Balaji Agro & Balaji Fodders

Balaji Agro & Balaji Fodders या पेजवर शेती व दुग्ध व्यवसाया संबंधी सर्व माहिती, मार्गदर्शन मिळेल.

बालाजी ग्रुप, लाटवडे तर्फे भागातील शेतकऱ्यांना शेती व दुग्ध व्यवसायातील सर्व सेवा पुरवण्यासाठी, बालाजी ऍग्रो आणि बालाजी फॉडर्स हे व्यवसाय सुरू करनेत आले आहेत.
बालाजी ऍग्रो परिसरातील एक नामांकित शेती सुविधा केंद्र आहे. आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांची खते, बी-बियाणे तसेच सर्व शेती औषधे योग्य दरात मिळतील. सेंद्रिय शेती ही काळाची गरज असल्याने निंबोळी पेंड, करंजी पेंड, सिटी कंपोस्ट, ग्रीन हारवेस

्ट सारखी उच्च दर्जाची सेंद्रिय खते उपलब्ध करण्यात आली आहेत. भरघोस उत्पादन घेणेसाठी नवीन युगातील हायटेक फवारणी तसेच ठिबक द्वारे देण्यात येणारी सर्व प्रकारची खते विक्रीस उपलब्ध आहेत. पिकांच्या योग्य वाढीसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरुन बनवलेले PGR देखील विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहेत. बालाजी ऍग्रो मध्ये श्री जे. पी. पाटील (B.Sc. Agri) (सेवा निवृत्त कृषि अधिकारी, महाराष्ट्र शासन) यांचे खते व्यवस्थापणावर तसेच श्री. पवन पाटील (Agri. Diploma) यांचे विविध कीड व रोगांवर योग्य व मोफत मार्गदर्शन दिले जाते. त्यामुळे भागातील शेतकाऱ्याना शेती खर्चात बचत करनेस व भरघोस उत्पादन घेणेस मदत होत आहे. श्री. पाटील यांचा बियाणे प्रमाणीकरण मधील प्रदीर्घ अनुभव असल्याने योग्य बी-बियाणे व्यवस्थापन करण्याचे मार्गदर्शन शेतकाऱ्याना मिळत आहे.
बालाजी ऍग्रो कार्यस्थळावर प्रशस्त शेड मध्ये खते मिश्रण करण्याची सोय करण्यात आली असून ते सर्व खते व इतर साहित्य शेतकऱ्यांच्या बांधावर माफक दरात पोहोच करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
बालाजी फॉडर्स मध्ये (मक्का, ऊस, गवत, ऊस वाढे) यांचा मुरघास तसेच कडबा कुट्टी यांचे उत्पादन घेतले जाते. ही सर्व उत्पादने विविध पॅकिंग मध्ये शेतकाऱ्यांना योग्य दरात उपलब्ध करून देणेत आले आहे.

Address

Kati Mala, Savarde Road, Latwade
Kolhapur
416112

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 8am - 10pm
Wednesday 8am - 10pm
Thursday 8am - 10pm
Friday 8am - 10pm
Saturday 8am - 10pm
Sunday 8am - 10pm

Telephone

+919423984211

Alerts

Be the first to know and let us send you an email when Balaji Agro & Balaji Fodders posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Balaji Agro & Balaji Fodders:

Shortcuts

Share