कोल्हापुर कोकण भटकंती

कोल्हापुर कोकण भटकंती Welcome to bhatkanti !! we had the vision to make a trip
we provide a Amazing traval experience w

पन्हाळापन्हाळाTeen darwaza panhala.jpgतीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळानाव  पन्हाळाउंची  ४०४० फूटप्रकार  गिर...
20/12/2016

पन्हाळा
पन्हाळा
Teen darwaza panhala.jpg
तीन दरवाजा येथील आतील द्वार, इ.स.१८९४,पन्हाळा
नाव पन्हाळा
उंची ४०४० फूट
प्रकार गिरीदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण कोल्हापूर, महाराष्ट्र
जवळचे गाव कोल्हापूर
डोंगररांग कोल्हापूर
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}
पन्हाळगड

पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.

पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला इतिहासाच्या दृष्टीने आणि आज पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या दृष्टीने महत्त्वाचा किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २ जानेवारी, इ.स. १९५४ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[१]

अनुक्रमणिका

१ भौगोलिक स्थान
२ इतिहास
३ कसे जाल ?
४ गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
५ गडावरील राहायची सोय
६ गडावरील खाण्याची सोय
७ मार्ग
८ जाण्यासाठी लागणारा वेळ
९ छायाचित्रे
१० संदर्भ आणि नोंदी
११ संदर्भ
१२ हेसुद्धा पाहा

भौगोलिक स्थान

आधुनिकदृष्ट्या थंड हवेचे ठिकाण असणारा हा किल्ला तसा निसर्गनिर्मित आहे. कोल्हापूरच्या वायव्येस १२ मैलावर समुद्रसपाटीपासून ३१२७ फूट उंचीवर आणि कोल्हापूरपासून १००० फूट उंचीवर आहे.
इतिहास
विकिपीडियातील इतिहासविषयक लेखात पाळावयाचे लेखनसंकेत[दाखवा]

पन्हाळ्याला साधारण १,२०० वर्षांचा इतिहास आहे.हा किल्ला प्रथम शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत बांधण्यात आला. हा किल्ला पूर्वी नाग जमातीतील लोकांकडे होता. याचे पहिले नाव पन्नग्नालय होते.

मुख्य पान: पावनखिंडीतील लढाई

मार्च २ १६६० ला किल्ल्यास सिद्दी जौहरचा वेढा पडला. छत्रपती शिवाजी महाराज सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकून पडले होते. गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते ६०० माणसांसकट पन्हाळयावरून विशाळगडाकडे निसटले. बरोबर शिवा काशीद (प्रति शिवाजी) व बाजीप्रभू देशपांडे होते. तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी बनून व बाजी प्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले.

१६७३ मध्ये कोंडाजी फर्जंद या बरोबर सैन्य पाठवून भेदनीतीचा उपयोग करून शिवाजीने परत किल्ला ताब्यात घेतला. पुढे १७१० मध्ये पन्हाळा कोल्हापूरची राजधानी झाली व नंतर १८४४ मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
कसे जाल ?
नकाशा

चार दरवाजा मार्गे कोल्हापूर शहरातून "एस टी' बसने किंवा खाजगी वाहनाने थेट

किल्ल्यावर जाता येते. ही वाट चार दरवाजा मार्गे गडात प्रवेश करते. तीन

दरवाजा मार्गे गडावर जाण्यासाठीचा दुसरा मार्ग तीन दरवाजातून जातो. हा दरवाजा तीन मजली असून याचे बांधकाम शिसे ओतून केलेले आहे .
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

राजवाडा- हा ताराबाईचा वाडा होय. वाडा प्रेक्षणीय असून यातील देवघर बघण्यासारखे आहे. आज यात नगरपालिका कार्यालय, पन्हाळा हायस्कूल व मिलिटरी बॉइज हॉस्टेल आहे.
सज्जाकोठी- राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोठीवजा इमारत दिसते. याच इमारतीस संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते. शिवरायांच्या गुप्त खलबते येथेच चालत.
राजदिंडी-ही दुर्गम वाट गडाखाली उतरते. याच वाटेचा उपयोग करून शिवाजीमहाराज सिद्दी जौहरचा वेढ्यातून निसटले. हीच विशाळगडावर जाणारी एकमेव वाट आहे. याच दरवाजातून ४५ मैलांचे अंतर कापून महाराज विशाळगडावर पोहचले.
अंबरखाना- अंबारखाना हा पूर्वीचा बालेकिल्ला. याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा ,यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत. यात वरी, नागली आण भात असे सुमारे २५ हजार खंडी धान्य मावत असे. याशिवाय सरकारी कचेर्‍या, दारुगोळ्याची कोठारे आणि एक टाकसाळ होती.
चार दरवाजा- हा पूर्वेकडील अत्यंत मोक्‍याचा व महत्त्वाचा दरवाजा होय. इ.स १८४४ मध्ये हा इंगज्रांनी पाडून टाकला. थोडे भग्नावशेष आज शिल्लक आहेत. येथेच "शिवा काशीद' यांचा पुतळा आहे.
सोमाळे तलाव - गडाच्या पेठेलगत हे एक मोठे तळे आहे. तळ्याच्या काठावर सोमेश्वर मंदिर आहे. ह्या मंदिराला महाराजांनी व त्याच्या सहस्त्र मावळ्यांनी लक्ष्य चाफ्यांची फुले वाहिली होती.
रामचंद्रपंत अमात्य यांची समाधी - सोमेश्वर तलावापासून थोडे पुढे गेल्यावर दोन समाध्या दिसतात. त्यातील उजवीकडची रामचंद्रपंत अमात्य व बाजूची त्यांच्या पत्नीची.
रेडे महाल- याच्याच बाजूला एक आडवी इमारत दिसते त्यास रेडे महाल म्हणतात.वस्तुतः ही पागा आहे. मात्र त्यात नंतर जनावरे बांधत म्हणून त्याला रेडे महाल म्हणत.
संभाजी मंदिर- त्याच्यापुढे ही एक छोटी गढी व दरवाजा आहे हे संभाजी मंदिर आहे.
धर्मकोठी- संभाजी मंदिरापुढे गेल्यावर ही एक झोकदार इमारत दिसते ती धर्मकोठी सरकारातून धान्य आणून येथे यथायोग्य दानधर्म करत.
अंदरबाव- तीन दरवाज्याच्या वरच्या बाजूला माळावर एक तीन कमानीची, काळ्या दगडांची वास्तू दिसते. ही वास्तू तीन मजली आहे. सर्वात तळाला खोल पाण्याची विहीर आहे, तर मधला मजला हा चांगला ऐसपेस आहे. त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकीवजा चोर दरवाजा दिसतो.
महालक्ष्मी मंदिर- राजवाड्यातून बाहेर पडल्यावर नेहरू उद्यानाच्या खालच्या बाजूस महालक्ष्मी मंदिर आहे. हे गडावरील सर्वात प्राचीन मंदिर आहे. ह्याच्या बांधणीवरून ते साधारण १००० वर्षापूर्वीचे असावे. राजा गंडारित्य भोज याचे हे कुलदैवत होय.
तीन दरवाजा- हा पश्‍चिमेकडील सर्वात महत्त्वाचा दरवाजा. दरवाज्यावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे. इ.स १६७६ मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या ६० मावळ्यानिशी किल्ला जिंकला.
बाजीप्रभूंचा पुतळा- एस टी थांब्यावरून थोडे खाली आल्यावर एका ऐसपैस चौकात वीररत्न बाजीप्रभू देशपांडे ह्यांचा आवेशपूर्ण पुतळा आहे.

गडावरील राहायची सोय

किल्ल्यावर राहण्यासाठी निवासस्थाने, हॉटेल्स आहेत.
गडावरील खाण्याची सोय

जेवणाची सोय निवासस्थानांमध्ये होते.
मार्ग
जाण्यासाठी लागणारा वेळ

कोल्हापूर मार्गे गाडी रस्त्याने १ तास लागतो

चला आता भटकंती करुया!  ऐतिहासिक आणि निसर्ग रम्य वातावरणची. घेऊन येत आहोत. खास  तुमच्यासाठी दोन दिवसांची भटकंती (family t...
18/12/2016

चला आता भटकंती करुया! ऐतिहासिक आणि निसर्ग रम्य वातावरणची. घेऊन येत आहोत. खास तुमच्यासाठी दोन दिवसांची भटकंती (family tour)........
स्थळ -
पहिला दिवस
1] महालक्ष्मी दर्शन
2] न्यु पँलेस
3] कणेरी मठ
[चहा,नाश्ता, सकाळ आणि रात्री चे जेवन(शाकाहारी /मांसाहारी ]
दुसरा दिवस
1] जोतिबा मंदिर
2] पन्हाळा किल्ला
3] सादळे मादळे केंट क्लब
[चहा,नाश्ता, सकाळ आणि रात्री चे जेवन(शाकाहारी /मांसाहारी ]
पँकेज - प्रत्येक व्यक्तीस ५००० प्रमाणे...
टिप- 1) टुर चे बुकिंग आधि 6 दिवस केले पाहिजे .
2) कमीत कमी 2 व्यक्ती बुकिंग करु शकता, (conditions apply)

बुकिंग करण्यासाठी संपर्क - 8169826694

History Of KolhapurKolhapur is one of the oldest civilizations of the country. Kolhapur's cultural history is dated back...
18/12/2016

History Of Kolhapur
Kolhapur is one of the oldest civilizations of the country. Kolhapur's cultural history is dated back to 17th Century. Situated at the banks of River Panchganga, Kolhapur is called as DAKSHIN KASHI (Kashi is a holy city in Northen India and Dakhin means South) for its spiritual history.

India’s pre independence history is in fact, history of kings and their kingdoms. Kolhapur is not different from the others, it has also seen and gone under the various regimes and since the emergence of the Marathas, the place was being ruled by the Bhonsle dynasty. Chhatrapati Shahu Maharaj was not among the male ancestor of this dynasty as he was born as the eldest son of Appasahed Ghatge [Chief of Kagal(Senior)] on 26th June 1874 and was named as Yashwatrao Ghatge. Those were the days around the Holi [an Indian Festival related with colour and usually celebrated in the months of March – April] in the year 1884, when Rani Shrimant Anandibai Raje Saheb decided to adopt him and made him Chhatrapati of the princely state of Kolhapur.

Chhatrapati Shahu Maharaj ascended the throne of Kolhapur in 1894, bringing an end to the 50 year old regency administration. His reign of 28 years from 1894 to 1922 ushered A new era of social, cultural and economic reforms for which he is remembered as one of the greatest rulers in Maharashtra.

The most benevolent and progressive rule of only 28 years from 1894 to 1922 of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur was a distinct epoch and an important landmark in the history of modern Maharashtra as it engendered a number of socio-religious movements of a revolutionary nature like the Vedokta Movement, the Satya Shodhak Movement. These movements were mainly responsible for effecting social change on a large scale and for helping the rise of new social leadership in Maharashtra. It is pertinent to note that as Chhatrapati Shahu Maharaj was the prominent central figure and the powerful moving force of these movements, he exerted tremendous influence on planning a social revival and on changing the course of social history in Maharashtra.

Address

पेठ MH09
Kolhapur
416001

Telephone

8308249090

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोल्हापुर कोकण भटकंती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share