18/12/2024
चिंच प्रक्रिया उद्योग प्रशिक्षण तेही प्रत्यक्ष उद्योगाच्या परिसरात ...
महिला असो वा युवक असो अथवा असो शेतकरी आता वेळ अली आली आहे ती शेतमालावर प्रक्रिया करून मूल्यवृद्धीची. मेहनत तुमची साथ आमची प्रमाणे वाटाड्या किमान ३० हजार ते १ लाख २५ हजाराच्या गुंतवणुकीवर घरातल्या एका कोपऱ्यात सहज चालू करण्यायोग्य उद्योग तथा मासिक किमान २५०००/- कमाई देणारा चिंच प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण आयोजित करीत आहे.
चिंच सामान्य शेतकऱ्यांचा मोठा आधार आहे. तो बहुतोपयोगी व मूल्यवान वृक्ष आहे. . असंख्य खाद्य पदार्थांमध्ये चिंचेचा उपयोग केला जातो. दक्षिण भारतात चिंच विपुल प्रमाणात दिसतात. उत्पन्नासाठी शेतीच्या बांधावर चिंचेची झाडे उगवत असतात. तो देशी भारतीय वृक्ष आहे.या सहज उपलब्ध होणाऱ्या चिंचे ला मशीनच्या साह्याने स्वच्छ करून बिया बाजूला करून चांगल्या प्रतीच्या मालाला आकर्षक व स्वस्त पॅकेजिंग तंत्राच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देता येते व उर्वरित मालावर प्रक्रिया करून कँडी, पल्प, पावडर ,आचार ,चटणी सिरप, रसाचा अर्क, रस व थंडपेय इत्यादीची निर्मिती करता येते .
चिंचेला घरगुती तथा हॉटेल व्यवसाईकांची प्रचंड मागणी आहे विशेषतः पाणीपुरी व्यवसायात तर प्रचंड मागणी आहे . अनेक खाद्यपदार्थ इंडस्ट्री मध्ये चिंच प्रक्रिया घटकाची मोठी मागणी आहे . सहज बाजारपेठेची उपलब्धता असलेला हा घरगुती उद्योग यास्तव आयोजित कार्यशाळेत पुढील घटकावर अभ्य्सापूर्ण मांडणी करण्यात येणार आहे.
१ संपूर्ण चिंच प्रक्रिया उद्योगाची संपूर्ण ओळख
२ संपूर्ण चिंच प्रक्रिया वस्तू निर्मिती प्रात्यक्षिक .
३ चिंच प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या पर्याप्त मशिनरी ओळख .
४ चिंच प्रक्रिया उद्योगाच्या सवरचानात्मक बाबी
५ अत्यल्प दरात व आकर्षक पॅकेजिंग तंत्र .
६. लघु उद्योगासाठी अनुदानासह अत्यल्प व्याज दरात वित्तीय उभारणी.
७. स्थानिक, होलसेल तथा ऑनलाईन मार्केटिंगची अभ्यासपूर्ण माहिती.
याशिवाय बरेच काही ...... प्रशिक्षणात .......
या ना त्या संपूर्ण माहितीचे प्रशिक्षण या कार्यशाळेत मिळणार आहे . आपण उत्पादित केलेल्या मालासाठी होलसेल बाजाराविषयक संपूर्ण माहिती देऊन आपल्या संपूर्ण निर्मित मालाची विक्री करण्याचे प्रशिक्षण या कार्यशाळेत दिले जाते.आतापर्यंत बऱ्याच संस्थानी वस्तूचे उत्पादन घ्यावयाचे शिकवले पण विकायचे कुठे हा मोठा प्रश्न होता पण वाटाड्याने संशोधनाअंती व यशस्वी प्रयोगांती विक्री करण्याचे तंत्र व मंत्र विकसित केले आहे.
प्रशिक्षण हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल स्वरूपात असून आपणास संस्थेचे मार्गदर्शन लाभणार आहे. फक्त इच्छुकांनीच वाटाड्या 9226467626 यांच्याशी संवाद साधावा.
चल चल पुढे गड्या ! तुझ्या सोबतीला वाटाडया !!
तुमच्या प्रतिक्षेत !!!!
वाटाड्या