21/12/2022
संस्थेची स्थापना हि रोजगार मिळवण्यसाठी केलेली आहे
नवयुवकांना स्वावलंबी बनवणे व स्वतःच काहीतरी करण्यासाठी साथ देणे हि काळाची गरज आहे.
आजच्या जीवनात एखाद्याला रोजगार मिळवून देणें हे अवघड झाले आहे पण अशक्य असे नाही आपल्या माणसांची साथ असेल तर सगळं शक्य होते. आपण सर्वांनी एकमेकांना मदत करुन यामध्ये सहभाग घ्यावा. आपल्याला जर कोणत्याही सेवेचा उपभोग घ्यायचा असेल तर आपली संस्था आपल्या सेवेत कार्यरत आहे. आपल्या सहभागामुळे कुणालातरी रोजगार मिळून त्यावर त्याची उपजीविका चालेल . आपल्या सहकार्यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळेल.आजकालचे जे युवक फक्त नोकरीच्या शोधात भटकतात त्यांच्या समोर आपण एक उदाहरणं निर्माण करू त्यांना स्वयंरोजगारा बद्दल प्रोत्साहन देऊ.
नोकरी शोधण्यात वेळ घालवण्याऐवजी प्रत्येकाने स्वयंरोजगाराचा विचार करावा.