Shree Datta Agencies

Shree Datta Agencies Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shree Datta Agencies, Business service, mirjoli chiplun, Chiplun.

01/02/2024
श्री दत्त एजन्सीज् परिवारातर्फे सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
10/01/2023

श्री दत्त एजन्सीज् परिवारातर्फे सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

कार्तिकी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला तसेच सर्व विठ्ठल भक्तांना श्री दत्त एजन्सीज् मिरजोळी, चिपळूण परिवार...
04/11/2022

कार्तिकी एकादशी निमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला तसेच सर्व विठ्ठल भक्तांना श्री दत्त एजन्सीज् मिरजोळी, चिपळूण परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.

लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या सर्वांना श्री दत्त एजन्सीज् परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा
24/10/2022

लक्ष्मीपूजन व दिपावलीच्या सर्वांना श्री दत्त एजन्सीज् परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा

तुमच्या सर्व दु:खाचा नाश होवो,हा कालीचौदस तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती नांदो.श्री दत्त एजन्सीज परिवारातर्फे कालीचौदस...
23/10/2022

तुमच्या सर्व दु:खाचा नाश होवो,
हा कालीचौदस तुमच्या घरात सुख, समृद्धी, शांती नांदो.

श्री दत्त एजन्सीज परिवारातर्फे कालीचौदसच्या हार्दिक शुभेच्छा.....!

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना श्री दत्त एजन्सीज् परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा
22/10/2022

धनत्रयोदशी निमित्त सर्वांना श्री दत्त एजन्सीज् परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा

आज पासून सुरु होणाऱ्या दीपावली निमित्त आपणा सर्वांना श्री दत्त एजन्सीज् परिवारा कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
21/10/2022

आज पासून सुरु होणाऱ्या दीपावली निमित्त आपणा सर्वांना श्री दत्त एजन्सीज् परिवारा कडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

श्री दत्त एजन्सीज परिवारातर्फे सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्या......
05/10/2022

श्री दत्त एजन्सीज परिवारातर्फे सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्या......

श्री दत्त एजन्सीज् (मिरजोळी), चिपळूण तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
27/09/2022

श्री दत्त एजन्सीज् (मिरजोळी), चिपळूण तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

29/08/2022
27/08/2022
घरं निर्माण करणारे मित्र म्हणजे श्री निर्माण मित्र- उद्योजक वसंत उदेग                           श्री दत्त एजन्सीचे टाईल...
27/08/2022

घरं निर्माण करणारे मित्र म्हणजे श्री निर्माण मित्र- उद्योजक वसंत उदेग
 श्री दत्त एजन्सीचे टाईल्स ॲण्ड सिरॅमिक सॅनिटरी शोरूमचे थाटात उद‌्घाटन
चिपळूण (प्रतिनिधी) : श्री म्हणजे श्री सिमेंट कंपनी, निर्माण म्हणजे जे घरं निर्माण करतात, इमारती निर्माण करतात आणि मित्र म्हणजे परिवार. श्री सिमेंटतर्फे घरांचे निर्माण करणारे मित्र हे श्री निर्माण मित्र होय, असे प्रतिपादन श्री दत्त एजन्सीचे मालक व उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांनी केले. श्री दत्त एजन्सीच्या मिरजोळी येथील शोरूमचे शुक्रवारी मोठ्या थाटामाटात उद‌्घाटन झाले, त्यावेळी श्री. उदेग बोलत होते.
उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांच्या श्री दत्त एजन्सी या दालना शेजारीच श्री दत्त एजन्सीचे टाईल्स ॲण्ड सिरॅमिक सॅनिटरी हे भव्य शोरूम उभारण्यात आले आहे. श्री जंगरोधक सिमेंटचे महाराष्ट्र, गोवा स्टेट हेड इस्माईल सय्यद यांच्या हस्ते फित कापून या भव्य शोरूमचे उद‌्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तेलंगणा या राज्याचे श्री सिमेंट टेक्निकल हेड साऊथ वेस्ट सुनील शिंदे, रत्नागिरी जिल्हा ऑफिसर ऋषिकेश मांजरेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा ऑफिसर रुपेश माने, सोलापूर जिल्हा ऑफिसर चंद्रशेखर हेरवाडे, ओम एजन्सी कुडाळचे पार्टनर किशोर लांबे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सर्व कॉन्ट्रॅक्टर व राज मेस्त्री यांचीसुद्धा लक्षणीय उपस्थिती होती.
श्री जंगरोधक सिमेंटचे महाराष्ट्र, गोवा स्टेट हेड इस्माईल सय्यद यांनी उद‌्घाटनपर भाषणात उद्योजक वसंत उदेग उर्फ दादा यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, दादांनी आज सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन आज या दालनाचे उद‌्घाटन करून दिले, यातच तुमचा व तुमच्या संस्थेचा मानसन्मान आहे. यातूनच आम्हाला खरी प्रेरणा मिळते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, हिमाचल, छतीसगड या अनेक राज्यांमध्ये आपण काम केले आहे. पण गेल्या २२ वर्षात दादांसारखं उमदं नेतृत्व आपण कधीच पाहिलं नाही. माणसाच्या आयुष्यात जन्मभूमी आणि कर्मभूमी या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. माझी जन्मभूमी जरी पश्चिम महाराष्ट्रातली असली तर कर्मभूमी ही कोकणातीलच आहे. कोकणातील कर्मभूमी ही मला माझं माहेरचघरच वाटतं, असं श्री. सय्यद यांनी सांगितलं. कोकणात गतवर्षी कोरोनाचे तसेच पावसाचे संकट आले, अशाही परिस्थितीत दादा टिकून राहिले. दादांकडे संयम आणि माणुसकी आहे. तुमच्यासारख्या सर्व नामांकित कॉन्ट्रॅक्टर व राज मेस्त्री यांच्या सहकार्यामुळेच व पाठिंब्यामुळेच, अशा कठिण प्रसंगातही दादा खंबीरपणे टिकून राहिले. असं टिकून राहणंही खूप महत्वाचं आहे, असे गौरवोद‌्गारही श्री. सय्यद यांनी यावेळी काढले. श्री जंगरोधक सिमेंट कंपनीबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, आमच्या श्री जंगरोधक सिमेंट कंपनीची काही नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत. आमची कंपनी ही उत्तर भारताची, कुठलीही हद्द नसलेली, पार्टनरशीप नसलेली, सर्वात जास्त सेल करणारी, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सगळीकडे सिमेंट उपलब्ध असणारी, सर्वात जास्त उत्पादन क्षमता असणारी अशी ही आमची नाविन्यपूर्ण कंपनी आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री दत्त एजन्सीचे मालक व उद्योजक वसंत उर्फ दादा उदेग यांनी प्रथम सर्व नामांकित कॉन्ट्रॅक्टर व राज मेस्त्री यांचे आभार मानले. सर्व राज मेस्त्रींना मार्गदर्शन करताना दादा म्हणाले की, लोकं दुकानाचे उद‌्घाटन करण्यासाठी सेलिब्रेटी व राजकारणी आणतात. सेलिब्रेटी आणून दुकानं चालतात असं होत नाही. उलट नाचण्याचीच कामं होतात. पण आपण उद‌्घाटनासाठी सेलिब्रेटी किंवा राजकारणी आणले नाहीत. आमच्यासाठी सेलिब्रेटी तर आपण सर्वजण आहात, असे उद्देशून दादांनी सर्व राजमेस्त्रींना सांगितले. श्री सिमेंट कंपनीने श्री निर्माण मित्र ही दोन वर्षांपूर्वी योजना काढलेली आहे. मात्र, या योजनेचे आपल्याला फारसं गांभीर्य नव्हतं. जुलै २०२१ ते डिसेंबर २०२१ असं सुमारे सहा महिन्यात सुमारे २०० च्या वरती गीफ्ट आली आहेत. त्यानंतर जानेवारी २०२२ ते जून २०२२ या सहा महिन्याचे गीफ्ट अजून आलेले नाही. त्यानंतर जुलै २०२२ ते ऑगस्ट या महिन्याचेदेखील गीफ्ट अद्याप आलेले नाही. ही योजना डिसेंबर २०२२ ला संपत आहे. श्री निर्माण मित्र या योजनेत केवळ ५५ लोकंच रजिस्टर झालेली आहेत. अजून बरीच लोकं रजिस्टर व्हायची बाकी आहेत. भारतामध्ये उच्चांकी सिमेंट सेल केलेली कंपनी म्हणून श्री जंगरोधक सिमेंट कंपनीचा उल्लेख होतो. श्री दत्त एजन्सीने २०१५-१६ मध्ये एका महिन्यात उच्चांकी विक्री करून २५ दुचाकी वाहने रत्नागिरीत वितरीत केलेली आहेत. भारतात नव्हे तर जगात सर्वाधिक विक्री करणारी श्री दत्त एजन्सी ही एकमेव कंपनी आहे, असा नामोल्लेखही दादांनी आपल्या भाषणात केला. गतवर्षी या कंपनीने साताऱ्यामध्ये ७ बुलेट, ६ युनिकॉर्न आणि ४ ॲक्ट्रीव्हा वितरीत केल्या आहेत. पण या सर्वांच्या उपस्थितीत आपण हे आव्हान स्वीकारले असून साताऱ्याचे हे रेकॉर्ड येत्या काही दिवसात आपण मोडणार असल्याचे दादांनी यावेळी सांगितले. एका महिन्यात २५ मोटारसायकल वितरीत करू शकतो, त्याला हे आव्हान फार कठीण नाही. असेही दादा म्हणाले. श्री निर्माण मित्र या योजनेबद्दल सांगताना दादा म्हणाले की, श्री म्हणजे श्री सिमेंट कंपनी, निर्माण म्हणजे जे घरं निर्माण करतात, इमारती निर्माण करतात आणि मित्र म्हणजे परिवार. श्री सिमेंटतर्फे घरांचे निर्माण करणारे मित्र हे श्री निर्माण मित्र. ही योजना फक्त श्री सिमेंटतर्फेच सुरू आहे. मात्र, गेली दोन वर्षे या योजनेची आपण पाहिजे तेवढी दखल घेतली नाही. या योजनेतून आलेल्या २०० बक्षिसांबद्दल आपण समाधानी नसल्याचे दादा उदेग यांनी सांगितले. येणाऱ्या कालावधीत आपल्याला २०० बक्षिसे नव्हे तर १ हजार प्लस बक्षिसे आम्हाला मिळालीच पाहिजेत. यासाठी सर्व राज मेस्त्रींच्या पाठिशी आपण खंबीरपणे उभे राहू, असे खुले आव्हानच दादांनी कंपनीचे साऊथ वेस्टचे टेक्नीकल हेड सुनील शिंदे व त्यांच्या टीमला दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रकाश गांधी यांनी केले. श्री दत्त एजन्सी कंपनीतील सर्व कर्मचारी वृंदांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे योग्य नियोजन केल्याबद्दल दादांनी या सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार मानले.

Address

Mirjoli Chiplun
Chiplun
415605

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+919011780782

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Datta Agencies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree Datta Agencies:

Share