पाटील अँग्रोटेक,माहुर

  • Home
  • India
  • Mahur
  • पाटील अँग्रोटेक,माहुर

पाटील अँग्रोटेक,माहुर शेती करणे काळाची गरज.....

06/09/2017
10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलंअकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं ध...
26/05/2016

10 एकर जमीन विकली, पठ्ठ्याने गावासाठी धरण बांधलं
अकोला जिल्ह्यातील संजय तिडके या शेतकऱ्याने जिद्दीच्या जोरावर चक्क छोटं धरण बांधलं आहे. यामुळे इथली शेकडो एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. विशेष म्हणजे सरकारी यंत्रणेने वारंवार खोडा घालून हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण तिडकेंनी आपले भागिरथ प्रयत्न थांबले नाहीत.

इथलं शिवार जलयुक्त करण्याची जिद्द, दुष्काळाला हरवण्याची जिद्द, सगळीकडे हिरवळ निर्माण करण्याची जिद्द आणि संजय तिडके यांच्या याच जिद्दीतून हा बंधारा उभा राहिला आहे.

सांगवी दुर्गवाडाच्या संजय यांची 80 एकर जमीन. दरवर्षीच्या पावसात पीक आणि माती वाहून जायची. तर उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा. यावर कायमचा पर्याय म्हणून शिरपूर पॅटर्नचा बंधारा बांधण्याचा निर्णय झाला. आसपासच्या शेतकऱ्यांनीही साथ दिली. काम सुरुही झालं. मात्र अवैध वाळू उपसा करण्याचं कारण देत प्रशासनाने कामात खोडा घातला.

दरवर्षीचा प्रश्न सोडवण्यासाठी बंधाऱ्याचं काम सुरु केलं. मात्र अवैध वाळू उपसा करता असं सांगत प्रशासनाने काम थांबण्याचा इशारा दिला. माझ्याकडे रॉयल्टी आहे तरी हा खोडा, असं संजय तिडके म्हणाले.

प्रशासनाच्या भितीपोटी शेतकऱ्यांनी साथ सोडली, काम थांबलं. मात्र अशातही ध्येयवेड्या संजय यांनी माघार घेतली नाही. त्यांनी स्वत:ची दहा एकर जमीन विकली. पैसा उभा केला आणि थांबलेलं काम पुन्हा सुरु झालं.

सध्या 18 फूट उंच आणि 260 फूट लांब भिंतीचं काम पूर्ण झालं आहे. खोलीकरणाचं काम अंतिम टप्प्यात आहे. या कामासाठी आतापर्यंत 20 लाख खर्च झाले आहेत.

सगळ्यांनी साथ सोडली तरी यावर संपूर्ण गावाचा हक्क आहे. सर्वांनी फुकट पाणी घ्याही त्यांची प्रामाणिक प्रतिक्रिया. पण आता जे कामात खोड़का घालत होते तेच कामाच श्रेय आपल्या पात्रावर ओढण्या साठी आम्हीच सर्व काही चा देखावा करत आहेत. आता मला माहित आहे की या कामावर सरकार आयत्या पिठावर रेषोट्या ओढायला येईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया संजय तिडके ह्या पाणीदार माणसाने दिलीआहे.
🙏नमन ह्या भगिरथाला 🙏

07/04/2016

आमच्याकडे थायलंड संशोधित कमी पैशात जास्त उत्पादन देणारे अँपल बोर मिळेल, तसेच NHR 1 Kg वजन पेरु, थाई फणस, सिताफळ, संञी, मोसंबी रोपे योग्य दराने मिळतील ..
संपर्क:
विनीत देवकुमार पाटील
कमल नर्सरी हरडफ,
पाटील अँग्रोटेक माहुर
मो.नं- 9423703100
9405380802
02460268800

30/03/2016

बोअर पुनर्भरण :
=============
आपल्या बोअरवेलजवळ ५ X५ आणि ७ फुट खोलीचा आधुनिक शोषखड्डा सांगितल्याप्रमाणे शोषखड्डा तयार करून घ्यावा.
छतावरील पाणी पाईपद्वारे या शोष खड्यात सोडून द्यावे. छतावरील पाईपच्या तोंडाला जाळी बसवून घ्यावी .जेणेकरून कचरा पाईपमधून आत जावून जाम होणार नाही . पाऊस पडल्यानंतर छताची साफसफाई करून घ्यावी.

घरासाठी ५ x ५, खोली ७ फुट खड्डा (जागा असेल तर ६ x ६ ,खोली जरा जास्त ८-१० फुट घेतली तरी जास्त पाणी मुरवण्याची क्षमता निर्माण केली जावू शकते.) घेवून त्यात वरच्या बाजूला छिद्रे पाडलेली दीड ते तीन फुट व्यासाची सिमेंटची टाकी अथवा रांजन मध्यभागी ठेवावी. जर माती ,बारीक काही कचरा जरी पाण्यातून आला तर तो या टाकीत जमा होईल. जो आपण दोन-तीन वर्षातून एकदा साफ करून घेवू शकतो.
बाजूने मोठे दगडगोटे, खडी,कोळसा ,वाळूचा थर दिला जातो. याद्वारे पाणी गाळले जाईल.

छतावरून पाईप खाली घेवून त्याचे तोंड या सिमेंटच्या टाकीत सोडावे आणि टाकीवर झाकण अथवा फारशी ठेवून बाजूने दगडगोटे, रेती टाकून लेवल करून घ्यावी. यावर प्लास्टिकचे अच्छादन टाकून वर फरशी ठेवून द्याव्यात जेणेकरून आत माती जाणार नाही.
बाजूने दोन ते तीन वीट थराचा कठडा करून घेतला तर बाहेरील दुषित पाणी आतमध्ये जाणार नाही आणि केवळ छतावारिलच स्वच्छ पावसाचे पाणी पिटमध्ये जाईल.

अशापद्धतीने केलेल्या शोषखड्यातून पाणी गाळून जमिनीत मुरले जाईल.
हि बोअरवेलमध्ये पावसाचे पाणी सोडण्याची सुरक्षित पद्धती आहे.

बोर पुनर्भरण केल्याने पावसाचे वाहून जाणारे पाणी हे जमिनीत मुरवले जावून आपले बोर रिचार्ज होण्यास मदत होते.पाण्याची पातळी वाढते. ज्यांनी बोर पुनर्भरण करून घेतले आहे त्यांना या दुष्काळात बराच फायदा झाला आहे.

आपणाकडे बोर नसले तरी छतावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी याच पद्धतीने जमिनीत मुरवून जलपुनर्भरण करू शकता.
पाण्याचा प्रत्येक थेंब मुरवणे हि काळाची गरज आहे. हि आपली जबाबदारी आहे. यासाठी सरक्रावर विसंबून न राहता प्रत्येकाने हे आपले कर्त्यव्य समजले पाहिजे. आपले घरातील कोणतेही कार्य करताना आपण सरकारची वाट पाहतो का ? मग हे पण आपले कार्य समजून प्रत्येकाने जलसाक्षर झालेच पाहिजे.
पाण्याचा वापर जपून करा. पाण्याचा अपव्यय टाळा.
जलसाक्षर व्हा ! जलसाक्षर करा !!

पाणी अडवा ! पाणी जिरवा !!
#आम्ही_शेतकऱ्यांचे_पोरं

भाजी व फळे अशा अनेक गरजू महिलांकडून किंवा माणसांकडे घ्या.कारण ते श्रीमंत होण्यासाठी नाही तर त्यांना पोट भरण्यासाठी संघर्...
15/03/2016

भाजी व फळे अशा अनेक गरजू महिलांकडून किंवा माणसांकडे घ्या.

कारण ते श्रीमंत होण्यासाठी नाही तर त्यांना पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो.

19/08/2015

पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद नांदेड द्वारा माहुर तालुका कार्यकारणी निवड..
माहुर(प्रतिनिधी):दि.19. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद नांदेड द्वारा जिल्हाअध्यक्ष भागवत देवसरकर, जिल्हा कार्याध्यक्ष विनीत देवकुमार पाटील यांनी माहुर तालुका पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील नांदेड द्वारे खालील कार्यकारणी घोषित केली आहे, त्यामध्ये जिल्हा संघटक अविनाश टनमणे, ता.अध्यक्ष श्रिकांत(सोनू)पाटील शिंदे, ता.उपाध्यक्ष योगेश डाखोरकर, शहराध्यक्ष शिवशंकर थोटे,ता.कार्याध्यक्ष अमोल शिंदे हडसणीकर, ता.संघटक नितीन हातमोडे तर सदस्य पदी धम्मपाल मुनेश्वर, स्वप्निल जाधव हडसणीकर,आश्विन नायके,अभिजित टनमणे, ज्ञानेश्वर चौधरी,राहुल राऊत,आचल गेंटलवार, महेश राऊत, विशाल पवार आदीची निवड घोषित केली असून वरील कार्यकारणीचे अभिनंदन माधवराव पाटील, देवकुमार पाटील,संदिप पडलवार,आकाश गिरी,जितू उपलेंछावार, आदीनी केले आहे. तसेच पद्मश्री डाँ.विठ्ठलराव विखे पाटील कृषि परिषद नांदेडच्या वतीने नांदेड येथे भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा व शेतकऱ्यांचा गौरव सोहळा दि.३०/८/२०१५ रोजी कुसुम सभाग्रह येथे आयोजित केला आहे. याचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा कार्याध्यक्ष विनीत देवकुमार पाटील ह्यांनी केले आहे.

21/03/2015

जय जिजाऊ ....
आजचा कृषि सल्ला ...
मार्च महिन्यात गारपीट आणि पाऊस हा हवामान बदल महाराष्ट्रात जाणवत आहे. अशा वेळी शेतात वाजवीपेक्षा अधिक पाणी साठवल्यास खरबूज पिकाची फळे उकलतात. त्यासाठी शेतात पाँलिमल्चिंग करुन शेतात पडणारे पावसाचे पाणी उताराच्या दिशेने शेताबाहेर काढणे गरजेचे आहे. येत्या काळात भविष्यात पाँलिहाऊसमधील शेती फायद्याची ठरणार आहे.
धन्यवाद ...
विनीत देवकुमार पाटील
पाटील अँग्रोटेक माहुर

19/03/2015

जय जिजाऊ ..
आजचा कृषि सल्ला ...
हवामान बदलामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकरी वर्गाने हवामान अंदाजाची माहिती घेऊन त्यानुसार शेतीतील कामांचे नियोजन केल्यास शेतीतील धोके करणे शक्य होईल. त्यासाठी विविध माध्यमाद्वारे दिले जाणारे हवामान अंदाज ऐकणे, वाचणे आणि त्यानुसार शेतातील कामाचे नियोजन करावे.
धन्यवाद ...
विनीत देवकुमार पाटील
पाटील अँग्रोटेक माहुर

18/03/2015

जय जिजाऊ
आजचा कृषि सल्ला ...
शेतक-यांची चंची
बाजरीपासून कीटकनाशक तयार कराः-
आपण कीड नियंत्रण प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर रसायनांचा वापर करतो. हा वापर सर्वात जास्त भाजीपाला पिकामध्ये पहावयास मिळतो. भाजापिकांमध्ये सर्वात मोठी समस्या ही सर्व प्रकारच्या अळ्यांची असते. त्यांचे नियंत्रणासाठी सकाळी आपण त्यावर औषधांचा वापर करतो व दुपारी तीच भाजी आधी आपण घरी खातो व नंतर बाजारात विक्रीसाठी नेतो. अशा परिस्थितीमध्ये आपण या कीटकनाशकांच्या सतत संपर्कात राहतो. यामुळे विविध व्याधी आपल्या मागे लागलेल्या असतात.
यासाठी स्वतः स्थानीक पातळीवर औषध तयार करता आले तर उत्तम म्हणून एक बाजरीपासून तयार करावयाच्या अळीनाशकाबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. यासाठी एक किलो बजरीचे पीठ, एक १५ लिटरचा छोटे तोंड असलेला तेलाचा किंवा डालड्याचा डब्बा व १० लिटर पाणी ही सामुग्री लागते. एक किलो बाजरीचे पीठ १० लिटर पाण्यात चांगले मिसळून घ्यावे. तयार झालेले मिश्रण १५ लिटरच्या डब्यात टाकावे. डब्ब्याचे तोंड झाळून घ्यावे किंवा ते हवाबंद करण्यासाठी एक चांगले झाकण त्यावर लावावे. हा डब्बा आपल्या उखंड्याच्या (शेणखत टाकण्याची जागा) मध्यभागी ४ ते ५ फुट खोल पुरावा. हा कालावधी साधारण ५० दिवसांचा असतो. यानंतर उखंड्यातून डब्बा बाहेर काढल्यानंतर त्यातील औषध सरळ फवारणीसाठी वापरता येते. डब्ब्यातील बाजरी पिठापासून तयार केलेले औषध २ मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात घेवून फवारणी करावी. या औषधामुळे मोठ्यात मोठ्या अळींचा नाश करण्याची क्षमता आहे. करून तर बघा. काय होईल डब्बा, बाजरीचे पीठच वाया जाईल. केल्या शिवाय समजणार नाही. शेतकरी बटव्यातील हे एक सुंदर कीटकनाशक आहे.
धन्यवाद ..
विनीत देवकुमार पाटील
पाटील अँग्रोटेक माहुर

16/03/2015

जय जिजाऊ ...
*कविता*
आम्ही शेतकऱ्याचे पोरं ...

कोसळ कितीही,बरस कितीही;
आम्ही शेतकऱ्याचे पोरं,
पोलादाची छाती आमची,
बघशील जेवढा अंत आमचा,
तितक्याच जोशात राहीन उभा,
का नाद करतोस आमचा???

'अरे थकशील आमची परीक्षा घेऊन,
आम्ही शेतकऱ्याचे पोरं,
भीत नाही मरणाला,
जगु पण याच मातीत,
मरु पण याच मातीत,
रडलो खूप,
पण आता लढून बघूया,
जिंकलो तर राजा,
नाही तर निदान
या महाराष्ट्राची माती होऊया...!!!
- एक शेतकऱ्याचा मुलगा....
धन्यवाद ..
विनीत देवकुमार पाटील
पाटील अँग्रोटेक माहुर

15/03/2015

जय जिजाऊ ....
आजचा कृषि सल्ला ...
पेरु, अँपल बोर, सीताफळ, डाळिंब या झाडांची बहारापूर्वी छाटणी करुन प्रत्येक झाडाच्या वाढीस पुरेशी जागा मिळेल, अशा बेताने त्याचा आकार ठेवावा, त्यामुळे झाडावर नवीन फुटवा येऊन चांगले उत्पन्न मिळते. बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते, त्यामुळे फळांची प्रतवारी सुधारते व रोग किडही कमी होते. छाटणी करताना जमिनीलगतच्या फांद्यासह रोगग्रस्त फांद्याचाही नायनाट करावा.
धन्यवाद ...
विनीत देवकुमार पाटील
पाटील अँग्रोटेक माहुर

Address

Op-BusStand Mahur
Mahur
431721

Telephone

+919405380802

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाटील अँग्रोटेक,माहुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to पाटील अँग्रोटेक,माहुर:

Share