Vivahvedh Matrimony

Vivahvedh Matrimony आपले विवाहवेध मॅट्रीमोनी मध्ये स्वागत आहे.!

22/01/2025
09/11/2023

*गडहिंग्लज मधील सर्व दानशूर व्यक्तींना नम्र आवाहन* 🙏

*माणूसकीची भिंत*

आमच्या सारखी इतरांना सुद्बा या दिवाळीचा आनंद घेता यावा यासाठी तुमच्या सर्वांच्या सहकार्याने........

तुम्हाला नको असणाऱ्या आणि वापरात नसलेल्या वस्तू , कपडे , लहान मुलांची खेळणी , फराळ साहित्य इ. आमच्या पर्यंत पोच करा आम्ही त्या गरजू लोकांना पोहोच करू.

*नको ते आणून द्या आणि हवं ते घेवून जा*

चला इतरांची दिवाळी सुद्धा गोड करू 🙏

शुक्रवार आणि शनिवार रोजी
सकाळी १० ते ५ या वेळेत
*गडहिंग्लज नगरपालिकेच्या समोर*

📌टीप - कोणतीही आर्थिक मदत स्वीकारली जाणार नाही.
इतरांना वापरता येतील अश्या वस्तू आणून द्यावे.

07/11/2023

*पंधरा लाखाची गोष्ट*...

एक चीनी महिला चुई दररोज गल्लीबोळातून फिरत रद्दी विकत घ्यायचा व्यवसाय करीत असते. एके दिवशी एक चीनी गृहिणी रद्दी विकताना बरीच घासाघीस करते. चुई भाव वाढवून द्यायला तयार होते. हातगाडीवरील तराजू आणण्यासाठी चुई रस्त्यावर येते आणि त्या गृहिणीच्या मनात पाप येते. ती रद्दीच्या गठ्यात एक जाडजूड विट बेमालुमपणे सरकवून देते. रद्दीचा गठ्ठा विस्कटून न बघताच चुई त्याचे वजन करते आणि पैसे देऊन गठ्ठा घेऊन जाते.
संध्याकाळी नवरा घरी येतो तेव्हा बायको नटूनथटून तयार झालेली असते. नवर्‍याला म्हणते, आटपा लवकर, आज आपण सिनेमाला जाऊ आणि बाहेरच जेवण करुन येऊ. नवरा म्हणतो, माझ्याकडे पैसे नाहीत, पुढच्या आठवड्यात बघू. बायको म्हणते, माझ्याकडे आहेत पैसे! आज मी घरातली सगळी रद्दी विकली! नवरा लगबगीने आपल्या खोलीत जातो. बरीच शोधाशोध करतो आणि त्रासिक चेहर्‍याने बायकोवर खेकसतो, टेबलावर माझा एक जाडजूड लिफाफा होता, तो कुठाय? तू घेतलास का? बायको म्हणते, तो होय? मी रद्दीत विकून टाकला! नवरा मटकन खाली बसतो. काय केलंस तू हे? अगं, गेल्या काही महिन्यात टेबलाखालून घेतलेले पंधरा लाख होते त्यात?
आपल्या घरी रद्दीची वर्गवारी करीत असताना कागदात गुंडाळलेली विट चुईच्या नजरेस पडते. क्षूद्र स्वार्थासाठी लोक किती खालच्या पायरीवर घसरतात, हे बघून ती दुःखी-कष्टी होते. विट बाजुला ठेवते आणि कामाला लागते. तो लिफाफाही तिच्या हाती लागतो. आत पंधरा लाखाच्या कोर्‍या करकरीत नोटा! ती बघतच राहते. ती नोटा लिफाफ्यात होत्या तशा परत घालून, लिफाफा विटेवर ठेऊन शांतपणे झोपी जाते.
इकडे त्या नवराबायकोला रात्रभर झोप येत नाही. एकमेकांवर खेकसाखेकशी होते. सकाळ होताच त्या रद्दीवालीला शोधून काढले पाहिजे. रद्दीवालीच ती! रद्दीत एक लिफाफा मिळाला आणि त्यात पंधरा लाख मिळाले, हे ती कबूल करील का? त्यातली काही रक्कम तिने खर्च तर केली नसेल ना? पोलिसात तक्रार केली असेल का? पोलिसाचे नाव काढताच बायकोच्या पोटातही गोळा येतो. हरामाचा पैसा बुध्दी भ्रष्ट करतो म्हणतात! झोप कशी येणार?
दुसर्‍या दिवशी चुई नेहमीप्रमाणे, रद्दी विकत घेणार, उचित दाम देणार, असा पुकारा करत रस्त्यावरुन जात असते. नवरा धावत पळत जाऊन चुईला गाठतो. म्हणतो, काल तू माझ्या बायकोकडून रद्दी घेऊन गेलीस? त्यात तुला एक जाडसर लिफाफा मिळाला का? तुझ्यासाठी तो रद्दीचा भाग असला, तरी माझ्यासाठी तो लिफाफा फार महत्वाचा आहे. चुई त्याला आपादमस्तक न्याहळते. थोडीफार चौकशी करुन लिफाफा त्याच्या हातात ठेवते. तो नोटा मोजून बघतो आणि त्यातली एक नोट चुईला देऊ करतो. चुई त्याला नम्रपणे नकार देते आणि हातगाडी ढकलत पुढे निघून जाते.
नवरा-बायकोच्या आनंदाला उधान येते. नवरा म्हणतो, नाही तरी माझे हे पंधरा लाख गेलेच होते, घे तुला शाॅपिंगला! रद्दीवाली खरंच बावळट आहे. आयुष्यभर पायपीट करुनही तिला पंधरा लाख मिळायचे नाहीत. ती खोटं बोलली असती, तर मी काय करु शकलो असतो? चोरीचा मामला! बायको म्हणते, अहो, मी पण तुमचीच बायको आहे म्हटलं! कमी समजू नका मला? त्या रद्दीवालीशी आधी घासाघीस करुन भाव वाढवून घेतला आणि नंतर रद्दीत विट सरकवून दहा किलोचे पैसेही लाटले! आहात कुठे? रद्दीवाली खरंच बावळट आहे!
नवरा-बायकोचे संभाषण ऐकत दाराआड उभी असलेली चुई म्हणते, ही घ्या तुमची विट. काल रद्दीत चुकून आली माझ्याकडे! रद्दीच्या व्यवसायात मी माझ्या आयुष्यभरात पंधरा लाख मिळवू शकेन की नाही, मला माहीत नाही, पण प्रामाणिकपणे जे काही मिळविते, त्यावर मी आयकरही भरते! दिवसभर रद्दी गोळा करत फिरते आणि रात्री शांतपणे झोपी जाते, कारण मी स्वतःला कधीच फसवत नाही! मी समाधानी आहे. तुमच्या घरातली रद्दी बाहेर काढण्यासाठी मला केव्हाही बोलवा. तुमच्या मनातली रद्दी मात्र तुम्हालाच बाहेर काढून फेकून द्यावी लागेल! कारण, ती विकत घेऊ शकत नाही आणि कुणी फुकटही घेणार नाही!

*मतितार्थ* : प्रामाणिकपणा हा कुठल्या टोलेजंग बंगल्यात राहणाऱ्या मध्ये असेलच असे नाही, व ती झोपड़पट्टी मध्ये राहणा-या माणसांमध्ये मिळणार नाही असेही कांही नाही...प्रामाणिकपणा ही रक्तात व आचरणांत असावी लागते...कुणालाही कधीही कमी लेखूं नका...कांहीवेळा आपण सामान्य दिसणार्या लोकांना कमी लेखतो...व तेच कांहीवेळा असामान्य दातृत्व दाखवून जातात...एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा की...बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चलाखी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कारावर अवलंबून असते...चलाखी चारदिवसच चमकते आणि इमानदारी आयुष्यभर...
पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं. तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं...

सुरक्षित राहा व काळजी घ्या...

*शुभ रात्री*...

शोध नव्या नात्यांचा ...744 744 8 744
31/10/2023

शोध नव्या नात्यांचा ...744 744 8 744

30/10/2023

*★मुंगीची गोष्ट★*

एका रविवारी सकाळी, एक श्रीमंत माणूस त्याच्या बाल्कनीत कॉफी घेऊन सूर्यप्रकाशाचा आनंद घेत होता, तेव्हा एका छोट्या मुंगीने त्याचे लक्ष वेधून घेतले. मुंगी तिच्या आकारापेक्षा कितीतरी पट मोठे पान घेऊन बाल्कनीतून चालली होती.

त्या माणसाने तासाभराहून अधिक काळ ते पहात होता. त्याने पाहिले की मुंगीला तिच्या प्रवासात अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला विराम घेतला. वळसा घेतला.

आणि मग ती आपल्या गंतव्याच्या दिशेने चालू लागली.
एका क्षणी या चिमुकल्या जीवाला अवघड जागा आडवी आली. फरशीला तडा गेला होता. मोठी भेग होती. ती थोडावेळ थांबली, विश्लेषण केले आणि मग मोठे पान त्या भेगेवर ठेवले, पानावरून चालली, पुढे जाऊन दुसऱ्या बाजूने पान उचलले आणि आपला प्रवास चालू ठेवला.

मुंगीच्या हुशारीने तो माणूस मोहित झाला. त्याला सृष्टीच्या चमत्काराने विचार करण्यास भाग पाडले.

त्याच्या डोळ्यांसमोर हा लहानसा प्राणी होता, जो आकाराने फार मोठा नसलेला, परंतु विश्लेषण, चिंतन, तर्क, शोध, शोध आणि मात करण्यासाठी मेंदूने सुसज्ज होता.

थोड्या वेळाने त्या माणसाने पाहिले की प्राणी त्याच्या गंतव्य स्थानी पोहोचला आहे - जमिनीत एक लहान छिद्र होते, जे त्याच्या भूमीगत निवासस्थानाचे प्रवेशद्वार होते.

आणि याच टप्प्यावर मुंगीची कमतरता उघड झाली.

मुंगी लहान छिद्रात कसे वाहून नेईल?

ते मोठे पान तिने काळजीपूर्वक गंतव्य स्थानावर आणले, पण हे आत नेणे तिला शक्य नाही!

तो छोटा प्राणी, खूप कष्ट आणि मेहनत आणि उत्तम कौशल्याचा वापर करून, वाटेतल्या सर्व अडचणींवर मात करून, आणलेले मोठे पान मागे टाकून रिकाम्या हाताने गेली.

मुंगीने आपला आव्हानात्मक प्रवास सुरू करण्यापूर्वी शेवटचा विचार केला नव्हता आणि शेवटी मोठे पान हे तिच्यासाठी ओझ्याशिवाय दुसरे काही नव्हते.

त्या दिवशी त्या माणसाला खूप मोठा धडा मिळाला. हेच आपल्या आयुष्यातील सत्य आहे.

आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता आहे, आपल्याला आपल्या नोकरीची चिंता आहे, आपल्याला अधिक पैसे कसे कमवायचे याची चिंता आहे, आम्ही कोठे राहायचे, कोणते वाहन घ्यायचे, कोणते कपडे घालायचे, कोणते गॅझेट अपग्रेड करायचे, सगळ्याची चिंता आहे.

*फक्त सोडून देण्याची चिंता नाही.*

*आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला हे कळत नाही की आपण हे फक्त ओझे वाहत आहोत. आपण ते अत्यंत काळजीने वाहत आहोत. आपण ते आपल्यासोबत घेऊ शकत नाही*.. ..

*कथा इथेच संपत नाही...*

मुंगी मोठे पान बाहेर सोडून छिद्राच्या आत नाहीशी झाली.
आणखी 20 मुंग्या घेऊन परतली. त्यांनी पानाचे छोटे तुकडे केले आणि ते सर्व आत नेले.

*बोध:*
*१. हार न मानता केलेले प्रयत्न वाया जात नाहीत!*

*२. एक संघ म्हणून एकत्र, अशक्य काहीही नाही*

*३. कमावलेली वस्तू तुमच्या बहिणी भावांसोबत,गरीब मित्र,नातेवाईक,नोकर सोबत शेअर करा*

*४. (सर्वात महत्त्वाचे!) तुम्ही जेवढे वापरता त्यापेक्षा जास्त घेऊन गेलात तर तुमच्या नंतर इतरांनाही त्याचा आनंद मिळेल. तर तुम्ही कोणासाठी प्रयत्न करत आहात हे ठरवा.*


*मुंगीसारख्या लहानशा प्राण्यापासूनही आपण ही किती शिकू शकतो.*

शोध नव्या नात्यांचा ......744 744 8 744
30/10/2023

शोध नव्या नात्यांचा ......744 744 8 744

शोध नव्या नात्यांचा ....744 744 8 744
27/10/2023

शोध नव्या नात्यांचा ....744 744 8 744

05/10/2023

*💞🫶सर्व मुलांनो मुलींनो व /त्यांच्या पालकांनो, ऑक्टोबर महिना निघाला आहे आता लग्नाच्या तयारीला लागा, लग्न करायचं आहे ना नक्की कि नुसती जाहिरात कश्यासाठी????*💐🤝👨‍❤️‍👨🙏

*लग्न करायचं आहे ना नक्की मग कुठेतरी थांबायला शिका रे!! सर्वसाधारणपणे १७/१८ व्या वर्षी मुलगी वयात येते. या वयात साधारण दिसणाऱ्या मुलीही चांगल्या दिसतात. मुळातच सुंदर असल्या, तर त्या अधिकच छान रेखीव आकर्षक दिसतात. विविध लग्नसमारंभात/कार्यक्रमात अशा मुली उठुन दिसतात आणि बऱ्याच वेळी अशा मुलींना आपणहुन चांगली स्थळे सांगुन येतात . विचारणा होते,*

*पण*.

*स्वतःहुन असे कुणी विचारले व जरी ते स्थळ चांगले असले तरी मुलीच्या बापाच्या डोक्यात वारं शिरतं. तो अचानक भाव खायला लागतो, "मुलीला अजून शिकायचे आहे, करीयर करायचे आहे, स्वतःच्या पायावर उभे करायचे आहे" असे सांगून अशी चांगली चालत आलेली स्थळे टाळली जातात.*

*मग काय, मुलगीपण अभ्यासाला लागते. चांगली डिग्री मिळवते. तोपर्यंत ती २२/२३ वयाची होते. मग लगेच लग्नाचा विचार करायला हरकत नसते,*

*पण*

*नुसत्या डिग्रीने काय होते, अजुन उच्च शिक्षण घेतले म्हणजे अजुन मोठ्ठे तोलामोलाचे स्थळ मिळेल, असे म्हणुन परत शिक्षण सुरुच रहाते. तोपर्यंत मुली पंचवीशीच्या होतात. अभ्यास करुन करुन तब्बेत बिघडते. चेहऱ्यावरील गोडवा कमी होत जातो. (पुर्वीच्या पिढीत म्हणजे दहा पंधरा वर्षापुर्वीपर्यंत पंचविशीत पोरींना दोन एक पोर होवुन परत त्या मोकळे फिरायला मोकळ्या रहायच्या)*

*मग*,

*मग आता पंचविशीत मुलगी नोकरीच्या शोधात व बाप स्थळाच्या शोधात निघतो.*

*बरे स्थळ शोधतांना किती किस काढावा?*

*सरकारी नोकरीच हवी, किंवा चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असावा, किंवा खुप खुप पगार असावा, तसेच त्याच्याकडे गाडी-फ्लॅट हवा, दिसायला चांगला हवा, वयात जास्त अंतर नको व अगदी कमीही नको, एकुलता एक शक्यतो नसावा, (सासु सासरे मग कायमच बोकांडी बसतील नां !) आई बाप मुलाजवळ रहाणारे नकोत, धंदेवाईक नको, शेतकरी नको, फक्त पुणे, मुंबई, बंगलोर सारख्या मेट्रो सिटीतच हवा किंवा US/UK त असावा.*

*काय काय म्हणुन अपेक्षा असाव्यात, याला मर्यादाच नाही. बरे सगळा तपास बाहेर बाहेरुनच चालतो. प्रत्येक स्थळात काही ना काही खोट काढत काढत पोरीचे वय २७/२८ वर येवुन पोहोचते. पोरगी नोकरी करायला लागली असेल तरी, किंवा नोकरी लागली नाही तरी, निसर्गनियमानुसार चेहऱ्याचे तेज कमी कमी होत जाते. तोलामोलाचे स्थळ मिळणे मुश्किल होत जाते. तरीसुद्धा अजुनही तडजोड करायची तयारी नसते. जिथे नोकरी करते, त्याच गावातील स्थळ हवे.आपल्यापेक्षा जास्त पगारवालाच हवा, या नादात वये वाढत जातात. मग केव्हातरी कुणालातरी उपरती होवुन २८/३० त लग्ने उरकली जातात. सगळ्यांचा उत्साह तोपर्यंत निघुन गेलेला असतो.*

*बरे २८/३0 त लग्ने होवुनही यांना मुलाबाळांची घाई नसते. अगोदर सगळे व्यवस्थित झाल्यावर किंवा दोनतीन वर्षा नंतर मुल आणायचे असे यांचे महान विचार. तोपर्यंत प्रकृतीचा/शरीराचा आकार पार बिघडुन गेलेला असतो.*

*मग*

*मग काय? सगळे स्थिर स्थावर झाल्यावर मुलाचा विचार. ३४/३५ व्या वर्षी मुल. तोपर्यंत मुलीच्या आईचे/सासुचे वय ६० च्या पुढे. त्यांना स्वतःचेच सुधरत नाही, तर त्या काय पोरींचे बाळंतपण व पुढचे सोपस्कार काय करतील? पण करतात बिचाऱ्या स्वतःची ओढाताण करुन.*

*नंतर मग*,

*नंतर काय ? ४/६ महीन्याचे बाळ आईच्या/सासुच्या हाती देऊन चालल्या नोकरीवर. त्यांचाही नाईलाज व बाकीच्यांचाही. खरे तर वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झालेल्या चांगल्या असतात. पण यांना कोण समजवणार??.*

*म्हणुन कीं मुली आणि मुलांनो*

*सर्व मुलींनो, मुलांनो आणि त्यांच्या पालकांनोआपल्या अपेक्षा कमी करा. काहीतरी तडजोड करुन कुठेतरी थांबायला शिका हो!! आणि कुणि फोन करून चौकशी केली तर एकमेंकाना घोळवत ठेवण्यापेक्षा जे कारण असेल ते स्षष्ट सांगत चला. संसारात सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही मिळत. काहीतरी डावं उजवं होतचं.*

*आपण ज्या गावी स्थळ पाहतो त्यागावातील काही लोक खोडासाळ असतात. अशी विघ्न आणणारी माणसे चुकीची माहिती देऊन दोन्हीकडील माणसांना लग्नकार्य मोडण्यासाठी प्रयत्न करीत असतात, त्यांना मुलां/ मुलींचे चांगले झालेले पाहावत नाही म्हणून चुगली करीत असतात. त्यांचे म्हणण्यानुसार दोन्हीही बाजूनच्या माणसांनी प्रत्यक्ष पाहणी करून योग्य तो निर्णय घेऊन लग्नकार्य पूर्ण करून घ्यावे. लबाड लोकांच्यावर विश्वास ठेऊ नये. काही चुकीचे वाटल्यास स्वतः निर्णय घ्यावा.*

*सोन्याचा साठा करुन मिळविलेल्या श्रीमंतीपेक्ष्या, सोन्याहून मूल्यवान मनुष्यांचा साठा ज्याच्याकडे आहे. तोच खरा श्रीमंत....🙏*

*🌺सर्वप्रथम आपण व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. सरकारी सुचनांचे, नियमांचे व कायद्याचे पालन करा. पण लोकशाही व संविधान जिवंत ठेऊन वाचवा...!!!*

*🌺एकमेकांना अडचणीत आणु नका, त्यापेक्षा मदत करा, जमत नसेल तर निदान गप्प तरी बसा, नकोत्या उठाठेवी करू नका, वाद वाढऊ नका, दुसऱ्याच्या वहीवाट संपत्तीवर आपली समजून वागू नका, ते पाप आहे ...!!!*

*🌺समाजातील खोट्या, राजकारणी व स्वार्थी, मतलबी आणि विश्वास घातकी लोकांपासुन नेहमीच दूर रहा, खोट्या अफवानवर विश्वास ठेवण्याआधी प्रत्यक्ष खात्री करा, नेहमी सुखी, समाधानी व आनंदी राहा. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा व सतर्क रहा...!!!*

*🌺"प्रत्येकाचे जीवन, आयुष्य फार सुंदर आहे ते आनंदात जगा व दुसऱ्यांलाही आनंदी जगु द्या. स्वार्थ व अहंकार कधीही मनात ठेऊन वागू नका, वाईट व कठीण प्रसंगाची वेळ कधी, केव्हा आणि कुठे कुणावर येईल हे सांगून शकत नाही हे लक्षात ठेवा"...!!!*🙏

🌹🌺🙏🌹🌺🙏🌹🌺🙏🌹

Address

2028 B, Om Ganesha Residency, Near Bank Of Baroda, Tilak Path, Gadhinglaj
Kolhapur
416502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivahvedh Matrimony posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vivahvedh Matrimony:

Share