ज्ञाणाई लाकडी तेल घाणा

ज्ञाणाई लाकडी तेल घाणा आमच्याकडे रसायन विरहित व भेसळ विरहित लाकडी घाण्यातून तेल तयार करून विकले जाते

आरोग्यासाठी शुद्ध, पारंपरिक लाकडी घाण्याचं तेल! 💯🌿 ज्ञानाई लाकडी तेल घाणा 🌿शुद्धतेची नवी ओळख – परंपरेच्या मुळाशी!🛒 आमच्य...
28/05/2025

आरोग्यासाठी शुद्ध, पारंपरिक लाकडी घाण्याचं तेल! 💯

🌿 ज्ञानाई लाकडी तेल घाणा 🌿
शुद्धतेची नवी ओळख – परंपरेच्या मुळाशी!

🛒 आमच्याकडे मिळतं:
➡ खोबरेल तेल 🥥
➡ सुर्यफूल तेल 🌻
➡ शेंगदाणे तेल 🥜
➡ तीळ, करडई, बदाम, जवस व काऱ्हाळे तेल 🌰

तेही पारंपरिक लाकडी घाण्याने, 100% नैसर्गिक, शुद्ध आणि रसायनमुक्त! 💚

🛢 5 किलो तेलाच्या ऑर्डरवर होम डिलिव्हरी फ्री 🆓

🤙🏻 9923305523 / 9145655645

❤ पारंपरिक लाकडी घाण्याच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे:
✨ रासायनमुक्त – कोणतेही केमिकल नसल्याने शरीरावर दुष्परिणाम नाही
🫀 हृदयासाठी हितकारक – चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते
👤 पचनास मदत – पचनक्रिया सुधारते आणि पोट हलकं राहतं
🦵🏻 सांधेदुखी व त्वचेसाठी उपयोगी – हाडं मजबूत करतं व त्वचा तेजस्वी बनवते
💪🏻 पौष्टिक आणि ऊर्जायुक्त – शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते
📈 प्रतिकारशक्ती वाढवते – रोजच्या आहारात वापरल्यास आजारांपासून संरक्षण

आमची वैशिष्ट्ये: 🤗
* शेतकऱ्यांकडून थेट दर्जेदार बिया घेऊन, कोणतेही रासायनिक प्रक्रिया न करता आम्ही तयार करतो शेंगदाणे, करडई, मोहरी, जवस, बदाम, तीळ, खोबरेल व सुर्यफूल तेल – तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम! ❤
* पौष्टिकतेची हमी 💪
* स्वाद, सुगंध आणि आरोग्याचं समाधान! 😋👃
* सर्व प्रकारच्या तेलबिया गाळप करून मिळतील (आपण आणलेल्या तेलबीयांपासून तेल काढून मिळेल.)

☎ संपर्क:
👨🏻‍💼 योगेश जगन्नाथराव खेडकर
📞 9923305523 / 9145655645

तुम्हीही या शुद्धतेचा भाग बना – आजच ऑर्डर करा! 🛒

📍 पत्ता:
शॉप नं. 9, प्लॉट नं. C1 & C2, आदिनाथ रेसिडेन्सी, अथर्व अपार्टमेंट समोर, उत्तरानगरी, चिखलठाणा एम. आय. डी. सी.
छत्रपती संभाजीनगर – 431006

🌿 ज्ञानाई लाकडी तेल घाणा 🌿
जिथे परंपरा आणि गुणवत्ता 🤝 एकत्र येतात!

"शुद्ध खा, स्वस्थ रहा!" – हेच आमचं ब्रीदवाक्य! ✨

HighlightsEveryone
06/04/2025

HighlightsEveryone

!! जय जय शनिदेव !! जय हनुमान ! जय श्रीराम !!
29/03/2025

!! जय जय शनिदेव !! जय हनुमान ! जय श्रीराम !!

29/03/2025
28/03/2025

!! शुद्ध खा स्वस्थ रहा !!
!! जय माता दी !!

24/03/2025

!! शुद्ध खा स्वस्थ रहा !!
ग्राहकाची प्रतिक्रिया

कसे तयार होते तेल, पहा नेमके या व्हिडिओ मध्ये.
महत्व पटले तर नक्कीच खरेदी साठी संपर्क करा.
099233 05523
8484872086

24/03/2025

!! शुद्ध खा स्वस्थ रहा !!
कसे तयार होते तेल, पहा नेमके या व्हिडिओ मध्ये.
महत्व पटले तर नक्कीच खरेदी साठी संपर्क करा.
099233 05523
8484872086

21/03/2025

नमस्कार
आपण आमच्या पेजला जॉईन झालात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.
आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण खूप व्यस्त झालो आहोत.या व्यस्ततेमुळे आणि कामाच्या व्यापामुळे आपल्याला शरीराची काळजी घेणे बऱ्याच वेळेस किंबहुना नेहमीच शक्य होत नाही.व्यायाम,योगासने, जिम ,पायी फिरणे, झुंबा नृत्य, ऑनलाईन फिटनेस प्रोग्राम आणि असे बरेच माध्यम आहेत आपला फिटनेस कायम ठेवण्यासाठी.पण एक अतिशय महत्त्वाची बाब ज्यामुळे आपला फिटनेस संतुलित राहण्यासाठी मदत होते,ते म्हणजे आपल्या सर्वांचा आहार,जेवण.असे म्हणतात की घरातील गृहिणी जितक्या प्रसन्न मनाने स्वयंपाक बनवतात तितकीच प्रसन्नता त्या कुटुंबातील सदस्यांमध्ये देखील राहते.या बरोबरच आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे जेवणासाठी वापरले जाणारे तेल.
आज बाजारामध्ये अनेक प्रकारचे आणि अनेक कंपन्यांचे तेल उपलब्ध आहेत.ही सर्व तेल खरच पोषक आहेत का? याचा कधीच कुणी विचार करत नाही किंवा मंथली बजेट बिघडते या सबबीला पुढे करून याकडे कानाडोळा केला जातो.अनेक संशोधनातून हे सिद्ध झाले आहे की बाजारात उपलब्ध रिफाइंड ऑईल किंवा राईस ब्रँड ही व अशी तेल बनवताना या मध्ये पाम किंवा सरकी तेलाचे मिश्रण करून उच्च तापमानात ती तापवली जातात व पुन्हा थंड करून आपल्याला पॅकिंग करून विकली जातात.उच्च तापमानात गरम केल्यानंतर या तेलांमधील पोषक घटक नष्ट होतात आणि त्यामुळे फक्त तेलाची अनुभूती देणारे द्रव्य आपण आपल्या जेवणामध्ये खातो.याउलट लाकडी तेल घाणा मधून तयार केलेले तेल हे कमी तापमानात आणि कसलेली तेलबिया व्यतिरिक्त रसायन किंवा सरकी किंवा पाम मिक्स न करता नैसर्गिक पद्धतीने तयार केले जाते.पूर्वीच्या काळात बैलाचा वापर करून लाकडी तेल घाणा चालवला जायचा आणि आता इलेक्ट्रिक मोटरचा वापर करून चालवला जातो.पण तेल बनवण्याची पद्धत तीच जी पूर्वीचे तेली वापरायचे.
कमी तापमानामध्ये आणि योग्य गुणवत्तेच्या तेल बिया वापरून तयार केलेले तेल या मध्ये पुर्ण शुद्धता आणि पूर्ण पोषक घटक समाविष्ट असतात.आणि असे शुद्ध तेल खाल्यामुळे आपली पाचन शक्ती मजबूत होऊन रोग प्रतिकार शक्ती वाढते. रिफाइंड ऑईल किंवा राईस ब्रँड ऑईल या सारख्या तेलातून तेल खाण्याचा फिल मिळतो पण पोषण नाही,तसेच या तेलामुळे अपचनाचे त्रास, थायरॉईड, कॅन्सर, सांधेदुखी या सारखे आजार उद्भवतात.तेंव्हा हा सर्व समाजावर होणाऱ्या आघातामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आपण हा लाकडी तेल घाणा व्यवसाय निवडला.
आमची उद्दिष्टे:
१) सर्वांना शुद्ध तेल पुरवठा करणे.
२) सर्वांना रसायन विरहित आणि भेसळ विरहित तेल पुरवठा करणे.
३) तेल तयार करून त्यातून तयार झालेली पोषक पेंढ (ढेप किंवा खाली) शेतकऱ्यांना अल्प दरात उपलब्ध करून त्यांच्या दुग्ध व्यवसायात अप्रत्यक्ष मदत करणे.
४) आमच्या व्यवसायाच्या माध्यमातून गरजू आणि प्रामाणिक,होतकरू अशा बेरोजगार व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणे.
५) शुद्ध खा आणि स्वस्थ रहा या ब्रीद वाक्यानुसार समाजातील घटकांप्रती असणारी सामाजिक जबाबदारी पार पाडणे.आपणही समाजाचे काही देणे लागतो याचे भान ठेवून भगीरथ प्रयत्न करणे.
आपलाच
६) श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी लिहून सकल मनुष्याच्या जीवनात प्रकाश टाकला आणि ज्ञानाचे द्वार उघडले आणि संपूर्ण विश्वाचे कल्याण केले त्याप्रमाणेच आमच्या कुवतीनुसार महाराष्ट्र आणि भारत यातील लोकांच्या आरोग्याची काळजी म्हणून आमचे ज्ञानाई लाकडी घाणा तेल सर्वदुर भारत भर पोहचवण्याचा मानस घेऊन या व्यवसायाची सुरुवात केली आहे.आमचा हा मानस पुर्ण करण्याहेतू आपलाही हातभार लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.
तेल खरेदी करण्यासाठी किंवा व्यवसाय करण्याहेतू संपर्क करा.
099233 05523
8055050281
ज्ञानाई लाकडी तेल घाणा उत्तरानगरी चिकलठाणा औद्योगिक वसाहत छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र राज्य.

Address

Shop No.9,Aadinath Residency,Tathagat Chowk,Uttaranagari
Aurangabad
431006

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when ज्ञाणाई लाकडी तेल घाणा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share