यशराज शेळीपालन,उत्पादन संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पळशी सातारा

  • Home
  • India
  • Dahivadi
  • यशराज शेळीपालन,उत्पादन संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पळशी सातारा

यशराज शेळीपालन,उत्पादन संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पळशी सातारा बंदिस्त शेळीपालन

12/10/2022
11/10/2022

सर्व नवीन शेळी पालकांचे यशराज शेळी पालन उत्पादन संशोधन प्रशिक्षण केंद्र पळशी सातारा या फेसबुक ग्रुप वर
आपले सहर्ष स्वागत

11/10/2022

शेळीपालन करताय किंवा करायचा विचार करताय.
तर पहिल्यांदा शेळीपालनात फायद्यात येण्यासाठी खालील गोष्टी तुमच्याकडे आहेत का ते पाह.
1-चाऱ्यासाठी जमीन
2-पाणी
3-शेळीपालन अनुभव
4-गुंतवणुकीसाठी भांडवल
5-शेळी विक्रीसाठी तुमच्याकडे मार्केट
6-शेड उभारण्यासाठी जागा
7- शेळ्यांचे आजार व उपचार या बद्दल माहिती आहे का.गरज पडली तर तुम्ही तुमच्या शेळीचे उपचार करु शकता का.
8- तुमच्याकडे मनुष्यबळ आहे का. नसेल तर स्वतः काम करण्याची तयारी आहे काय.

शेळीपालनात तुम्हाला धोके काय आहेत.माहिती आहे का.
नवीन लोकांची फसवणूक किंवा नुकसान कोठे होते.
1- शेळी खरेदीतील फसवणूक.
2- साथीच्या रोगा मुळे सुधा नुसकान होते.
3-अयोग्य शेळीची निवड.
4-अनाठाई गुंतवणूक--गरज नसतांना मोठ शेंड इतर गोष्टी
5-आपल्याकडे पुरेसे ज्ञान नुसताना मार्केट नसताना नको त्या महागड्या जातीची खरेदी.
6-कामगारावर विसंबून राहणे. (उंटावरून शेळ्या हाकणे)
7-शेळीपालनाचे प्रशिक्षण एकाने घेणे. व दुसऱ्याला शेळी पालन करायला लावने. वडील भाऊ पावना मेहवना मित्र
8- एखाद्या शेळीपालकावर अति विश्वास ठेवणे. त्यांच्या भूलथापांना बळी पडणे.

शेळीपालनात कोणकोणत्या पैसा कमावण्याच्या संधी आहेत.
1-पैदाशीसाठी विक्री करणे. एका विशिष्ट जातीमध्ये चांगले वंशावळी मध्ये काम करुन तो माल न फसवता नवीन शेळीपालकाला विकणे.
2-बोकडपालन-मार्केट मधून लहान लहान बोकड खरेदी करून तीन-चार महिने सांभाळून पुढील दिवसांसाठी विक्रीसाठी तयार करणे यात्रा जत्रा धुलीवंदन 31 डिसेंबर यासाठी
3-बकरी ईद
4-मटण दुकान- स्वतःच्या फार्मवरील किंवा मार्केटमधील योग्य भावात माल गोळा करून. स्वतःच्या मटन दुकानावर कटिंग करून विकणे.
5-प्राण्यांची खरेदी विक्री करणे. थोडक्यात व्यापारी फक्त कोणाची फसवणूक होणार नाही याची काळजी घेणे.
6-शेळीपालना बरोबर वेगवेगळ्या प्रकारचा चारा बियाणे विकणे.
7-शेळीपालनात मिळणा-ये लेंडी खात गांडूळ खत किंवा लेंडी पावडर करून. फळबागधारकांना पॅकिंग स्वरूपात विकणे.
8-आपल्याकडे सुक्या सार्याचे उत्पादन जास्त होत असेल.किवा तुमच्या भागात तुर भुसा हरभरा भुसा ज्वारीचा कडबा भुईमंग पाल्याचे वेल. मिळत असतील तर त्यांची विक्री आपल्याशी निगडीत असलेल्या शेळी पालकांना योग्य भावात चाऱ्याची विक्री करणे.

KGF

2 जनरेशन फिमेल विक्री झाली
01/10/2022

2 जनरेशन फिमेल विक्री झाली

29/08/2022

○शेळीपालन-
एका गाईच्या चाऱ्यात व खुराकात चार ते पाच शेळ्याचे चांगल्याप्रकारे संगोपन होते. शेळी हा प्राणी काटक असल्यामुळे सहसा आजाराला बळी पडत नाही. शेळ्यांचे मेन उत्पादन हे बोकड व पाटी असतात ज्या की दुधाप्रमाणे नासत नाहीत.तर भाजीपाल्याप्रमाणे सडत नाहीत. शेळ्यांचे उत्पादन बोकड व पाटी जास्त काळ राहिले तरी काही तोटा नाही. उलट फायदा आहे कारण त्यांचे वजन हे वाढत जाणार आहे. वजन वाढले तर मटण पण जास्त मिळणार आहे.व मटन जास्त तर आपल्याला उत्पादनात पैसा पण जास्त मिळणार आहे. जर आपल्याला बोकड किंवा पाटीची योग्य किंमत मिळाली तरच मार्केटमध्ये विक्री करायची. म्हणजे शेळीपानात कटिंग मार्केट हे आपल्यासाठी शाश्वत मार्केट आहे. जे की शेतीच्या कोणत्याच जोडधंद्यात नाही. त्यामुळे शेतीला पूरक जोड व्यवसाय शेळीपालन हा एक बेस्ट पर्याय आहे. जर आपण बंदिस्त शेळीपालन करणार असाल.तर साधारण एक जोडपे 60 ते 70 शेळ्या दीड एकर क्षेत्रामध्ये आरामात सांभाळू शकते. त्यांचे चांगल्या प्रकारे संगोपन व मॅनेजमेंट करू शकते.
○शेळीपालनाचा नफा व त्यांचे प्रकार-
शेळीपालना पासून होणारे मेन उत्पादन म्हणजे बोकड व पाटी यांची कटिंग मार्केट ईद मार्केट व पैदाशीसाठी विक्री करून नफा मिळवला जातो.
1.कटिंग मार्केट साठी माल तयार करणे म्हणजे-
तीन ते सहा महिन्याचे बोकड व पाटी या आपल्या लोकल शेळी मेंढी बाजारात नेऊन खाटीक लोकांना त्याची विक्री करणे.
2.ईद मार्केट साठी माल तयार करणे म्हणजे-
रंगीबेरंगी वजनदार व रुबाबदार एका वर्षाचे दोन दात झालेले बोकड. हे वर्षातून एकदा मुस्लिम बांधवांच्या सणासाठी म्हणजे बकरी ईद साठी तयार करणे विक्री करणे. याची विक्री वर्षातून एकच दिवस होते. व चांगल्या रेटला होते.
3.पैदाशीसाठी माल तयार करणे-
चांगल्या व शुद्ध वंशावळीच्या शेळ्या व बोकड तयार करून त्या नवीन शेळीपालकाला शेळीपालन चालू करण्यासाठी विकणे.
4.बोकड पालन-
तीन ते चार महिन्याचे बोकड आणून ते पुढे तीन ते चार महिने चांगले संभाळून त्यांचे वजन वाढवून पुन्हा आपल्या लोकल मार्केटमध्ये कटिंग साठी विकणे.
5.लेंडीखत-
शेळीपालनातून मिळणारे लेंडी खत यातून पण आपण चांगल्या पद्धतीने नफा कमवू शकतो. लेंडी खतापासून गांडूळ खत तयार करणे किंवा लेंडी पावडर तयार करणे व ती आपल्या किंवा बाहेरील भागातील फळ बागधारकांना खत स्वरूपात विक्री करणे. यातून प्राण्यांचा खुराक खर्च व मेडिसिन खर्च लसीकरण खर्च हा 80 ते 90 टक्के निघू शकतो

28/08/2022

स्टड फर्स्ट जनरेशन बोअर 2 फीमेल विक्री साठी उपलब्ध वजन 33+28+ वय 5/4 महिने मोठं.7775971880

13/08/2022

नेपियरसाठी - लागवडीसाठी एक खोल नांगरणी आणि 2 ते 3 वेळा वखरणी करून जमीन तयार करावी. लागवडीपूर्वी उभ्या-आडव्या नांगरटी करून, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करून घ्यावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची लागवड तीन वर्षांपर्यंत टिकते.

हेही पाहा- नियोजन चारा पिकांचे...

लागवड पध्दती-

सुपर नेपियर गवताची कांडी ४ फूट x २ फूट अंतरावर लावल्यास चारा उत्पादन मुबलक मिळते. ४ फुटाची सरी केल्यामुळे आंतरमशागती सोबतच चारापिकास पाणी देणे सोयीचे जाते.
खरीप हंगामात जून ते ऑगस्ट आणि उन्हाळ्यात फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांत या गवताची लागवड करावी. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी.
तीन महिने वाढ झालेल्या गवताच्या खोडाचा जमिनीकडील दोन तृतीयांश भागातील दोन ते तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास त्या चांगल्या फुटतात.
सरासरी दोन ठोंब्यांतील अंतर ९० x ६० सें. मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते.
लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र, ४० किलो स्फुरद, २० किलो पालाश द्यावे. पुढे पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी कापणीनंतर २५ किलो नत्र द्यावे.
गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी करावी.
उन्हाळी हंगामात (फेब्रुवारी ते मार्च) लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
कापणी लागवडीपासून अडीच ते तीन महिन्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण १५ ते २० सें. मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सहा ते आठ आठवड्यांनी कराव्यात. वर्षभरातील सात ते आठ कापण्यांनंतर हेक्टरी २००० ते २५०० क्विंटल उत्पादन मिळते.
उष्ण कटिबंधातील वातावरण या पिकाच्या वाढीसाठी उपयुक्त असते. संकरित बाजरी नेपीयर गवताच्या लागवडीसाठी ३१ अंश सेल्सिअस तापमान उपयुक्त असते.
हेही पाहा- सकस चाऱ्या‍साठी बीएचएन - १० संकरित नेपियर

वर्षभर हिरव्या चाऱ्याची गरज भागवण्यासाठी चारा पिकांचे नियोजन करून तशी उपलब्धता ठेवावी लागते. नेपीयर गवत पूर्वी हत्ती गवत म्हणून ओळखले जात होत. हे त्याच्यातील उंचपणा व जास्तीत जास्त फुटवे देण्याच्या क्षमतेमुळे ते नावारूपाला आले होते. नेपियर गवत हे बहुवार्षिक असल्यामुळे ते एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षांपर्यंत चारा उत्पादन देऊ शकतो.

12/08/2022

भारतातील पहिल्या ओरिजनल 50% फिमेल
उस्मानाबाद क्रॉस फुल ब्लड सिंल्गशॉट

Address

सातारा पंढरपूर रोड
Dahivadi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when यशराज शेळीपालन,उत्पादन संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पळशी सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share