Ayurved Chikitsalaya

Ayurved Chikitsalaya Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ayurved Chikitsalaya, Business service, Latur.

12/11/2023

मधुमेह- नियंत्रिण व आयुर्वेद
आपण जसे जसे सुख सुविधांनी संपन्न जीवन जगु लागलो आहोत, त्या प्रमाणात काही व्याधी मणुष्यात निर्माण होत आहेत, सध्याच्या गतिमान व धकाधकीच्या जीवन शैलीमुळे मधुमेह हा व्याधी आपल्यातीलच एक अविभाज्य घटक होउन राहिलेला आहे. मधुमेह चोर पावलांनी शरीरात प्रवेश करतो. मधुमेह झालेले लक्षात येत नाही आणि लक्षात येतं तेव्हा त्याने शरीरात चांगलेच हातपाय पसरलेले असतात. ब-याच वेळा त्याचा कोणताही त्रास जाणवत नाही पण शरीर मात्र आत मधून पोखरणे सुरु असते.
मधूमेहाची लक्षणे खालील प्रमाणे असू शकतात.
जास्त तहान लागणे.
सारखी लघवीला येणे.
जास्त भूक लागणे किंवा थकवा जाणवणे.
कोणतेही प्रयत्न न करता वजन कमी होणे.
जखम झाल्यास ती बरी होण्यास वेळ लागणे.
कोरडया त्वचेत खाज येणे.
पाय सुन्न पडणे किंवा याला मुंग्या येणे.
नजर अस्पष्ट होणे.
अशा प्रकारची लक्षणे जर आढळ्त असतील तर साध्या रक्ताच्या चाचणीद्वारे मधुमेहाचे निदान होउ शकते. मधुमेहाचं निदान झालं की, पुढील संभाव्य धोके टाळण्यासाठी तो नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. त्यासाठी योग्य आहार, विहार, व्यायाम महत्त्वाचा आहे. यासाठी योग्य मार्गदर्शन व नियमित रक्तातील साखरेची पातळी तपासणीसुद्धा गरजेचं आहे.
मधुमेहामध्ये आहार व व्यायामाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आहाराचं योग्य प्रमाण, पौष्टिकता आणि जेवणाच्या वेळा पाळणं महत्त्वाचं असतं. योग्य मात्रा व योग्य प्रमाणात आहार व शरिराच्या प्रकृतीनुसार आहार घेतल्यास वजनवाढ रोखली जाते.
दैनंदिन आहारामध्ये शरीराला आवश्यक असलेली पौष्टिकता, स्निग्धता, कार्बोदके, प्रथिनं, जीवनसत्त्वं आणि तंतुमय पदार्थ (चोथा) यांचं योग्य प्रमाण असावे लागते. मधुमेहामध्ये आहारातील चोथ्याला जास्त महत्त्वं आहे. कारण चोथ्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहायला मदत होते, आहाराची पचन क्रिया व्यवस्थित राहते.
मधुमेही रुग्णाचे वाढलेले वजन कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. आयुर्वेदिक औषधांच्या मदतीने वजन कमी करणे अत्यंत सोपे आहे. फक्त जाहीरातीच्या भुल थापांना बळी पडु नये.
आहारातील तोचतोचपणा टाळण्यासाठी आहाराच्या विविध पर्यायांचा विचार करावा. सर्वसाधारणपणे मधुमेहींना भूक सहन होत नाही. वरचेवर भूक लागल्याने ते खात सुटतात आणि वजनवाढीला बळी पडतात. म्हणूनच त्यांना नेमून दिलेल्या उष्मांकाचं अन्न दिवसभरात सहा ते सात वेळांत विभागून त्या-त्या वेळेस खाणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीर तृप्त राहतं. भूक लागल्यावर गाजर, काकडी, ताजे ताक, चुरमुरे भरपूर प्रमाणात खावी. परिणामी थकल्यासारखं वाटणं, चिडचिडणं हे त्रास उद्भवत नाहीत. शिवाय नियंत्रित उष्मांक शरीरात जात असल्याने वजनवाढीचं भयसुद्धा राहत नाही.
मधुमेहींनी आहारात काही निवडक पदार्थ वर्ज्य केले, तर त्यांचं जगणं सुसह्य व्हायला खूप मदत होईल.
साखरयुक्त मिठाई,
आइस्क्रीम,
कँडी, केक, बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ, मांसाहार
चॉकलेट इत्यादी पदार्थ टाळणं अत्यंत आवयक आहे.
त्याचप्रमाणे पिष्टमय पदार्थ असलेले बटाटे, रताळी इत्यादी पदार्थ, तळलेले पदार्थ, पनीर, चीज, खवा, लोणी मधुमेहींनी शक्यतो टाळावीच.
गोड फळं उदा. आंबा, केळी, चिकू, द्राक्षं इत्यादी फळंसुद्धा टाळणं गरजेचं आहे. त्याऐवजी संत्र, मोसंब, पेर, पपया, सफरचंद, आवळा, जांभूळ , कलिंगड ही फळं थोड्या प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावीत.
पालेभाज्या, वेलभाज्या खाव्यात. शेवग्याच्या शेंगा, चवळीच्या शेंगा खाल्लेल्या चांगल्या.
आहारात नाचणी, मूग, हुलगे, हरबरा, जुने तांदूळ, कारले, दोडका, दूधीभोपळा यासारख्या भाज्या पथ्यकर आहेत.
चपाती, भाकरीचं पीठ कोंडायुक्त असेल याकडे कटाक्ष ठेवावा.
म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं दूध वापरावं. त्याचंच दही, ताक खावं.
तेलाचा वापर फक्त फोडणीसाठी करावा. एरवी शक्यतो भाजणं, उकडणं, वाफवणं यावरच भर द्यावा.
दररोज न चुकता व्यायाम करणे सगळयात चांगले .चालणं हा उत्कृष्ट व्यायाम आहे. रोज 1 तास जलद चालण्याचा व्यायाम न चुकवता वेळ मिळेल त्या वेळी करावा. तो घरातल्या घरात, रस्त्यावर, बाग बगिच्यामध्ये, ट्रेड मिलवर कुठेही चालेल. रोज किमान ४ ते ५ कि.मी. चालावं. वजन कमी करण्यासाठी जास्त चालणं आधिक उपयोगी. मात्र त्यामध्ये प्रामाणिकपणा असावयास हवा. कोणतीही गोष्ट सातत्याने केल्यास लवकर फळास येते. चालण्याची सवय असायला पाहिजे, योग्य मार्गदर्शनाखाली योगासने करावी. नित्य बसून राहणे, दिवसा झोपणे, सकाळी उशीरा उटणे, व्यायाम न करणे या गोष्टी टाळाव्यात.
ताण तणाव रहीत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करावा. शवासन, ध्यान धारणा, प्रार्थना, संगीत, आर्ट ऑफ लिव्हिंग, आयुर्वेदातील शिरोधारा, स्नेहन-अभ्यंग याचा उपयोग करुन घेतल्याने तणाव रहीत आयुष्य जगणे सोपे जाते.
आयुर्वेदातील जांभळाचा मुख्य उपयोग मधुमेहावर होतो. मधुमेहाच्या रोग्यांनी जांभळाच्या बियांचे चूर्ण दर चार चार तासांनी एक घोटभर कोमट पाण्याबरोबर घ्यावे. असे दोन महिने घेऊन पथ्याने राहिल्यास लघवीतून साखर जाण्याचे प्रमाण बरेच कमी होते.
मधूमेह या आयुष्यभर साथ करणारया आजाराला नियंत्रणात ठेवायचे असल्यास आद्रक खा, असा सल्ला ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी दिला आहे. आल्यामुळे रक्तातील साखर आरामात नियंत्रणात राहते. याचा फायदा दीर्घकाळापर्यंत मधुमेहाच्या रुग्णांना मिळू शकतो
कडूलिंब, कारले, सप्तपर्णी, नागरमोथा, खदिर, लोध्र, गुळवेल, वड, उंबर, जांभूळ, बेल, आवळा, त्रिफला, गुडमार इत्यादी वनस्पती द्रव्ये रक्तातील साखर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच मधुमेहामध्ये वेगवेगळ्या धातूंच्या भस्मांचाही उपयोग करता येतो. उदा. वंग, नाग, जसद, लोह, रोप्य, सुवर्ण ,शिलाजित याचा सर्व प्रकारच्या प्रमेहात उत्तम उपयोग होतो. वरील सर्व चिकित्सा देत असताना या सर्व औषधांनी मधूमेह कमी होतो, हे खरे पण त्याचा परिणाम सर्व शरीरावर होण्यास काही अवधी जरूर द्यावा लागतो. प्रमेह काही रूग्णात पूर्ण बरा झाला असे दिसून येते. मात्र यासाठी आवश्यक ती चिकाटी व योग्य औषधोपचार अनेक दिवस चालू ठेवणे जरूरीचे असते. आयुर्वेदीय चिकित्सेने रक्तशर्करेचे प्रमाण अचानक एकदम कमी झाले असे कधीच घडत नसल्याने ही औषधे सुरक्षित व सहजतेने वापरता येतात. मधुमेही रुग्णांनी शरिर शुध्दिकरणासाठी आयुर्वेदातील पंचकर्मे करुन घ्यावीत. यातील स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, बस्ती या पंचकर्मांचा चांगला फायदा होत असताना दिसुन येते.
प्रत्येक मधुमेहीचा आहार, त्याचं वजन, मधुमेहाची तीव्रता आणि इतर शारीरिक आजार इत्यादी गोष्टींनुसार वेगळा असतो. त्यामुळे एक दुस-याचं अनुकरण करू नये. कोणतेही औषध घेताना डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा. आधुनिक औषधाबरोबर आयुर्वेदिक औषधी घेतल्यामुळे मधुमेहातील भविष्यात होणारे दुष्परीणाम टाळ्ता येतात. लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालयात मागील कित्येक वर्षापासुन रुग्ण आधुनिक औषधाशिवाय आयुर्वेदिक औषधीच्या मदतीने आरामात मधुमेहासोबत जीवन जगत आहेत.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड, लातुर
०२३८२ २२१३६४

12/11/2023

*जागतिक मधूमेह दिनानिमित्त*
गोड मधुमेहाची कडू लैंगिकता
मधुमेहाने कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होत जाते. मधुमेहाने प्रोलॅक्टिन रसायन वाढते. तसेच पुरुषत्वाचा सेक्स हॉर्मोन ‘टेस्टोस्टेरॉन’ही कमी होत जातो. त्यामुळे कामेच्छा केंद्रावर परिणाम होऊन ती भावना हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे मधुमेहींच्या कामसंबंधांमध्ये अंतर पडत जाते. दाम्पत्यांच्या संबंधांवरही विपरीत परिणाम होतो.
-------------------------
मधुमेहामुळे कोलेस्टेरॉलचेही प्रमाण वाढू लागते. अथेरोस्केरॉसिस वाढते. रक्तवाहिन्या अरुंद होत जातात. त्यामुळेही नपुंसकता, इरेक्टाइल डिस्फन्क्शन व योनीमार्गाच्या कोरडेपणाची समस्या लवकर येते. शरीराच्या झिजेमुळे सतत निर्माण होणारी ऑक्सिडन्ट ही रसायने अवयवांमध्ये साठून रक्तवाहिन्यांचे नुकसान फार करतात. मधुमेहामध्ये हे जास्त प्रकर्षांने घडते.
-------------------------
मधुमेहाला आटोक्यात आणणाऱ्या औषधांच्या जोडीला, मधुमेहामुळे लैंगिक रक्तवाहिन्या व लैंगिक स्नायूंवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे, लैंगिक स्नायूंचा फिटनेस कमी होत असल्याने मधुमेहाच्या औषधांबरोबरच लैगिक शक्तीवर्धक औषधी उपयुक्त असतातच, आणि समस्या नसतानाही याचा वापर केला तर मधुमेहींना फायदेशीर असतात.
------------------------
लैगिक समस्यांच्या योग्य उपचारासाठी डॉक्टरांना दाखवून उपचार घेणे हे सर्वोत्तम असते. लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय येथे लैगिक समस्यांच्या समाधानासाठी उत्तमोत्तम आयुर्वेदिक औषधी उपलब्ध आहेत.
------------------------
संपर्क-
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड, बॅक ऑफ महाराष्ट्र शेजारी
लातूर
फोन ०२३८२ २२१३६४ (कॉलर आय डी सह)
वेळ सकाळी १० ते २, संध्याकाळी ५ ते ९

शूर आम्ही सरदार..लातूर करू हिरवगार .आजराजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक.छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राणी अहि...
22/10/2023

शूर आम्ही सरदार..
लातूर करू हिरवगार .
आज
राजीव गांधी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राणी अहिल्याबाई होळकर चौक.
दुभाजका तील
तहानलेल्या झाडांना
चार टँकरद्वारे भरपुर पाणी दिलं.
प्रचंड मेहनत, प्रचंड कष्ट
आलेल्या सर्व सदस्यांचे व प्रायोजक यांचे मन:पूर्वक आभार, अभिनंदन, कौतुक.
ग्रीन लातूर वृक्ष टिम
प्रत्यक्ष कार्यावर भर देणारी टीम.

23/04/2023

#90 Days Weight Loss Challenge*
* १ मे ते ३० जुलै*
----------------------------
तुम्ही आत्तापर्यंत बरेच वेळा डाएटिंग केलं असेल पण फक्त ९० दिवसात तुमच्या शरीराला हवा तसा आकार देणं तुम्हाला जमलंय का? आमचे मार्गदर्शन तुम्हाला ते निश्चितच जमवून देईल.
डॉ. पवन लड्डा व डॉ. कविता लड्डा आयुर्वेदिक तज्ज्ञ आहेत. आमच्या १७ वर्षाच्या अनुभवातून आम्ही तुमच्या जीवनशैलीला अनुसरून आणि कोणताही क्रॅश डायट, शॉर्टकट न वापरता प्रत्यक्षात आणता येईल असा सर्वोत्तम डाएट प्लॅन तयार करून देतो. आमचे कित्येक डायट प्लॅन इंटरनेट वर व्हायरल झालेले आहेत.
----------------------------
*आमच्या डाएट प्लॅनची वैशिष्ट्यं म्हणजे*
+ वैयक्तिक गरजेनुसार, रुग्णाच्या व्यवसायानुसार, त्याच्या आजारानुसार आहारात बदल.
+ या प्लॅनमध्ये कोठेही उपाशी राहायचे नाही . खाऊन-पिऊन वजन कमी करायचे आहे.
+ तुम्हाला कोणताही बेचव आणि अनाकर्षक आहार घ्यावा लागणार नाही.
+ हे पदार्थ तुमच्या नेहमीच्या भाज्या व मसाले वापरून करता येण्यासारखे आहेत.
+ या डाएट प्लॅनमधले पदार्थ आपल्या नित्य वापरातीलच आहेत.
*याशिवाय*
+ घरी करता येण्यासारखे व्यायाम,
+ अवघड व्यायाम किंवा जिमची गरज नाही.
+ चालण्यासारखा सोपा व्यायाम
+ पोट-कंबर कमी करण्यासाठी वेगळे व्यायाम प्रकार
+ वजन कमी करण्याविषयीची माहिती
*याशिवाय महत्वाची आयुर्वेदिक औषधी*
+ वजनासोबत शरीराचे शुध्दीकरण करण्यासाठी.
+ शरीरामध्ये नवीन चरबी निर्माण थांबविण्यासाठी
+ सद्य असलेले कोलेस्टेरॉल, चरबी कमी करण्यासाठी.

*मग वाट कसली बघताय? आजच हा वजन कमी करण्याचा प्लॅन सुरू करा आणि ९० दिवसात शिडशिडीत फिगर बनवा!*
----------------------
*उन्हाळी सुट्टी मध्ये वजन कमी करण्यासाठी व उन्हाळ्यासाठी विशेष प्लॅन १ मे ते ३० जुलै पर्यंत वजन कमी करण्यासाठी विशेष पॅकेज.*
-------------------------------------
*लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय*
पद्मा नगर, बार्शी रोड, लातूर
फोन नंबर ०२३८२ २२१३६४ (कॉलर आय डी सह)
मो. ०९३२६५११६८१
---------------------------------
*मित्रांनो ही माहीती आपल्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत पोहोंचवा ही आग्रहाची विनंती*
-------------------------------

05/03/2022

जागतिक महिला दिनानिमित्त
सौन्दर्य समस्या तपासणी व मार्गदर्शन शिबिर
सोमवार दिनांक - ७ मार्च
सकाळी ११ ते ३
चेहऱ्यावर काळे डाग
तारुण्य पिटीका
वांग
Sun Tan
काळपट चेहरा
केस गळणे
अकाली पांढरे केस
चाई-टक्कल
इत्यादी समस्यांवर
मोफत मार्गदर्शन शिबिर
फंगल इन्फेक्शन, गजकर्ण, इसबगोल, सोरायसिस, कोड येणे, पांढरे डाग, सुरांबी, नागीण
अशा त्वचा विकारांवर मोफत मार्गदर्शन शिबिर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शिबीर- दिनांक ७ मार्च २०२२, सोमवार
सकाळी ११ ते दुपारी ३
स्थळ:- लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मावती देवी मार्ग, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, उदय पेट्रोल पंप मागे, पद्मा नगर, बार्शी रोड, लातूर
नाव नोंदणी करिता
मो नंबर - 9860298666

01/03/2022

जागतिक महिला दिनानिमित्त
*सौन्दर्य समस्या तपासणी व मार्गदर्शन शिबिर*
*सोमवार दिनांक - ७ मार्च*
सकाळी ११ ते ३
*चेहऱ्यावर काळे डाग*
*तारुण्य पिटीका*
*वांग*
*Sun Tan*
*काळपट चेहरा*
*केस गळणे*
*अकाली पांढरे केस*
*चाई-टक्कल*
इत्यादी समस्यांवर
*मोफत मार्गदर्शन शिबिर*
फंगल इन्फेक्शन, गजकर्ण, इसबगोल, सोरायसिस, कोड येणे, पांढरे डाग, सुरांबी, नागीण
*अशा त्वचा विकारांवर मोफत मार्गदर्शन शिबिर*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*शिबीर- दिनांक ७ मार्च २०२२, सोमवार*
सकाळी ११ ते दुपारी ३
*स्थळ:- लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय*
पद्मावती देवी मार्ग, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, उदय पेट्रोल पंप मागे, पद्मा नगर, बार्शी रोड, लातूर
*नाव नोंदणी करिता*
मो नंबर - 9860298666

25/10/2021

दिवाळीत सुध्दा पथ्य, नको रे बाबा.....................
चकली, चिवडा, शंकरपाळे, लाडू, करंजी, अनारसे या सारख्या पदार्थांचे नाव लिहता लिहताच अक्षरक्ष: तोंडाला पाणी सुटते. मग दिवाळीत बनविल्यानंतर त्यापासून दुर कसे राहता येईल. आणि कोण सांगतयं दूर रहायला?
दिवाळी असतेच कशासाठी-अभ्यंग स्नान, लक्ष्मी पूजा, फटाके, रोशनाई, सूंदर सूंदर रांगोळ्या, झेंडुंच्या फुलाच्या माळा आणि आईच्या हातचा फराळ. पण वजन कमी करण्यारया रुग्णांचा या दरम्यान हिरमोडच होतो. नाही म्हटले तरीही खाण्यापिण्यावर खुप बंधन आलेले असते. आणि ऐन दिवाळीत ही तेच नियंत्रण!. विशेषतः स्त्रियांना यादरम्यान हे नियंत्रण खुप कठीण जाते. एक तर सर्व बनवायचे दुसरयांना छान वाढायचे, आणि आपण मात्र खायचे नाही. किती हिरमुसले पणा येतो. मग या रुग्णांना डॉक्टरांनी दिलेले सर्व नितीनियम झुगारून मस्त पैकी सर्व मग फस्त करावेसे वाटते आणि नेमके होते ही असेच. आणि मग त्याचा परिणाम खुप वाईट, खुप मेहनतीने जे पाच सहा किलो वजन कमी झालेले असते ते या दहा दिवसात लागलीच दोन चार किलो ने वाढवून घेतात, आणि मग वजन काट्यावर बघुन अगदीच निराश होतात, आम्ही काही खायचेच नाही का वगैरे वगैरे नकारात्मक विचार. पण आम्ही म्हणतोय ना खा. अवश्य फराळाचा आनंद घ्या. पण जरास भान असू द्या. दिवाळी म्हणजे हेमंत ऋतूची सुरुवात. या दरम्यान जठराग्नि, निसर्गतःच अधिकच दिप्त होतो. या दिप्त झालेल्या यद्न्यात आहुतीसाठीच आपल्या पुर्वजांनी दिवाळीत अशा पदार्थांची योजना जाणुन बुझून केली. परंतू आहुतीसाठी अशा पारंपारिक पदार्थाचा विचार करावा.
शरीराला तर उर्जा मिळते परंतू मनाला सुध्दा आनंद मिळावा म्हणुन हा दिपोत्सव. सर्व नातेवाईक मित्र मैत्रिणी यांच्या सोबत फराळाचा फडशा पाडण्याची मजाच काही और परंतू फराळ करताना लठ्ठ व्यक्तीनी तारतम्य असे बाळगावे की तुम्हाला फराळ करायचा आहे ना मग भर पेट जेवण टाळा.
माहीती आहे ना लक्ष्मीपुजनाच्या दिवशी उदरपूजन, जिव्हालाड, जोरात होणार मग त्या दिवशी फराळाचा मेनू जरा बाजूला ठेऊन दिवाळिच्या विशेष मेजवानीचा आनंद अधिक घ्या. मात्र एक वेळ तरी फ्ळे-ज्युस यांना आपल्या आहारात अवश्य स्थान द्या. शेवटी फळे ही पण माता लक्ष्मी ला प्रियच आहेत ना. आणि मह्त्वाचे म्हणजे व्यायाम सोडायचा नाही. उलट एक लाडू जास्तच खायचा विचार आहे ना, मग व्यायामही थोडा अधिकच व्हायला हवा. खाल्लेला गुलाबजामून उर्जेत खर्च करायचा की चरबीच्या रुपात साठवायचा हे शेवटी तुम्ही तुमचेच ठरवा.
*निर्णय है आपका... आखिर शरीर है आपका*
So Enjoy Your Diwali Days in a Perfect Ways.
डॉ. कविता पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय,
पद्मा नगर, उदय पेट्रोलपंपामागे लातुर.
फोन 02382 221364 , मो. 9326511681

06/10/2021
02/10/2021

जुनाट आजार व आयुर्वेदिक उपचार
जुनाट सर्दी
ऍलर्जी
मूळव्याध
सोरियासिस
त्वचा विकार
केस गळणे
केसांमध्ये कोंडा
अकाली केस पांढरे होणे
मूळव्याध
फिशर
पोटाच्या तक्रारी
पित्ताशय खडा
या आजारावर
मोफत तपासणी व आयुर्वेदिक उपचार मार्गदर्शन
दिनांक - १० ऑक्टोंबर
रविवार
सकाळी १० ते ३
द्वारा-
डॉ. पवन - डॉ. कविता लड्डा
ठिकाण
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, बार्शी रोड, लातूर.
नावनोंदणी करिता संपर्क
मो-9860298666

29/09/2021

*हार्ट अटॅक*
आज जागतिक हृदय रोग दिवस
यानिमित्ताने हृदय रोग का होते व त्यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत याची थोडक्यात माहीती घेऊ या,
हृदयरोगाची कारणेः
() वाढलेले वजन
() अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित मधुमेह
() व्यायामाचा अभाव,
() कामाची बैठी पद्धत,
() कमी झालेले शारीरिक श्रम,
() फास्ट फूड – जंक फूड
() हॉटेलातील तेलकट, तिखट खाणे,
() मांसाहार, बेकरीचे पदार्थ
() रात्री उशीरा जेवण किंवा जेवणाच्या अनियमित वेळा
() स्पर्धात्मक कार्यसंस्कृतीचे ताणतणाव,
() तणाव युक्त कौटुंबिक संबंध , संकुचित मानसिक वृत्ती
() तंबाखु, सुपारी, गुटखा, सिगारेट, मद्य यासारखे व्यसन
() पंखा, एसी याचा सतत वापर, घामाचा अभाव.
() आपल्या आजारांच्या नियमित तपासण्यांचा अभाव.
यामुळे हृदयरोग आणि इतर आजार गावोगावी साथीच्या रोगाप्रमाणे पसरलेले आपल्याला दिसत आहेत.
** सध्या आपण आंधळेपणाने चुकीच्या जीवनशैलीला बळी पडत आहोत. चुकीचा आहार- विहार आणि विचार यामुळे हृदयविकारासाठी कारणीभूत ठरू शकणार्या मधुमेह, अतिरक्तदाब, लठ्ठपणा इ. व्याधींचे प्रमाणही भारतीयांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसून येत आहे. यामुळे हृदयविकाराबाबत भारतीयांनी विशेष जागरूक असण्याची गरज आहे.
** संपूर्ण शरीराला शुद्ध रक्‍ताचा पुरवठा करणे हे हृदयाचे काम. त्यासाठी हृदय अविरतपणे काम करत असते. विविध शरीरघटकांच्या साह्याने हे काम चालू असते. मात्र काही कारणास्तव या शरीरघटकांमधील संतुलन बिघडले किंवा त्यांना आवश्‍यक ती ऊर्जा मिळाली नाही, तर त्याचा परिणाम हृदयाच्या कार्यक्षमतेवर होतो आणि रक्‍तपुरवठा व्हायला हवा तसा होत नाही. अर्थातच याचा दुष्परिणाम संपूर्ण शरीरावर होतो.
** हृदयाचा झटका (हार्ट ऍटॅक) येण्यामागे रक्त वाहिन्यांतील अवरोध हे मुख्य कारण असते. अवरोध झाल्यामुळे हृदयाच्या ज्या भागापर्यंत रक्‍त पोचत नाही तो भाग झटका येऊन गेल्यावर कायमचा अशक्‍त होऊन बसतो. म्हणूनच हृदयाचा झटका (हार्ट ऍटॅक) येणे टाळणे खूप महत्त्वाचे असते. अवरोध झालेल्या वाहिन्या शस्त्रकर्माने उघडता येणे शक्‍य असले किंवा नवीन वाहिन्या टाकून हृदयाला रक्‍तपुरवठा पुरेसा मिळण्याची व्यवस्था केली म्हणजे हृदय रोगावर उपचार केले ही मानसिकता चुकीची आहे. याकरिता अवरोध होण्याची प्रवृत्ती मुळापासून बदलणे आवश्‍यक असते. प्रवृत्ती तशीच राहिली व नुसतेच शस्त्रकर्म केले तर बहुधा पुन्हा नवीन नवीन अवरोध तयार होऊ शकतात. अर्थातच दर वेळेला शस्त्रकर्म करणे शरीराच्या दृष्टीने अवघड होत जाते.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लातूर. ०९३२६५११६८१
** प्रकृतीनुरूप योग्य औषधांची योजना केली, विशेषतः पंचकर्माद्वारे शरीरशुद्धी करून हृद्‌बस्ती, हृदय धारा, जलौकावचरण सारखे विशेष उपचार करून घेतले तर त्यामुळे रक्तवाहीन्यांतील अवरोध कमी होऊ शकतो, नाहीसाही होऊ शकतो. वारंवार अवरोध होण्याची प्रवृत्ती नाहीशी होऊ शकते. हृदयाची कार्यक्षमता वाढु शकते. आयुर्वेदामध्ये दिलेल्या अनेक अनुभुत औषधांचा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाकाली उप्योग करुन घेतला तर अशा केसेसमध्ये उत्तम गुण येऊ शकतो . अत्यायीक अवस्थेमध्ये आधुनिक चिकित्सा पध्दतीचा निश्चित लाभ घ्यावा, मात्र आजार नियंत्रणात आला की आधुनिक औषधांच्या जोडीला आयुर्वेदिक औषधी, पंचकर्म, आयुर्वेदिक आहार पध्दती, आयुर्वेदानुसार राहणीमान यांचा अवलंब करावा.
या बरोबर
() वजन नियंत्रित ठेवावे
() दररोज पुरेसा व्यायाम करणे, आवश्यक ती योगासने करावी.
() व्यायाम करताना घाम येणे आवश्यक, व्यायाम हा आपल्या प्रकृतीला-वयोमानाला सोसेल या पद्ध्तीनेच करावा. व्यायाम करण्यापुर्वी योग्य डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे. आपण प्रत्येकानेच रोज नियमित व्यायाम करून, आपल्या स्वास्थाविषयी जागरूक राहिले पाहिजे.
() व्यसनांचा, मांसाहाराचा त्याग करणे
() पुरेसी निद्रा घेणे, ताण तणावापासुन नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहाणे महत्वाचे आहे.
() आपल्या आजारांची नियमित तपासणी करावी .रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवावा.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लातूर. ०९३२६५११६८१
**** जागतिक हृदय रोग दिनानिमित्त आज एकच करा, जर आपणास ह्रदय रोगांसंबंधित काही आजार असेल तर आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याकडे आयुर्वेदिक उपचाराबद्दल चौकशी करा. आधुनिक औषधांच्या सोबत आयुर्वेदिक औषधी वापरा. कारले, भोपळा, कोरफड, अर्जुन यांचा स्वताच्या मनाने किंवा कोठे वाचुन स्वतावर प्रयोग करण्यापेक्षा आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सहाय्याने औषधोपचार करा. आहार-विहार-राहणीमान-व्यायाम याबद्दल आयुर्वेदिक डॉक्टरच आपणास योग्य मार्गदर्शन करु शकतात.
डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक पंचकर्म चिकित्सालय
लातूर. ०९३२६५११६८१

18/09/2021

🤰🏻👶🏻💻🏢🤰🏻👶🏻
*नौकर दार महिलाओं की सुविधा देखते हुए Online गर्भ गर्भिणी संस्कार कार्यशाला छुट्टी के दिन आयोजित किए जा रही है I*
*3 दिन में - हर दिन 3 घंटा इस प्रकार यह कार्यशाला संपन्न होगी, महीने के तीन रविवार को यह कार्यशाला रहेगी I इच्छुक महिलाएं अपना नाम इस कार्यशाला के लिए पंजीकरण करवाने हेतु संपर्क करें I*
(कार्यशाला मराठी / हिंदी दोनों भी भाषाओं में उपलब्ध)
🤰🏻👶🏻💻🏢🤰🏻👶🏻
☎️9326511681

14/09/2021

चिकणगुणिया नंतरच्या वेदना,
नंतरचा त्रास,
अंगावरील सूज,
सांधेदुखी
अशक्तपणा
कमी करण्यासाठी
आयुर्वेदिक उपचार पध्द्ती फायदेशीर ठरतात.
शरीर शुद्धीकरण, Detox हे उपक्रम आवश्यक.
संपर्क
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
पद्मा नगर, बार्शी रोड , लातूर.
मो 9326511681

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayurved Chikitsalaya posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share