23/06/2025
"१५००+ शेतकऱ्यांसह प्रभावी मार्गदर्शन — द्राक्षाचार्य डॉ. एस. डी. सावंत"
द्राक्ष बागायतदार मेळावा - वडनेर भैरव | २० जून २०२५
वडनेर भैरव येथे द्राक्ष बागायतदारांसाठी "छाटणीनंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे रोग व्यवस्थापन" या विषयावर भव्य मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. १५०० हून अधिक शेतकऱ्यांची उपस्थिती या कार्यक्रमात होती.
द्राक्षाचार्य डॉ. एस. डी. सावंत यांनी प्रमुख रोगांवर अत्यंत सखोल व वैज्ञानिक पद्धतीने मार्गदर्शन केले —
🍇 डाऊनी मिल्ड्यू
🍇 पावडरी मिल्ड्यू (भुरी)
🍇 अँथ्रॅक्नोज
🍇 बॅक्टेरियल लीफ स्पॉट
✅ रोग नियंत्रणाची अचूक पद्धती
✅ वेळेवर उपचार व उपाययोजना
✅ प्रारंभी तांब्याचा अति वापर टाळण्याचे कारण — नंतर झाडांमध्ये विषारी परिणाम व उत्पादनात मोठे नुकसान
✅ सिस्टेमिक व कॉन्टॅक्ट फंगीसाइड यांचा शास्त्रोक्त वापर
या कार्यक्रमात विशेष म्हणजे ड्राक्षाचार्य डॉ. सावंत यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांनी अगदी शांततेत ऐकले. आजच्या ऑनलाईन युगात प्रत्यक्ष हजेरी लावणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाहून डॉ. सावंत यांचा शेतकऱ्यांवर असलेला प्रभाव आणि विश्वास दिसून आला.
द्राक्ष बागायतदारांसाठी अजून एक यशस्वी आणि दिशादर्शक कार्यक्रम ✅
#द्राक्ष #शेती #द्राक्षाचार्य #रोगव्यवस्थापन #शेतकरीप्रथम #कृषी