VB tax consultancy

VB tax consultancy TAX consultancy

नमस्कार नमस्कार  !!! कृपया माहिती असु द्या कि  आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022...
12/06/2022

नमस्कार नमस्कार
!!! कृपया माहिती असु द्या कि आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 आहे. तुम्हाला विनंती आहे की कृपया आमच्याशी आवश्यक तपशील शेअर करा, जेणेकरून विलंबाने दाखल करण्यासाठी कोणतेही दंड आणि व्याज न घेता आम्ही तुमचा आयकर विवरणपत्र योग्य तारखेच्या आत भरू शकतो.
धन्यवाद आणि शुभेच्छा.
VB TAX CONSULTANCY
Mob no. 8793229423

01/05/2022
26/04/2022

नमस्कार
!!! कृपया माहिती असु द्या कि आर्थिक वर्ष 2021-22 साठी आयकर विवरणपत्र( Income Tax Return)भरण्यास सुरुवात झाली आहे. तुम्हाला विनंती आहे की कृपया आमच्याशी आवश्यक तपशील शेअर करा, जेणेकरून विलंबाने दाखल करण्यासाठी कोणतेही दंड आणि व्याज न घेता आम्ही तुमचा आयकर विवरणपत्र योग्य तारखेच्या आत भरू शकतो. धन्यवाद आणि शुभेच्छा,
VB TAX CONSULTANCY
(8793229423 )

29/03/2022

आपण आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले तर *31 मार्च 2022* च्या आधी करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल .

लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/ #/pre-login/link-aadhaar-status

लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी
https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/ #/pre-login/bl-link-aadhaar

16/12/2021

जास्त विलंब शुल्क भरणे टाळण्यासाठी तुमच्याकडे ३१ डिसेंबर पर्यंत मुदत आहे.
३१ डिसेम्बरपूर्वी तुमचे रिटर्न फाइल करा आणि 5000 रुपये पर्यंतचा
विलंब शुल्क टाळा..
🙏🙏🙏🙏🙏

आपल्याला अनेकदा कर आणि कराबाबत नियम हे माहीत नसतात. त्यामुळे आपण अनेकदा इन्कम टॅक्स (Income Tax) या प्रश्नावर खूप गोंधळू...
11/09/2021

आपल्याला अनेकदा कर आणि कराबाबत नियम हे माहीत नसतात. त्यामुळे आपण अनेकदा इन्कम टॅक्स (Income Tax) या प्रश्नावर खूप गोंधळून जात असतो. त्याचप्रमाणे आयटीआर (Income Tax Return), कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gain Tax) आणि इतर करा बाबत आपल्याला माहिती नसते. आम्ही आपल्याला या लेखाच्या माध्यमातून घर विकल्यास होणारा कॅपिटल गेन आणि त्याला Income Tax मधे दिली जाणारी सूट या बद्दल माहीती देणार आहोत.

घर विकल्यास इन्कम टॅक्स भरावा लागेल की नाही, इन्कम टॅक्स वाचवण्याचा उपाय काय?

घर विकत आहात का? काही काळजी करू नका. खाली दिलेला लेख पूर्ण वाचा. इन्कम टॅक्स वाचवण्याचा आपल्याला निश्चितच या माध्यमातून पर्याय मिळेल.
इन्कम टॅक्स कायद्याचे कलम 54 प्रमाणे घर विकल्यास आपल्याला दीर्घ मुदतीचा फायदा (Long Term Capital Gain) झाला असेल तर आपण नवीन घर विकत घेऊन किंवा बांधून पूर्ण इन्कम टॅक्स वाचवू शकता.
त्याची माहिती खालील प्रमाणे
1) हा फायदा कुणाला घेता येईल?

वैयक्तिक व्यक्ती व हिंदू अविभक्त कुटुंब (HUF) यांना या सवलतीचा फायदा घेता येतो.
2) कुठल्या स्वरूपाचा फायदा झाल्यास ही सवलत घेता येते?

राहते घर विकल्यास दीर्घ मुदतीच्या फायद्यासाठी (Long Term Capital Gain) ही सवलत मिळते. घर घेतल्यापासून ते 2 वर्षाच्या कालावधीनंतर विकल्यास त्यावर होणाऱ्या नफ्यास दीर्घ मुदतीचा फायदा (Long Term Capital Gain) म्हणतात.
3) इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी काय करावे लागेल?

एकतर आपण नवीन घर खरेदी करू शकता किंवा नवीन घराचे बांधकाम करू शकता.
4) नवीन घर घेण्याचा अथवा बांधण्याचा कालावधी किती असावा?

नवीन घर घेण्यासाठी जुने घर विकल्यापासून 2 वर्षाच्या आत घ्यावे लागेल.
नवीन घर बांधण्यासाठी जुने घर विकल्या पासून ३ वर्षाच्या आत मध्ये बांधावे लागेल.
उदाहरणार्थ – जूने घर जर 1/10/2020 रोजी विकले असेल, तर नवीन घर हे 30/9/2022 पर्यंत घ्यावे लागेल किंवा नवीन घराचे बांधकाम हे 30/9/2023 पर्यंत करावे लागेल.
5) कुठली रक्कम नवीन घरामध्ये गुंतवावी लागेल?

Capital Gain ची रक्कम आपणास नवीन घरामध्ये गुंतवावी लागेल.
उदाहरणार्थ : आपण आपले जुने घर 50 लाख रुपये मध्ये विकले आणि त्यावर 30 लाख रुपये Capital Gain झाला. (रुपये 50 लाख – 20 लाख Indexed Cost) तर आपल्याला फक्त 30 लाख रुपये नवीन घरांमध्ये गुंतवावे लागतील. तसे केल्यास रुपये 30 लाखाच्या नफ्यावर पूर्ण रुपये 30 लाख सूट मिळेल.
जर आपण फक्त रुपये 20 लाख रुपये गुंतवणूक करू शकला, तर आपणास रुपये 10 लाखावर (रुपये 30 लाख – रुपये 20 लाख) Long Term Capital Gain tax भरावा लागेल. तो 20 टक्के प्रमाणे भरावा लागतो.

6) नवीन घर कधीपर्यंत विकता येणार नाही?

नवीन घर हे विकत घेतल्या पासून किंवा बांधकाम पूर्ण केल्यापासून तीन वर्षाच्या आत विकता येणार नाही. तीन वर्षात विकल्यास मिळालेल्या सुटीवर टॅक्स भरावा लागेल.
7) आयकर विवरण पत्र (Income Tax Return) भरण्याच्या मुदतीपर्यंत जर नवीन घरामध्ये गुंतवणूक न केल्यास काय होईल.

जर आपण आपले आर्थिक वर्षाचे विवरणपत्र (Income Tax Return) भरण्याच्या मुदतीपर्यंत नवीन घरामध्ये गुंतवणूक करू शकत नाही, तर ती रक्कम तुम्ही (Capital Gain Account Scheme) या नवीन अकाउंटमध्ये भरावी लागते. नंतर नवीन घराची गुंतवणूक या अकाउंट मधून ठरलेल्या कालावधीत म्हणजे दोन/ तीन वर्षात करावी लागते.
उदाहरणार्थ : आपण जुने घर दिनांक 1/10/2020 रोजी म्हणजेच आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये रुपये 50 लाख ला विकले व त्यावर आपणास रुपये 30 लाख Long Term Capital Gain झाला. तर आता रुपये 30 लाख Long Term Capital Gain वर सूट मिळवण्यासाठी आपल्याला रुपये 30 लाख किमतीचे नवीन घर दोन वर्षात म्हणजेच 30/09/2022 पर्यंत घ्यावे लागेल अथवा नवीन घर तीन वर्षात म्हणजेच 30/9/2023 पर्यंत बांधावे लागेल. आपल्याला आर्थिक वर्ष 2020-21 चे आयकर विवरण पत्र जुलै 2021 पर्यंत दाखल करावे लागते व ते दाखल करताना त्यामध्ये आपल्याला रुपये 30 लाख रुपयांची सूट घ्यावी लागेल. जर आपण दिनांक 31 जुलैपर्यंत रुपये 30 लाख नवीन घरामध्ये गुंतवणूक करू शकलो नाही, तर आपल्याला सूट मिळणार नाही. ती सूट घेण्यासाठी आपल्याला (Capital Gain Account Scheme) हे नवीन बँक अकाउंट उघडावे लागेल व रुपये 30 लाख या खात्यामध्ये भरावे लागतील. हे अकाउंट आपण कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये उघडू शकता व या रकमेतून नवीन घरांमध्ये 30/9/2022 अथवा 30/9/2023 पर्यंत गुंतवणूक करू शकता. या तारखेपर्यंत काही रक्कम जर गुंतवता नाही आली तर त्यावर (Capital Gain Tax) भरावा लागतो. म्हणजे जर आपण 30 लाख रुपयेपैकी केवळ 25 लाख रुपये गुंतवणूक करू शकलात तर 5 लाखावर कॅपिटल गेन टॅक्स (Capital Gain Tax) 20% भरावा लागू शकतो.

अनेकदा शेतकरी हे आपली शेत जमीन विकून टाकतात. मात्र, शेत विकल्यानंतर त्यांना इन्कम  (Income Tax) टॅक्स भरावा लागेल की नाह...
06/09/2021

अनेकदा शेतकरी हे आपली शेत जमीन विकून टाकतात. मात्र, शेत विकल्यानंतर त्यांना इन्कम (Income Tax) टॅक्स भरावा लागेल की नाही याबाबत माहिती समजत नसते. आम्ही आपल्याला या लेखांमध्ये याबाबतची माहिती देणार आहोत चला तर मग जाणून घेऊया.



शेत जमीन विकल्यानंतर इन्कम टॅक्स भरावा लागेल की नाही हे पाहण्यापूर्वी आपण शेत जमिनीचे प्रकार समजावून घेऊ.

इन्कम टॅक्स कायद्याप्रमाणे शेत जमीनीचे खालील प्रमाणे 2 प्रकार असतात –

1) ग्रामीण शेत जमीन (Ruler Agriculture Land)

2) शहरी शेत जमीन (Urban Agriculture Land)



1) ग्रामीण शेत जमीन म्हणजे काय?

ग्रामीण शेत जमीन ही त्या स्थानिक प्रशासनाच्या/गावाच्या लोकसंख्येवर ठरवलेली असते. त्याची माहिती खालील प्रमाणे
जी शेत जमीन खाली दिलेल्या किलोमीटरच्या हद्दीच्या बाहेर असेल, त्याला ग्रामीण शेत जमीन म्हणतात.

गावाची लोकसंख्या

किमी (हवाई अंतर)
10 हजार पेक्षा जास्त पण एक लाखापर्यंत

2 किमी

10 हजार पेक्षा जास्त पण 10 लाखापर्यंत
6 किमी

10 लाखापेक्षा जास्त
८ किमी



उदाहरणार्थ : गावाची लोकसंख्या जर 5 लाख असेल तर त्या गावाच्या हद्दीपासून 6 किलोमीटर बाहेरील शेतजमीन ही ग्रामीण शेत जमीन म्हणून समजली जाईल.



2) शहरी शेत जमीन (Urban Agricultural Land)

वर नमूद केलेल्या किलोमीटरच्या हद्दीच्या आतील शेत जमिनीला शहरी शेत जमीन असे म्हणतात.

उदाहरणार्थ: जर गावाची लोकसंख्या ही 12 लाख असेल, तर त्या गावाच्या हद्दीपासून 8 किमीच्या आत असणारी सर्व शेत जमीन ही शहरी शेत जमीन म्हणून समजल्या जाईल. तसेच जर गावाची लोकसंख्या ही 50 हजार असेल तर त्या गावाच्या हद्दीपासून 2 किमीच्या आत असणारी शेत जमीन ही शहरी क्षेत्र जमीन म्हणून समजल्या जाईल.



कोणती जमीन विक्री केली तर इन्कम टॅक्स (Income Tax) भरावा लागू शकतो.

आपण एक महत्त्वपूर्ण मुद्दा लक्षात ठेवावा कि ग्रामीण शेत जमीन (Ruler Agriculture Land) विकल्यास कोणत्याही स्वरूपाचा इन्कम टॅक्स द्यावा लागत नाही.
तर शहरी शेत जमीन विकल्यास आपणास इन्कम टॅक्स भरावा लागू शकतो.
शहरी जमीन विकल्यास त्यावर अल्प मुदतीचा नफा (Short Term Capital Gain) किंवा दीर्घ मुदतीचा नफा (Long Term Capital Gain) होवू शकतो.
जर शहरी जमीन घेतल्यापासून दोन वर्षाच्या आत विकली तर त्यावर होणाऱ्या नफ्याला अल्प मुदतीचा नफा (Short Term Capital Gain) असे म्हणतात. जर जमीन घेतल्यापासून ती दोन वर्षाच्या नंतर विकली तर त्यावर होणार्‍या नफ्याला दीर्घ मुदतीचा नफा (Long Term Capital Gain) असे म्हणतात.


शहरी शेत जमीन (urban agriculture land) विकल्यास होणाऱ्या नफ्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स वाचवता येईल का?

होय. (Urban Agriculture Land) विकल्यास त्यावर भरावा लागणारा इन्कम टॅक्स हा पुर्णपणे वाचवता येऊ शकतो.

25/08/2021

Address

Ausa
413520

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VB tax consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share