Atul Thakur - Empowering People To Tap Into Their Greatness.

Atul Thakur - Empowering People To Tap Into Their Greatness. We are committed for each and every small and medium scale business becoming successful.

22/11/2025

तुमच्यासोबत काय मृत्यू पावत यापेक्षा, तुम्ही जिवंत असताना तुमच्यात काय मरतं हेच अधिक धोकादायक

— अतुल ठाकुर

उद्योजक म्हणून आपण वारंवार “आपल्या मागे काय राहील” याबद्दल बोलतो.
पण खरी धोकादायक गोष्ट कधी सुरू होते माहिती आहे का?

जेव्हा तुम्ही जिवंत असताना — तुमच्यातील काही महत्त्वाची गोष्ट मरायला सुरुवात करते.

उद्योजकांमध्ये नेमकं काय मरतं?

1. वाढीची आग

सुरुवातीला उत्साह, धडाडी, आक्रमकपणा असतो.
पण वेळोवेळी अपयश, भीती, दबाव किंवा सहजतेने जुळवून घेणे
ही आग हळूहळू विझवू लागतात.
व्यवसाय अनेक गोष्टींशिवाय चालू राहू शकतो—
पण निर्धार गमावलेला उद्योजक व्यवसायाला नेऊ शकत नाही.

2. धाडसी निर्णय घेण्याचं धैर्य

प्रत्येक व्यवसायाला वाढीसाठी काही वेळा कठोर, मोठे आणि धाडसी निर्णय घ्यावे लागतात.
स्केलिंग, हायरिंग, फायरींग, इन्व्हेस्टमेंट…
धैर्य मेलं की वाढही मरते.

3. शिकण्याची तयारी

ज्या उद्योजकांनी शिकणं बंद केलं, त्यांनी वाढणंही बंद केलं.
जुनी विचारसरणी, जुन्या पद्धती आणि जुनी सवयी
व्यवसायाला पुढे जाण्यापासून थांबवतात.

4. मोठं स्वप्न पाहण्याची दृष्टी

लहान दृष्टी = लहान कृती.
सुरुवातीला उद्योजक मोठे विचार करतात,
पण मार्गातच कुठेतरी भीती, शंका आणि सर्वायवल मोड
त्यांची दृष्टी मारतात.

5. सातत्य आणि शिस्त

कल्पना व्यवसाय उभारू शकत नाहीत—
शिस्तबद्ध कृती उभारते.
सातत्य मरलं की व्यवसाय गोंधळात जातो.
खरी गोष्ट सोपी आहे:

तुम्ही व्यवसाय बंद केला तेव्हा व्यवसाय मरत नाही.
तुम्ही वाढणं थांबवलं, तेव्हाच व्यवसाय मरायला सुरुवात होते.
तुमच्यात काही मरू देऊ नका — पुन्हा जागं व्हा

तुम्ही फक्त व्यवसाय सांभाळण्यासाठी जन्माला आला नाहीत.
तुम्ही व्यवसाय उभारण्यासाठी, वाढवण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी जन्माला आला आहात

Life Catalyst Private Limited कसे मदत करते?

आमचे कार्यक्रम:

🔥 Business Excellence Program
🔥 Wake Up & Scale Up Workshop
🔥 9 Business Fundamentals Program

उद्योजकांमध्ये पुन्हा जागं करतात—
✔ जिंकालेली आग
✔ दृष्टी
✔ आत्मविश्वास
✔ सिस्टीम्स
✔ वाढीचा मार्ग
✔ आणि पुन्हा मोठं निर्माण करण्याची मानसिकता

हे कार्यक्रम तुमच्यातील उद्योजक पुन्हा जिवंत करतात आणि
तुमचा व्यवसाय सिस्टम-ड्रिव्हन बनवतात

लक्षात ठेवा:

तुमच्यासोबत काय मरतं यापेक्षा,
तुम्ही जिवंत असताना तुमच्यात काय मरतं हे महत्त्वाचं.
ते जपा, पुन्हा जागं करा आणि स्वतःला व व्यवसायाला पुढे न्या.

— अतुल ठाकुर
Life Catalyst Private Limited
093252 23344

01/06/2025
17/10/2024
If we look at most of the businesses today you will find that more than 60% are struggling today to acheive what they wa...
02/03/2024

If we look at most of the businesses today you will find that more than 60% are struggling today to acheive what they want to achieve. The reason for this is not the condition not the product not the team in fact nothing that owner thinks is a problem. The main problem is wrong person is handling the business. Most of the business owner start their business just because they don't want to work under anyone. They want to be there one boss. So with some technical aspect and technical knowledge of business they start something called business. Truly and slowly the business becomes thier boss. They don't allow systems to grow around them. Because they want to control everything in their business. For them that is the only way to handle the business. Surendra wrong person is handling the business business is found to fail. Look at the way many hospitals are run by medical practices, look at how civil engineers are handling their contractor business, look at some marketing people starting their own production units, look at sales peilople starting his own trading company and so on.
You will find most of them struggling to find time and money as per their own wish. They have not created business they have created job for themselves. Now this new boss their own business doesnt give salary on time nor allows them to have holidays.
Education is the key here. You must educate yourself to run the business. This type of education is not available in schools or colleges. Your Degree is not sufficient.
That's why we decided to train small and medium business people in wake up and scale up.
Atul Thakur
9325223344

Share this vdo
28/02/2024

Share this vdo

25/02/2024

नमस्कार .
काल परवापासून व्हाट्सअप वर एक पोस्ट व्हायरल होत आहे.त्यामध्ये दोन तरुणी अमली पदार्थांच्या अंमलाखाली बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या. आहेत. कोण आहेत कोणत्या घरातल्या आहेत हे महत्त्वाचे नाही पण एका चांगल्या घरातल्या तरुणी या अवस्थेत पोहोचणे हे एका सुदृढ समाजाचे चांगले लक्षण नक्कीच नाही.
या अशा घटना आपल्या समाज भावना आणि सामाजिक जाणीव किती बोथट होत चालल्या आहेत याचे प्रमाण असते.

आज अमली पदार्थांचे तस्कर पकडले जातात त्यांना शिक्षा होतात की नाही होत ते कळतही नाही परंतु समाजात वाढत चाललेला अंमली पदार्थाचा वापर; त्यातल्या त्यात महाराष्ट्रातला हा नक्कीच विचलित करायला लावणार आहे. कदाचित यामध्ये आई-वडिलांची एक चूक आपण मान्य करायला हवी. आजकाल बऱ्याच जणांना आपल्या मुलांचे लाड पैशाने किंवा त्यांना सुविधा देऊन करणे हे आपले कर्तव्य वाटते व स्वतःच्या आयुष्यात असलेले प्रॉब्लेम्स मुलांना जास्तीत जास्त सुविधा देऊन सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा जबाबदारी झटकण्यासाठी सुद्धा पालक हे करतात किंवा काही जणांना एवढीच आपली जबाबदारी आहे असे वाटते. काहीजण एका इमोशनल आंदोलनामध्ये अडकलेले असतात 'मला जे मिळालं नाही ते माझ्या मुलांना मिळाला पाहिजे'. मुलं बिघडत राहतात, समाज बिघडत राहतो. गोष्टी हाताबाहेर गेल्यानंतर प्रयत्न सुरू होतात.. बऱ्याच वेळा त्याला उशीर झालेला असतो!

समाज देखील याकडे माझ्या घरात प्रॉब्लेम नाही म्हणजे तो माझा प्रॉब्लेम नाही असा बघत असतो. कित्येक शाळा कॉलेज बाहेर या प्रकारचे पदार्थ विकले जातात याची जाणीव असून देखील काहीच केले जात नाही. पोलीस यंत्रणा यासाठी कुचकामी आहे किंवा निष्प्रभ आहे हे कोणाच्या लक्षात येत नाही. यामागे असलेल्या भ्रष्टाचारात ज्यांच्या ज्यांच्या हात बरबटलेले आहेत त्यांना आमच्या वागण्याचे काहीच वाटत नाही. आणि अशा लोकांना सामाजिक बहिष्कृत करणं हे सुद्धा आपले कर्तव्य वाटत नाही . नाक्यावरचा हवालदार पैसे खात असताना आपल्या मनात काहीच वाटत नाही. पॉलिटिशन पैशासोबत सापडला तर आपल्याला त्याविषयी पण काही वाटत नाही. प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ रिऍक्ट करणे आणि विसरून जाणे हा मानवी स्वभाव होत चालला आहे.याचे परिणाम पुढे जाऊन भयानक होऊ शकतात याची आणि आज न राज्यकर्त्यांना आहे न विरोधकांना!
*मला काय पाहिजे* यामध्ये प्रत्येकाला जास्त इंटरेस्ट आहे. हजारो लोक आंदोलनामध्ये सहभागी होतात पण अंमली पदार्थ आंदोलन स्वतःचे वाटत नाही. यासाठी सामाजिक बांधिलकी आहे असेही वाटत नाही. हा आजचा फार मोठा ज्वलंत प्रॉब्लेम आहे.

'पुढची पिढी बिघडवणे हे कुठले कटकारस्थान तर नाही ना?' यावर आज आपण लक्ष देत नाही ही शोकांतिका आहे.
हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाने हा विचार करावा.!!!

24/02/2024

आज बहुतेक कुटुंबसमोर, ज्याच्यासमोर आर्थिक समस्या आहेत त्यांनी जर स्वतःच्या पैशाच्या वापरा विषयी विचार केला तर एक लक्षात येते त्यांना श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंत दिसण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे.
आज ब्रँड्स, ऍडव्हर्टाईस या सगळ्या गोष्टीचा मारा जो होत असतो तो केवळ याच मानसिकतेचा फायदा उचलण्यासाठी होत असतो. आज सगळ्यात जास्त कुठला वर्ग टार्गेट केला जातं असेल तर तो मध्यमवर्गीय वर्ग आहे. यामध्ये माध्यमावर्गीय वर्गाला श्रीमंत दिसण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असतो.ते महागड्या गोष्टी विकत घेतात, अवास्तव खर्च घरावर करतात गाड्या विकत घेत राहतात, कपड्यांवर खूप खर्च करतात, गॅजेट्सवर खर्च करतात, यालाच सुखी आयुष्य जगणे असं समजतात.वास्तविक पाहता यांचे सगळे आयुष्य
बँकेचे हप्ते फेडण्यात, किंवा बँकेच्या इम्प्लायी सारख काम करण्यातच जातो.
याचं सगळं महत्त्वाचं कारण म्हणजे आर्थिक साक्षरता नसणे हेच असतं.
मुळात कुटुंबामध्ये आर्थिक साक्षरता या विषयावर कधी चर्चाच होत नाही. ना ती त्यांची प्रायोरिटी असते नाही ती त्यांची आवश्यकता असते.
त्यामुळे हा लेख वाचणाऱ्यांनी कुटुंबात आर्थिक साक्षरता कशी निर्माण करण्यात येईल याचा विचार करावा.
अतुल ठाकूर

24/02/2024

Post has been temporarily taken down & is under review...

Address

Aurangabad
431003

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Thakur - Empowering People To Tap Into Their Greatness. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Atul Thakur - Empowering People To Tap Into Their Greatness.:

Share