Ajinkya Career academy Latur.

Ajinkya Career academy Latur. we work together to guide students for competitive exams like MPSC and direct recruitment...

22/03/2016
Maharashtra Police Recruitment
02/02/2016

Maharashtra Police Recruitment

सर्व पोलीस भरती साठी तयारी करणा-या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिनांक 03/02/2016 रोजीच्या वर्तमान पत्रातून या वर्षीची भर...
01/02/2016

सर्व पोलीस भरती साठी तयारी करणा-या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी दिनांक 03/02/2016 रोजीच्या वर्तमान पत्रातून या वर्षीची भरतीची जाहीरात येणार 100% .
जास्तीतजास्त मित्रांना कळवा.

13/01/2016
13/01/2016

Letsup News Updates 11/01/2016

1. राजधानी दिल्लीत केजरीवाल सरकारचा सम-विषम फॉर्म्युला सुरुच राहणार, दिल्ली हायकोर्टाचा निर्णय

2. गोल्डन ग्लोब, लियोनार्डो डी कॅप्रियो याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, ब्री लार्सनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर 'द रेवनेंट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार

3. संपूर्ण देशी बनावटीचे रेल्वेचे डबे रुळावर, भोपाळमध्ये पहिली झलक, मेक इन इंडियांतर्गत बनलेल्या बोगी रेल्वेकडे हस्तांतरित

4. पूर्व मुंबईच्या विक्रांत जाधवला चारीमुंड्या चीत करीत विजय चौधरी दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी !

5. पुढील आर्थिक वर्षापासून करासंबंधी माहिती संबंधितांना ई-मेलद्वारे पाठवली जाईल!

6. पोस्टाकडून बँकींग सुविधा 2017 पर्यंत सुरू केली जाणार, केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांची घोषणा

7. यापुढे 82 वर्षे संक्रांत 15 जानेवारीलाच येणार, त्यानंतर ती 16 जानेवारीला येईल - पंचांगकर्ते

8. मूळ भारतीय असलेली 11 वर्षीय कश्मिया वाही ब्रिटनमधील बुद्धिमत्ता चाचणीत (आयक्यू) अव्वल

9. लेनोवोचा 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असलेला 'वाइब एस1 लाइट' स्मार्टफोन लाँच, किंमत साधारण 13,250, या फोनची विक्री मार्च 2016 पासून सुरु होईल

10. बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि त्याची प्रेयसी अंकिता लोखंडे या वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार!

11/01/2016

महिला व बालविकास परीक्षेसाठी प्रश्नसंच 1 :

1) 1000 पुरुषामागे महिलांची संख्या सर्वात कमी असणारी दोन राज्य कोणती ?
उत्तर :- पंजाब व हरीयांना

2) मानव विकास निर्देशांकाची संकल्पना कोणी मांडली
उत्तर :- डॉ महेबूब उल हक आणी डॉ अमर्त्य सेन

3) जागतीक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार मुलीचे वमुलांचे जन्मत: किती वजन आदर्श मानले जाते ?
उत्तर :- मुलीचे 3.100 व मुलाचे 3.300

4) महाराष्ट्र राज्यात बाल न्याय कायदा अमलात आहे. त्यानुसार राज्यातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन केले आहे?
उत्तर :- नाशिक

5) ------------ ही जगातील सर्वातमोठीशालेय आहार योजना आहे?
उत्तर :- मध्यान्ह भोजन कार्यक्रम

6) मध्यान्हीचे भोजन योजनेचा उगम कोणत्या राज्यात झाला ?
उत्तर :- तामीळनाडू

7) युनिसेफच्या मते जागतिक बालमृत्यूची सर्वातमहत्वाची तीन कारणे कोणती ?
उत्तर :- न्युमोनिया, अतिसार, मलेरिया

8) जागतिक आरोग्य संघटनेच्या आरोग्या च्या व्याख्यामध्ये कशाचा अंतर्भाव नाही ?
उत्तर :- गरीबी, निरक्षरता. मागासलेपण

9) मुले व मुली असा अभ्यासक्रमामध्ये भेद नको व मुलींचे शिक्षण ही एक विशेष समस्या समजली जावी अशी सूचना सर्वप्रथम --------------- यांच्या अहवालामध्ये करण्यात आलेली होती ?
उत्तर :- दुर्गाबाई देशमुखसमिती

10) आंतर्राष्ट्रीय महिला दिन केव्हापासून मानण्यात येतो
उत्तर :- 1975

11) उज्वला ही सर्वसमावेशक योजना असून तिचा उद्देश ------- हाआहे ?
उत्तर :- महिलांच्या अनैतिक शोषन व व्यापारास प्रतीबंध

12) महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना पुढील हक्क प्राप्त झाला ?
उत्तर :- सुरक्षित घर

13) सेवा या नावाचा परिवार 2,20,000 सदस्य व 16 संघटनानी बनलेला आहे. तो खालील पैकी कोणत्या शहरात सुरु झाला आहे ?
उत्तर :- अहमदाबाद

14) सामाजिक न्यायविभागाच्या आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजनेंतर्गत लाभदारक जोडप्यास ऐकून किती रकमेचा होतो ?
उत्तर :- रु 15000

15) महिला विकासासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या महिला व संस्था यांना ----------- हा पुरस्कार देण्यात येतो ?
उत्तर :- आहील्याबाई पुरस्कार

16) राष्ट्रीय महिला आयोगाच्या ताज्या अहवालानुसार भारतातील ------ वयोगटातील 2.4% महिला या वेश्या व्यवसायात अडकल्या गेल्या आहेत ?
उत्तर :- 15 ते 35

17) मुबई राज्यात मागासवर्गीय मुलांसाठीपहिले शासकीय वसतिगृह --------- या वर्षी सुरु झाले ?
उत्तर :-1922

18) अनाथ आणी परीत्यकत्ता माता कोणत्या घरकुलाच्या प्रमुख असतात /
उत्तर :- बालग्राम

19) इंदिरा आवास योजना कोणासाठी आहे ?
उत्तर :- ग्रामीण भागातील वर्गीकृत जाती वजमाती

20) संजय गांधी निराधार योजना
उत्तर :- निराधार जेष्ठ नागरिक

21) सामजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने ------- या नावाने वृद्धाश्रम सुरु केले
उत्तर :- मातोश्री वृद्धाश्रम

22) हुंडा\\विरोधी कायदा 1961 मध्ये करण्यात आला व त्यात ------------ मध्ये सुधारणा करण्यात आली ?
उत्तर :- 1984

महिला व बालविकास परीक्षेसाठी प्रश्नसंच 2 :

1) पोषण व नियोजनाच्या तत्वानुसार उत्पन्न गटातील व स्वास्थ स्थतीतील व्यक्ती किवा समुहातील लोकाकरीता असलेले एकत्र विज्ञान व आहार देण्याची कला ही ------- ची व्याख्या आहे ?
उत्तर :- आहार शास्र

2) भारतामध्ये सार्वजनिक आहाराच्या दर्जात सुधारणा करणाऱ्या राष्ट्रीय पोषण संस्था चे कार्यालय ------------ या शहरात आहे ?
उत्तर :- हैद्राबाद

3) राष्ट्रीय शालेय भोजन नियमात नमूद केल्यानुसार पेय म्हणून कोणत्या गोष्टीचा समावेश असावा
उत्तर :- 1/2 ग्लास दुध

4) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 मध्ये कोणाचा समावेश नाही
उत्तर :- डाळी

5) शाळेत जाणार्‍या मुलांसाठी शालेय आहार उपहार कार्यक्रम मद्रास येथे कधी सुरु झाला ?
उत्तर :- 1925

6) बाल न्याय अधिनियम 2000 अंतर्गत विधी संघर्षग्रुस्त बालकासाठी राज्यात ठीकठिकानी कोणती गृहे उभारण्यात आलेली आहे ?
उत्तर :- विशेष गृहे

7) हुंडा प्रतिबंध कायदा 1961 नुसार राज्यस्तरीय हुंडा प्रतीबंध सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण असतात
उत्तर :- गृह मंत्री महाराष्ट्र राज्य

8) हुंडा प्रतिबंध कायदा 1961 मध्ये मंजूर करण्यात' आला व त्यात ------------ मध्ये सुधारणा करण्यात आला
उत्तर :- 1964

9) संयुक्त राष्ट्रीसंघाच्या अहवालानुसार सन 2050 पर्यंत जेष्ठ नागरीकांची लोकसंख्या किती अब्ज असेल ?
उत्तर :- दोन अब्ज

10) 2011 ते 2020 हे दशक संयुक्त राष्ट्र संघटनेने कोणते उद्दिष्टे आहे ?
उत्तर :- वसाहतवादाचे निर्मुलन

11) महाराष्ट्रातील खेडेगावात बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून कोण काम करतो ?
उत्तर :- ग्रामसेवक

12) STEP ही योजना
उत्तर :- केंद्र शासनाची आहे

13) भारतात जनहित याचिकेची सुरुवात ------------ झाली ?
उत्तर :- न्यायालयाच्या पुढाकाराने

14) बालग्राम योजनेचे मुळ खालीलपैकी कोणते आहे ? "
उत्तर :- मुलांचे सरक्षन करा

15) बालमजूर कायदा 1986 नुसार ---------------- वर्षाखालील मुला- मुलीना विविध उद्योग धद्यामध्

सुरुवात: १९८७
स्वरुप:- अडीच लाख डॉलर
संस्थापक: नॉर्मन बोरलॉंग
पहिला पुरस्कार: एम. एस. स्वामिनाथन

जगामध्ये अन्नाची गुणवत्ता, उपलब्धता यामध्ये सुधारणा करून मानव विकासामध्ये योगदान देणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
२०१५ चा जागतिक अन्न पुरस्कार बांग्लादेशातील फझल हसन आबेद यांना जाहीर झाला.
त्यांनी BRAC (Bangladesh Rural Advancement Committee) या संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून लोकांना दारिद्रयापासून मुक्त करण्यासाठी त्यांनी मदत केली.
१९७१ च्या बांग्लादेश मुक्ती संग्रामातही या संस्थेने मोलाची कामगिरी बाजवली. फझल हसन आबेद यांना २०१० मध्ये रॅमन मॅगसेसे तर २००४ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाचा मानव विकास पुरस्कार प्राप्त झाला.

आतापर्यंत सात भारतीयांना जागतिक अन्न पुरस्कार मिळाला.
१) एम. एस. स्वामीनाथन (१९८७)
२) डॉ. वर्गीस कुरीयन (१९८९)
३) डॉ. गुरुदेव खुश (१९९६)
४) डॉ. बी. आर. बारवाले (१९९८)
५) डॉ. सुरिंदर वसल (२०००)
६) मोदादुगु विजय गुप्त (२००५)
७) डॉ. संजय राजाराम (२०१४)

: सुरुवात- १९६९
सरुप- ५० हजार पौंड

प्रथम पुरस्कार पी. एच. न्यूबॉय यांच्या समथिंग टू अन्सर फॉर या कादंबरीला मिळाला. ६८६ पानाची कादंबरी आहे. या कादंबरीत सात खुनाचा संक्षिप्त इतिहास आहे. त्यात किमान ७५ पात्र आहेत.

जेम्स यांची जॉन क्रोज डेव्हिल हि पहिली कादंबरी लॉसएंजल्स टाईम्स बुक प्राइज स्पर्धेत व राष्ट्रकुल लेखक स्पर्धेत होती. द बुक ऑफ नाईट विमेन या यांच्या दुसऱ्या कादंबरीला २०१० मध्ये डेटन साहित्य शांतता पुरस्कार मिळाला.

२०१५- मार्लन जेम्स (देश-जमेका)
अ ब्रिफ हिस्टरी ऑफ सेव्हन किलिंग्ज कादंबरीला.

आत्तापर्यंत पाच भारतीयांना मॅन बुकर पुरस्कार मिळाला:-
व्ही. एस. नायपॉल- १९७१- इन अ फ्री स्टेट.
सलमान रश्दी- १९८१- मिडनाईट चिल्ड्रेन.
अरुंधती रॉय- १९९७- द गॉड ऑफ स्मॉल थिंग.
किरण देसाई- २००६- द इन हेरिटेन्स ऑफ लॉस.
अरविंद अडींगा- २००८- द व्हाईट टायगर.

मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार २०१५:-

सुरुवात- २००५- दर दोन वर्षांनी दिला जातो.
स्वरुप- ६० हजार पौंड.

आतापर्यंतचे मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्कार
१) इस्माइल कदारे- २००५- अल्बानिया
२) चिनुआ अचेबे- २००७- नायझेरिया
३) अॅलीस मुन्रो- २००९- कॅनडा
४) फिलीप रोथ- २०११- अमेरिका
५) लिडिया डेव्हीस- २०१३- अमेरिका
६) लास्को क्रस्नाहोकही- २०१५- हंगेरी

11/01/2016

चालू घडामोडी (11 जानेवारी 2016)
चालू घडामोडी (11 जानेवारी 2016) :

जळगावच्या विजय चौधरीने दुसऱ्यांदा पटकावला "महाराष्ट्र केसरी" किताब :

गतविजेत्या जळगावच्या विजय चौधरी याने मुंबईच्या विक्रांत जाधवला चितपट करत दुसऱ्यांदा प्रतिष्ठेचा "महाराष्ट्र केसरी" किताब पटकावला.
किताबाच्या आजपर्यंतच्या 42व्या लढतीत डबल महाराष्ट्र केसरी ठरलेला विजय पाचवा मल्ल ठरला.

चंद्रावरील गावांची कल्पना सत्यात :

चंद्रावर गाव वसविण्याच्या तयारीत शास्त्रज्ञ असून, चांद्रभूमीवरील गावाचे स्वप्न 2030 मध्ये सत्यात उतरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.
चंद्रावरील गावांची कल्पना सत्यात उतरण्यासाठी 2030 उजाडणार असले, तरी त्यानंतर या गावांचा अभ्यास मंगळमोहीम व इतर अवकाश मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पासाठी अमेरिकेतील नॉट्रे डॅम विद्यापीठातील युवा शास्त्रज्ञ व रोबोटिक यंत्रणांच्या साह्याने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक :

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडच्या कॉलिन मुन्रोने अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक झळकाविले. ट्वेंटी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान अर्धशतक आहे.
जगातील सर्वांत लहान मैदानांपैकी एक असलेल्या ऑकलंडमधील मैदानावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 142 धावा केल्या होत्या.

इंटरनेटवर 50 कोटी नवे ग्राहक जोडणार :

केंद्र सरकारने घोषणा केलेल्या डिजिटल इंडिया मिशनला गती देण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू केले असून आगामी सहा महिन्यांत नवे 50 कोटी इंटरनेट ग्राहक जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू असल्याची माहिती केंद्रीय दूरसंचार मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी दिली.
डिजिटल इंडिया म��

Address

Latur
413512

Telephone

+91 99221 91797

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ajinkya Career academy Latur. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share