Entrao2

Entrao2 Breath , Survive and Grow

We provide organic Oxygen to entrepreneur by creating mind sets , counselling , and end to solution

02/05/2023

मुंबईचा डबेवाला हा एका मॅनेजमेंट लेसन पेक्षा कमी नाहीये हे आपल्याला माहिती आहे आणि यालाच अतिशय सुंदर पद्धतीने या व्हिडिओमध्ये सांगितले गेले आहे

असाच सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असताना उद्योजक म्हणून मॅनेजमेंट हा अग्रगण्य भाग आहे हे म्हणायला हरकत नाही

हा व्हिडिओ आपल्यापर्यंत शेअर करत आहे.

Join Group for more content like this

https://chat.whatsapp.com/CNO2pS4XXKd2Ai5TlOuBFd

*फक्त संकल्पनेवर म्हणजेच बिझनेस आयडिया आधारित भांडवल उभा करता येतात का ?*उत्तर अर्थात हो !सध्या एक नवीनच फॅड बाजारपेठेत ...
02/05/2023

*फक्त संकल्पनेवर म्हणजेच बिझनेस आयडिया आधारित भांडवल उभा करता येतात का ?*

उत्तर अर्थात हो !

सध्या एक नवीनच फॅड बाजारपेठेत आले ते म्हणजे माझ्याकडे बिझनेस आयडिया आहे आणि मला कर्ज मिळेल का ते सुद्धा विना तारण नाहीतर कोणी गुंतवणूकदार मिळेल का ?

परत माझं उत्तर एकच असेल अर्थात हो !

मग नेमकं असा काय होतं की आपल्याला भांडवल उभारणी सहज होत नाही ?

🫱🏻‍🫲🏻जाणून घेण्यासाठी

*Join Group*

https://chat.whatsapp.com/CNO2pS4XXKd2Ai5TlOuBFd

*उद्योजकतेचा रोड मॅप*गेल्या पाच वर्षात उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे आण...
01/05/2023

*उद्योजकतेचा रोड मॅप*

गेल्या पाच वर्षात उद्योग आणि व्यवसाय करणाऱ्यांची इच्छा असणाऱ्यांची संख्या खूप झपाट्याने वाढत आहे आणि त्यातलच एक आश्चर्य असंही की भारतामध्ये जर चांगल्या उद्योजकांना योग्य मार्ग मिळाले तर आपल्यालाही भारतीय फेसबुक, गुगल, आयबीएम मायक्रोसॉफ्ट बघायला मिळू शकतात, या सगळ्यांचे विचार करताना मनामध्ये प्रत्येक वेळेस एक प्रश्न तुमच्याही भेडसावत असेल की

*नेमका उद्योग काय करायचा?*

आता तुम्ही म्हणाल की उद्योग काय करायचा हेच माहिती नाही तर मग रोड मॅप बनवायचा कसा ?😅

एखादा व्यवसाय यशस्वी आणि सस्टेनेबल करण्यासाठी त्यासाठी फक्त एक चांगले विजन आणि एका योग्य रोड मॅप ची गरज असते ज्यामध्ये आपली सुरुवात कशी होईल इथपासून ते आपल्या प्रॉडक्ट ला यशस्वीरित्या बाजारपेठेत आणण्यापर्यंत सर्व काही आलं

💡आता हा रोड मॅप ढोबळ मानाने सर्व व्यवसायिकांसाठी सारखाच पण प्रत्येकाच्या असलेल्या गरजा व्यवसायाची पद्धत प्रॉडक्ट किंवा सर्विसेस, कुठे विकायचा आणि कसा विकायचा या सगळ्याचे पॅरामीटर वेगळेवेगळे असू शकतात त्यामुळे रोड मॅप हा प्रत्येक वैयक्तिक उद्योजकांसाठी वेगळा बनवला जाऊ शकतो.

✅ याची सुरुवात होते योग्य व्यवसायाच्या निवडीपासून ज्यामध्ये आपल्याला असा व्यवसाय निवडता आला पाहिजे जो बाजारपेठेचा गरजा पूर्ण करेल , चांगला नफा कमवेल आणि आपल्या खिशाला ही परवडेल.

✅ पण विचार केलेला उद्योग किंवा व्यवसाय आपणच पहिल्यांदा विचार केला या भ्रमात राहू नका आपल्यापेक्षाही अनेक दिग्गज मंडळी या जगाच्या पाठीवर असंच काहीसं करत आहेत त्याचा शोध घ्या आणि मग ठरवा जो विचार आपण केला होता याची सत्य परिस्थिती काय आहे, कोणत्याही व्यवसायिक संकल्पनेला तपासण्याचे अनेक प्रमाण आहेत पण आपल्या गरजेनुसार आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीच्या अंदाजानुसार त्याचा विचार प्रत्येकाने करावा.

- इथे खरं मुद्दा येतो तो म्हणजे संकल्पनेचे प्रात्यक्षिक करण्याचा पण छोट्या प्रमाणात आणि एकदा यामध्ये यश आले की आपण त्याला बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी तयार. ( You can say prototype and beta testing)

- या ठिकाणी आपल्याला असंख्य वेगळ्या वेगळ्या विषयांचा विचार करणे गरजेचे आहे त्यामध्ये प्रामुख्याने

१. भांडवल उभारणी आणि योग्य वापर

२. कमीत कमी पुढच्या एक वर्षात ठेवलेली ध्येय आणि ती कशी पूर्ण करणार याची रूपरेषा

३. आवश्यक सरकारी नोंदण्या आणि कागदपत्रे

४. चांगली आणि विश्वासू अशी एक सहकार्याची टीम

५. ज्या गोष्टी आपल्याला अवघड वाटतात त्यासाठी विविध विषयातील विविध तज्ञ सल्लागार

आणि अशा गोष्टी आपल्याला व्यवसायाचा किंवा उद्योगाचा रोड मॅप तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात

आपल्यालाही सदरील विषयांमध्ये कुठल्याही प्रकारे मदत हवी असल्यास आम्ही आपल्याला सल्लागार म्हणून नक्कीच मदत करू शकतो.

🫱🏻‍🫲🏻तसेच या सर्व गोष्टी एकत्रितरित्या आम्ही एका दहा आठवड्यांच्या कार्यशाळांमध्ये उद्योजकांना शिकवत असतो जर आपली ही इच्छा असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करून अधिक माहिती घेऊ शकता

*संपर्क क्रमांक 9404165618*

👍🏻तसेच जर वरील माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या अधिक उद्योजकांपर्यंत नक्कीच शेअर करा

धन्यवाद
*उद्योजकांचा ऑक्सिजन* Entrao2

ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी👇🏻

WhatsApp Group Invite

24/04/2023

नमस्कार

कोरोना काळ संपून जवळपास दोन वर्षे उलटली आणि उद्योजकांचा ऑक्सिजन पासून सुरू झालेली ही चळवळ सोशल मीडियाच्या पुढे जाऊन बऱ्याच ठिकाणी तळागाळापर्यंत पोहोचली, पण हे सर्व करताना कुठेतरी फेसबुक व्हाट्सअप इंस्टाग्राम आणि इत्यादी ठिकाणी असणाऱ्या वाचकांकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष झाले.

आता पुन्हा त्याचप्रमाणे नवीन माहिती नवीन रूपात आपल्यासाठी घेउन येत आहोत आणि जर पुण्यात असाल तर महिन्यातून एकदा प्रत्यक्ष भेटण्याचा एक उपक्रम करण्याचे मानस आहे.

जवळपास गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये हजारो लोकांपर्यंत पोहोचलेला हा समूह आता एकरूप करण्याची वेळ आली आहे असे वाटते

जर आपण सदरील उपक्रमाला सहमत असाल तर नक्कीच या मेसेजला आपल्या जवळच उद्योजकापर्यंत पोहोचवा आणि आपण लवकरच झूम माध्यमातून आणि प्रत्यक्ष पुण्यात वेळोवेळी भेटण्याचे नियोजन करूया

*Printable Solar Panel | The Future of Solar Industry*Must Watch 👍🏻 Like | *Subscribe* | ↗️ Share *Watch Link 👇🏻👇🏻* *htt...
16/09/2022

*Printable Solar Panel | The Future of Solar Industry*

Must Watch

👍🏻 Like | *Subscribe* | ↗️ Share

*Watch Link 👇🏻👇🏻*

*https://youtu.be/-t_Jp0thkhQ*

If you are looking for a new | business | idea so this video will provide you all new and futuristic business ideas "Printable Solar Panel" ...

Are You Looking To Start Your Own Business ....?Then Join our Masterclass Where you will get everything from concept to ...
25/07/2022

Are You Looking To Start Your Own Business ....?

Then Join our Masterclass Where you will get everything from concept to commissioning.

Join Entrepreneurship Development Program

Live Online on Zoom

If you can come down for Location - Aurangabad MH

19/07/2022

*सिबिल चा इतिहास वर्तमान आणि भविष्य*आपल्याला जर बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर सर्वप्रथम बघितली जाणारी गोष्ट म्हणजे सिबिलचा...
18/07/2022

*सिबिल चा इतिहास वर्तमान आणि भविष्य*

आपल्याला जर बँकेचं कर्ज घ्यायचं असेल तर सर्वप्रथम बघितली जाणारी गोष्ट म्हणजे सिबिलचा स्कोर आता मुळात हा सिबिल म्हणजे काय, सिबिलचा स्कोर का बरं ? आणि सिबिल कसा काम करतो या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखामध्ये आपल्याला नक्की मिळतील.

*सिबिल म्हणजे काय ?*

थोडक्यात सांगायचं झालं तर सिबिल हा एका नावाचा शॉर्ट फॉर्म आहे , "क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड" म्हणजे सिबिल

*सिबिल चा इतिहास*

इसवी सन 2000 मध्ये क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड लिमिटेड या संस्थेची सुरुवात झाली, 2000 पासून 2007 पर्यंत सिबिल या या संस्थेने विविध वित्तीय संस्थांना कोणतेही आर्थिक व्यवहार करताना विशेषतः कर्ज प्रकरणांमध्ये किती रिस्क आहे म्हणजेच किती प्रमाणात आपण लावलेल्या पैसा हा जोखमी मध्ये आहे हे सांगण्याची सुरुवात केली , 2010 मध्ये या क्षेत्रात मुख्यतः दोन गोष्टींच्या जोखमी या बघितल्या जायच्या सर्वप्रथम "सिबिल डिटेल" आणि " सिबिल mortgage चेक "

इसवी सन 2011 मध्ये सिबिल स्कोर हा प्रत्येक व्यक्तीसाठी उपलब्ध व्हायला लागला आणि तेव्हापासून आपण घेतलेले कर्ज प्रकरण आणि त्यांची परतफेड ह्या गोष्टींची सर्व माहिती प्रत्येक वित्तीय संस्थांकडून आणि बँकेकडून सिबिल मध्ये जायला सुरुवात झाली आणि याच अनुषंगाने आजही आपल्याला 2011 नंतरच्या घेतलेल्या सर्व कर्ज प्रकरणांची माहिती आणि त्यामध्ये असलेला आपला परतफेडीचा प्रमाण आणि माहिती ही सर्व आपल्या सिबिलमध्ये उपलब्ध असते.

2016 मध्ये ट्रान्स युनियन ह्या अमेरिकन ग्रुपने सिबिल या संस्थेचे जवळपास 92 टक्के हिस्सेदारी घेऊन सिबिलचा नामांतरण हे ट्रान्स युनियन सिबिल असं करण्यात आलं.

*सिबिल काम कसा करतो आणि त्याचा आपल्या कर्ज प्रकरणांवर कसा प्रभाव होतो..?*

प्रत्येक बँक आपण त्यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची सर्व माहिती आणि आपण प्रति महिना भरत असलेल्या हप्त्याची संपूर्ण माहिती अगदी आपण किती रुपयांचा EMI भरला आणि वेळेवर भरला की उशिरा भरला या सर्व गोष्टींची माहिती सीबीला पाठवते आणि सिबिल या माहितीच्या आधारे आपला असा एक स्कोर तयार करतो यामध्ये

🔹 600 पेक्षा कमी म्हणजे खराब सिबिल स्कोर
🔹 650 ते 699 म्हणजे आपल्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे
🔹700-749 म्हणजे चांगला सिबिल स्कोर
🔹750 पेक्षा जास्त म्हणजे सर्वोत्तम सिबिल स्कोर

या माहितीच्या आधारे प्रत्येक वित्तीय संस्था बँक आणि कर्ज देणाऱ्या विविध कंपन्या आपली पैसे परत फेडण्याची नियत कशी आहे याचा पहिला प्राथमिक अंदाज घेतात आणि त्यानंतरच आपल्याला कर्ज देऊ करतात

सिबिल क्षेत्रात ट्रान्स युनियन सोबतच Equifax आणि Experian सारख्याही इतर संस्था कार्यरत आहेत

*या क्षेत्रातील व्यवसायाच्या संधी*

सिबिल म्हणजे थोडक्यात आपली क्रेडिट इन्फॉर्मेशन भारतामध्ये गेल्या काही वर्षात स्टार्ट अप नव्याने सुरू होत आहेत आणि ते स्टार्टअप चा असणारा मालक हा प्रत्येक वेळेस चांगल्या सिबिलचा असेल याची खात्री देता येत नाही त्यामुळे कदाचित त्यांना या वित्तीय संस्थांकडून मिळणाऱ्या बऱ्याच सहकार्यामध्ये अडचणी येतात आणि ही अशा प्रकारचे स्टार्ट अप बंद पडतात.

💡ज्याप्रकारे कर्ज परतफेडीची माहिती घेऊन क्रेडिट इन्फॉर्मेशन तयार केली जाते त्याचप्रमाणे प्रत्येक स्टार्टअप ची विविध पॅरामीटर वर अभ्यास करून यामध्ये केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीला अंदाजीत किती मोबदला मिळू शकेल आणि याचं येणाऱ्या काळातील भविष्य काय अशी माहिती सांगणारी एखादी संस्था जर आपण सुरू केली तर येणाऱ्या काळामध्ये सामान्य व्यक्ती ही नवनवीन स्टार्टअप मध्ये ह्या माहितीच्या आधारे शक्य तितके पैसे गुंतवणूक करून चांगला मोबदला कमवू शकतो तसेच बऱ्याच स्टार्टअप ला आणि खऱ्या अर्थाने चांगल्या काम करणाऱ्या स्टार्टअप ला ही संस्था जीवनदायी पर्वणी असेल यात शंका नाही.

- अनुप कुलकर्णी

👍🏻 लेख उपयुक्त वाटल्यास जास्तीत जास्त उद्योजकांपर्यंत तसेच स्टार्टअप पर्यंत शेअर करा.

🤝 माहिती आवडली असल्यास आमच्या डिजिटल मॅक्झिन UdyogForMe ला सबस्क्राईब करायला विसरू नका....

*सहभागी होण्यासाठी*

https://udyogforme.com/subscribe

Thanks and Regards
Team UdyogForMe

*Entrepreneurship History Present and Future* 👍🏻Share if you like 🤝 Subscribe Us For Videos like This ...View 👇🏻👇🏻https:...
16/06/2022

*Entrepreneurship History Present and Future*

👍🏻Share if you like

🤝 Subscribe Us For Videos like This ...

View 👇🏻👇🏻

https://youtu.be/tww0FQDCjBI

*Thanks and Regards*

Get to know everything about entrepreneurship evolutionSource of reference Stuff Used In Creation - Canva Pro

Bakery 2.0 More Advance and More Practical than Ever Before...
12/06/2022

Bakery 2.0 More Advance and More Practical than Ever Before...

Address

Entrao2 Consultancy Services Plot No 6 Near K Pond Hospital Garkheda Parisar
Aurangabad
431006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Entrao2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Entrao2:

Share