17/12/2022
अशी करा ठिबकवर
तंञ शुद्ध कांदा लागवड.
सध्या शेतकरी पोळ कांदा लागवडीच्या लगबगीत आहेत. उपलब्ध पाणी व खतांचा काटेकोर वापर करण्यासाठी ठिबक सिंचन प्रणाली उपयुक्त ठरू शकेल.
महाराष्ट्रातील हवामान हे वर्षभर म्हणजे खरीप, रांगडा, उन्हाळी हंगामात लागवडीसाठी पोषक असते. सध्या पोळ कांदा लागवडीच्या लगबगीत आहेत. या हंगामात प्रामुख्याने लाल रंगाचा कांद्याचा वाण लावला जातो. उपलब्ध पाण्याचा व खतांचा काटेकोर वापर करण्याच्या उद्देशाने ठिबक सिंचन प्रणालीचा कांद्यात वापर करता येईल.
कांदा पुनर्लागवडीतील महत्त्वाचे - कांद्या लागवडीसाठी मध्यम प्रकारची रेतीमिश्रित जमीन उत्तम समजली जाते. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असल्यास कांदा चांगला पोसतो.
- कांद्याची मुळे 5 ते 6 सें.मी. लांब असतात. त्यासाठी जमिनीची नांगरट मध्यम खोल करावी. शेवटच्या कुळवणीपूर्वी एकरी 10 टन चांगले कुजलेले शेणखत टाकावे.
- एकरी 55 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, 10 किलो गंधक गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीत मिसळून घ्यावीत.
-कांदा पिकासाठी 3.5 फूट रुंदीचे गादीवाफे ट्रॅक्टरच्या साह्याने पाडून घ्यावेत. बेडचा आकार कांदा पिकासाठी साधारणतः छत्रीसारखा असावा.
त्यामुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा चांगला होतो. - कांद्यासाठी 16 मि.मी. व्यासाची व दोन ड्रिपरमध्ये
40 सें.मी. अंतर असणारी नळी (लॅटरल) वापरावी. ड्रिपरचा उत्सर्ग 4 लिटर प्रति तास असावा. एका बेडवर एकच नळी टाकावी.
- कांदा लागवड करताना दोन ओळीमध्ये 12 सें.मी. व दोन रोपांमध्ये 10 सें.मी. अंतर ठेवून लागवड करावी. पुनर्लागवडीपूर्वी ठिबक चालवून बेड चांगला ओला करून घ्यावा. रोपे ट्रायकोडरमा 3 ग्रॅम प्रति लिटर या द्रावणात बुडवून लावावीत.
- पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन संच रोज चालवावा. बेड वाफशावर राहील इतकेच पाणी द्यावे. बेडवरून पाण्याचा निचरा झाला नाही तर कांदे पोसत नाही. - गादीवाफ्यावर कांदा लावल्यामुळे एकाच वेळी - पक्वता, चांगली टिकवणक्षमता मिळते. तसेच जोडकांदा, डेंगळे, चिंगळी कांद्याचे प्रमाण नगण्य राहते. - कांदे काढण्यापूर्वी 15 दिवस आधी पाणी बंद करावे. त्यामुळे उत्पादन चांगले मिळते व साठवणुकीतील घट कमी येते.
खत व्यवस्थापन -
कांदा पिकासाठी कोणतीही खते ही पुनर्लागवडीनंतर 60 दिवसांच्या आतच द्यावीत.खते दिल्यानंतर लगेच फुगवणीसाठी व खते लागु होण्यासाठी फंगबँक्ट कांदा किट ठिबकने द्यावी.किंवा फवारणी करावी.60 दिवसांनंतर (पातीच्या वाढीच्या काळात) दिल्यास पातीचीच भरघोस वाढ होऊन कांदे नीट पोसत नाहीत. तसेच दुभाळक्या कांद्याचे (Multicentred) प्रमाण वाढते.
- पंधरा दिवसांतून एकदा एकरी 6 किलो मॅग्नेशियम - सल्फेट ड्रिपद्वारे द्यावे.