Avet Poultry Farms and Suppliers

Avet Poultry Farms and Suppliers We supply live chicken, poultry feed and medicine and every thing related to broiler poultry.

20/02/2021

🙏😜 कोरोना मध्ये चिकन खाल्ल म्हणून कोरोना कमी झाला बर्ड फ्लू आला म्हणून चिकन खायच बंद केल आणि कोरोना पुन्हा वाढायला लागला 😂म्हणून म्हणतोय चिकन खा, कोरोना मुक्त रहा।😂😜🙏

06/01/2021

बर्ड फ्लूचा संसर्ग कावळे, बदकांमध्ये - मग बातम्या देतांना पोल्ट्री बर्ड्सचे फोटो का?
पोल्ट्री ब्रॉयलर्स, लेअर्स फार्मर्ससह, मका - सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून देणार?
केरळ राज्यात बदके; हिमाचल प्रदेशात स्थलांतरीत पक्षी तर मध्यप्रदेशात कावळ्यांमध्ये बर्ड फ्लूची बाधा झाल्याची अधिकृत नोंद आहे. पोल्ट्री फार्म्समधील पक्ष्यांशी वरील बर्ड फ्लू संसर्गाचा संबंध नसल्याचे शासकीय यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
बर्ड फ्लूसंदर्भात भोपाळस्थित ‘राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था’ चाचणी, निदान आणि उपचाराबाबत मार्गदर्शन करते. मध्यप्रदेश व राजस्थानात H5N8 टाईप विषाणूची बाधा झाल्याने कावळे मृत झाल्याचा अहवाल वरील संस्थेने दिला आहे. तथापि, कावळे वगळता अन्य पक्ष्यांमध्ये उपरोक्त विषाणूची बाधा नाही, असे मध्यप्रदेश राज्य पशूपालन खात्याचे उपसंचालक प्रमोद शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
“संबंधित विषाणू पोल्ट्री फार्म्समध्ये मिळून आलेला नाही.” असे मध्यप्रदेश पशूपालन खात्याचे संचालक डॉ. आर.के. रोकडे यांनी स्पष्ट केलेय. “राजस्थानात कावळ्यांच्या ‘डेथ पॅटर्न’नुसार असे दिसतेय, की ‘कोल्ड शॉकमुळे त्यांचा मृत्यू झाला असावा,” असे मत राजस्थान विद्यापीठाच्या व्हेटरनरी सायन्सचे माजी प्रोफेसर डॉ. ए.के. कटारिया यांनी मांडले.
पोल्ट्री पक्ष्यांचे संगोपन शास्त्रीय पद्धतीने केले जाते. आहारतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार उच्च पोषणाचे खाद्य दिले जाते. व्हेटरनरी डॉक्टर्स, पॅथोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली रोगराईवर नियंत्रण ठेवले जाते. म्हणून, सध्याच्या बर्ड फ्लूचा संबंध सोशल मीडियासह मुख्य प्रवाहातील माध्यमांनी पोल्ट्री उद्योगाशी जोडू नये, असे आवाहन पोल्ट्री फार्मर्स अॅन्ड ब्रीडर्स असोसिएशनचे पदाधिकारी डॉ. पी. जी. पेडगावकर यांनी केले आहे.
- दीपक चव्हाण, ता. 6 जानेवारी 2021.

28/09/2020

1. आज (ता.28) महाराष्ट्रात ब्रॉयलर मार्केटने शंभर रुपये लिफ्टिंग रेट गाठला. तेजीमुळे कोरोना काळातील नुकसान भरून येण्यास मदत मिळेल.
2. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून बार आणि रेस्टॉरंट खुले होणार आहेत. (चिकन+अंडी खपवृद्धीसाठी पुरक)
3. मॉन्सूनचा परतीचा प्रवास आजपासून. पावसाच्या उघडीपीमुळे पोल्ट्रीचा कच्चा माल असलेल्या मका, सोयाबीन हार्वेस्टिंगसाठीही अनुकूल माहोल...
चांगल्या घटना- बातम्याही झुंडीने येतात!

28/09/2020
02/08/2020

1 # स्नायू बळकट करतात :

मांसाहारातून शरीराला प्रोटिनचा पुरवठा करणारा हे पदार्थ म्हणजे 'चिकन' ! कमी मांस असलेले चिकनमधून शरीराला मुबलक प्रमाणात प्रोटिन आणि अत्यल्प प्रमाणात मेद (फॅट) शरीराला मिळते. 100 ग्रॅम भाजलेल्या चिकनमधून 31 ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे शरीरयसष्टी सुधारण्यासाठी आणि पिळदार शरीरासाठी हे नक्कीच फायदेशीर आहे. (अधिक पिळदार शरीरासाठी करा पुशअप्समध्ये हे '5' बदल)

2 # हाडं बळकट होतात :

प्रोटिन प्रमाणेच चिकनमधून फॉस्फरस, कॅल्शियम यासारखी आवश्यक मिनरल्सचा पुरवठा होतो. यामुळे हाडं बळकट होतात. चिकनमधील सेलेनियम घटक 'सांधेदुखी'ची समस्या कमी करते.

3 # ताण-तणाव कमी होतो :

व्हिटामिन बी5 आणि ट्राइप्टोफन (tryptophan) या चिकनमधून मिळणार्‍या दोन घटकांमुळे तणाव कमी होण्यास मदत होते. यामुळे दिवसभरातील थकवा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे थकवा दूर करण्यासाठी आठवड्यातून एकदा चविष्ट चिकनची चव चाखायला काहीच हरकत नाही.

4 # पीएमएसच्या( (Pre-Menstrual Syndrome) समस्या कमी होतात :

चिकनमधून मिळणारे 'मॅग्नेशियम' घटक पीएमएस या पाळीसंबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते. या दिवसांत होणारे मूड-स्विंग्स टाळण्यासाठी मदत होते.

5 #टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवते :

चिकनमधून मिळणारे झिंक घटक पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्यासोबतच शुक्राणूंचीदेखील संख्या वाढवण्यास मदत होते.

6 # रोगप्रतिकारशक्ती वाढते :

सर्दी-खोकला आणि इतर श्वसनाच्या विकारांमध्ये चिकन सूप अत्यंत फायदेशीर आहे. हे सूप गरम प्यायल्यास चोंदलेले नाक आणि घश्यातील खवखव कमी होते. तसेच संसर्गापासून बचावापासून आराम मिळतो. एका संशोधनातून पुढे आलेली बाब म्हणजे चिकन सूप न्युट्रोफिल्स या इम्यूसेल्सचे स्थलांतर रोखते. परिणामी संसर्गजन्य रोगापासून आपला बचाव होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते[1].( मॉन्सूनमध्ये 'इम्युनिटी' वाढवा या '5' नैसर्गिक पदार्थांनी !)

7 # ह्र्दयाचे आरोग्य सुधारते:

चिकनमध्ये व्हिटामिन बीं6 मुबलक प्रमाणात असल्याने हृद्यविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी करण्यास होते. व्हिटामिन बी6 मूळे होमोसिस्टाइन (homocysteine) ची पातळी कमी होते परिणामी हृदयविकाराचे प्रमाणही मंदावते.याचसोबत चिकनमधून मिळणारे नायसिन घटक कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास मदत करतात. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार रेड मीट खाण्याऐवजी चिकन खाणे हा एक हेल्दी उपाय आहे. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असते तसेच ओमेगा3 या फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामुळे हृद्याचे कार्य सुधारते.( कोलेस्टेरॉल कमी करायचयं? मग आहारात ठेवा हे 7 पदार्थ !)

05/07/2019
It's Brezza ZDI+.....
07/01/2019

It's Brezza ZDI+.....

20/11/2018

कुक्कुटपालन:-

आपल्या कडेच नव्हे तर संपूर्ण भारतात कोंबडी पालन हा शेतीला जोडधंदा म्हणून त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय म्हणून अत्यंत उपयुक्त, असल्यामुळे किफायतशीर ठरलेला आहे.

कुक्कुट पालनाची वैशिष्ट्ये

शेतीला पूरक जोडधंदा म्हणून कुक्कुट पालनाचा व्यवसाय मोठया प्रमाणावर केला जातो.

या धंद्यात गुंतवणूक केलेले भांडवल लवकरच मिळते.

कोंबड्या पासून अंडी, मांस तर मिळतेच त्यचबरोबर कोंबड्यांचे खत शेतीसाठी अतिशय उपयुक्त म्हणून मोठया प्रमाणावर त्याला मागणी असते.

जर मांसल कोंबड्या पाळल्या, तर ह्या धंद्यात नफा दोन महिन्याच्या आतच मिळतो. तसेच गुंतवणूक केलेले भांडवल पुन्हा धंद्यामध्ये गुंतवता येते.

कोंबडी पालनाचा धंदा कसा करावा हे देखील एक शास्त्र आहे. हा धंदा चार प्रकारे सुरु करता येतो.

उत्कृष्ट जातीची उबवण्याची अंडी आणावयाची वं ती खुडुक कोंबडी खाली उबवायची. या पद्धतीत पिल्ले वाढवण्याची योग्य माहिती असणे आवश्यक आहे.

एक दिवसाची पिल्ले विकत आणावयाची व त्या पिल्लांची योग्य निगा ठेऊन चांगली वाढवायची.

तीन महिन्याच्या मद्या विकत आणावयाच्या व धंदा सुरु करावयाचा.

चौथा मार्ग म्हणजे सरळ अंड्यावर आलेल्या पाच ते सहा महिन्याच्या माद्या खरेदी करावयाच्या. या पद्धतीमध्ये कोंबड्या जातिवंत व अंडी देणाऱ्या आहेत की नाही हे तपासून घेणे गरजेचे असते.

कुक्कुट पालन धंद्यातील महत्वाच्या बाबी.

कोंबड्यांच्या सुधारित जाती, त्यांची निवड व पैदास.

कोंबड्यांचे खाद्य.

कोंबड्यांची जोपासना, निगा व घरे

कोंबड्यांचे आरोग्य प्रतिबंधक उपाय व औषधे.
योग्य पद्धतीने व वेळेवर अंड्यांची व मटणाची विक्री.

इतर सर्व गोष्टींचा विचार करणे अत्यंत गरजेचे असते. अशा प्रकारच्या आधुनिक ज्ञानाचे या धंद्यातून जास्तीत जास्त नफा मिळवता येईल.
कोंबड्यांचे आजार आणि त्यावरील उपचार
कोंबडीच्या वाढीबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे तितकेच महत्वाचे ठरते. योग्य वेळी योग्य उपचार झाले नाहीत तर त्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. आहार, स्वच्छता, रोगनिदान आणि उपचार या गोष्टींना या व्यवसायात अनन्य साधारण महत्व असते.
कोंबड्यांना खालीलप्रमाणे आजार होतात.

जीवाणू जन्य – कॉलरा, तुरा निळा होणे इ.

विषाणू जन्य – राणीखेत (मानमोडी), गंबोरी (रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होणे), मेरेक्स (पिल्ले पांगळी होणे)

आदिजीवजन्य – कॉक्सीडीओसीस (रक्ताची हगवण)

भारत सरकारने देशातील शेतक-यांना कुक्कुटपालन विषयक सेवा एक खिडकी तत्वावर उपलब्ध करून देण्यासाठी चार ठिकाणी केंद्रीय पोल्ट्री विकास संस्था (Central Poultry Development Organization) स्थापन केलेल्या आहेत. त्या चंदीगड, भुवनेश्वर, मुंबई, आणि हेसरघट्टा येथे आहेत.भारत सरकारने ५ कुक्कुटपालन फार्मस (Poultry Farms) स्थापन केले आहेत. बेंगलोर, मुंबई, भुवनेश्वर, दिल्ली व सिमला या ठिकाणी ते फार्मस आहेत. या ठिकाणी जातीवंत कोंबड्या संकरीत करून वितरीत केल्या जातात.

कोंबड्यांच्या संशोधना बद्दलचे केंद्रीय एव्हीयन संशोधन हे केंद्र ( Central Avian Research Centre) उत्तरप्रदेशात इज्जत नगर येथे स्थापन करण्यात आले आहे.२००९ ते २०१० मध्ये सरकारने केंद्र पुरस्कृत पोल्ट्री विकास योजना (Poultry Development Schemes) नावाची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामीण परसदार (पारंपारिक) कुक्कुट विकास (Rural Backyard Poultry) नावाची उपयोजना सुध्दा सुरु केली आहे.

व्यवस्थापन आणि संगोपन

कुक्कुटपालन हा एक महत्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. जगात कोंबड्यांच्या एकूण ६६ जाती आहेत. त्यापैकी भारतात १८ जाती आढळून येतात. भारत हा अंडी उत्पादन करणारा जगात पाचवा तर मांस उत्पादनात जगात नववा देश आहे. कुक्कुट पालन हा व्यवसाय भूमिहीन मजुरांसाठी दुय्यम उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पारंपारिक तसेच व्यावसाईक अशा दोन्हीही पद्धतीने करता येतो.

खाद्य व्यवस्थापन

संतुलित खाद्य, रोग प्रतिबंधात्मक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांच्या आधारे कोंबड्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या व्यवस्थापनाचे तीन टप्पे पडतात.

लहान पिलांची निगा राखणे (एका दिवसापासून सहा आठवड्यांपर्यंत) - या प्रक्रियेला बृडींग असे म्हणतात. या दरम्यान ‘चीकमेश’ प्रकारचे खाद्य पिलांस दिले जाते. त्यात २२ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध पदार्थांचे प्रमाण असते.

६ आठवड्यांपासून २० आठवड्यांपर्यंतची निगा - या कालावधीत शरीर वाढीसाठी ‘ग्रोअर मेश’ प्रकारचे खाद्य कोंबडीस दिले जाते.त्यात १६ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध घटक असतात.

२१ ते ७२ आठवड्यां दरम्यान निगा – २० आठवड्यांनंतर कोंबडी अंड्यावर आल्यानंतर तिला ‘ लेअर मेश’ प्रकारचे खाद्य दिले जाते. त्यात १८ टक्के प्रथिने व ३.४ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.

कोंबड्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या लसी त्या त्या वेळी देणे गरजेचे असते. त्यामध्ये मेरेक्स, लासोटा, गंबोरी, राणीखेत इ लसींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अंडी देणा-या कोंबड्यासाठी चोची कापणे व रोग प्रतिकारक लस टोचणे हे ही तितकेच महत्वाचे अस

व्यवस्थापन आणि संगोपन

कुक्कुटपालन हा एक महत्वाचा शेतीपूरक व्यवसाय आहे. जगात कोंबड्यांच्या एकूण ६६ जाती आहेत. त्यापैकी भारतात १८ जाती आढळून येतात. भारत हा अंडी उत्पादन करणारा जगात पाचवा तर मांस उत्पादनात जगात नववा देश आहे. कुक्कुट पालन हा व्यवसाय भूमिहीन मजुरांसाठी दुय्यम उत्पन्नाचा एक महत्वाचा स्त्रोत आहे. कुक्कुट पालनाचा व्यवसाय पारंपारिक तसेच व्यावसाईक अशा दोन्हीही पद्धतीने करता येतो.

खाद्य व्यवस्थापन

संतुलित खाद्य, रोग प्रतिबंधात्मक उपाय व शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन या तीन सूत्रांच्या आधारे कोंबड्यांच्या वयोगटानुसार त्यांच्या व्यवस्थापनाचे तीन टप्पे पडतात.

लहान पिलांची निगा राखणे (एका दिवसापासून सहा आठवड्यांपर्यंत) - या प्रक्रियेला बृडींग असे म्हणतात. या दरम्यान ‘चीकमेश’ प्रकारचे खाद्य पिलांस दिले जाते. त्यात २२ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध पदार्थांचे प्रमाण असते.

६ आठवड्यांपासून २० आठवड्यांपर्यंतची निगा -
या कालावधीत शरीर वाढीसाठी ‘ग्रोअर मेश’ प्रकारचे खाद्य कोंबडीस दिले जाते.त्यात १६ टक्के प्रथिने तर ३.४ टक्के स्निग्ध घटक असतात.

२१ ते ७२ आठवड्यां दरम्यान निगा – २० आठवड्यांनंतर कोंबडी अंड्यावर आल्यानंतर तिला ‘ लेअर मेश’ प्रकारचे खाद्य दिले जाते. त्यात १८ टक्के प्रथिने व ३.४ टक्के स्निग्ध पदार्थ असतात.

कोंबड्यांच्या वयाच्या वेगवेगळ्या लसी त्या त्या वेळी देणे गरजेचे असते. त्यामध्ये मेरेक्स, लासोटा, गंबोरी, राणीखेत इ लसींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अंडी देणा-या कोंबड्यासाठी चोची कापणे व रोग प्रतिकारक लस टोचणे हे ही तितकेच महत्वाचे असते.

Avet Feedmill....
07/11/2018

Avet Feedmill....

Address

Karanje
Bhor
411028

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919970166346

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avet Poultry Farms and Suppliers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share