981263023 . ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र, करगणी

🌳PomegranateFarming 🌳OrganicFarmin🌳. 🌳SmartFarming 🍃

डाळिंब बागेतील नैसर्गिक ताण 60-70% टप्प्यांपर्यंत दिल्यानंतर केलेली छाटणी अत्यंत परिणामकारक ठरली आहे. यामुळे काडी पूर्णप...
14/04/2025

डाळिंब बागेतील नैसर्गिक ताण 60-70% टप्प्यांपर्यंत दिल्यानंतर केलेली छाटणी अत्यंत परिणामकारक ठरली आहे. यामुळे काडी पूर्णपणे पक्व झाली असून, नैसर्गिकरीत्या तयार झालेलं काडीचं स्टोरेज प्रभावी ठरल्यामुळे झाडाची ताकद लक्षणीय वाढली आहे. यामुळे पुढील बहार अधिक यशस्वी होईल, हे निश्चित झालं आहे. या प्रक्रियेमुळे झाड सशक्त होत स्टोरेज अवस्थेत जातं आणि नैसर्गिक पानगळ घडवून आणली जाते. अनिल गिड्डे यांनी त्यांच्या बागेतील 200 झाडांवर शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून हे सिद्ध केलं आहे. त्यांनी हार्वेस्टिंगनंतर अवघ्या 15 दिवसांत बेसल डोस व सेंद्रिय शेणखताचा वापर करत 70 दिवसांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने पाणी देत काडीचं परिपूर्ण स्टोरेज केलं. त्यानंतर नियोजनबद्ध रीतीने पाणी कमी करून नैसर्गिक पानगळ साधली, ज्यामुळे फुलधारणा, फळधारणा आणि फळगुणवत्ता या सर्व बाबी संतुलित राहतील याची शाश्वती मिळाली. 21 एप्रिल तारखेदरम्यान इथेरल फवारणीचं नियोजन करत त्यांनी पुढील बहारासाठी आदर्श परिस्थिती निर्माण केली आहे. 200 झाडांच्या फिजिओलॉजीचा अभ्यास करून केलेलं हे संपूर्ण नियोजन डाळिंब बागायतीतील इतर शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. शास्त्र, अनुभव आणि नैसर्गिक प्रक्रियेचा समतोल राखून केल्यास उत्पादनात आणि गुणवत्तेत निश्चितच भर घालता येते, हे यशस्वी प्रयोगातून स्पष्ट झालं आहे. इतर शेतकऱ्यांनी या यशस्वी पद्धतीतून प्रेरणा घेऊन आपल्या बागेचं व्यवस्थापन योग्य दिशेने करावं, हीच खरी शाश्वत शेतीची वाट आहे.

कृषी मार्गदर्शक,: मनोज कदम _ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र करगणी 7981263023. योग्य नियोजन! योग्य मॅनेजमेंट ! नैसर्गिक प्रक्रियेचा आदार व झाडाच्या पेजोलॉजीनुसार नियोजन! कमी खर्चात अधिक उत्पादन नियोजन!

तडवळे गावातील गणेश गिड्डे हे नाव आज शेतकऱ्यांमध्ये प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. त्यांच्या १० वर्षांच्या डाळिंब बागेतील यश के...
14/04/2025

तडवळे गावातील गणेश गिड्डे हे नाव आज शेतकऱ्यांमध्ये प्रेरणेचा स्रोत ठरत आहे. त्यांच्या १० वर्षांच्या डाळिंब बागेतील यश केवळ उत्पादनापुरते मर्यादित नाही, तर त्यांनी शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला आहे.​

पानगळ आणि दाट फळसेटिंग

गणेशभाऊंनी १ फेब्रुवारी रोजी पानगळ केली आणि अवघ्या ७५ दिवसांत प्रत्येक झाडावर १५० हून अधिक फळांची दाट सेटिंग साधली. प्रत्येक फळाचं वजन १०० ग्रॅमपेक्षा अधिक असून त्यांना नैसर्गिक, लालसर आणि चमकदार रंग लाभला आहे – जे थेट बाजारपेठेत दर्जेदार स्पर्धेसाठी सज्ज आहेत.​

जैविक पोषणाचे रहस्य

रासायनिक मार्ग कमी प्रमाणात स्वीकारता, गणेशभाऊंनी निसर्गाशी घट्ट नातं जोडलं. त्यांच्या गोठ्यातील १२ गाईंपासून मिळणाऱ्या शेण व गोमूत्राचा वापर करून त्यांनी स्वतःचं गोबर गॅस युनिट उभारलं. त्यातून मिळणारी जैविक स्लरी PSB व KSB जैविक जिवाणूंनी समृद्ध करून त्यांनी महिन्यातून चार वेळा ती डबल ड्रिपद्वारे झाडांपर्यंत पोचवली.​

मल्चिंगसाठी उरलेली स्लरी

गोबर गॅस प्रक्रियेत उरलेली स्लरी त्यांनी मल्चिंगमध्ये रूपांतरित केली. झाडाच्या ड्रिप लाईनखाली ही स्लरी ओतल्याने झाडाभोवती एक सघन मल्चिंगचा थर तयार झाला, ज्यामुळे मातीची ओलावा टिकून राहिला आणि वाष्पीभवन कमी झाले. तसेच, मल्चिंगमुळे खरपतवारांचा प्रसार आटोक्यात आला आणि मातीतील सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता वाढली, ज्यामुळे ऑरगॅनिक कार्बनचे प्रमाण लक्षणीय वाढले.​

सजीव माती आणि पांढऱ्या मुळ्यांचा विकास

या संपूर्ण जैविक प्रक्रियेमुळे मातीत सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढलं, पांढऱ्या मुळ्यांची वाढ जोमात झाली आणि माती पुन्हा सजीव झाली. संपूर्ण हंगामात केवळ ९ फवारण्या आणि अत्यल्प रासायनिक खतांचा वापर करूनही गणेशभाऊंनी जे भरघोस उत्पादन घेतलं, ते खरंच स्तुत्य आहे.​

“शेती ही व्यवसाय नाही, ती साधना आहे. जेव्हा आपण निसर्गावर विश्वास ठेवतो, तेव्हा निसर्ग आपल्यावर आशीर्वादाचा वर्षाव करतो.”​

गणेशभाऊंची ही गोष्ट केवळ एक यशकथा नाही – ती हजारो शेतकऱ्यांना नव्या विचारांची दिशा देणारी वाट आहे. अशी शेती म्हणजे जमिनीशी नातं, मनाशी श्रद्धा आणि निसर्गाशी एकरूपता – ज्यातून सोनंही उगवू शकतं.​

शेतकरी: गणेश गिड्डे 94037 82912
मार्गदर्शक: मनोज कदम
ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र, करगणी – 7981263023

उन्हाळ्यातही भरघोस फुलबहार – अचूक नियोजनाची यशोगाथा!रामनगर येथील शेतकरी दशरथ जाधव व त्यांचे बंधू भीमराव जाधव या दोघायांन...
11/04/2025

उन्हाळ्यातही भरघोस फुलबहार – अचूक नियोजनाची यशोगाथा!

रामनगर येथील शेतकरी दशरथ जाधव व त्यांचे बंधू भीमराव जाधव या दोघायांनी अत्यंत अचूक आणि वैज्ञानिक पद्धतीने डाळिंब बागेचे नियोजन केले आहे.
उन्हाळ्याच्या कडाक्यातसुद्धा आज त्यांच्या बागेत ७०% मादी फुलांची संख्या, तसेच १०-१५% सेटिंग यशस्वीरीत्या झालं आहे – यामागे आहे पूर्वतयारीचं शास्त्रीय नियोजन.

महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समाविष्ट असलेले घटक:

स्टोरेज स्टेज नियोजन:
पानगळ सुरू होण्याच्या आधी झाडामध्ये अन्नद्रव्य साठवण (स्टोरेज) करण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी, खत, मायक्रोन्यूट्रंट्स व अन्नद्रव्यांचं नियोजन केलं गेलं.
यामुळे पानगळीनंतर झाडांची ऊर्जा टिकून राहिली.

पानगळ नियोजन:
२५ फेब्रुवारी रोजी झाडांना इथीफोनच्या योग्य प्रमाणातील फवारणीसह घेतली व पाणी नियोजन करून पानगळ केली.
यामुळे ८०-९०% नैसर्गिक पाने पिवळी पडत गेली आणि खाली पडली. यामुळे जे झाडाच्या पानांमध्ये अन्नद्रव्याचा साठा होता तो काडीमध्ये पूर्ण पाठवला गेला.
ही नैसर्गिक प्रक्रिया झाल्यामुळेच पुढील सर्व क्रिया यशस्वीपणे पार पडल्या.

फुलबहार नियोजन:
नैसर्गिक स्टेजनंतर हार्मोन स्प्रे, बायोस्टिम्युलंट्स आणि योग्य न्यूट्रंट्सच्या सहाय्याने जोरदार फुलबहार तयार झाला.

डाळिंब बागेत उसाच्या पाचटाचं मल्चिंग:
मातीचं तापमान नियंत्रण, तण नियंत्रण, जमिनीतील आर्द्रता टिकवणं आणि जिवाणूंची क्रियाशीलता वाढवणं – या सर्व गोष्टींसाठी उसाच्या पाचटाचं मल्चिंग वापरण्यात आलं.
यामुळे मुळांची वाढ चांगली झाली, मातीतील ओलावा टिकून राहिला आणि झाडांना उन्हाळ्यातही पोषण देणं शक्य झालं.

७०% मादी फुलांची उपस्थिती:
फुलांची गुणवत्ता चांगली असून त्यातील बहुतांश फुले मादी फुले असल्याने उत्पादनक्षमतेत मोठी वाढ.

मधमाशा आकर्षित करण्यासाठी विशेष फॉर्म्युला:
मधमाशीच्या राणीला सांगून मधमाशा बोलावलं देण्यात आले ते कशाच्या मार्फत? तर याच्या मार्फत:

200 लिटर पाणी साठी:

आंबट ताक – 5 लिटर

दालचिनी – 50 ग्रॅम

ईलायची – 10 ग्रॅम

गुळ काकवी – 1 लिटर

काकवी, दालचिनी, ईलायची, ताक – 5 लिटर पाण्यात रातभर भिजत ठेवणे.
सकाळी सूर्योदयपूर्वी फवारा घेणे.

१०-१५% सेटिंग सुरू:
सुरुवातीच्या फुलांचे यशस्वी फळात रूपांतर होऊ लागले आहे, जे भविष्यातील भरघोस उत्पादनाची ग्वाही देते.

कीड-रोग व स्ट्रेस नियंत्रण:
वाढत्या तापमानात बायोटिक व अ‍ॅबायोटिक स्ट्रेसवर प्रभावी नियंत्रण ठेवल्यामुळे झाडांची स्थिती सशक्त आहे.

शेतकरी: दशरथ जाधव, रामनगर
कृषी मार्गदर्शन: ॲग्रोवन कृषी सेवा केंद्र, करगणी
कृषी मार्गदर्शक: मनोज कदम : 7981263023

योग्य नियोजन | योग्य मॅनेजमेंट | नैसर्गिक प्रक्रियेचा आदर व झाडाच्या पेजोलॉजीनुसार नियोजन | कमी खर्चात अधिक उत्पादन नियोजन.

डाळिंबरत्न मा श्री डॉ बी टी गोरे साहेब यांच्याशी आज संख येथे भेट झाली।सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध...
08/10/2021

डाळिंबरत्न मा श्री डॉ बी टी गोरे साहेब यांच्याशी आज संख येथे भेट झाली।सध्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विविध समस्येवर सकारात्मक चर्चा झाली🙏धन्यवाद साहेब🙏

Address

Kargani
Atpadi
415306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgroOne krushi Seva Kendra, Kargani , AtpaDi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AgroOne krushi Seva Kendra, Kargani , AtpaDi:

Share