Mahakesar Farmer Producer Company

Mahakesar Farmer Producer Company Deogiri Farms is a E-commerce Company for Wholesale and Retail of Fresh Fruits, Dry Fruits and Spices across India.

16/08/2026

लंगडा आंबा __ ओळख व महत्त्व..

03/08/2026

भिले, चिपळून❤️

03/08/2026

आंबा छाटणीचे मर्म_ ०२

19/07/2026

आंबा छाटनी चे मर्म…

श्री नारायण पाटील व सर्व आंबा बागायतदारांना आबासाहेब पाटील यांचा प्रेम पुर्वक नमस्कार.माझा थोडक्यात परिचय:- नाव संदिपान ...
12/07/2026

श्री नारायण पाटील व सर्व आंबा बागायतदारांना आबासाहेब पाटील यांचा प्रेम पुर्वक नमस्कार.
माझा थोडक्यात परिचय:- नाव संदिपान रंगनाथ पवार टोपन किंवा ओळख नाव आबासाहेब पाटील.
जन्म ०३/०३/१९६२. व्यवसाय शेती/नौकरी, ३८ वर्ष फौज मध्ये नौकरी करून वयाच्या साठाव्या वर्षी निवृत्त. मागील चार वर्षा पासून शेती व्यवसायात व्यस्त.

दिनांक ०९/०६/२०२६ रोजी आपलीं मिटींग मोबाईल नेटवर्क मध्ये व्यत्यय आल्याने मी पूर्णतः अटेंड करूं शकलो नाही याचा मला खेद आहे. फक्त मी श्री देवकाते सरांचे विक्री अनुभव पूर्णतः ऐकले परंतु जसे संदिप कुरे सरांनी आपले विक्री अनुभव सांगण्यास सुरुवात केली तसेच नेटवर्क मध्ये व्यत्यय येण्यास सुरुवात झाली. मी एकदा Rejoin पण झालो परंतु मला नंतर होता आले नाही.

माझा या वर्षीचा विक्री अनुभव मी या पोस्टच्या माध्यमातून आपल्या समोर व्यक्त करत आहे.
पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली विक्रीचे हे माझे दुसरे वर्ष आहे. मी माझा आंबा दोन वर्षा पासून पिकवण गृह मध्ये पिकवून महाकेशर च्या १ डझन च्या पेटीतून विक्री करत आहे.
या वर्षीच्या विक्रीचा कालावधी २५ /०४/२६ ते ०६/०६/२६ असा होता.
माझी बाग खंडाळा/तुळजापूर/धाराशिव येथे असुन माझा आंबा पुण्यात विक्री केला. मी आंबा ट्रॅव्हल्स ने पुण्यात पाठवला ज्यात वाहतूक खर्च १० रुपये प्रति डझन आला अद्याप वाहतूकीत माझा एकही आंबा खराब झाला नाही. मी वाहतुकीच्या सोयी साठी १-१ डझनाचे पांच बाॅक्स एका ठिकाणी बांईडींग करत होतो तरीही बाॅक्स च्या मजबुती मुळे वाहातुकित एकही आंबा खराब झाला नाही.

पाटील सरांचे प्रोत्साहन व त्यांच्या योग्य मार्गदर्शना मुळे मला आंबा विक्रीस खूप मदत झाली. कशी ती खालीलप्रमाणे.
१. पहिल्या वर्षी मला पाटील सरांनी आंब्याची काढणी कशी करावी त्याची ग्रेडिंग कशी करावी तो पिकवावा कसा याचं मार्गदर्शन केले व ते मी शिकलो व मला त्याचा खूप मोठा फायदा पण झाला.
२. दुसऱ्या वर्षी सरांनी अतोनात प्रयत्न करुन कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे तिन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर योग्य वेळी आयोजित केले त्यात मी बाकी विषयांबरोबरच आंब्याची काढणी, प्रतवारी व टिकवण कशी करावी हे शिकलो व त्याचा खूप मोठा फायदा पण झाला.

कसं ते खालीलप्रमाणे:-
डॉक्टर महेश कुलकर्णी सरांनी आंबा पिकवण गृह मध्ये टाकण्या पूर्व आंबा प्रतवारी करून घेण्यास सांगितले.
सरांनी सांगितले आंबा काढणी नंतर आंबा साध्या व स्वच्छ पाण्यात टाकावा तदनंतर जो आंबा तरंगला तो वेगळा करावा व जो बुडला तो वेगळा करावा. नंतर जो आंबा पाण्यात बुडाला तो आंबा परत २५० पी पी एम मिठाच्या पाण्यात टाकावा व त्यात जो आंबा तरंगला तो बाजूला घ्यावा व बुडालेला आंबा बाजूला ठेवावा.
जो आंबा मिठाच्या पाण्यात बुडाला तो आंबा पूर्णतः पिकलेला आहे असं समजावं व त्याला परत पिकवू नये तो डायरेक्ट विक्री साठी पॅक करावा व जो मिठाच्या पाण्यात तरंगला त्याला पिकवण्यासाठी ठेवावे. आशा प्रकारे यात तीन ग्रेडचा आंबा तयार झाला. A B C
A:- पूर्णतः पिकलेला आहे.
B:- परिपक्व आहे
C:- कच्चा आहे.
त्यांनी पुढे जाऊन सांगितले की,
ए ग्रेडचा आंबा न पिकवता डायरेक्ट विक्री करावा.
बी ग्रेड चा पिकवून विकावा व सी ग्रेड चा आंबा कच्चा आहे पिकवू नये तो लोणच्या साठी विकावा.
मग आम्ही काय केले, आम्ही आमचेच डोके वापरले या हिशेबाने तर ए ग्रेडचा आंबा कस्टमरला देण्या साठी कमीतकमी पाच ते सहा दिवस लागतील व बाजारात तर रोजच भाव बदलत आहेत. मग काय करावं. मग मी काय केलं. मी तिन्ही ग्रेड चे आंबे
पिकवण गृह मध्ये टाकले.
ए ग्रेडचा आंबा २४ तासांच्या एका सायकल मध्ये बाहेर काढून विक्री साठी पाठवला.
बी ग्रेड चा आंबा दिड सायकल म्हणजे ३६ तासात बाहेर काढून विक्री केला
सी ग्रेड चा आंबा ६० तासानंतर बाहेर काढला व विक्रीस पाठवला.

समजा मी जर आंब्याची मिठाच्या पाण्यात टाकून प्रतवारी केली नसती तर सर्वच आबें एकाच प्रकारच्या सायकल मधून बाहेर काढले असते, मग काय झाले असते ए ग्रेड चा आंबा पुढे गेला असता व बिळ बिळ पण झाला असता व सी ग्रेड चा आंबा पिकला नसता फक्त आपणास बी ग्रेड चा आंबा ठीकठाक मिळाला असता.

मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या १ डझन च्या पेटी मध्ये ११ आंबे चांगले व १२ व्हा आंबा खराब निघाला तर तुमच्या चांगल्या ११ आंब्याचा काहिच उपयोग नाही.
आपली जबाबदारी फक्त आंबा विक्री पर्यंत नसुन त्याहीपेक्षा पुढे आहे.

विक्री कसा केला.
ए व बी ग्रेड चा आंबा माहाकेशर च्या बाॅक्स मध्ये पॅक करुन डझन वर विकण्यात आला. त्यात ही जे कस्टमर सांगेल तो भाव देत होते त्यांना ए ग्रेडची पॅकिंग दिली. मी माझ्या ओळखी साठी पेनाने बॉक्स वर ए व बी अशी मार्कीग केली होती.

सी ग्रेड चा आंबा मला माहित होते की जो सी ग्रेड चा आंबा आहे तो जरी परीपक्व नसला तरी तो परिपक्व तेच्या जवळपास आहे, याठिकाणी मला पाटिल सरांनी दिलेल्या पिकवण गृहचा फायदा झाला. पिकवण गृह नसते तर मला हा आंबा पिकवता आला नसता. जवळपास २५% आंबा सी ग्रेड चा माझ्या हातून निघाला यांचा अर्थ असा नाही कि मी काढणीत चूक केली तसं हे माझं आंबा काढणीचे तिसरं वर्ष आहे. पूर्ण काढणी चा निकष लावूनच आंबा काढला होता. मी माझ्या कामात कसल्याच प्रकारचा निष्काळजीपणा ठेवत नाही.
माझ्या मते एकाच बागेतील प्रत्येक कलमांची बायोग्राफी वेगळी असावी तसेच एकाच कलमावरील प्रत्येक फळांची पण.
सी ग्रेड चा आंबा मी किलो वर विकला व तो १०० ते २०० रुपये प्रति किलो आंबा व कस्टमर पाहून विकला.

पिकवण गृहचा फायदा कोणता, कोणाला, कसा व किती होतो.
१. आंबा बागायतदार:- आंबा बागायतदारांचा आंबा पिकवण्यासाठी लागणारा वेळ, मेहनत व खर्च यात बचत होते. योग्य आंबा योग्य ग्राहकांच्या हाती जातो जेणेकरून आपणास ज्यास्तीत जास्त आंब्याची किंमत मिळते. जसं कि सी ग्रेड चा आंबा मला या तर लोणच्यासाठी ३० ते ४० रुपये किलोने विक्री करावा लागला असता नाही तर पारंपरिक पद्धतीने पीकवण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच २५% नुकसान करून घ्यावे लागले असते.
२. ग्राहक:- चवदार व विषमुक्त आंबा खाण्यासाठी मिळतो.

या वर्षी चे अनुभव:-
जनतेकडे पैशाची कमी नाही फक्त कमी आहे ती योग्य वस्तूंची.
ग्राहकास तुम्ही योग्य आंबा द्या ग्राहक तुम्हाला योग्य तो मोबदला देणारच.

मी मान्य करतो की तुमच्या कडे विस पंचवीस एकर बाग आहे किंवा त्या ही पेक्षा जास्त आहे शंभर दीडशे टन माल निघतो ते विकणं शक्य नाही. तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढे तरी करा. देशवासीयांना विषमुक्त अन्न देण्याचा प्रयत्न करा. देशवासीयांना विषमुक्त अन्न प्रदान करणे म्हणजे देश भक्तीच आहे व हे फक्त तुम्हीच करू शकता. तुम्ही बाहेर नका पाठवू तुम्ही तुमच्या जवळ पास विका यात तुम्हाला पैशाचा फायदा होईल किंवा नाही मी सांगू शकत नाही परंतु मानसिक समाधान मात्र नक्की मिळेल.
व्यापारी काय करतात आंब्याच्या गुणवत्तेचे नुसार प्रतवारी करतात ए व बी ग्रेड चा आंबा परदेशी पाटवतात व सी ग्रेड चा आंबा तयाला विषयुक्त बनवून भारतीयांना खायाला घालतात.
ज्या मुळे भारतीयांची मानसिक व शारीरिक कमजोरी वाढत चालली आहे. मी काल परवा च्या बातमी मध्ये ऐकले की चंद्रबाबू नायडू ने जाहीर केले आहे की जे कोणी दांपत्य तिसरं मुल जन्माला घालील त्याला सरकार तीस हजार रुपयांची मदत करील. आपण कुठून कुठे पोहोचलो यांचा विचार करवत नाही.

माफ करा मी थोडा विषय भटकलो्
मी काय म्हणतो आपणास आंबा उत्पादन व विक्रीत आत्मनिर्भर व्हायचे आहे ना मग करा ना एखाद व्यक्तीला पुढे करा त्याचे हात बळकट त्यात फायदाच होईल नुकसान नाही होणार तसं ही सरकार गटांना प्रोत्साहन व सहकार्य करतं आहे म्हणे.

या वर्षांची कौतुकास्पद गोष्ट
१. दोन डझन कृष्णाई मराठवाडा केशर आंबा रशियात पोंहचला.
२. ०६/०६/२०२६ रोजी पुण्यात माझा केशर आंबा ५००/- डझन विकत होतो व माझ्या शेजारी हापूस आंबा २५०/- रुपये डझन दराने विकत होता.
कृपया जे हापूसचे गुण गाण करतात व पक्षधर आहेत त्यांना ही माझी पोस्ट अवश्य पाठवून द्यावी.
चुकीस क्षमा.
धन्यवाद

08/07/2026

आंबा फळांच्या वीरळणीचे महत्त्व __

14/05/2026

पिकवलेले केसर आंब्याचे रॅकेट मध्ये भरणी करून वाहतूक करन्यासाठी तयार करणे..

14/05/2026

जी केसर आंबा बागायतदार स्वतःचा आंबा स्वतः पिकून विकत आहेत त्या बागायतदारांनी आपला आंबा होलसेल पद्धतीने किरकोळ विक्री करणाऱ्या ग्राहकांना किंवा विक्रेत्यांना देताना जर वरील प्रमाणे साॅर्टिंग आणि वजनानुसार ग्रेडिंग करून कॅरेट मध्ये आंबा भरून दिला तर त्या किरकोळ विक्रेत्याकडून आपल्याला निश्चितच चांगला प्रतिसाद मिळेल..आणि आपला आंबा ग्रेडिंग मध्ये सुबक व आकर्षक दिसत असल्यामुळे आपल्याला दोन पैसे अधिकचे मिळवता येतील. सर्व केसर आंबा बागायतदारांनी वरील व्हिडिओचे अवलोकन करून शक्यतो त्याप्रमाणे थांबा विक्री करावी. धन्यवाद 🙏

Address

A-402, Manjeet Pride Primo, Mahanubhav Ashram Chowk, Beed Bypass T-Point
Aurangabad
431001

Opening Hours

Monday 9am - 8pm
Tuesday 9am - 8pm
Wednesday 9am - 8pm
Thursday 9am - 8pm
Friday 9am - 8pm
Saturday 9am - 8pm
Sunday 9am - 8pm

Telephone

+919421525055

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahakesar Farmer Producer Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahakesar Farmer Producer Company:

Shortcuts

Share