ओम कृषि सेवा केंद्र केंद्रा बु.

  • Home
  • India
  • Hingoli
  • ओम कृषि सेवा केंद्र केंद्रा बु.

ओम कृषि सेवा केंद्र केंद्रा बु. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ओम कृषि सेवा केंद्र केंद्रा बु., Consulting Agency, kendra bk, Hingoli.

08/04/2019
08/04/2019
तुमच्या पिकांच्या उत्तम वाढीसाठी अति उत्तम सुरक्षेची गरज असते. पिकांना प्रभावित करणाऱ्या हानिकारक बुरशीजन्य रोगांना मिटव...
01/01/2019

तुमच्या पिकांच्या उत्तम वाढीसाठी अति उत्तम सुरक्षेची गरज असते. पिकांना प्रभावित करणाऱ्या हानिकारक बुरशीजन्य रोगांना मिटवा आमच्या जैव सेंद्रिय खत एनरिच सोबत. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://coromandel.biz/prod_speciality.html

आपल्या टोमॅटो पिकाकरिता ग्रोमोर अल्ट्रा २४-२४-०-८ खत द्या आणि चांगली वाढ व अधिक उत्पन्न मिळवा. अधिक माहितीसाठी येथे क्लि...
01/01/2019

आपल्या टोमॅटो पिकाकरिता ग्रोमोर अल्ट्रा २४-२४-०-८ खत द्या आणि चांगली वाढ व अधिक उत्पन्न मिळवा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://coromandel.biz/prod_speciality.html

आपल्या आद्रक पिकाच्या सुनिश्चित व निरोगी वाढी करिता तसेच भरघोस व उच्च गुणवत्तेचे उत्पादनकरिता ग्रोमोर अल्ट्रा २४-२४-०-८ ...
01/01/2019

आपल्या आद्रक पिकाच्या सुनिश्चित व निरोगी वाढी करिता तसेच भरघोस व उच्च गुणवत्तेचे उत्पादनकरिता ग्रोमोर अल्ट्रा २४-२४-०-८ वापरा. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा: https://coromandel.biz/prod_fortifiedfertilizers.html

20/12/2018

*खतांमधील भेसळ ओळखा*

शेती उत्पन्न वाढीसाठी शेतकरी बांधव बरेच वेळेस कर्ज काढून खते आणतात पण बरेच वेळेला आपणास मिळालेली खते योग्य आहेत का ? ही तपासणी गरजेची असते.

_*खते तपासणी -*_
*१. युरिया :*
तपास नळीत १ gm युरिया, ५ ते ६ थेंब सिल्व्हर नायट्रेट, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिसळुन ढवळल्यास द्रावण पांढरे झाल्यास भेसळ आहे.

*२. युरिया :*
१ gm युरिया तपास नळीत गरम केल्यास संपुर्ण युरिया विरघळला नाही तर भेसळ आहे.

*३. DAP :*
१ gm DAP खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर, ०१ ml आम्ल मिसळून हलवा. संपुर्ण DAP विरघळला नाही तर भेसळ आहे.

*४. म्युरेट ऑफ पोटॅश :*
०१ gm खत, १० ml पाणी तपासनळीत घेऊन हलवून पाहिल्यास बरेच कण तरंगत असतील तर भेसळ आहे.
याशिवाय
पेटत्या निखाऱ्यावर खत टाकल्यानंतर निखारा पिवळा झाल्यास भेसळ समजावी.

*५. सिंगल सुपर फॉस्फेट :*
१ gm खत, ५ ml डिस्टिल्ड वॉटर मिश्रण गाळून घ्या. नंतर त्यामध्ये १ थेंब (२%) डिस्टिल्ड अमोनिअम हैड्रोक्साइड आणि १ ml सिल्व्हर नायट्रेट मिसळले तर द्रावनास पिवळा रंग न आल्यास भेसळ समजावी.

*६. फेरस सल्फेट :*
१ gm खत आणि ५ ml पाणी मिसळा त्यात १ ml पोटॅशिअम फेरोसिनाईड मिसळल्यास मिश्रण निळे बनेल अन्यथा भेसळ समजावी.

16/12/2018

*कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम*
*बाजार भाव*
*दिनांक.१५-१२-२०१८*
----------------------------------------
१)सोया-३२५०-३४१८
३५६२ २)चना-४५००-४७५० ४५४ ३)तुर-४५५०-४७००
१६२
४)उडीद-४४००-४५००
९५
५)मुंग-४५००-४८५०
१२ ६)गहु-१६५०-२१०० १०९ ७)ज्वारी-१३५०-१६६५ १ ८)हळद-५५००-६६०० ६११
--------------------------------------
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

22/11/2018

गांडूळ खताचे जमिनीच्या आरोग्यावर होणारे अनुकूल परिणाम –

गांडूळ खतामुळे हलक्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते तर भारी जमिनीच्या निचरा होण्याच्या क्षमतेत वाढ होते.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गांडूळ खतामुळे वाढवून जमिनीचे कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.

गांडुळे जमिनीवर खोलवर जाऊन मशागत करत असल्यामुळे जमिनीची उलथापालथ करतात. त्यामुळे शेतातील माती समृद्ध व उपजाऊ बनते.

गांडुळांच्या हालचालीमुळे जमीन सच्छीद्र बनून पावसाचे पाणी जमिनीत खोलवर मुरून जमिनीची जलग्रहण क्षमता व निचरा होण्याची क्षमता वाढते.

जमिनीची निचरा क्षमता वाढल्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण कमी होऊन जमिनी क्षारयुक्त व चोपणयुक्त बनत नाहीत. क्षारयुक्त व चोपणयुक्त जमिनीत इतर सेंद्रिय पदार्थासोबत गांडूळखताचा वापर केल्यास अशा जमिनी लवकर दुरुस्त होण्यास मदत होते.

जमिनीत राहिलेले पिकांचे अवशेष इतर सेंद्रिय पदार्थ यांचे गांडुळांच्या मदतीने जलद विघटन होऊन त्यातील अन्नद्रव्ये मुक्त होतात. जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत होते.

गांडुळाच्या मदतीने सेंद्रिय पदार्थांपासून कमी कालावधीत उत्कृष्ट असे सेंद्रिय खत तयार करता येते.

जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गांडूळखतामुळे वाढवून जमिनीचे कायिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते.

जमिनीचा सामू (आम्लविम्ल निर्देशांक) सुधारण्यास मदत होऊन त्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण अनुकूल राखण्यास मदत होते.

जमिनीचा पोत सुधारून धूप कमी करण्यास मदत होते.

हलक्या जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेत वाढ होते तर भारी जमिनीच्या निचरा होण्याच्या क्षमतेत वाढ होते.

पडीक व मुरमाड जमीन सुधारण्याकरिता गांडूळखताचा तसेच गांडुळांचा उपयोग होतो.

गांडुळाच्या हालचालीमुळे जमीन सच्छिद्र होऊन पाणी, हवा व तापमान यांचे जमिनीतील नियमन चांगल्या रितीने होते.

नत्र स्थिरीकरण, स्फुरद विद्रावीकरण व इतर अनेक महत्त्वपूर्ण कार्य करणाऱ्या जिवाणूंच्या संख्येत गांडूळखतामुळे लक्षणीय वाढ होऊन जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारतात.

जमिनीतील घातक द्रव्ये, कीटकनाशके व इतर विषारी घटक गांडुळाच्या चयापचय क्रियेमुळे लवकरात लवकर विघटन होऊन जमीन प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होते

Address

Kendra Bk
Hingoli

Telephone

9921582777

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ओम कृषि सेवा केंद्र केंद्रा बु. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share