Abhimanyu Shelar अभिमन्यु शेलार

  • Home
  • India
  • Chakan
  • Abhimanyu Shelar अभिमन्यु शेलार

Abhimanyu Shelar अभिमन्यु शेलार Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Abhimanyu Shelar अभिमन्यु शेलार, Business Center, Chakan.

28/08/2023
 ोशी_वैचारिक_व्याख्यानमालाचाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या संयुक्त वि...
02/09/2022

ोशी_वैचारिक_व्याख्यानमाला

चाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने मिरा मंगल कार्यालय येथे तीन दिवसीय "शरद जोशी वैचारिक व्याख्यानमालेचे" उद्घाटन करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमाला शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आली असून व्याख्यानमालेचे हे दहावे वर्ष आहे.

दिनांक ०१ सप्टेंबर २०२२ रोजी व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांच्या हस्ते गुंफण्यात आले. "चाकोरी बाहेरील शिक्षण" या विषयावर त्यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या उपस्थिती द्वारे उत्तम प्रतिसाद व्याख्यानमालेस दिला.

आज दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी व्याख्यानमालेत द्वितीय पुष्प गुंफण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादितचे( MKCL) मुख्य मार्गदर्शक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत उपस्थित होते. "एकविसाव्या शतकात तरुणांपुढील आव्हाने आणि संधी" या विषयावर त्यांनी उपस्थितांना माहितीपूर्ण मार्गदर्शन केले.

उद्या दिनांक ०३ सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेत तृतीय पुष्प गुंफण्यासाठी जनशक्ती वाचक चळवळीचे प्रकाशक श्रीकांत उमरीकर उपस्थित राहणार असून "कृषीकायदे : सत्य आणि विपर्यास" या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून व्याख्यानमालेची सांगता करणार आहेत.

याप्रसंगी चाकण शिक्षण मंडळाचे शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संचालक मंडळ उपस्थित होते. महाशिवार ॲग्रोचे चेअरमन अभिमन्यू शेलार व संचालक तसेच सभासद मंडळ याप्रसंगी उपस्थित होते.

उद्या शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्रभरातून शेतकरी संघटनेचे पाईक अंगारमळ्यात अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.

व्याख्यानमाला पाहण्यासाठी इथे क्लिक करा https://youtu.be/73HzTn5k_tk

 ोशी_वैचारिक_व्याख्यानमालादिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी चाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि अभिमन्यू शेलार मित...
02/09/2022

ोशी_वैचारिक_व्याख्यानमाला

दिनांक १ सप्टेंबर २०२२ रोजी चाकण शिक्षण मंडळाचे कला वाणिज्य महाविद्यालय आणि अभिमन्यू शेलार मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमानाने मिरा मंगल कार्यालय येथे तीन दिवसीय "शरद जोशी वैचारिक व्याख्यानमालेचे" उद्घाटन करण्यात आले. सदर व्याख्यानमाला शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाने सुरू करण्यात आली असून व्याख्यानमालेचे हे आठवे वर्ष आहे.

व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय चाकणे यांच्या हस्ते गुंफण्यात आले. "चाकोरी बाहेरील शिक्षण" या विषयावर त्यांनी आपले मनोगत विद्यार्थ्यांसमोर मांडले. विद्यार्थ्यांनी देखील आपल्या उपस्थिती द्वारे उत्तम प्रतिसाद व्याख्यानमालेस दिला.

याप्रसंगी चाकण शिक्षण मंडळाचे शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी आणि संचालक मंडळ उपस्थित होते. महाशिवार ॲग्रोचे चेअरमन अभिमन्यू शेलार व संचालक तसेच सभासद मंडळ याप्रसंगी उपस्थित होते.

व्याख्यानमाला पाहण्यासाठी इथे क्लिक करा : https://youtu.be/2wWnzfiDmdE

"महाशिवार ॲग्रो" आणि "महा चिकन" - शरद जोशी यांनी मांडलेल्या व्यापारी शेतीचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम.आर्थिक संकटात सापडल...
31/05/2022

"महाशिवार ॲग्रो" आणि "महा चिकन" - शरद जोशी यांनी मांडलेल्या व्यापारी शेतीचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम.

आर्थिक संकटात सापडलेल्या भारत देशाने १९९१ मध्ये उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि या धोरणाचे कौतुक करताना शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री शरद जोशी यांनी शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणले की, "पुढचा कार्यक्रम व्यापारी शेतीचा. इथं मात्र आपल्याला सगळ्यांना भाग घ्यावा लागेल. शेतकऱ्याच्या घरात प्रक्रिया करून जो जो माल तयार होईल तो खपविण्याची जबाबदारी आपल्यावर येणार आहे. अगदी नजीकच्या काळामध्ये, शेतकऱ्यांनी तयार केलेला ताजा व उत्तम प्रतीचा माल ग्राहकांना इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा रास्त व कमी किमतीत मिळू शकेल अशा ५००० दुकानांची साखळी आपण महाराष्ट्रभर उभी करणार आहोत."

विचारांचा प्रवाह आयुष्य समृद्ध करतो परंतु याच प्रवाहाने जर कृती कार्यक्रमाचा वेग पकडला नाही तर तो वैचारिक प्रवाह एक डबकं बनून वैचारिक चिखल बनून आयुष्याची चाके गाळात रुतवितो. नेमकी याच गोष्टीची सल असलेल्या काही झपाटलेल्या युवकांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या झपाटलेल्या युवकांचे नेतृत्व करत होती अर्थवादी विचारांची बैठक पक्की असलेली एक ध्येयवेडी व्यक्ती अभिमन्यू बबनराव शेलार. सोबतीला होती अहोरात्र व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन अर्थवादी विचारांचे पाईक युवा मंडळी.

शरद जोशी यांच्या विचारांना कृतीत उतरविणारी घटना तब्बल २८ वर्षांनी चाकणच्या भूमीत घडली आणि शरद जोशी यांच्या अर्थवादी विचारांनी झपाटलेल्या युवकांनी "महाशिवार अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनीची" स्थापना केली. पदार्पणातच महाशिवार अॅग्रोने रास्त भावात शेतकरी सभासदांचा शेतमाल म्हणजेच फळे, अंडी आणि भाजीपाला मूल्यवर्धित साखळीमार्फत थेट ग्राहकांना विक्री केला. ग्राहकांना दर्जात्मक गुणवत्ता आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू लागला तसेच व्यावसायिक व्यापार क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना नोकरीची संधी लाभल्याने त्यांना देखील व्यापार क्षेत्राचा थेट अनुभव मिळत आहे. तसेच त्यांच्या बौद्धिक विद्वत्तेचा फायदा देखील महाशिवार अॅग्रोला लाभला आहे. शेतीमालाच्या जोडीने महाशिवार ॲग्रो मार्फत बेकरी उत्पादने तसेच दुग्धजन्य पदार्थांची विक्री करत आहे.

कोरोनाच्या महामारीनंतर प्रथिनांची गरज भागवण्यासाठी बाजारात अचानक मांसाहाराची मागणी वाढू लागली. चिकन आणि अंड्याची मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे देखील मागणी वाढू लागली. आम्ही वेळेचे गांभीर्य राखून तातडीने शेतकऱ्यांना संपर्क करून ग्राहकांना दर्जेदार गावरान अंडी उपलब्ध करून दिली पण सततची वाढत राहणारी मागणी पाहून कुक्कुटपालन क्षेत्रात भरीव काम करण्याची गरज निर्माण झाली. कारण एकीकडे बाजारात मागणी वाढत असून देखील दुसरीकडे परवडत नसल्याने शेतकरी या व्यवसायातून हळू हळू बाहेर पडत असल्याचे निरीक्षण आमच्या लक्षात आले. मग ग्राहकापासून विक्री साखळीतील घटक आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करत महाशिवार ॲग्रोने "महा चिकन" या ब्रँड अंतर्गत कुक्कुटपालन पासून वाहतूक व्यवस्था आणि विक्री दालने उभी करण्याचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने अमलात आणला.

"महा चिकन" या ब्रँड अंतर्गत कुक्कुटपालन क्षेत्रातील सर्व स्तरातील सेवा आणि व्यवस्थापन सांभाळले जाते. तज्ञांच्या सल्ल्याने सर्वोत्तम दर्जाच्या कोंबडीच्या पिल्लांचे संगोपन करून त्यांची योग्य वाढ होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती आणि उत्तम दर्जाचे पौष्टिक खाद्य पुरविले. पक्षांची योग्य वाढ झाल्यावर ते विक्री साठी महा चिकनच्या दालनात तसेच इतर खाजगी व्यापाऱ्यांना विक्री साठी पाठविले जातात. महा चिकन मार्फत ग्राहकांना वाजवी दरात अंडी चिकन पुरवठा केला जातो तसेच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील रास्त भाव मिळवून दिला जातो. नजीकच्या काळात "महा चिकन" मार्फत ग्राहकांना "फ्रोजन चिकन" तसेच "घरपोच चिकन" या दोन सेवा पुरविण्याची देखील तयारी सुरू केली आहे.

पुणे शहर सध्या वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे या शहराची अन्न धान्य प्रमाणेच अंडी आणि मांस यांची देखील मागणी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. याची दखल घेऊन महाशिवार ॲग्रोने महा चिकनच्या दालनांची साखळी उभी करण्याचा निर्णय घेतला. धानोरी येथे भाजीपाला आणि मत्स्य विक्रीची दोन दालने, चर्होली येथे चिकन आणि मत्स्य विक्रीची दोन दालने आणि टिंगरे नगर येथे चिकनचे दालनाच्या यशस्वी पदार्पणानंतर आज लोहगाव विमाननगर येथे देखील महाशिवार ॲग्रोचे महाचिकन दालन सुरू करण्यात आले आहे.

विज्ञानात ऊर्जा अक्षयत्येचा नियम सांगतो की, "उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते." शरद जोशी यांनी मांडलेले विचार म्हणजे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा म्हणून दिलेली ऊर्जा आहे. ही ऊर्जा नष्ट होऊ शकत नाही, मात्र हीच ऊर्जा महाशिवार ॲग्रोच्या आणि महा चिकनच्या स्वरूपात रूपांतरित मात्र नक्की झाली आहे.

https://www.facebook.com/109711674213382/posts/515621343622411/?d=n
30/05/2022

https://www.facebook.com/109711674213382/posts/515621343622411/?d=n

पुणे शहरातील विमाननगर परिसरात नव्याने सुरू झालेल्या महाशिवार अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनीच्या महाचिकन दालनाचे उद्घाटन ३१ मे २०२२ रोजी श्री सुरेशचंद्र म्हात्रे सर, VRK ग्रुपचे सर्वेसर्वा श्री चंद्रकांत पाठक सर आणि पुणे शहरातील नामवंत बांधकाम व्यावसायिक श्री नितीन टिंगरे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आले आहे.

"महाशिवार ॲग्रो" आणि "महा चिकन" - शरद जोशी यांनी मांडलेल्या व्यापारी शेतीचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रमआर्थिक संकटात सापडले...
06/11/2021

"महाशिवार ॲग्रो" आणि "महा चिकन" - शरद जोशी यांनी मांडलेल्या व्यापारी शेतीचा प्रत्यक्ष कृती कार्यक्रम

आर्थिक संकटात सापडलेल्या भारत देशाने १९९१ मध्ये उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि या धोरणाचे कौतुक करताना शेतकरी संघटनेचे संस्थापक श्री शरद जोशी यांनी शेगाव येथील शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हणले की, "पुढचा कार्यक्रम व्यापारी शेतीचा. इथं मात्र आपल्याला सगळ्यांना भाग घ्यावा लागेल. शेतकऱ्याच्या घरात प्रक्रिया करून जो जो माल तयार होईल तो खपविण्याची जबाबदारी आपल्यावर येणार आहे. अगदी नजीकच्या काळामध्ये, शेतकऱ्यांनी तयार केलेला ताजा व उत्तम प्रतीचा माल ग्राहकांना इतर कुठल्याही ठिकाणांपेक्षा रास्त व कमी किमतीत मिळू शकेल अशा ५००० दुकानांची साखळी आपण महाराष्ट्रभर उभी करणार आहोत."

शरद जोशी यांच्या विचारांना कृतीत उतरविणारी घटना तब्बल १८ वर्षांनी चाकणच्या भूमीत घडली आणि शरद जोशी यांच्या अर्थवादी विचारांनी झपाटलेल्या युवकांनी "महाशिवार अॅग्रो शेतकरी उत्पादक कंपनीची" स्थापना केली. पदार्पणातच महाशिवार अॅग्रोने रास्त भावात शेतकरी सभासदांचा शेतमाल म्हणजेच फळे, अंडी आणि भाजीपाला मूल्यवर्धित साखळीमार्फत थेट ग्राहकांना विक्री केला. ग्राहकांना दर्जात्मक गुणवत्ता आणि शेतकऱ्यांना रास्त भाव मिळू लागला तसेच व्यावसायिक व्यापार क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना नोकरीची संधी लाभल्याने त्यांना देखील व्यापार क्षेत्राचा थेट अनुभव मिळत आहे. तसेच त्यांच्या बौद्धिक विद्वत्तेचा फायदा देखील महाशिवार अॅग्रोला लाभला आहे.

कोरोनाच्या महामारीनंतर प्रथिनांची गरज भागवण्यासाठी बाजारात अचानक मांसाहाराची मागणी वाढू लागली. चिकन आणि अंड्याची मोठ्या प्रमाणावर आमच्याकडे देखील मागणी वाढू लागली. आम्ही वेळेचे गांभीर्य राखून तातडीने शेतकऱ्यांना संपर्क करून ग्राहकांना दर्जेदार गावरान अंडी उपलब्ध करून दिली पण सततची वाढत राहणारी मागणी पाहून कुक्कुटपालन क्षेत्रात भरीव काम करण्याची गरज निर्माण झाली. कारण एकीकडे बाजारात मागणी वाढत असून देखील दुसरीकडे परवडत नसल्याने शेतकरी या व्यवसायातून हळू हळू बाहेर पडत असल्याचे निरीक्षण आमच्या लक्षात आले. मग ग्राहकापासून विक्री साखळीतील घटक आणि शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना करत महाशिवार ॲग्रोने "महा चिकन" या ब्रँड अंतर्गत कुक्कुटपालन पासून वाहतूक व्यवस्था आणि विक्री दालने उभी करण्याचा कार्यक्रम नियोजनबद्ध पद्धतीने अमलात आणला.

"महा चिकन" या ब्रँड अंतर्गत कुक्कुटपालन क्षेत्रातील सर्व स्तरातील सेवा आणि व्यवस्थापन सांभाळले जाते. तज्ञांच्या सल्ल्याने सर्वोत्तम दर्जाच्या कोंबडीच्या पिल्लांचे संगोपन करून त्यांची योग्य वाढ होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती आणि उत्तम दर्जाचे पौष्टिक खाद्य पुरविले. पक्षांची योग्य वाढ झाल्यावर ते विक्री साठी महा चिकनच्या दालनात तसेच इतर खाजगी व्यापाऱ्यांना विक्री साठी पाठविले जातात. महा चिकन मार्फत ग्राहकांना वाजवी दरात अंडी चिकन पुरवठा केला जातो तसेच कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील रास्त भाव मिळवून दिला जातो. नजीकच्या काळात "महा चिकन" मार्फत ग्राहकांना "फ्रोजन चिकन" तसेच "घरपोच चिकन" या दोन सेवा पुरविण्याची देखील तयारी सुरू केली आहे.

विज्ञानात ऊर्जा अक्षयत्येचा नियम सांगतो की, "उर्जा निर्माण क‍रता येत नाही, तसेच उर्जा नष्ट ही करता येत नाही; मात्र उर्जेचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर करता येते." शरद जोशी यांनी मांडलेले विचार म्हणजे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळावा म्हणून दिलेली ऊर्जा आहे. ही ऊर्जा नष्ट होऊ शकत नाही, मात्र हीच ऊर्जा महाशिवार ॲग्रो आणि महा चिकनच्या स्वरूपात रूपांतरित मात्र नक्की झाली आहे.

कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री.अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्या...
03/09/2021

कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री.अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजित
युगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला
१ ते ३ सप्टेंबर २०२१, पुष्प तिसरे- ३ सप्टेंबर २०२१
प्रा.डॉ.श्रीपाल सबनीस -विषय - "समकालीन शेतकरी संघटना व शरद जोशी"
व्याख्यान पाहण्यासाठी लिंक👇🏻

चाकण शिक्षण मंडळाचे,कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री. अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शे....

कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण श्री.अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्यानम...
03/09/2021

कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण
श्री.अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजित
युगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला
१ ते ३ सप्टेंबर २०२१- पुष्प दुसरे- २ सप्टेंबर २०२१
प्रा. डॉ. दिलीप चव्हाण - विषय - "राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची दिशा"
व्याख्यान पाहण्यासाठी लिंक 👇🏻

चाकण शिक्षण मंडळाचे,कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री. अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शे....

कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण श्री.अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्यानम...
01/09/2021

कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण
श्री.अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजित
युगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला
१ ते ३ सप्टेंबर २०२१
पुष्प पहिले - १ सप्टेंबर २०२१
डॉ. उमेश बगाडे सर - विषय - "वसाहतकालीन शेतकरी चळवळीचे स्वरूप"
व्याख्यान पाहण्यासाठी लिंक 👇🏻

चाकण शिक्षण मंडळाचे,कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री. अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शे....

https://youtu.be/S-qpcNxcDgAस्वराज्य वार्ता
31/08/2021

https://youtu.be/S-qpcNxcDgA
स्वराज्य वार्ता

चाकण शिक्षण मंडळाचे,कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण ,तालुका खेड, जिल्हा पुणे, आणिश्री अभिमन्यु शेलार मित्र परिवार, ...

चाकण शिक्षण मंडळाचे,कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व  श्री. अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजितयुगात्मा योद्धा शेतकरी शरद...
31/08/2021

चाकण शिक्षण मंडळाचे,कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण व श्री. अभिमन्यू शेलार मित्र परिवार आयोजित
युगात्मा योद्धा शेतकरी शरद जोशी वैचारिक व्याख्यानमाला (वर्ष ९वे )
बुधवार, दि. १ सप्टेंबर ते शुक्रवार दि. ३ सप्टेंबर २०२१ सकाळी १०.०० वा.
व्याख्यानमालेस सहभागी होण्यासाठी व सहभागाचे प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील गुगल फॉर्मला जाऊन नोंदणी करावी.

https://forms.gle/2K1F4S4YoryEEGRj7

Time: 10.00 am
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/2392457046?pwd=cnBNeGJWb1N6LzN0RDZwWGc0eE41dz09

Meeting ID: 239 245 7046
Passcode: 123

Youtube link -
https://www.youtube.com/c/HemantGawadePatil/live

आपले नम्र,
मा. श्री. शांतीलालजी मुथ्था कार्यकारी विश्वस्त,चा.शि.मं.
मा. श्री. मोतीलालजी सांकला, संस्थापक विश्वस्त, चा. शि. मं.
मा. डॉ. अविनाश अरगडे, संस्थापक विश्वस्त सचिव चा. शि. मं.
मा. श्री. अभिमन्यु शेलार, प्रायोजक, चेअरमन महाशिवार ॲग्रो
डॉ. शिवाजी एंडाईत, समन्वयक
प्रा. हेमकांत गावडे, सहसमन्वयक
डॉ. राजेश लाटणे, प्राचार्य, कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण

Address

Chakan
410501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Abhimanyu Shelar अभिमन्यु शेलार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Abhimanyu Shelar अभिमन्यु शेलार:

Share