MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH

MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH Conducting on-farm testing to identify the location specificity of agricultural technologies under va

मराठवाडा कृषी हवामानावर आधारित शेतकरी सल्ला (०८ ते १२ जुलै २०२६)पुढील काही दिवस मराठवाड्यात तुरळक ते हलक्या पावसाची शक्य...
07/07/2026

मराठवाडा कृषी हवामानावर आधारित शेतकरी सल्ला (०८ ते १२ जुलै २०२६)

पुढील काही दिवस मराठवाड्यात तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम पाऊस पडू शकतो.

उशिरा पेरणी करावयाची असल्यास कमी कालावधीच्या वाणांची निवड करावी.

पेरणीनंतर पिकामध्ये योग्य ओलावा राखण्यासाठी आवश्यकतेनुसार आंतरमशागत व तणनियंत्रण करावे.

कपाशी, सोयाबीन, तूर, मूग व उडीद पिकांमध्ये शेंडी/पाने खाणाऱ्या अळ्यांचे निरीक्षण करून प्रादुर्भाव आढळल्यास शिफारशीनुसार नियंत्रण उपाय करावेत.

फळबागांमध्ये पावसामुळे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी तसेच रोग व कीड नियंत्रणासाठी नियमित पाहणी करावी.

जनावरांच्या गोठ्यांची स्वच्छता राखावी, कोरडा चारा साठवून ठेवावा आणि पावसापासून जनावरांचे संरक्षण करावे.

– महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्र, गांधेली, छत्रपती संभाजीनगर

04/07/2026

हवामान आधारित कृषी सल्ला (04 ते 08 जुलै 2026)

हवामान अंदाज :

मराठवाड्यात या आठवड्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारे (30–50 कि.मी./तास) व मुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान 27 ते 31°C दरम्यान राहील.

🌱 सोयाबीन

• पेरणीसाठी पुरेसा ओलावा असल्यास 15 जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करावी.
• बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
• बी.बी.एफ. (रुंद वरंबा-सरी) पद्धतीने पेरणी केल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होऊन चांगले उत्पादन मिळते.
• पेरणीवेळी शिफारशीनुसार खतांचा वापर करावा.

🌾 खरीप ज्वारी

• पेरणी शक्य तितक्या लवकर पूर्ण करावी.
• पेरणीवेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश खत द्यावे.
• जोरदार पावसाच्या काळात शेतात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

🌾 बाजरी

• 20 जुलैपर्यंत पेरणी करता येईल.
• जमिनीच्या प्रकारानुसार शिफारस केलेली खत मात्रा द्यावी.
• पावसानंतर तण नियंत्रणाकडे लक्ष द्यावे.

🌾 संत्रा / मोसंबी

• फुलधारणेच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
• ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पावसाची उघडीप पाहून बुरशीनाशकाची फवारणी करावी.
• नवीन लागवडीसाठी प्रमाणित रोपेच वापरावीत.

🌾 पशुधन

• गोठ्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
• गोठ्यात हवा खेळती राहील अशी व्यवस्था करावी.
• जनावरांना झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नये.
• हिरवा चारा मर्यादित प्रमाणात द्यावा.
• दुग्धजनावरांच्या कासेची स्वच्छता राखावी.

विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक ३ ते ९ जुलै २०२६ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी ...
04/07/2026

विस्तारित अंदाजानुसार मराठवाड्यात दिनांक ३ ते ९ जुलै २०२६ दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर दिनांक १० ते १६ जुलै दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी एवढी राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा कृषी हवामान सल्ला (01 ते 05 जुलै 2026)शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्लापुढील काही दिवस मराठवाड्यात बहुतांश भा...
30/06/2026

मराठवाडा कृषी हवामान सल्ला (01 ते 05 जुलै 2026)

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला

पुढील काही दिवस मराठवाड्यात बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मेघगर्जना आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.

कृषी सल्ला:
• पुरेसा ओलावा (75–100 मिमी) झाल्यानंतरच पेरणी करावी.
• ज्या भागात समाधानकारक पाऊस झाला आहे तेथे कापूस, तूर, मूग, उडीद, भुईमूग व मका पिकांची पेरणी/लागवड शिफारशीनुसार पूर्ण करावी.
• वादळी व पावसाळी वातावरणात रासायनिक फवारणी टाळावी आणि हवामान स्वच्छ झाल्यानंतरच करावी.
• भाजीपाला व फुलपिकांमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा.
• जनावरांच्या गोठ्यात ओलावा साचू देऊ नये व स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी.

विशेष सूचना:

वादळी वारे व विजांच्या शक्यतेमुळे शेतातील कामे हवामानाचा अंदाज पाहूनच करावीत आणि स्वतःची तसेच पशुधनाची सुरक्षितता जपावी.

कृषी हवामान सल्ला – मराठवाडा (26 ते 30 जून 2026)मराठवाड्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी!मराठवाड्यात पु...
25/06/2026

कृषी हवामान सल्ला – मराठवाडा (26 ते 30 जून 2026)

मराठवाड्यात पावसाची हजेरी; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी!

मराठवाड्यात पुढील काही दिवस हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना व मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य 75–100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी. सोयाबीन, ज्वारी, बाजरी आदी पिकांसाठी शिफारस केलेली बीजप्रक्रिया व खत व्यवस्थापन अवलंबावे. जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.

24/06/2026

पुढील ३ तासात छत्रपती संभाजीनगर, धुळे, हिंगोली, जळगाव, नांदेड, परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई

23/06/2026

पिकाचे नाव : कापूस

अवस्था : वाणाची निवड / आंतरपीक / बीजप्रक्रिया

कापूस पिकाच्या लागवडीसाठी वाण निवडताना जमीन व हवामान, कोरडवाहू किंवा बागायती, लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यांचा विचार करूनच वाणांची निवड करावी. बीटी कापसामध्ये कापूस + तूर (४-६:१ किंवा ६-८:२), कापूस+सोयाबीन (१:१), कापूस + मूग (१:२), कापूस+उडीद (१:१) असे ओळीचे प्रमाण ठेवून आंतरपीक पद्धती अवलंबल्यास फायदेशीर ठरते. कापूस बियाण्यास थायोमेथोक्झाम ७० एफएस १० ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डाझीम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. यामुळे मर व करपा यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. नत्र स्थिरीकरणासाठी अझोटोबॅक्टर व स्फुरद विरघळ करणारे जिवाणू संवर्धकाची १० मिली प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.

23/06/2026

तूर

आंतरपीक / बीजप्रक्रिया / बियाणे प्रमाण

तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी तसेच जमिनीची उत्पादकता राखण्यासाठी तूर + बाजरी (२:४), तूर + सोयाबीन/मुग/उडीद (१:२ किंवा २:४) असे ओळीचे प्रमाण ठेवून फायदेशीर आंतरपीक पद्धतीचा वापर केल्यास अधिक फायदा होतो.

पेरणीपूर्वी तूर बियाण्यास कॅप्टान ८० टक्के २० ग्रॅम किंवा कार्बेन्डॅझिम १० ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास रायझोबियम आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू प्रत्येकी २५० ग्रॅम व ट्रायकोडर्मा ५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.

कोरडवाहूसाठी हेक्टरी १२ ते १५ कि.ग्रॅ. बियाणे तर बागायती टोकण पद्धतीने लागवडीसाठी ५ ते ६ कि.ग्रॅ. प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

मराठवाड्यासाठी चालू आठवड्याचा कृषी हवामान अंदाज (२४ ते २८ जून २०२६)मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, ध...
23/06/2026

मराठवाड्यासाठी चालू आठवड्याचा कृषी हवामान अंदाज (२४ ते २८ जून २०२६)

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये आगामी आठवड्यात ५१ मिमीपर्यंत पावसाची शक्यता असून वातावरण प्रामुख्याने ढगाळ राहणार आहे. कमाल तापमान ३५ ते ३७°से. तर किमान तापमान २१ ते २६°से. दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. सकाळी व दुपारी आर्द्रतेचे प्रमाण तुलनेने जास्त राहील. वाऱ्याचा वेग ८ ते २० किमी/तास असून दिशा प्रामुख्याने पश्चिम ते पश्चिम-नैऋत्य राहील.

शेतकरी सल्ला :

पावसाचा अंदाज लक्षात घेऊन पेरणी व आंतरमशागतीची कामे नियोजनबद्ध करावीत.
पिकांमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित ठेवावा.
कीड व रोगांच्या प्रादुर्भावावर नियमित निरीक्षण ठेवावे.
खतांचा संतुलित वापर व बीजप्रक्रिया यांना प्राधान्य द्यावे.

Address

Pardari Road
Aurangabad
431007

Opening Hours

Monday 9am - 5:30pm
Tuesday 9:30am - 5:30pm
Wednesday 9:30am - 5:30pm
Thursday 9:30am - 5:30pm
Friday 9:30am - 5:30pm
Saturday 9:30am - 5:30pm

Telephone

+919404997772

Alerts

Be the first to know and let us send you an email when MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MGM Krishi Vigyan Kendra, Gandheli, Aurangabad - MH:

Shortcuts

Share