29/08/2026
दिनांक २९ आॅगस्ट १९०५ हाॅकीचे जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस. भारतात हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून सन २०१२ पासून अधिकृतपणे साजरा करण्यात येतो. या दिवशी शारीरिक दृष्ट्या सदृढतेबाबत विषेश कार्यक्रम शाळा, महाविद्यालये तसेच सर्व क्रिडा प्रेमी क्षेत्रात आयोजित केले जातात. तरूणांमध्ये आणि नागरीकांमध्ये खेळाबद्दल आवड निर्माण करणे, शारीरिक आरोग्य सुधारणे आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देणे हा यामागचा मुख्य उद्देश. याच दिवसाचे औचित्य साधून धुळे सायकलिस्ट फौंडेशन, ट्रेक अॅड ट्रेल आणि अथर्व सायकल एंटरप्रायझेस यांच्या वतीने सायकल रॅली काढण्यात आली. उपस्थित सर्व सायकलस्वारांना श्री. पराग दादा पाटील यांचेकडून टी शर्टस् देण्यात आले. जेष्ठ सायकलिस्ट दिवाण तात्या सूर्यवंशी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅली रवाना केली. धुळे - वलवाडी - भोकर - गोंदूर - निमडाळे व परत असा ४० किलोमीटर मार्गाक्रमण करुन सदर रॅली अथर्व सायकल एंटरप्रायझेस येथे आली. अथर्व सायकल एंटरप्रायझेस यांच्या मार्फत चहा नास्ता देण्यात आला. रॅलीत सहभागी झाल्याबद्दल धुळे सायकलिष्ट फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. भैय्यासाहेब पाटील, पी.एसआय दिलीप दादा खोंडे, अनिल दादा जाधव, दिवाण तात्या सूर्यवंशी, प्राचार्य डॉ मनोहर पाटील यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
श्री. गणेश बोरोकर व सौ. माधूरी बोरोकर यांच्या टॅनडम सायकलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत मेजर मनोज माळी, माजी सैनिक, डॉ. विनोद पाटील, प्रा. जगदिश पाटील, सुधीर पाटील, मनोज पाटील, कैलास पाटील, विजय नाना बोरसे, रविंद्र वाघ यांच्यासह सुमारे ६० सायकलस्वारांनी उत्फुर्तपणे सहभाग नोंदविला. प्रास्ताविक भैय्यासाहेब पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ मनोहर पाटील यांनी केले. अथर्व सायकल एंटरप्रायझेसचे पराग पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.