सिद्येष गोटफारमिग सावखेड भोई ता.देऊळगाव राजा जि. बुलढाना ૪૪३२०૪

  • Home
  • India
  • Deulgaon Raja
  • सिद्येष गोटफारमिग सावखेड भोई ता.देऊळगाव राजा जि. बुलढाना ૪૪३२०૪

सिद्येष गोटफारमिग सावखेड भोई ता.देऊळगाव राजा जि. बुलढाना ૪૪३२०૪ हम गोट फार्मिंग के बारे मे पूरी जानकार

📢 शेळी आजारी पडण्याची 5 सुरुवातीची लक्षणे ⚠️1️⃣ खाणं कमी करणे2️⃣ पोट फुगणे3️⃣ डोळे पाणीदार होणे4️⃣ नाकातून पाणी येणे5️⃣ ...
27/02/2026

📢 शेळी आजारी पडण्याची 5 सुरुवातीची लक्षणे ⚠️
1️⃣ खाणं कमी करणे
2️⃣ पोट फुगणे
3️⃣ डोळे पाणीदार होणे
4️⃣ नाकातून पाणी येणे
5️⃣ उभं राहायला आळस
👉 ही लक्षणं दिसली तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
शेळी वाचवायची असेल तर सुरुवातीची काळजी महत्वाची!
ही पोस्ट सेव्ह करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत पोचवा
#शेळीपालन

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! गोरक्षनाथ लोहार लाड, Parshuram Jagdale, Siddheshwar Mundh...
25/02/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! गोरक्षनाथ लोहार लाड, Parshuram Jagdale, Siddheshwar Mundhe, Dinkar Adate, Navnath Borkar, Nilesh Yadav, Sushil Ajgaonkar, Nilesh Darekar, Rupesh Pawar, Sachin Rewatkar, Saddamhushen Sultan Sayyad, Dipak Sawant, Sudarshan Borade, Kalidas Shelke, Macchindra Savale, Sachin Dusane, Vaibhav Malpure, Yogesh Wani, Shankar Wadkar, Dattatray Shedane, Madhav Chame, राहुल मारकड पाटील, Rajesh More, Saiprasad Dodikindiwad, Vijay Tejam, गुलाब कसाब, Nitin Gole, Prasad Aapte, Avadhut Satvekar, Madhukar Kurundawade, Arvind Timande, Keshav Havale, प्रकाश सलगर, Vilas Pawar, Laxman Jamlawd, Ganesh Ghuge, P. L. Thorat, गजानन सोनटक्के, Amol Gofane, Balkrishna Sonje, Rakesh Adav, Anil Nalavade, Yogesh Shigvan, विनोद वाघ, Nana Rasal, Sunil Rathod, Rameshwar Patil Kale, जय शिवराय जय शंभुराजे, Shrikant Dhoble, Swapnil Anandrao

I've just reached 8K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗...
22/02/2026

I've just reached 8K followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉

28/11/2025

आजकाल शेळीपालनाकडे खूप सार्‍या लोकांचा कल होताना दिसत आहे पण शेळीपालन हा खूप काटेकोरपणे करण्याचा व्यवसाय आहे जिद्द चिकाटी आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर निश्चितच यामध्ये यश सामावलेलं आहे

24/07/2021

करडांचे व्यवस्थापन

करडांच्या वाढीच्या वयाचे साधारण तीन टप्पे असतात. जन्मापासून दोन महिने वय, दोन ते चार महिने वय आणि चार ते सहा महिने वय अशा गटांत करडांची विभागणी योग्य ठरते. महत्त्वाची बाब अशी, की पहिल्या सहा महिन्यांत दर पंधरा दिवसांस करडे सांभाळण्याचे व्यवस्थापन गरजेनुसार बदलावे लागते. जन्मानंतर लगेच शरीरवजनांच्या नोंदीवरून करडे अशक्त आहेत का सशक्त आहेत, याचा अंदाज बांधता येतो. अशक्त करडे पहिले पंधरा दिवस सांभाळावी लागतात. बाह्य वातावरण अतिउष्ण असो किंवा अति थंड असो, करडांच्या कप्प्यात गरजेनुसार पंखे किंवा विद्युत दिवे लावून तापमान नियंत्रित करणे प्रमुख गरजेचे समजावे.करडांच्या कप्प्यात असणारे तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस एवढे असावे. कप्प्यात तापमान वाढीस पूरक असल्यास करडांच्या शरीरातील ऊर्जा (शरीर तापमान) बाह्य वातावरणाप्रमाणे बदलून संतुलित राहण्यासाठी खर्ची पडत नाही.

*आरोग्य व्यवस्थापन*

करडांच्या कप्प्यातील तापमानाकडे दुर्लक्ष केल्यामुळे मरतुकीचे सत्र सुरू होते. अति थंड बाह्य हवामानास गोठ्यात उबदारपणा, उष्णतामान वाढविण्यासाठी विद्युत दिवे उपयोगी पडतात. अति थंड वातावरणात आर्द्रतेमुळे करडांचे कप्पे लवकर कोरडे होत नाहीत. लेंड्या, पातळ हगवण किंवा मूत्र यामुळे कप्प्यात ओल राहते; मात्र दिवसातून तीन-चार वेळा जागा बदलून करडे कोरड्याच ठिकाणी राहतील याची काळजी घ्यावी. करडांच्या कप्प्यात गोणपाटाचा वापर केल्यास ओल शोषली जाऊ शकते, जमिनीत चुनखडीचा थोडा वापर ओल शोषण्यास मदतीचा ठरतो. फरशीपेक्षा मुरूम, मातीची धुम्मस केलेली जमीन अधिक गरम असते.बाह्य वातावरणात थंडी असल्यास दुरडीखाली चार-पाच करडे दिवसभर ठेवून काम टाळणारे शेळीपालक सर्वत्र दिसतात. एका दुरडीखाली चार-पाच करडे, म्हणजे मोकळी हवा मिळणे कठीण आणि श्‍वसनाचे रोग पसरण्यास वाव निर्माण होतो. दुरडीमुळे शरीर हालचाल पूर्ण बंद होते. व्यावसायिक शेळी प्रकल्पावर दुरडीमुळे होणारे सगळे तोटे गांभीर्याने टाळले जाणे आवश्‍यक ठरते.सतत चार-पाच दिवस पावसाची झड असणाऱ्या भागात करडांच्या सांभाळाचा प्रश्‍न अधिक क्‍लिष्ट असतो. ऊब निर्माण करण्यासाठी रात्री व पहाटे स्वतःच्या देखरेखीखाली शेकोट्या कराव्यात.भिजलेल्या शेळ्यांबरोबर करडे ठेवू नयेत.

ऋतू कोणताही असो, करडांना स्वच्छ, निर्जंतुक पाणी द्यावे.बाह्य वातावरणात एकदम झालेला बदल करडांना सहन होऊ शकत नाही अचानक घडणारे बदल करडांच्या शरीरात ताण निर्माण करतात. अशा वेळी रोगजंतू फैलावतात. प्रतिकूल बाह्य वातावरण, रोगाची लागण, कमी झालेली शरीरक्षमता, अशक्तपणा म्हणजे करडांच्या वाढीवर मोठा परिणाम घडविणारी स्थिती निर्माण होते.रोग-जंतू सर्वत्र असतात, निरोगी शरीरातही दडून असतात. उच्च शरीरस्वास्थ्य असल्याने रोगफैलाव घडू शकत नाही; मात्र शरीरावर ताण आला, की ऋतूनुसार अथवा अवकाळी रोगही शरीरावर प्रादुर्भाव करतात.

*करडांची वाढ*

दूध पिणाऱ्या करडांस शेळीपासून दूर सांभाळणे गरजेचे असते. पहिल्या पंधरवड्यात चार-पाच वेळा दूध पिण्यासाठी तास-अर्धा तास मातेजवळ ठेवावे. इतर वेळी वेगळ्या कप्प्यात हिंडू द्यावे. व्यायाम नसणारी करडे अपचनास बळी पडतात. करडांच्या कप्प्यात मोकळी जागा असल्यास त्यांना मोकळे फिरणे, उड्या मारणे शक्‍य होऊ शकेल. दुरडीखाली सतत बंदिस्त झालेली करडे अशक्त आणि दुर्बल राहतात.आज सुदृढ असणारी करडे भविष्यात कोणत्याही कारणाने आजारी पडणार नाहीत, यासाठी त्यांची शरीरक्षमता काही प्रमाणात वाढविता येते. असे उपाय प्रतिबंधात्मक लसीकरणाप्रमाणे उपयुक्त ठरतात. करडांना पावसाची झड सुरू होताच प्रतिजैविकांच्या गोळ्या आणि जीवनसत्त्वांच्या मात्रा देता येतात. असा उपचार शरीर ताण निर्माण होऊ न देण्यास उपयुक्त ठरतो.

करडांत माती चाटणे, परजीवी प्रसार होणे, बाह्य परजीवींचा त्रास असणे, असे प्रकार नेहमीच दिसून येतात. बाह्य परजीवी सुदृढ करडांकडे फिरकत नाहीत. याउलट अशक्त करडे दिवसभर माश्‍यांच्या प्रादुर्भावाने त्रस्त असतात. वाढीस लागलेल्या करडांना क्षार कमतरता असल्यास ते माती चाटतात आणि यातूनच पोटात जंतही वाढतात.प्रत्येक करडास जन्मानंतर 15 दिवसांत, तर पुढे दर महिन्यास एकदा जंतनाशन करावे. करडे सहा महिन्यांची वाढेपर्यंत जंतनाशक मात्रा अत्यंत उपयोगी पडतात. बाह्य आणि पोटातील कृमीनाशनामुळे करडांचा शरीर ताण मोठ्या प्रमाणावर कमी होतो.करडांची वाढ जोमाने होण्यासाठी तीन-चार करडे असणाऱ्या शेळीस दूध कमी असू शकते. अशा वेळी करडांना बाहेरून बाटलीने दूध पाजावे. पाने तोडणाऱ्या करडांसाठी कप्प्यात हिरवा लुसलुशीत चारा टांगून ठेवावा. वाढीच्या वयाप्रमाणे कप्प्याची जागा वाढवावी आणि गटवारीनुसार करडे वेगळे करावेत. तीन महिन्यांनंतर नर व मादी करडे वेगळी करावीत, तर खच्चीकरणानंतर नर करडे मांसल बनविता येऊ शकतात.

वेळीच ओळखा जनावरांतील आजार... दुधाळ जनावरांतील आजारावर उपचारापेक्षा प्रतिबंधक उपचार महत्त्वाचे आहेत. योग्यवेळी उपाययोजना केल्यास जनावरे आजारापासून दूर राहू शकतात. यासाठी वेळोवेळी पशुवैद्यांकडून जनावरांच्या आरोग्याची तपासणी महत्त्वाची आहे.

आजारी जनावरे शांत बसून राहतात. त्यांची हालचाल मंदावते. चेहरा पडलेला दिसतो. त्वचा निस्तेज होते. केस राठ किंवा उभे राहिलेले दिसतात. त्वचेवरून हात फिरवला असता कोंडा गळतो. शरीराभोवती माश्‍या घोंघावताना दिसतात. अंगावर बसलेल्या माश्‍या कातडीच्या हालचालीने अथवा शेपटीने उठवण्याची ताकद जनावरांमध्ये नसते. रोगी जनावरांची नाकपुडी बऱ्याचदा कोरडी आढळते. रवंथ करण्याची प्रक्रिया मंदावते. खाण्या-पिण्याची क्रिया मंदावते किंवा थांबते. दूध उत्पादन किंवा काम करण्याची क्षमता कमी होते. शेण व लघवीमध्ये नेहमीपेक्षा फरक जाणवतो. जनावरे थरथर कापतात. तोंडातून लाळ गळते. नाकातून, डोळ्यांतून पाणी येते. रोगी जनावरांच्या शरीराचे तापमान, श्‍वसन, हृदयाचे ठोके प्रमाणात नसतात.

*प्रतिबंधात्मक उपाययोजना*

1) योग्य उत्पादनक्षम जनावरांची निवड करावी. जनावरांना आरोग्यदायक, थंडी, ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करणारा निवारा असावा. गोठा व संपूर्ण परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. विशेष करून पावसाळ्यात जास्तीची खबरदारी घ्यावी. गोठ्यामध्ये दोन जनावरांत योग्य अंतर ठेवावे.

2) वातावरणातील बदलांचा जनावरांवर ताण येतो, त्यासाठी वेळोवेळी परिस्थितीनुसार व्यवस्थापनात बदल करत जावा. खाद्याच्या गव्हाणी नियमित स्वच्छ पाण्याने धुऊन घ्याव्यात. पाणी पिण्याचा हौद स्वच्छ धुऊन घेऊन त्याला चुना लावावा, त्यामुळे हौदात शेवाळ्याची वाढ होणार नाही. जनावरांच्या शरीराला सर्व अन्नघटक (पिष्टमय पदार्थ, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, तंतुमय पदार्थ, क्षार व जीवनसत्त्वे) योग्य प्रमाणात उपलब्ध होतील, असा योग्य व संतुलित आहार पुरवावा.

3) दुभत्या जनावरांना मोकाट चरण्यासाठी सोडू नये. मोकाट, मुक्त पद्धतीने जनावरांचे संगोपन करत असताना ते कोणतेही अखाद्य वस्तू किंवा विषारी वनस्पतीचे सेवन करणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत, आंत्रविषार (शेळी व मेंढी) रोगाविरुद्ध नियमित लसीकरण करणे.

4) जंतूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वर्षातून किमान दोनदा (पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर) जंतनाशक औषधे पाजावीत. पचनसंस्थेचे विकार टाळण्यासाठी एकाच वेळी जास्त खाद्य न देता ते विभागून द्यावे, तसेच फक्त सुका किंवा ओला चारा न देता दोन्ही योग्य प्रमाणात द्यावा. जनावरांच्या अंगावरील व परिसरातील गोचीड, गोमाश्‍या यांचा प्रादुर्भाव नियंत्रित ठेवावा.

5) धार काढण्यापूर्वी व काढल्यानंतर कास व सड पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने स्वच्छ धुऊन कपड्याने पुसून घ्यावी. प्रजननसंस्थेचे विकार टाळण्यासाठी अनुभवी तज्ज्ञांकडून योग्य वेळी तपासणी करून घ्यावी. दुभती जनावरे आटविल्यानंतर प्रत्येक सडात प्रतिजैविके सोडून घ्यावी.

6) गाभण जनावरांचा योग्य सांभाळ करावा, तसेच विताना व विल्यानंतर योग्य ती खबरदारी घ्यावी. वासराच्या जन्मापूर्वीपासूनच त्याच्या संगोपनाकडे लक्ष द्यावे. जनावरांतील विषबाधा टाळण्यासाठी बुरशीयुक्त चारा खाण्यास देऊ नये, तसेच कीटकनाशके, तणनाशके, खते, कोवळी ज्वारी, ज्वारी पिकाचे फुटवे, जवस, गायरानातील विषारी वनस्पती यांचा जनावरांशी संपर्क येणार नाही याची दक्षता घ्यावी. जनावरांना सर्पदंशापासून किंवा इतर प्राणी दंशापासून वाचविण्यासाठी अडचणीच्या ठिकाणी चरण्यास नेऊ नये.

7) वेळीच निदानासाठी, गरज भासल्यास रक्त, रक्तजल, दूध, शेण व मूत्र यांची तपासणी करून घ्यावी, तरीही जनावरास रोग झाल्यास त्वरित पशुवैद्याच्या साह्याने उपचार करून घ्यावेत. फक्त आजारपणातच जनावरांना पशुवैद्याकडे न नेता वेळोवेळी पशुवैद्यकीय डॉक्‍टरांकडून योग्य पशुसंगोपनाची माहिती घ्यावी.

17/05/2020

शेळ्यांची पाण्याची गरज
1. शरीरातील प्रत्येक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.
2. पुर्ण वाढ झालेल्या प्राण्यांच्या शरीरामध्ये 50 ते 60%, वाढणाऱ्या गर्भामध्ये 95% ,नवजात वासराच्या शरीरामध्ये 80%, तर 6 ते 12 महिन्याच्या वासराच्या शरीरामध्ये 65% एवढे पाण्याचे प्रमाण असते.
3. शरीर वजनाच्या 10% पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास ते प्राणघातक ठरते.
4. प्राणी सेंद्रीय चा-याशिवाय जवळजवळ 100 दिवस जिवंत राहु शकतात परंतु पाण्याशिवाय 5 ते 10 दिवसापर्यत जिवंत राहु शकत नाहीत.
5. शरीराचे तापमान नियंञित ठेवण्यासाठी,अन्नद्रव्ये पचन करणे, पचलेल्या अन्न द्रव्यांचे शोषण करणे, त्यांचे शरीरात वेगवेगळ्या भागात वहन करणे या सर्व प्रक्रीयेसाठी पाण्याची अवश्यकता असते.
6. शरीरातील वेगवेगळ्या द्रव्यांचा सामु नियंत्रित करण्यासाठी पाण्याची गरज लागते.
7. पाण्याची गरज पाणी पिऊन व शरीरातील प्रथिन,पिष्टमय पदार्थ व स्निग्ध पदार्थ यांच्या चयापचय प्रक्रीयेतुन काहि प्रमाणात शरीरामध्ये पाणी तयार होते यामधुन भागविली जाते.
8. ज्यावेळी आपण शेळ्यांना वेगवेगळ्या कडधान्याचा भरडा जास्त प्रमाणात खाऊ घालतो अशा वेळी शेळ्यांची पाण्याची गरज जास्त असते.
9. शेळी व मेंढीची पाण्याची गरज गाय व म्हैस यांच्या तुलनेत खुप कमी असते.
10. शेळ्यांची पिण्याच्या पाण्याची गरज वातावरणातील तापमान,आर्द्रता, खाद्य घटकामधील पाण्याचे प्रमाण, कोरड्या चा-याचे प्रमाण,प्रथिनांचे व क्षारांचे प्रमाण यावर तसेच शेळीची शरीर अवस्था शेळीची उत्पादन अवस्था , वय व लिंग तसेच शेळीपालनाची कोणती पद्धत या बाबीवर अवलंबून असते.
11. उन्हाळ्यातील कोरड्या व रुक्ष वातावरणात सरासरीपेक्षा शेळ्यांना पिण्यासाठी 3 पट पाणी जास्त लागते.याउलट थंड हवामानात दैनंदिन पिण्याच्या पाण्याची गरज कमी असते आणी बहुतेक वेळा ती हिरवा कोवळा चारा झाडपाला यांच्या खाण्यातुन भागविली जाते.
12. पारंपरिक शेळीपालनामध्ये शेळ्या आहारासाठी दिवसभर 7 ते 8 तास फिरत असतात यामुळे जास्त हालचाल होते शरीर क्रिया जास्त वेगात होतात साहजीकच यामुळे शेळ्यांना भुक जास्त लागते व पाण्याची दैनंदिन गरज जास्त होते.
13. वेगवेगळ्या हवामानात शेळ्यांची पिण्याच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. हिवाळ्यात शेळ्या त्यांनी खालेल्या वाळलेल्या किंवा कोरडा चारा यांच्या सरासरी 5 पट तर ऊन्हाळ्यामध्ये कोरड्या चा-याच्या 10 पट पाणी जास्त पितात.
14. शेळ्यांच्या पाणी पिण्याच्या वेळा देखील वेगवेगळ्या असतात.दैनंदिन एकुण पाण्याच्या आवश्यकतेपैकी दुपारनंतर 75% व सायंकाळी थंड वेळी 25% पाणी पितात.
15. वर्षभरातील सरासरी हवामानाचा विचार केल्यास शेळ्यांना त्यांच्या शरीर वजनाच्या 8 ते 10% पाण्याची गरज असते.
16. गाभण व दुध देणाऱ्या शेळ्यांची पाण्याची गरज ईतर शेळ्यांपेक्षा जास्त असते.
17. शेळ्यांना प्रत्येक हवामानात स्वच्छ ,थंड व वासरहित पाणी पिण्यासाठी उपलब्ध करावे.पाण्यामध्ये घाण व मलमुञ पडणार नाही याची काळजी घ्यावी.
18. शेळी स्वच्छताप्रिय प्राणी असल्यामुळे घाण पाणी,एकमेकींचे उष्टे तसेच वास असलेले पाणी पित नाहीत.
19. ऊन्हाळ्यामध्ये पाणी साठवणीची जागा थंड राहील याची काळजी घेणे आवश्यक आहे.

डॉ रमेश ओव्हाळ

14/03/2020

जनावरांमध्ये अस्थिभंग झाल्यास प्रार्थमिक उपचार म्हणून अर्थीसोल औषधवेदनाशामक म्हणून सुरु करावे ,घरगुती उपाय टाळावे , पशुवैदायाकाकडून निखळलेले सांधे जुळवून आधारपट्टी करावी अश्या परिस्थितीत क्ष-किरण तपासणी करून पशुधनाची हालचाल टाळावी पशुवैदायाकाकडून तत्काळ उपचारांची गरज असते .
त्यामुळे जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन मदत घ्यावी

25/02/2020

🐐🐐 *शेळी पालन

✅नवजात करडांपैकी जे बोकड शेळ्या भरवण्यासाठी उपयोगात आणायचे नाहीत अशा सर्व बोकडांचे ४ ते ६ आठवड्यात खच्चीकरण करावे.

✅खच्चीकरण केल्याने बोकडाचे वजन झपाट्याने वाढते. मांसाची प्रत सुधारते. कातडीही चांगल्या प्रतीची तयार होऊन त्याला बाजारभाव चांगला मिळतो. बकरी ईद सणाला अशा बोकडाला चांगली मागणी असते.

✅योग्य वाढीच्या बोकडांना बकरी ईदच्या वेळी पाच हजारांपासून लाखापर्यंत भाव मिळतो. नर व मादी करडांचे एकत्रित संगोपन करता येते. बोकड शांत आणि मवाळ बनते. प्रत्येक बोकडामागचा नफा वाढतो.

✅खच्चीकरण प्रशिक्षित डॉक्टरांकडूनच करावे. खच्चीकरण केलेली जागा निर्जंतुक करावी. खच्चीकरणासाठी बर्डीझो कॅस्ट्रेटर (चिमटा पद्धत) नावाचे उपकरण वापरले जाते.

✅ चिमट्याने खच्चीकरण केल्यास बोकडाच्या अंडाशयाला जखम न करता अंडाशयाला रक्तपुरवठा करणारी व शुक्राणू वाहून नेणारी नस चिमटली जाते.

✅त्यामुळे अंडाशय थोड्या दिवसांनी बारीक होते व बोकड पैदाशीच्या उपयोगाचा राहत नाही. खच्चीकरण शक्यतो सकाळी लवकर स्वच्छ सूर्यप्रकाशात करावे.

✅पावसाळा आणि थंडीच्या दिवसात खच्चीकरण करू नये, कारण या काळात रोगराई व माशांचा वावर जास्त असतो. खच्चीकरण केल्यानंतर बोकडाला लगेच धनुर्वाताचे इंजेक्शन द्यावे.

शेतीशी निगडित माहिती आणि सल्ला या पेज?

23/02/2020

शेळ्यांतील माजाची लक्षणे
माजावर आलेली शेळी बेचैन असते.
भूक मंदावते.
शेपूट सारखे हलविते.
वारंवार लघवी करते.
इतर शेळ्यांवर चढते.
बोकडाशी लगट करते.
बोकडाचे जननेंद्रिय हुंगते, बोकड/ शेळी तिच्या अंगावर चढल्यास किंवा लगट केल्यास शांतपणे उभी राहते.
योनिमार्गातून चिकट स्राव येतो.
माज २४ ते ४८ तास टिकतो.
प्रतिकूल हवामानात माजाचा काळ लांबतो. क्वचित माज असूनही वरील लक्षणे दिसत नाहीत. अशा माजला मुका माज म्हणतात.
बोकड मुक्‍या माजावरील शेळीला वासाने ओळखतो.
बोकडाला नेहमी शेळ्यांपासून वेगळे ठेवावे. शेळ्यांना फळवण्यापुरतेच त्याला शेळ्यांमध्ये सोडावे.

शेळ्यांतील गर्भधारणा अोळखण्यासाठी रासायनिक पद्धत -
शेळीच्या ५ मिली मलमूत्रामध्ये ५ मिली १ टक्के बेरीअम क्‍लोराइड द्रावण मिसळावे. जर तळाशी गाळ साचला व द्रावण गढूळ बनले तर शेळी गाभण नाही असे मानले जाते व द्रावण जर स्वच्छ राहिले तर शेळी गाभण आहे असे मानले जाते. ही पद्धत ठोकळ प्रमाण म्हणून वापरावी.

शेळी गाभण असण्याची लक्षणे
शेळी २१ दिवसांत परत माजावर येत नाही.
३ महिन्यांनंतर शेळीचे पोट वाढू लागते व योनी सुजल्यासारखी दिसते.
शेळी गाभण झाल्यावर तिची त्वचा तजेलदार होते.
शेळी गाभण आहे, की नाही हे ओळखण्यासाठी नवीन पद्धतीमध्ये एक्‍स-रे, सोनोग्राफी, लॅप्रोस्कोपी या तपासण्या खूपच विश्‍वसनीय मानल्या जातात.
शेळी जर गाभण असेल तर शेळीच्या योनी मार्गातील पेशींमध्ये बदल होतो व तो बदल व्हजायनल सायटोलॉजी (Vaginal Cytology) या पद्धतीने ओळखून शेळी गाभण आहे, की नाही हे ओळखता येते.
कोणत्याही पद्धतीचा वापर जात, गाभणअवस्था, खर्च व नेमकेपणा यानुसार बदलतो.
गाभण शेळीची विण्याअगोदर आवश्‍यक काळजी, करडांचे व्यवस्थापन व खाद्य, पाणी व निवारा या गोष्टींच्या योग्य व्यवस्थापनासाठी शेळी साधारणतः कधी विणार आहे व विण्याअगोदर कोणती लक्षणे दिसतात, याबद्दलची माहिती असणे आवश्‍यक आहे.
पाठ व शेपटीकडील भाग आखडून धरणे.
कास मोठी होते व चमकल्यासारखी दिसते.
श्‍वसन हळू, दीर्घ होते व अस्वस्थ दिसते.
पाठीकडे व शरीराच्या उजव्या बाजूला सारखे वळून पाहते.
शेळी बैचेन होते व हळू आवाजात ओरडते.
रोजचा कामगार किंवा मालक जवळ आल्यावर ओरडते.

विलेल्या व दूध देणाऱ्या शेळीचे व्यवस्थापन व काळजी
शेळी जिथे विली असेल, ती जागा स्वच्छ करून तिथे जंतुनाशकाची फवारणी करून वाराची व्यवस्थित विल्हेवाट लावावी.
शेळीचा मागचा भाग स्वच्छ धुऊन काढावा.
जास्त थंडीपासून शेळीचे संरक्षण करावे.
विल्यानंतर शेळीला चवळी गरम करून, गूळ, मीठ, आले, खनिजमिश्रण हे सर्व खायला द्यावे.
खुराक दर दिवसाला ५०० ग्रॅमपेक्षा जास्त न देता दोन दिवसांनंतर शेळीच्या आवडीचे खाद्य द्यावे.
विल्यानंतर शेळी ४० ते ४५ दिवसांनंतर माज दाखवते. ४० ते ४५ दिवसांत माज दाखवल्यानंतर बोकड दाखवावा.
दूध देणाऱ्या शेळीला ३०० ते ४०० ग्रॅम खुराकाचे मिश्रण १ लिटर दुधासाठी देणे गरजेचे आहे.
दूध काढण्याअगोदर कास जंतूनाशकाने स्वच्छ करून घ्यावी.
कासेवरचे केस कापून कोरड्या हाताने पूर्ण दूध काढून घ्यावे.
गाभण शेळीच्या केसामध्ये नियमित हात फिरवल्यास कातडी चमकदार व नरम राहते.

Address

At. Po. Sawkhed Bhoi Te. Deulgon Raja Dis. Buldhana
Deulgaon Raja
443204

Telephone

+919921009733

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सिद्येष गोटफारमिग सावखेड भोई ता.देऊळगाव राजा जि. बुलढाना ૪૪३२०૪ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to सिद्येष गोटफारमिग सावखेड भोई ता.देऊळगाव राजा जि. बुलढाना ૪૪३२०૪:

Share