Riyaj subhedar

Riyaj subhedar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Riyaj subhedar, Business service, Kolhapur.

14/04/2026
आनंद, उत्साह आणि बंधुभावाची उधळण करणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! या पवित्र स...
21/03/2026

आनंद, उत्साह आणि बंधुभावाची उधळण करणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा! या पवित्र सणाच्या निमित्ताने आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधानाचा वर्षाव होवो, तसेच आपल्या सर्वांची भरभराट होवो हीच मनापासून सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना ईद मुबारक!

आमचे बंधुतुल्य मा. मुस्ताक मलाबारी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार...
20/02/2026

आमचे बंधुतुल्य मा. मुस्ताक मलाबारी यांची कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे, समाजसेवेतील निष्ठेमुळे आणि सर्वसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीमुळे ही निवड निश्चितच सार्थ ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या प्रभावी सोडवणुकीसाठी त्यांचे कार्य अधिक जोमाने पुढे जावो, हीच सदिच्छा.

तसेच या निवडीसाठी सहकार्य व पाठबळ दिल्याबद्दल मा. सतेज (बंटी) पाटील यांचेही मनःपूर्वक आभार.

त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. 💐

18/02/2026

आज प्रभाग क्रमांक १२ मधील अकबर मोहल्ला येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी नूतन नगरसेविका सौ. अनुराधा मुळीक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच माजी नगरसेवक मेहजबीन सुभेदार, सामाजिक कार्यकर्ते रियाज सुभेदार, हाजी इरफान मोमीन, असलम बागवान, परवेज बागवान, आरिफ काजी , यासीन बरगीर तसेच इलाही लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रियाज अहमद सुभेदार
(सामाजिक कार्यकर्ते)

17/02/2026

आज प्रभाग क्रमांक १२ मधील अकबर मोहल्ला येथे काँक्रीट रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी नूतन नगरसेविका सौ. अनुराधा मुळीक यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तसेच माजी नगरसेवक मेहजबीन सुभेदार, सामाजिक कार्यकर्त्या रियाज सुभेदार, हाजी इरफान मोमीन, असलम बागवान, परवेज बागवान, आरिफ काझी, यासीन बरगीर इलाही लाड आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी परिसरातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

रियाज अहमद सुभेदार
( सामाजिक कार्यकर्ते)

01/02/2026

आराम कॉर्नर स्पोर्ट्सच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली साहिल मुल्ला फुटबॉल स्पर्धा २०२६ अत्यंत उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या उद्घाटनप्रसंगी तसेच विजेत्या संघांना पारितोषिक वितरण करण्याचा मान आम्हाला मिळाला, याबद्दल आम्ही आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो.

या भव्य क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन साहिल मुल्ला व रहीम मुल्ला यांनी केले होते. या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते मा. रियाज सुभेदार, वसीम फरास,सुफियान मोमीन तसेच अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांनी खेळभावना जपत उत्कृष्ट कामगिरी केली.

अशा क्रीडा उपक्रमांमुळे युवकांना सकारात्मक दिशा मिळते व समाजात एकोपा वाढतो. या यशस्वी आयोजनाबद्दल साहिल मुल्ला, रहीम मुल्ला आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 🙏⚽
#433

भावपूर्ण श्रद्धांजली
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही!" ✊✨निवडणुकीचा निकाल काहीही लागला असला...
16/01/2026

विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही... पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही!" ✊✨

निवडणुकीचा निकाल काहीही लागला असला, तरी जनसेवेचा माझा निर्धार कायम आहे. माझ्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी दिलेले प्रेम आणि विश्वास हीच माझी खरी शिदोरी आहे. हे नातं निवडणुकीपुरतं मर्यादित नाही, तर ते काळजाला भिडणारं आहे. तुमच्या या प्रेमाच्या ऋणातून मी कधीच मुक्त होऊ इच्छित नाही.

लढा सुरूच राहील! जनसेवेचे व्रत कधीच थांबणार नाही. 🙏

Address

Kolhapur
416008

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Riyaj subhedar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share