19/11/2020
जालनारोडवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी २१ते २७ नोव्हेंबर या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर आकाशवाणी सिग्नल बंद करून सेव्हन हिल ते मोंढा नाका आणि मोंढा नाका ते सेव्हन हिल ही दोन बाजूंचीच वाहतूक सतत सुरू ठेवली जाईल.
संध्याकाळी ६ ते रात्री ८ या वेळात हा बदल केला जाणार आहे. पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा म्हणून दर तीन मिनिटांनी १५ सेकंद वाहतूक थांबवली जाईल.