15/10/2024
*शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! PM किसान, नमो सन्मानसाठी नवी नियमावली जारी; काय आहे नियमावलीत?*
*🌾डिजिटल शेतकरी🌾*
पीएम किसान व नमो सन्मान योजनेच्या नवीन नोंदणीसाठी सरकारकडून नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे.
वारसा हक्क वगळता ज्या लोकांनी २०१९ नंतर जमीन खरेदी केली असेल, त्यांना शेतकरी म्हणून या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तसेच पीएम किसान नोंदणी करताना पती, पत्नी व मुलाचे आधार कार्ड जोडावे लागणार आहे.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू केली. पनवेल तालुक्यात २९ हजार ५०० शेतकरी आहेत. यापैकी १० हजार ५०० शेतकरी पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत.
या योजनेतून शेतकऱ्याला तीन हप्त्यात वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात, तसेच आता राज्य सरकारनेही नमो सन्मान योजना लागू केली असून राज्य सरकारकडूनही राज्यातील शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यात सहा हजार रुपये मिळत आहेत.
या योजनेसाठी शेतकरी म्हणून कुटुंबातील पती-पत्नी यापैकी एकाला व २०१९ पूर्वी जमीन नोंद असेल, तर १८ वर्षांवरील मुलाला लाभ घेता येतो; परंतु काही पती-पत्नी व २०१९ नंतर जमीन नावावर झालेले, तसेच माहेरकडील जमीन नावावर आहे म्हणून अर्ज करून या योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे आता पात्र लाभार्थीचे निधन झाले असेल, तरच वारसा हक्काने जमिनीची नोंद झाली असेल, त्या पती किंवा पत्नीपैकी एकच या योजनेसाठी पात्र असेल. शिवाय सरकारी व निमसरकारी नोकरी नसेल अथवा कर भरत नसेल, तर अशा शेतकऱ्यांना नोंदणी करून लाभ घेता येणार आहे.
*अपात्र नसूनही लाभ*
पीएम किसान योजनेत ऑनलाइन पोर्टलवरून स्वतःच्या नावावर कोणताही सातबारा (शेती) नसताना अनेकांनी सुरुवातीपासून नोंदणी केलेली आहे, त्यांनासुद्धा या योजनेचा लाभ आजही मिळत आहे.
सोबतच कित्येकांना पती, पत्नी व काही जणांचे; तर घरात मुलांचीसुद्धा नोंदणी केली असल्याने एकाच घरात तीन ते चार जणांना या योजनेचा लाभ मिळत असल्याचे वास्तव आहे.
*नवीन अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे*
१. लाभार्थी शेतकऱ्याच्या नावाचा नवीन सातबारा.
२. अर्ज केलेल्या शेतकऱ्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा असेल, तर एकच फेरफार.
३. फेब्रुवारी २०१९ नंतर मृत्यू झाला असेल, तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार
४. पती, पत्नी व मुलांचे आधार कार्ड
५. १२ अंकी रेशन कार्ड
*शेतकरी सरकारी योजना व महत्त्वाच्या माहितीसाठी फॉलो करा*
*https://whatsapp.com/channel/0029Va6RX4T5Ejxuj4mRbF1d
Mo no 7757948028