28/07/2016
गायीचे दूध सर्वश्रेष्ठ आहार मानले गेले आहे. आईच्या दुधाला पर्याय फक्त गायीचे दूधच आहे. गायीच्या दुधामध्ये मुबलक प्रमाणात कॅरोटीन नावाचे तत्त्व असते, ज्याचे पुढे व्हिटॅमीन ‘ए’ मध्ये रूपांतरण होते. अन्य दुधामध्ये कॅरोटीन खूप कमी आढळते. गायीच्या दूधामुळे मेंदूच्या शक्तीमध्ये वाढ होण्यास मदत होते. अन्य दुधांच्या तुलनेत फॅट व कोलेस्टेरॉलचे प्रमाणसुद्धा गायीच्या दुधात खूप कमी असते.